अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येथे ते मनुष्य गण वगैरे फार चिकित्सा न करता एक कारण पटते ते ऑरा सम्बंधी. ज्याचा हां कमकुवत त्याला नक्की त्रास होतो. शास्त्रीय कारण पटते ते दुर्बल किंवा घाबरे मनोवृत्ती<< +११११११
ऑरा कसा चेक करावा याबद्दल कोणी माहिती देउ शकेल का?

तपोवनात तर देव साधू महात्म्यांची वस्ती असते तिथला भाग हाँटेड कसा बुवा?

विनिता.झक्कास - कन्नमवार वरून पुढे गेलात कि आडगाव नाकावरून थोडे पुढे गेलात तर युजीवीकडे जो फाटा आहे तिथे ...>> पंचवटी कॉलेजजवळ का??
मग बरोबर आहे.

नाही त्याना औरंगाबाद रोडच म्हणायचे आहे. वर नाही का त्यानी म्हटलेय तो आता हाय वे झालाय पूर्वी सिंगल रोडच होता ... त्यांना कुठले पंचवटी कॉलेज माहीत असायला? ते दुसर्‍याच्या हवाल्याने पुड्या सोडताहेत इथे....

थोडेसे जुन्या काळात डोकावले म्हणजे अगदी पार रामयणातील श्रीराम ह्यांच्या वनवास काळात जो काही प्रदेश त्यांनी पर्णकुटी बांधून तात्पुरत्या निवासासाठी निवडला तो संपूर्ण प्रदेश खरे तर निबिड़ अरण्य आणि अनेक राक्षस समुहाचे प्राबल्य असलेला दुर्गम तसेच अतिघोर भाग होता.
दुष्ट राक्षस म्हणजे त्यानुशंगाने त्यांच्या वामाचारी प्रथा आणि उपासना सुद्धा तिकडे घडत असणार हे नक्की. मनुष्य किंवा इतर सजीव ह्यांच्या सारखे प्रत्येक वास्तु किंवा भुभागास सुद्धा त्याची कुंडली (ज्योतिषात म्हणतात ती नव्हे तर एक CV किंवा बायोडाटा ह्या अर्थाने) असते जी प्रगट अप्रगट क्रियांचे प्रतिबिंब असते.

म्हणजेच हां नाशिक जवळील भूभाग त्रेता युगात श्री राम ह्यांच्यामुळे पावन झाला तरी पुढे अनेक वर्षात पुन्हा वाम मार्गाच्या उपासना किंवा त्या पंथातील प्रबल व्यक्तींची कर्मे ह्यामुळे वाईट शक्तीचे स्पंदन प्रस्थापित होण्यास व त्या अनुषंगाने अनुभव येण्यास नक्कीच वाव आहे असे मानता येईल.

ह्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टया प्रूव्ह नाही होऊ शकत निदान सध्यातरी पण म्हणून लगेच ह्या थिअरी नाकारणे सुद्धा अनेक बाबतीत प्रत्यक्ष साक्षीजन्य घडामोडी समोर असल्यास शक्य होत नाही

धन्यवाद श्री चिंतोपंत

अजून एक उदाहरण आठवले अश्याच वाईट उपासना किंवा सिद्धि मिळवण्यास (कु)प्रसिद्ध असलेले कोल्हापुर मधील मांढरा देवी हे स्थान.

अतिशय विचित्र आणि भयानक अनुभव होता तो. पण अश्या अनुभवांकडे त्रयस्थ आणि तटस्थ भूमिकेत राहून आस्वाद घ्यायची फार आधी (कॉलेज पासून) सवय असल्याने घाबरलो नाही Happy

कोणी माबोकर तिकडे गेले असतील त्या वर्ष अखेरीस भरणाऱ्या यात्रेसाठी तर नक्कीच ह्यास अनुमोदन देतील.

साधू महात्मे म्हणजे तेच सिंहस्थाला येणारे पोटभरू गोसावी.
>> अअअ - धाग्याचा टोपिकच तुम्हाला पटणारा नसेल तर सोडून द्या ना. उगाच ज्यांना लिहा - वाचायचय त्यात खोडा का?

>> अअअ - धाग्याचा टोपिकच तुम्हाला पटणारा नसेल तर सोडून द्या ना. उगाच ज्यांना लिहा - वाचायचय त्यात खोडा का?
>>

परफेक्ट !

पहा हे अंबज्ञ नाशिक्परिसरातील आम्हा लोकाना वामाचारी , भुते किंवा त्यांचे वंशज वगैरे म्हणत आहेत. राम राहून गेला तिथे ही तर्हा तर इतर ठिकाणी जिथली भूमी पवित्र झालीच नाही अशा ठिकाणी काय स्थिती असेल ? अगदी पांडित्यपूर्ण भाषेत लिहिले म्हनजे काहीही खपून जाते की काय ? जिथे हजारो देवळे आहेत इथे याना ( म्हणजे ज्यांनी या पुड्या याना सांगितल्या आहेत त्याना ) भुते दिसतात. मग तुमचे देव तिथे काय झोपा काढतात का? की भुताना भिऊन पळून जातात.?

>>> मग तुमचे देव तिथे काय झोपा काढतात का? की भुताना भिऊन पळून जातात.? <<< काय की, माहित नाही बोवा... तेव्हा रजेवर जात असतील, किंवा त्यांचे ड्युटी अवर्स नसतील... Proud

बाकी एक नक्की, की माबोवरील काही काही मनुष्यगण /ड्युगणाच्या आयडीजना भुतबाधा होत असावी, अन अशी बाधा झालि की आयडी "हाराकिरीवर" उतरत असावी असे मानण्यास बराच वाव आहे.... नै? Wink लोकांचे काय मत यावर?

होय, मांढरदेवीचे ठाणं वाई जवळ /भोर जवळ (वाई-भोर चे दरम्यान डोंगरावर) आहे. Happy

@ अजय अभय अहमदनगरकर जि नाशिक तुमचे शहर आहे म्हनुन तुम्हाला वाईट वाटले असेल तर सौरि मि जे टेलिव्हिजन वर दाखवलं तेच लिहिलंय.
आणि तुम्हि असे बोलत आहात कि नाशिक ला बदनाम करण्यासाठिच हा धागा उघडलाय.
बाकि पुड्या सोड्णे हा वाक्यप्रचार खुपच थर्ड क्लास वाटतो त्याऐवजि एखादा साधा शब्द वापरला तर बरं होइल
हि विनंति Bw

Pages