Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राधाक्का परदेशात....
राधाक्का परदेशात....
टॉम भाऊजी ... जॉर्ज काका... विल्यम दादा.... एमिल्यि वहिनी.. एम्मा ताई... सारे या... नागपुरच्या पुडाच्या वडया खायला...
गॅरी पुन्हा डोक्यालाा हात लावणांर की कुठून परत आलो रे....
परत इतक्यात कुठे राधिका येणार
गॅरीकडे परत इतक्यात राधिका येणार नाही, सिध्द वगैरे करणार आहेना स्वतःला. परदेशात जाऊ शकते की त्यात काय आता एकदम मोठी उद्योजिका होणार बघा ती, गॅरीपण मदत करतोय ना. असं काही दाखवलं तरंच सिरीयल संपेल आणि काल शनायाची वाट बघत होता गॅरी, तिला जळवायला बायकोला आणलंय. मग हा अपमान नाही का राधिकाचा.
शनाया परत येईल रहायला गॅरीकडे
शनाया परत येईल रहायला गॅरीकडे असं वाटतं मला. पण आता तो धडा शिकवायला आणेल की मनात त्याच्या अजूनही ती आहे म्हणून आणेल त्याची शंका वाटते.
वेणीचा रट्टा>>
वेणीचा रट्टा>>
सारे या... नागपुरच्या पुडाच्या वडया खायला...>>नो नो.. तिला आता काँटीनेंटल पण बनवता येते...मागे एकदा गॅरीच्या ऑफिस मध्ये तिने आणले होते, भाकरीवर भाजी आणि चीज लावून
कालच्या भागात अजून एक वाईट
कालच्या भागात अजून एक चुकीचा सन्देश दिला.
रेवती राधिकाला म्हणते," यापुढे कामासाठी बाहेर पडताना एकटी जात जाऊ नकोस. बरोबर नानाजी किव्वा गुप्तेला घे."
राधिका म्हणते कशी," तु सुद्दा अशी बाहेर एकटी पडू नकोस. सोबतीला गुप्तेभाऊन्ना घे."
म्हणजे हयान्ना हया प्रसन्गातून हे सान्गायचे आहे का कि, बाईने कधीही घराबाहेर एकटे जाऊ नये. सुरक्षेसाठी पुरुषाला बरोबर घेऊन जाव? हे सिरियलवाले कधी पेपर वाचत नाही का? सोबतीला पुरुष असून् सुद्दा बायकान्वर बलात्कार झालेले/ त्यान्ची छेड काढल्याचे कित्येक उदाहरणे आहेत.
खरतर रेवतीने म्हणायला हव होत, कि मी तुझ्यासारखी बावळट नाहिये. सो मला कुणाच्या सोबतीची/आधाराची गरज नाही.
सुलू करेक्टे :रागः
सुलू करेक्टे
आणि वर गुरु म्हणे..की तुलाही
आणि वर गुरु म्हणे..की तुलाही परदेशात जायची वेळ आली तर कसे करशील? पिझ्झा न खाऊन?>>> परदेशात सगळे लोक पिझ्झाच खातात हे कुणी सान्गितल गुरुला? सीईओ आहे ना हा?
गॅरी Client शी मारामारी करू शकतो तर राधिकेने एक वेणीचा रट्टा दिला अस्ता तरी काम झालं अस्तं! +१
नुसतीच भेटायला जात नाही तर त्याला हॉटेलच्या लॉबीमधे न भेटता रुम मधे भेटते. तो दार उघडताना हातात दारुचा ग्लास असतो तरी आत जाते. खरच बावळट आहे ती>>> नैतर काय, आणि हि शनायाला मीच तुझ्यापेक्षा कशी हुशार आहे हयाचे ज्ञान पाजळत होती.
राधिकाच्या शोषीकपणाची हाईट
राधिकाच्या शोषीकपणाची हाईट झाली .....
अलका कुबलचे सगळे रेकॉर्ड्स मोडले या एकटीने....
मोरपंखिस
मोरपंखिस
नुसतीच भेटायला जात नाही तर
नुसतीच भेटायला जात नाही तर त्याला हॉटेलच्या लॉबीमधे न भेटता रुम मधे भेटते. तो दार उघडताना हातात दारुचा ग्लास असतो तरी आत जाते. >>> मी लगेच म्हणाले पण तिला अशी काय तू, समजत नाही का तुला, आत कशाला जातेयस. काही नाही सडन रिअॅक्शन होती माझी
पण राधिका त्या रेवतीला सांगते
पण राधिका त्या रेवतीला सांगते ते पटलं मला, गुरुनाथला खरं सांगायला हवं की कुणाल शनायाचा एक्स आहे ते.
राधिका म्हणते कशी," तु सुद्दा
राधिका म्हणते कशी," तु सुद्दा अशी बाहेर एकटी पडू नकोस. सोबतीला गुप्तेभाऊन्ना घे." >>> ते वाक्य सुचक होतं. रेवती आणि गुप्ते ह्यांच्या सोबती बद्दल.
