भूतबाधा

भूतबाधा?

Submitted by किल्ली on 31 October, 2018 - 10:44

कामाचा प्रचंड लोड उपसत व ऑफिसच्या बदलत्या वेळा सांभाळत आकाश दमून जायचा. कधी रात्रपाळी, तर कधी अर्धा दिवस अर्धी रात्र अशी वेळ गाठावी लागे. उशिरा घरी येणे नेहमीचेच झाले होते. जनसामान्यांची संध्याकाळ म्हणजे त्याची ऑफिसला जायची वेळ असे. शेजाऱ्यापाजाऱ्यांना तो क्वचितच दिसे. त्यामुळे त्याची आजूबाजूच्या लोकांशी फक्त तोंडओळख होती. पण कामाच्या अनियमीत वेळा ही एक गोष्ट सोडली तर काम, पगार आणि कंपनी चान्गली असल्यामुळे ही कंपनी सोडण्याचा सध्या तरी त्याचा काही विचार नव्हता. एकंदरीत त्याचं बरं चाललं होतं. लग्नबिग्न झालेले नसल्यामुळे कधीही आलं गेलं तरी वाट पाहणारं आणि कारण विचारणारं कोणी नव्हतं.

विषय: 

बाधित बहिण

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 March, 2016 - 10:57

दत्ताच्या मंडपी होताच जागर
आले अंगावर वारे तिच्या
पंधरा वर्षाची बाधित बहिण
करीतो राखण भाऊराया
झेलितो तिजला पडताच खाली
वस्त्रे विस्कटली नीट करी
गरगरा जाता धावतो मागुती
सांभाळे स्वहाती फुलापरी
तया आरतीची शुध्द ना गर्दीची
चिंता बहिणीची सर्वकाळ
डोळ्यात वेदना मळभ दुःखाचे
अकाली उद्याचे प्रौढपण
कुणाची परीक्षा असेही कळेना
विचित्र जीवना खेळ कैसा

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Subscribe to RSS - भूतबाधा