बाधित बहिण
Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 March, 2016 - 10:57
दत्ताच्या मंडपी होताच जागर
आले अंगावर वारे तिच्या
पंधरा वर्षाची बाधित बहिण
करीतो राखण भाऊराया
झेलितो तिजला पडताच खाली
वस्त्रे विस्कटली नीट करी
गरगरा जाता धावतो मागुती
सांभाळे स्वहाती फुलापरी
तया आरतीची शुध्द ना गर्दीची
चिंता बहिणीची सर्वकाळ
डोळ्यात वेदना मळभ दुःखाचे
अकाली उद्याचे प्रौढपण
कुणाची परीक्षा असेही कळेना
विचित्र जीवना खेळ कैसा
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय: