अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळेत असतांना माझी बहीण (ती साधारण ५/६ वी त असेल) शाळेच्या शौचालयात गेलेली. हे शाळे पासुन जरा बाजुला होते आणि रेगुलर च बांधकाम चालु होत म्हणुन हे तातपुर्त बनवल होत. बहीण शाळा चालु असतांना गेली होते तेव्हा कोणीच नव्हत. तिच्या मते तिने काहीतरी बघितले बाथरुम च्या झरोक्या सारख्या खिडकीत. ती प्रचंड घाबरली, पळत पळत शाळेत आली. त्या १५/२० मिनीटात तिला ताप आला तसच ती थर थर कापत होती. तसच तिला घरी आणल आणि डॉक्टर ला बोलवल. डॉकने काही औषधं देउन झोपवल. दिसर्या दिवशी सकाळी उठल्यावर ती नॉर्मल झाली.

तिला खिडकी बाहेरच्या झाडांच्या सळसळण्यामुळे कोणी असल्याचा भास झाला किंवा खरच कोणी (मानव) डोकावल असेल. Happy

@ नानाकळा,Chocolateboy,राया भारि अनुभव
पण त्यापेक्षा अ ३ यांच हसणं जास्त अमानविय वाटलं Proud Sad
Bw

मी ऐकलेला किस्सा. एक गुजराती फॅमिली बस करून महाबळेश्वर फिरायला आलेली होती . अक्खी फेमिली म्हणजे पन्नास एक जण होते . त्यांनी एक ड्राइवर ठेवला होता. त्याने नॉन स्टॉप गुजरात पासून महाबळेश्वर गाडी चालवली होती. इथे आल्ग वर त्याने थोडा वेळ थाम्बायची विनंती केली . कारण दुसरा ड्राइवर न्हवता. पण त्यांनी गाडी rent वर घेतल्या मुळे आणि पुढच्या वेळे साठी त्यांना एक्ट्रा भाडे लागणार होते म्हणून त्यांनी नकार दिला. ड्राइवर ला तस शक्यच नसल्यामुळे त्याने थोडी बडबड केली म्हणून त्या लोकांनी त्याला च मारला. आणि तशी च गाडी चालवायला लावली. पुढच्या प्रवासात त्यच्या डोक्यात तेच होत. त्याने मग प्लान केला एक खतरनाक. तिथल्या हाइवे वरून एक turn होता तिथून थेट गाडी दरीत सोडून दिली आणि त्याने साईड ला उडी मारली. व घाबरुन स्वतः पोलीस स्टेशन ला पळत गेला व सगळं सांगितलं. पण ती फेमिली अक्खी डेड झाली होती . आणि नंतर त्या वळणावर लोकांना भूताटकी चे अनुभव आले खूप

अरे वा Happy आज बर्‍याच दिवसांनी किस्से रंगलेत इथे. हॉस्टेल वाला अनुभव चांगलाच खतरनाक होता. वरचा ड्रायव्हर चा किस्सा ऐकून वाईट वाटलं मात्र.

अजून एक महाबळेश्वर चाच किस्सा . ऐकलेला .
एक कपल तिथे एका लॉज वर थांबले होते . आणि रात्री च्या वेळी अचानक दरवाजा तोडून कोणी तरी माणसांनी त्या दोघांचा एनकाउंटर केला . गोळी गोळी मुलाला मारली होती ती आरपार जाऊन मुलीच्या पण डोक्यात घुसली. तिथे मग त्यांची पण भूत झाली. आज पण त्या रूम मधे कोणी जात नाही तरी पण तिथून फोन वगेरे येतात चहा पाठवून द्या वगेरे

बापरे !
एकदिन में कितना डराओगे Sad

महाबळेश्वर येथे वाई पाचगणी मधे खूप भुताटकि होते असं ऐकलं आहे. कोणाला काही अनुभव ??
>>
एका घराची कथा ऐकून होते. त्यात घरात रेशन भरलं की संपायचं. वगैरे वगैरे. पुढे तो वाडा एकांनी विकत घेतला.
बांधकाम करताना त्यांना वाड्यात मोठा पेटारा सापडला. उघडल्यावर त्यात मातीचे नाग भरलेले होते. ह्यांनी ते टाकून द्यायला सांगितले. काही दिवसातच बाईक चालू करताना - ती चालू होऊन ब्रेक न लागून गाडी सरळ उतारावरून गेली आणि नदीत पडली. गृहस्थ गेले.
योगायोग का काय मला माहित नाही.

हे गृहस्थ माझ्या वडिलांचे मित्र होते आणि अनेकदा भेटले आहेत मला (अर्थातच पूर्वी :))
ते गेल्याचं एकदा होस्टेल वरून परत गेल्यावर कळलं आणि सोबतच त्यांनी **चा वाडा घेतलेला आणि बाकीची माहितीही कळली.
वाड्याचा पूर्वेतिहास ऐकला होता आधीच.

हा अनुभव मी पूर्वी इथे कुठेतरी दिलेला आहे माबोवर. परत देतोय आठवतोय तसा.

सन १९७९
सातार्‍यातील पोवईनाक्याजवळील एक हॉटेल, तिथे माझा एक लांबचा नातेवाईक मेडिकल रिप्रेझेन्टेटिव उतरलेला होता.
मी असाच दुपारचा त्याला भेटायला गेलो. तेव्हा मला खोलीतच थांबवुन, तो जरा बाहेर गेला.
खोलीच्या खिडक्या बंद होत्या, तसेच पंखाही चालू नव्हता.
खोलीत एक जुन्या पद्धतीचा हँगिग आरसा होता लाकडी फ्रेममधे, आरशा च्या दोनही बाजुने दोन उभ्या पट्ट्या, त्यास तो आरसा मधोमध बसवलेला जेणेकरुन त्याचा कोन सेट करता येईल.
मी जेव्हा आरशाकडे बघितले, तेव्हा तो जमिनीकडे कललेला असा होता.
मधेच मी उठुन खोलिला अ‍ॅटॅच्ड टॉयलेटकडे जाऊन आलो. आत मधे असताना मला आवाज ऐकु आला खुडबुडीचा.
मी तत्काळ बाहेर आलो, खोलीत अर्थात कोणीच नव्हते.
मग सहज आरशाकडे लक्ष गेले, त्याचा कोन बदलुन तो आभाळाकडे झाला होता.
मी फारसा घाबरलो नाही...
मधेच अति क्युरॅसिटीमुळे आभाळाकडे बघणार्‍या आडव्या आरशाला सरळ उभे करुन ठेवले व त्यात काही दिसते का ते घाबरत घाबरत बघितले....
काहीच्च नव्हते... मीच दिसत होतो.
असेल कुणी चावट भूत, आरसा हलवुन मला भिती दाखवु पहातय असे मनात म्हणले, देवाचे नाव घेतले, अन त्या रिलेटीव्हची वाट बघत बसलो पुढचा अर्धा तास तिथेच.

अजून एक महाबळेश्वर चाच किस्सा . ऐकलेला .

>> ऐकलेलाच ना? मग चालू द्या चालू द्या.
पुड्यासोडण्याचा च बीबी आहे. मनसोक्त हाणा....

अ३ - तुम्हीपण सोडा कि पुड्या नुसत्याच काय त्याचा त्याच कंमेंट्स टाकताय... पाहूतरी तुम्ही कल्पना शक्ती ...

अच्चा म्हनजे तुम्ही जे सांगताय तो तुमच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे तर..... Wink

आमच्या नातेवाईकांनी सांगितलेली खालील सत्य घटना :

एक नवरा बायको एका गावी एका लग्नाला उपस्थित राहाण्यासाठी गेले. त्या गावी दोघे प्रथमच जात होते. लग्नाच्या आदल्या रात्री सीमांत पूजन असते. ते रात्री उशीरापर्यंत चालते. साधारण मध्यरात्रीच्या सुमारास ती स्त्री काहितरी कचरा वगैरे फेकण्यासाठी कार्यालयापासून थोडे दूर एका निर्जन ठिकाणी गेली. आणि जेव्हा परत आली तेव्हा ती झपाटली गेलेली होती आणि वेगळ्याच गोष्टी बडबडायला लागली होती.

" माझे तुम्ही तुकडे केले आणि मी तुम्हाला सोडणार नाही" वगैरे.

नंतर स्थानिक लोकांकडून कळले की त्या जागी एका बापाने मुलीला निर्दयपणे तुकडे करून गाडले होते कारण ती तीच्या मित्रापासून गर्भवती होती. ही स्त्री त्या गावी पहिल्यांदा आली होती आणि तीला त्या बापा ने मुलीला मारण्याच्या घटनेबद्दल आधी माहिती नव्हती. मग हा प्रकार मल्टिपल पर्सनॅलिटी चा नक्की नाही. ( अक्षयकुमारच्या'भूल भूलैया' चित्रपटा प्रमाणे )

मग या मागचे कारण काय ?

अ३, एखाद्या झपाटल्याच्या घटनेला अख्खा गाव साक्षिदार असेल तर?

माझ्या काकाला ५ भुतांनी एकत्र झपाटलं होतं. ते पाच भाऊ होते त्यांना मालमत्तेच्या वादातून एका वडाच्या झाडाला एकाच वेळेस फाशी देऊन मारले होते. ही घटना म्हणजे त्यांच्या मरण्याची शंभर वर्षाआधीची.. ती भुतं शंभरवर्ष पुरानी होती. माझा काका एका रात्री परगावाहून येत असतांना त्याच वडाच्या झाडाखाली थांबला लघुशंकेला, वय त्याचं त्यावेळी असेल २०-२२ वर्षी. नंतर तो गावात आला तेव्हा विचित्र वागत होता. पाच जणांचा आवाज एकत्र निघत होता त्याच्या तोंडातून... एकदम मोंजोलिका. त्यांनीच सर्व ष्टुरी सांगितली, अख्खा गाव गोळा झाला होता. ते मारवाडी-जैन वगैरे हिंदीभाषिक भुतं होती. हिंदीत बोलत होती. देवभोळी होती. त्यांनी देवाचं भरपूर करणार्‍या आमच्या मोठ्या काकांच्या घरचं जेवण घेतलं फक्त. बर्‍याच गमती-जमती केल्या. नंतर ते परत त्याच झाडावर निघून गेले. भयंकर वगैरे काही नव्हते. काकाला दोन दिवसांनी जाग आली तेव्हा तो विचारत होता मी तर झाडाजवळ लघवी करत होतो, इथे कसा आलो?

ही कथा माझ्या सर्व नातेवाईकांनी जे तिथे हजर होते, एक मात्रा-वेलांटी इकडे तिकडे न करता सांगितलेली आहे. मी इथे परत सांगतांना स्वैर सांगितली कारण मला आठवत नाही पूर्ण. मी दहा-बारा वर्षांचा असतांना ही ऐकलेली. आधी बाबांकडून, मग गावी गेल्यावर काकांकडून, मग आजी-आजोबाकडून.... सर्वांना वेगवेगळ्या वेळी विचारलेले, सर्वांची उत्तरे एकसारखीच.

ही पण पुडी असेल. जौ दे.

पुढे माझा स्वतःचा अनुभव सांगेन.

भुत्याभाउ तुमचा किस्सा खरो असो वा पुडी, पण सीमांत पूजन हा शब्द अचूक लिहिल्याबद्दल धन्यवाद.
अनेक लोक त्याचं काहीही करून लिहितात.

एखाद्या झपाटल्याच्या घटनेला अख्खा गाव साक्षिदार असेल तर?>>
ज्या लोकांचा विश्वास असतो त्यांचा विश्वास असतो. ज्यांचा नसतो त्यांचा नसतो. डोने साईड्ने काहीही आर्ग्युमेंटस - काहीही पुरावे आले तरी दुसरी बाजू विश्वास ठेवत नाही.
म्हणजे ज्याचा विश्वास असतो तो अगदी ॲक्सिडेंट मधून मानवी उपायांनी वाचला तरी मानतो की ही दैवी घटना आहे आणि ज्याचा विश्वास नसतो तो कितीही मोठा चमत्कार दिसला तरी कारणं काढतो. दोन्ही बाजू इक्वली क्लोज्ड असतात. शक्यतांचा विचार करायची इच्छा दोन्ही बाजूंना नसते.
आता रियाच्या केस मधे - विश्वास नसणारा म्हणणार - घ्या - आणि तुम्हाला वाटलं असतं की..
आणि विश्वास असणारा राजूकाका आणि त्याभोवतीची मिस्टरी लक्षात ठेवणार. इतकच कशाला - गेल्या दीड वर्षात रिया ज्या जास्त वाईट परिस्थितीतून गेली(लेखानुसार) ती परिस्थिती वडिलांबरोबर घडलेल्या घटनेचाच परिणाम कशावरून नसेल असेही प्रश्न उपस्थित होतील.
ओपन असावं - जिथून मदत मिळते तिथून घ्यावी आणि मूव ओन करावं.
इतरांना पटत नाहीच. (in either case).
त्यामुळे आपल्याला पटलय ना - बास!

@दक्षिणा - बरीच लोक इथे छान छान लिहतात कि ... तरी पण आभार ...

बाकी काय आपल्याला पटलय ना मग बास ... आणि तसाही मी याकडे एक मनोरंजन म्हणून पाहतो ... त्यामुळे पुडी म्हणा किंवा इतर काही ... काय फरक पडतो Happy

मध्यंतरी मी कुठेतरी पुण्यातील इन्फोसिस या कंपनीमधील पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिट्स बद्दल वाचले होते कुणाला काही माहिती आहे का त्याबद्दल ??

सध्या शेतकर्‍यांचा विषय सुरु आहे. थट्टामस्करी नको, पण सुमारे साडेतीन लाख आत्महत्या झाल्यात. मी अतिशय संवेदनशीलतेने व जबाबदारीने विचारतो आहे की इतक्या प्रमाणात अतृप्त व उद्विग्न जीवांनी आयुष्य संपवले तर त्यांचे काही अमानवीय अनुभव येत असतील आले असतील काय कोणाला? मी विषयाचे गांभिर्य परत एकदा अधोरेखित करतो.

Pages