पण राधिका त्या रेवतीला सांगते
पण राधिका त्या रेवतीला सांगते ते पटलं मला, गुरुनाथला खरं सांगायला हवं की कुणाल शनायाचा एक्स आहे ते. > तेव्हा राधिकाचा डाय्लॉग - `सत्य लपायला वेळ लागत नाही' ! सत्य लपायला???
मला पन तोच प्रश्न ?????? सत्य
मला पन तोच प्रश्न ?????? सत्य लपायला?????
म्हणजे हयान्ना हया
म्हणजे हयान्ना हया प्रसन्गातून हे सान्गायचे आहे का कि, बाईने कधीही घराबाहेर एकटे जाऊ नये. सुरक्षेसाठी पुरुषाला बरोबर घेऊन जाव? >>>> अगदी बरोबर आहे सुलु . फार खटकलं बघताना ते .
मूर्ख लोक .. आपण फक्त राग राग करू शकतो .. अन्जुतै जाउन त्यांन्च्या साईटवर टाकून येते , पण मग ती लोक तीलाच बाहेर काढतात
आता शनायाला पण पश्चाताप होतोय
आता शनायाला पण पश्चाताप होतोय का काय ?? गॅरी तर ऑलरेडी तिला मिस करतोय ,जळवतोय म्हणजे दोघांना आपापली चूक कळून ते परत एकत्र आले तर ‘माह्या नवरा’ ‘माह्या संसार’ च घोंगडं परत भिजत राहणार वाटत समिधाची प्रतीक्षा अजून लांबणार आता ...
या शिर्षकाचं नाव लईच चूकिचं
या शिर्षकाचं नाव लईच चूकिचं ठेवलंय ना बावा..
दिग्दर्शक भाऊना सांगा माझ्या ऐवजी 'माह्या नवर्याची बायको' असं करा म्हणा.. इज्जतीचा सवाल हे ना..
राधिका आणि गॅरीचं भैताड
राधिका आणि गॅरीचं भैताड कॅरेक्टर लिहिणरा कोणे खरंच?
स्पेशली राधिका चं कॅरेक्टर.
अशी कॅरेक्टरं काय म्हणुन दाखवायची? आपल्या नवर्याने दुसर्या बाईला घरात आणुन मुलासहीत आपल्याला हाकलुन दिलंय हे राधक्का विसरली का? त्या दुसर्या बाई सोबत हिचा नवरा कय भातुकली खेळत होता का घरात? तरी ही बया त्या पिझ्झाच्या सीनमधे कसली दात काढत होती. लाजत मुरकत होती.
आयशप्पथ डोकंच फिरलं माझं
अन्जुतै जाउन त्यांन्च्या
अन्जुतै जाउन त्यांन्च्या साईटवर टाकून येते , पण मग ती लोक तीलाच बाहेर काढतात>>>
हम्म्म खरं आहे , इ टीव्हीने केलं मला block मागेच म्हणून आता जपून लिहिते पण प्रत्येक मालिकेवर लिहून आलेय तरीही झी च्या.
चू भू च्या पोस्ट्स जास्त नसतात, चांगल्या मालिकेला प्रसिद्धी देत नाहीत तेपण त्यांना लिहून आले.
राधिका बावळट्टे का? शनायाने
राधिका बावळट्टे का? शनायाने चीट केल्याने तो गॅरी राधिकाकडे उपरती होऊन (तीही कितपत खरी कुणास ठाऊक) परत आलाय याचा अर्थ तिचा नवरा तिला परत मिळालाय अस नाहिये.
उद्या अजुन कुणी शनाया मिळाली तर रादर शनायावरच्या प्रेमाने तो तिच्याचकडे परत जाणार नाही कश्यावरुन? झी वाले फारच घाई करतात राव निर्णायाला यायची.
फार थकेल दिसायला लागलिये
फार थकेल दिसायला लागलिये राधिका आजकाल
आयशप्पथ डोकंच फिरलं माझं >>
आयशप्पथ डोकंच फिरलं माझं >>>खरं आहे, पिझ्झा सीन फारच बेकार होता आणि बोअर होता.
हे म्हणजे तु किती पण लाथाळी
हे म्हणजे तु किती पण लाथाळी कर मी मागं मागं येणार कणाहीन असल्यासारखं.
हे म्हणजे तु किती पण लाथाळी
हे म्हणजे तु किती पण लाथाळी कर मी मागं मागं येणार कणाहीन असल्यासारखं.>>> असतात अश्या बायका. आपल्याला ते कणाहीन वाटते पण त्या म्हणतात कि आमचे प्रेम आहे.
किंवा दुसरे पर्याय नसतील बहुतेक.....गावाला आमच्या शेजारी एक कुटुंब होते. त्यांच्या दोन बायका आणि पाच मुले. त्या मोठ्या काकू(पहिली) म्हटल्या होत्या, काहीपण करा पण मी घर सोडून जाणार नाही.
अजून एक-दोन कुटुंब पाहिली आहेत.... त्यांची दोन घरे होती. त्यातल्या काकू म्हटल्या होत्या, घराची अन मुलांची जबाबदारी सगळी तुमचीच, ती पार पाडा बाकी बाहेर दुसरा संसार थाटायचा तर थाटा.
या शिर्षकाचं नाव लईच चूकिचं
या शिर्षकाचं नाव लईच चूकिचं ठेवलंय ना बावा..
दिग्दर्शक भाऊना सांगा माझ्या ऐवजी 'माह्या नवर्याची बायको' असं करा म्हणा.. इज्जतीचा सवाल हे ना..>>>
नावात खरेच चूक आहे. एक तर शनायाला गॅरीची बायको करायला पाहिजे म्हणजे ती नवर्याची बायको होईल किंवा 'माह्या नवर्याची मीच बायको' असे तरी ठेवायला हवे होते.
आता शनायाला पण पश्चाताप होतोय
आता शनायाला पण पश्चाताप होतोय का काय ?? गॅरी तर ऑलरेडी तिला मिस करतोय ,जळवतोय म्हणजे दोघांना आपापली चूक कळून ते परत एकत्र आले >>> सध्याच्या ट्रेकवरुन मला अस वाटतय की बहुतेक हे सिरियलचा शेवट असा करतील कि, राधिका गुरु ला खर सान्गून टाकेल, गुरु आणि शनाया दोघान्ना आपापल्या चुका कळून पुन्हा ते दोघे एकत्र येतील. शनाया गुरुवर खर प्रेम करु लागेल. ती सुधारेल, ती फुल टाईम गृहिणी होईल. (आजच्या भागात तिला सलवार कमीज मध्ये दाखवलय). राधिका गुरुला फायनली सोडून देईल. ती सन्मानाने दोघान्च्या प्रेमाला सम्मती देईल आणि त्यान्च्या मार्गातून बाजूला होईल. पण जाता जाता ती गुरुला एक मोलाचा सल्ला देईल, "मला सोडलस तस आता शनायाला कुणा तिसरीसाठी सोडू नकोस." अर्थव सुद्दा आईची बाजू घेईल आणि गुरुचा द्वेष करेल. राधिका परदेशी जाईल आणि मोठी उदयोजिका होईल. इकडे गुरु-शनायासुद्दा सुखी राहतील.
शेवटी सिरियलचे टायटल सार्थक होण्याशी मतलब- माझ्या नवर्याची बायको, मग ती राधिका असो किव्वा शनाया काय फरक पडतो.
मला ह्या सिरियलचा हा असा, वेगळा शेवट हवाय. पण झीवाले ऐकतील तर ना!
हे म्हणजे तु किती पण लाथाळी
हे म्हणजे तु किती पण लाथाळी कर मी मागं मागं येणार कणाहीन असल्यासारखं.>>> राधिका असो किव्वा शनाया, दोघीही कणाहीन आहेत. गुरुने
त्यान्ना कितीही लाथाडल तरीही लोचटासारख ह्या त्याच्या मागे मागे जातात. आधी राधिका 'माह्या नवर्याला मी परत मिळवीनच' करायची, आता शनाया 'गॅरी ला मी परत मिळवीनच' करते. दोघी सारख्याच आहेत, लोचट आणि बावळट.
सुलू लईच भारी
सुलू लईच भारी
पण झी वाले अत्यंत नैतिक आहेत हो त्यामुळे सावित्रीने कसे सत्यवानाचे प्राण परत आणले ना? तसेच ही राधीका स्वतःचा नवरा परत मिळवून दाखवणार.
कारण दुनियेत फक्त एकच शेड असते (झी च्या मते) खास करून बायकोची.. ती म्हणजे कशी लांब केस वाली (वेणी उडवणारी, प्रेमाने सर्वांचं करणारी, इ. इ.) त्या मुळे ती हारलेली कशी काय दाखवतील? काहीही... हं
दोघी सारख्याच आहेत, लोचट आणि
दोघी सारख्याच आहेत, लोचट आणि बावळट.>> मला वाटत शनाया बावळट नाहिये, तिने गुरुला कधिही स्व्तःला हाडहुड करु दिले नाही, तिचा उद्देश सरळ होता छान-छौकी, शॉपिन्ग, उत्तम लाइफस्टाईल, तिला गुरु कडे परत जायच्य कारण तिला दुसर्या कुणाला मुर्ख बनवण जास्त अवघड आहे.
राधिका बावळट आहे.
शनाया खरचं छान दिसतं होती
शनाया खरचं छान दिसतं होती पंजाबी ड्रेस मध्ये… राधाक्का पेक्षा कितीतरी मस्त… कानातले पण सूट होत होते … मेकअप पण डेसेन्ट होता…
Pages