Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल गॅरी वाफ घेउन झोप्ला
काल गॅरी वाफ घेउन झोप्ला तेव्हा त्याचे पाय बेड च्या बाहेर आले होते (बेड ची लांबी कमी होती) . निदान असा शॉट वेगळ्या अँगल ने घेता आला अस्ता ना. पण नाही. सगळेच भैताड!! >>>> हो हो, मीही नोटिस केलं. अगदीच लाज मालिका आहे.
गुरु शनायावर बापासारख प्रेम
गुरु शनायावर बापासारख प्रेम करतो, राधिका गुरुवर आई सारख प्रेम करते. जराही नोर्मली स्त्री पुरुष ज्या प्रकारे प्रेम करतात तस काही दाखवत नाही सिरियलमध्ये. बच्चा बच्चा, तोन्डात घास भरवण, नवर्याचे डोळे पदराने पुसणे, ओले डोके पुसणे, आजारी असले की सेवा करणे एवढाच प्रेमाचा अर्थ असतो का? तरी बर शनाया- गुरु मध्ये थोडातरी रोमान्स दाखवतात.
तरी बरं तो काही उंच नाहीचे
तरी बरं तो काही उंच नाहीचे एव्हढा...शिव सारखा>>>>
तिच तर गमत आहे ना ! सतरा
तिच तर गमत आहे ना ! सतरा भानगडी दाखवुन नायक नायिका सोवळेच असल्यासारख दाखवतात.
सुलू...... अगदी अगदी.......
सुलू...... अगदी अगदी....... किती वेळ ती गुरुचं डोकं पुसत होती खसा खसा..... मलाच चक्कर आल्या सारखं वाटायला लागलं...मी जर गुरवाच्या जागी असते तर डाफरलेच असते तिच्यावर! आणि आई तरी काय...त्याचे शूज उचलून आत नेले.....काहीही............... त्याला एव्हढं लाडावून ठेवायचंच का पण?
:रागः
ह्या रेवतीला कळत नाही का की
ह्या रेवतीला कळत नाही का की मोठ्यान्च्या गोष्टी लहान मुलान्समोर बोलू नये ते? फोडल ना ते भान्ड ३ लाखाच अर्थवने गुरुसमोर. आता तो पुन्हा राधिकाशी आणखी खोटे बोलायला तयार! आधी अर्थवला नेहाकडे खेळायला स्वतः पाठवायच आणि नन्तर बोलायच राधिकाशी. तो अर्थव सायकलवर बसून सगळ ऐकतोय तिथे ह्या बायकान्च लक्षच नाही, बोलतच सुटल्या.
मागच्या वेळी सुद्दा असच केल होत रेवतीने, गुरु-शनायाच्या अफेअर बद्दल ती भक्तीला काहीतरी सान्गत होती आणि तेही नेहा समोर.
ती नेहा म्हणत होती ना रेवतीला की मला गुप्तेकाका बाबा म्हणून आवडतात, तिने राधिका-रेवतीच सुबोधशी लग्न करण्याविषयी ऐकल असेल, दोघी तिच्याच समोर तर बोलत असतात ना ह्या असल्या गोष्टी. नाहीतर ही आगाऊपणे 'गुप्तेकाका माझे बाबा झाले असते तर किती बरे झाले असते' हे असले काही म्हणाली नसती.
काल राधिका झाशीच्या राणीचा
काल राधिका झाशीच्या राणीचा आव आणून सान्गत होती की, "पुन्हा हयान्नी तिच चूक केली तर ह्यावेळी मी त्यान्ना मुळीच माफ करणार नाही.' पण जेव्हा गुरु आपली चुक कबूल करेल (तो कसला कबूल करतोय?:राग:), तेव्हा हिच भैताड त्याचे डोळे पदराने पुसून म्हणेल," अहो नका असे रडू बरे, केले मी तुम्हाला माफ."
.. किती वेळ ती गुरुचं डोकं
.. किती वेळ ती गुरुचं डोकं पुसत होती खसा खसा..... मलाच चक्कर आल्या सारखं वाटायला लागलं...मी जर गुरवाच्या जागी असते तर डाफरलेच असते तिच्यावर! आणि आई तरी काय...त्याचे शूज उचलून आत नेले.....काहीही............... त्याला एव्हढं लाडावून ठेवायचंच का पण?>>> अगदी अगदी. पण गुरुचे बाबा बरोब्बर त्याला धाकात ठेवतात. फालतू लाड करत बसत नाही त्याचे.
एक पाऊस काय पडला आणि गुरुला सर्दी झाली? इतका नाजूक आहे हा माणूस? त्यापेक्षा अर्थव बरा.
ह्या रेवतीला कळत नाही का की
ह्या रेवतीला कळत नाही का की मोठ्यान्च्या गोष्टी लहान मुलान्समोर बोलू नये ते >> सुलु + १००० .
आणि गुरुचे दिवस खरच वाईट आले आहेत. केडी कडे सल्ले मागतोय .
आणि गुरुचे दिवस खरच वाईट आले
आणि गुरुचे दिवस खरच वाईट आले आहेत. केडी कडे सल्ले मागतोय .>>> श्रेयस ने दिलेला सल्ला वाईट होता का? कशाला जायच त्या सडाफटिन्ग केडीकडे?
बाकी काल रसिकाने बुटिकचे स्वप्न तुटल्याचे दु:ख छान दाखवल. शनायाला खरच दु:ख झालय असच वाटत होत.
केडी कडे सल्ले मागतोय .>>
केडी कडे सल्ले मागतोय .>> डॉयलॉग रायटर आहे ना तोच सिरियलीचा!
मी ही मालिका पाच ते सहा वेळाच
मी ही मालिका पाच ते सहा वेळाच पाहिली असेल. तरीही माझे मत या मालिकेबद्दल काहीसे चांगले नाही.
या असल्या फालतू मालिका ताबडतोब बंद केल्या पाहिजे. आपल्या पतीचे दुसºया बाईशी प्रेमप्रकरण चालू असताना त्याला (पती) धडा शिकवायचा सोडून त्याच्यासाठी झुरणे काय कामाचे.
आपली संस्कृती काय? आणि आपण असल्या मालिका दाखवून समाजापुढे कोणता आदर्श ठेवतो.
या मालिकेत पतीच्या ऐवजी बायकोचे प्रेमप्रकरण असते तर स्टोरी तीच ठेवता आली असता का? आज महिला आपल्या पायावर उभ्या आहेत. पतीचे कुठेतरी प्रेमप्रकरण सुरू असताना पतीव्रता न दाखवता सरळ असल्या लोकांना वटणीवर आणले पाहिजे.
शनायाला खरच दु:ख झालय असच
शनायाला खरच दु:ख झालय असच वाटत होत.>>>>>>अगं कसलं दु:ख आलयं डोंबल्याचं! ही महामुर्ख बया बुटीक साठी नव्हती रडत तर गॅरी आता काय म्हणेल ? पुढे आपल्याला कदाचीत दमडी पण खर्चाला मिळणार नाही या विचाराने लिपस्टीक पुसली जाणार नाही याची काळजी घेत रडत होती.
आणी पुढचं बघीतले नाहीस का? ती लांब नाकवाली ईशा तिचा हात दाबुन खुणावते जेव्हा गॅरोबाना वाटते की पुरे तीन लाख उडालेत, पण नंतर ईशा सांगते की गॅरीला माहीत नाहीये की अजून उरलेले पैसे आपल्याला शॉपिंग करता आहेत, ईशा या बावळटला सांगते की चल शॉपिंग करु तर लगेच लहान मुलासारखे गळा काढत जाते.
रश्मी स्मायलीज लय भारी. बाकी
रश्मी स्मायलीज लय भारी. बाकी सिरीयलमधे इंटरेस्ट नाही.
शनायाला खरच दु:ख झालय असच
शनायाला खरच दु:ख झालय असच वाटत होत.>>>>>>अगं कसलं दु:ख आलयं डोंबल्याचं! ही महामुर्ख बया बुटीक साठी नव्हती रडत तर गॅरी आता काय म्हणेल ? पुढे आपल्याला कदाचीत दमडी पण खर्चाला मिळणार नाही या विचाराने लिपस्टीक पुसली जाणार नाही याची काळजी घेत रडत होती. >>>>>>+++++ १०००००
रश्मी स्मायलीज मस्त आहेत.
फायनली राधिकाला अक्कल आली म्हणायची. मला वाटल, हिला आता श्रेयसच खोट खर वाटेल की काय.
सुलू...वाटलंच की श्रेयस चं
सुलू...वाटलंच की श्रेयस चं खोटं खरं!
सुलू...वाटलंच की श्रेयस चं
सुलू...वाटलंच की श्रेयस चं खोटं खरं! >>> हो ना. पण गुरुवर तिचा सन्शय अजून तसाच आहे हे काय कमी आहे का? काल तिने श्रेयस करवी गुरुकडून अडीच लाख मागितले. काल गुरु किचनमध्ये काम करत होता, राधिका आधी त्याला ,"अहो कशाला? मी करते ना." अस नावापुरतीच म्हणाली, ते नेहमीच उतू जाणार पतीप्रेम नाही दाखवल, नन्तर तिने विचार केला, करतोय तर करु दे त्याला सर्व. म्हणून ती मुद्दामहून गुपचुप आपल्या खोलीत गेली. काल ती मुद्दामहून उशीरा उठली. गुरु डिझर्वज दिस.
आज ती गुरुला इन डायरे़क्टली धमकी देणार आहे, जर का तुम्ही पुन्हा शनायाच्या मागे गेलात, तर मी तुम्हाला सुद्दा असच घराबाहेर हाकलीन.
राधिकाने गुरुपुढे केलेल
राधिकाने गुरुपुढे केलेल डेमोस्ट्रेशन कैच्याके होत. जी कुणी त्या नवर्याची नटवी (?) म्हणून घेतली होती, तिच्या नाकावरची माशी सुद्दा हलत नव्हती. ती आपली पुतळयासारखी उभी होती. जा म्हटल तर ती काहीही प्रतिकिया न देता निघूनही गेली.
हो ना.....अगदीच कैच्या कै
हो ना.....अगदीच कैच्या कै डेमो.... त्या बायका किती निर्विकार आणि थंड चेहेर्याच्या होत्या..... आणि जिकडे तिकडे ती काम वाली बाई (बकुळा मावशी बहुतेक!) कशी काय हजर असते?
राधिकाने गुरुपुढे केलेल
राधिकाने गुरुपुढे केलेल डेमोस्ट्रेशन कैच्याके होत. जी कुणी त्या नवर्याची नटवी (?) म्हणून घेतली होती, तिच्या नाकावरची माशी सुद्दा हलत नव्हती. ती आपली पुतळयासारखी उभी होती. जा म्हटल तर ती काहीही प्रतिकिया न देता निघूनही गेली>>>>> होहो. अगदी बिचारी कुणाला धरुन उभी केल्यासारखी होती. जाम हसलो आम्ही.
आज पासुन यावेळेला स्टार
आज पासुन यावेळेला स्टार प्लसला ईस प्यार को क्या नाम दु चालु होतीय.
मम्मीला सजेस्ट केलेय नविन शिरेल बघायला, कदाचित आता आम्हाला सुटका मिळेल
राधिकाने गुरुपुढे केलेल
राधिकाने गुरुपुढे केलेल डेमोस्ट्रेशन कैच्याके होत. >>> का म्हणून केल बरं ते ??
बरं , गुरुचं नक्की काय चालु आहे ? राधिकाच्या प्रेमात पडलाय , गजरा वगैरे आणून देतोय .
गुरु अगदी हॉरिबली बिहेव्ह
गुरु अगदी हॉरिबली बिहेव्ह करतोय...राधक्काला गजरा काय ,रोमँटिक डिनर डेट काय....ती अगदी हेअर स्टाईल वगैरे करुन , पिवळी साडी नेसून ( हो तीच ती...त्या मॉल मधून घेतलेली! :-)) त्याच्या कडे अगदी प्रेमाने बघत होती. तोहि तिच्या तोंडावर हात ठेवून मारे हॉटेल फिक्स करत होता........आणि गुरु खरे तर अगदी बच्चा दिसतो हिच्या समोर, म्हणतो शनायाला बच्चा आणि आहे तिसरीचाच बच्चा!!
तर तो आता दोघींनाही सेम हॉटेल मधे नेणार व त्याची त्रेधा तिरपीट होणार............. व राधाक्काच्या नेहमी प्रमाणे काहीच लक्षात येणार नाही...आयॅम डॅम शुअर!!
म्हणजे तुम तो धोकेबाज हो वादा
म्हणजे तुम तो धोकेबाज हो वादा करके भूल जाते हो होणार बहुतेक.
अत्यंत फालतू एपिसोड.. त्या
अत्यंत फालतू एपिसोड.. त्या बाईला हक्क मिळवून देण्याचा प्रसं ग तर दयनीय वगैरे होता
झी मराठी ची किव आली अक्षरशः
आणि दुकानाच्या ओपनिंग च्या
आणि दुकानाच्या ओपनिंग च्या वेळी जेव्हा गुरूचा गैरसमज होतो की या इशा आणि शनाया ने सर्व पैसे (तिन लाख) उडवून टाकले आहेत, त्यावर इशा शनायाचा हात दाबून गप्प बसण्याचा इशारा करते. पण खरंच सर्वच्या सर्व ३ लाख खर्च झालेत ना? दिड लाख दुकानाच्या भाड्याचे म्हणून सुंदरलाल ला दिले आणि उरलेल्याचे कपडे घेतले..
तपशिल खुद्द लेखक आणि दिग्दर्शकच विसरतात की काय?
की यांनी दुकानात शनायाचे जुनेच कपडे टांगलेत?
धन्यवाद अंजू. दक्षिणा, हो
धन्यवाद अंजू. दक्षिणा, हो अगं त्या महाडांबरट ईशाने शन्याचे जूनेच आणी नुकते शॉपिंग केलेले कपडे दुकानात ठेवले होते. कारण शन्याबै नवीन घेतलेले कपडे एकदाच घालुन फेकुन देतात. ( मला त्या दोघीना मारावेसे वाटले, पण ते प्रत्यक्षात शक्य नव्हते)
गॅरोबाचा फुकट्या सल्लागार मित्र केडी की फेडी ( रिंगण पिक्चरमधला शशांक शेंडे) सल्ला देतो की राधिकाशी प्रेमाने वाग, तिचे लाड कर. म्हणून गॅरोबा असे वागतात.
आणि.....अॅक्च्युअली.
आणि.....अॅक्च्युअली..राधिकेची मुळात नवर्याला दोषी ठरविण्याची मेंटॅलिटीच नाहीए. त्या बाईला तिने जशी दाखविली तशी.......... हिला तर गुरु म्हणजे सर्वस्व, प्राण प्रिय आणि शन्या म्हणजे उठवळ, बाजारबसवी आणी भोळ्या गुरवाला जाळयात ओढणारी...............!
त्यामुळे तो डेमो....फिलर म्हणून जरी वापरला असेल तरी...सर्वस्वी चुकीचा , अनाठायी (आणि अर्थातच तद्दन भंपक व फालतू!) होता.
दक्षिणा.... अगं आपण गरीब लोक...पै न पैचा हिशेब आपोआपच मनात राहतो..........या मानबाचे लेखक - दिग्दर्शक म्हणजे कोण असामी! ते असला किरकोळ हिशेब ध्यानात नाही ठेवत!
राधिकाने गुरुपुढे केलेल
राधिकाने गुरुपुढे केलेल डेमोस्ट्रेशन कैच्याके होत. >>> का म्हणून केल बरं ते ?? >>> तिला गुरुचा सन्शय येत होता, पुन्हा त्याने शेण खाऊ नये म्हणून डेमो च्या रुपात तिने घरातून हाकलून देण्याची धमकी दिली.
गॅरोबाचा फुकट्या सल्लागार मित्र केडी की फेडी ( रिंगण पिक्चरमधला शशांक शेंडे) सल्ला देतो की राधिकाशी प्रेमाने वाग, तिचे लाड कर. म्हणून गॅरोबा असे वागतात.>>> तो शशांक शेंडे नाहीये, समिधा गुरुचा नवरा अभिजित गुरु आहे, तोच ह्या सिरियलचा लेखक आहे.
गॅरोबाचा फुकट्या सल्लागार
गॅरोबाचा फुकट्या सल्लागार मित्र केडी की फेडी ( रिंगण पिक्चरमधला शशांक शेंडे) सल्ला देतो की राधिकाशी प्रेमाने वाग, तिचे लाड कर. म्हणून गॅरोबा असे वागतात. >>> केडी असेही म्हणाला होता की शनायाला विसरुन जा. मग त्या दिवशी श्रेयस ने गुरुला हाच सल्ला जपानी भाषेत सान्गितला होता का?तोही तेच म्हणाला होता ना कि शनायाला विसरुन जा म्हणून. पण त्या वेळी ऐकल नाही त्याच.
आणि जिकडे तिकडे ती काम वाली बाई (बकुळा मावशी बहुतेक!) कशी काय हजर असते? >>> राधिका बकुळामावशी च्या वस्तीत जाते, तिकडेच ती बाई राहत असते.
Pages