Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकी कालच्या प्रंसंगावरुन
बाकी कालच्या प्रंसंगावरुन गुप्ते आणि रेवतीच्या प्रेमाची पिप्पाणी वाजणार अस दिसतय एकुणात.>>>> काल गुप्ते रेवतीला म्हणाला, तुम्ही रागात असताना निर्णय घेत जाऊ नका, कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच चुकतात. तो हे राधिकाच्या बाबतीत म्हणत होता हे माहितीये. पण त्याला असही सुचवायच होत का कि तुझा नवर्याला सोडण्याचा निर्णय चुकीचा होता. रेवतीने आपल्या पर्सनल आयुष्यात काय काय भोगले हे जांंणून न घेता असे सल्ले तो तिला कसे देऊ शकतो?
बादवे, कालच्या एपिसोडमध्ये नो शनाया.
फायनली आज त्या शनायाच भान्ड
फायनली आज त्या शनायाच भान्ड फुटल.
माझी ११ वर्षाची लेक म्हणे,
माझी ११ वर्षाची लेक म्हणे, आता शनाया च्या ठिकाणी नवीन कोणी येईल मग पुन्हा तिला पळवून लावणार असं असेल आता पुढे, कारण मालिकेचं नाव नवर्याची बायको आहे ना, मग तीच नसेल तर मालिका कशी असेल !!
(No subject)
माझी ११ वर्षाची लेक म्हणे,
माझी ११ वर्षाची लेक म्हणे, आता शनाया च्या ठिकाणी नवीन कोणी येईल मग पुन्हा तिला पळवून लावणार असं असेल आता पुढे, कारण मालिकेचं नाव नवर्याची बायको आहे ना, मग तीच नसेल तर मालिका कशी असेल !!>>> हो ना, ती नवीन मालिका तर मे महिन्यापासून सुरु होणारेय. मग हि मालिका कधी सम्पतेय?:अओ: मला वाटल त्या शनायाला हाकलल्यावर हि मालिका सम्पेल, पण कसल काय?
मलासुद्दा असच वाटतय कि, पुन्हा कुणी दुसरी शनाया येईल, मग पुन्हा राधिकाची नवीन लढाई सुरु.
मलासुद्दा असच वाटतय कि,
मलासुद्दा असच वाटतय कि, पुन्हा कुणी दुसरी शनाया येईल, मग पुन्हा राधिकाची नवीन लढाई सुरु.>>>नक्को ग बाई!!! परत परत बालिश खोड्या काढणे, हिडिंबा सारखे हसणे नक्कोच.
मग मालिकेचे नाव 'माझ्या नवर्याच्या बायका' असे करावे लागेल
मग मालिकेचे नाव 'माझ्या नवर्
मग मालिकेचे नाव 'माझ्या नवर्याच्या बायका' असे करावे लागेल >>>>> हो, नाहीतर माह्या भैताड नवर्याच्या भैताड/ जहांबाज/ आगाऊ/ चालू बायका असे ठेवावे लागेल.
Radhika che vaagne baghun
Radhika che vaagne baghun mlaa tr garry chi baju patate.....yevdi baavlat baayko asel tr toh shanaya chya mage laaglaa tech bare ahe.. .....,
By d way Aapli garibanchi kareena kapoor mla tari jaam Aavadate....Aapli "REVATI" HO....acting chhan & diste pn chhan
मला तरी वाटते शनाया परत
मला तरी वाटते शनाया परत पटवणार गॅरीला, अन पुन्हा चालु तु तु मे मे
फक्त शनायाला स्वार्थी दाखवून
फक्त शनायाला स्वार्थी दाखवून गॅरीची चूक दडपणार आहेत का.. आता शनाया अशी निघाली हे गॅरीच फुटकं नशीब म्हणायचं...
आणि जर शनाया राधीका सारखीच ग्रुहक्रुतदक्ष ,अथर्वची ,सासू सासर्यांचि काळजी घेणारी ,सोसायटी मध्ये सगळ्याना मदत करणारी आणि वर जॉब ही करणारी, मॉडर्न राहणारी ,म्हणजे राधीका पेक्षा चांगली असती तरी पण मग ही भैताड राधीका माह्या नवरा , माझा संसार ,मी परत मिळवणारच अस करत बसली असती का ... म्हणजे शनाया चांगली असो किंवा वाईट त्या वरून गॅरी महाराजांची चूक जस्टिफाय होत नाही... आणि शेवटी कायं महान राधीका मोठ्या मनाने गॅरीची चूक पदरात घेणार , वर शनाया ला पण उपदेशाचे डोस पाजणार , की बाळे , असं नाही करावं.. शहाण्या सारखं वागावं.... आता परत आस नाय करायच हा... जा बघू आता तू...काळजी घे हा....
शनाया किंवा दूसरी कोणीही कशीही असती तरी सुद्धा राधीकाने सन्मानाने बाजूला व्हायला हव होतं..मग गॅरीला नंतर चूक कळली असती तरं तो स्वताहून परत आला असताच ना.. हिला लोचटा सारख तिथेच राहून बालिश खोड्या काढून राहून काय फायदा झाला... आता तो परत येईल ते काय अचानक राधीका आवडायला लागली म्हणून का आता एकटा पडला आणि सोबत हवी म्हणून....
'झी' च्या सिरेलच्या स्क्रीप्ट
'झी' च्या सिरेलच्या स्क्रीप्ट रायटरचे खरोखर विचार शक्ती एवढी गुंठीत झाली आहे का? प्रेक्षकांसाठी इतक्या प्रेडिक्टीबल का झाल्या सगळी कडे तेच लेखक एकत्र बसुन लिहीतात का? कारण सारख्याच वळणावर सगळ्या सिरेली... संवाद देखिल पराकोटीचे मिळमिळीत आणि तेच तेच सतत ऐकायला मिळतात.. प्रसंग कोणताही असो... बर्याचदा जाणवते २० मिन च्या एकूण एपिसोड मध्ये केवळ ७-८ मिन नविन प्रसंग तर १२-१३ मिन पुर्वीच्याच चर्चा..
त्या खुलता कडी मध्ये तर प्रत्येक कडीत १-२ तरी फ्लॅश बॅकच असतात.... झी सिरेल आता 'छ्या' सिरेल! झाल्यात!
मला पडलेला एक प्रश्न --- ते
मला पडलेला एक प्रश्न --- ते एक लाख रुपये नक्की कोणाकडे राहणार शेवटी? म्हणजे त्या जुन्या बॉफ्रे कडे राहिले तर गॅरीचे बुडाले किंवा मग ते गॅरीकडे परत आले तर त्या जुन्या बॉफ्रे चे बुडाले. दोन्हीमध्ये शनायाचं काहीच नुकसान नाही.
मला पडलेला एक प्रश्न --- ते
मला पडलेला एक प्रश्न --- ते एक लाख रुपये नक्की कोणाकडे राहणार शेवटी? म्हणजे त्या जुन्या बॉफ्रे कडे राहिले तर गॅरीचे बुडाले किंवा मग ते गॅरीकडे परत आले तर त्या जुन्या बॉफ्रे चे बुडाले. दोन्हीमध्ये शनायाचं काहीच नुकसान नाही. >> अगदी अगदी !! मलाही असाच प्रश्न पडला बहुधा तिच्या नेक्स्ट BF कडून मिळवेल गॅरी
मला तर वाटले होते कि शनायाला
मला तर वाटले होते कि शनायाला तेथे बघून गुरुनाथ आधि घरात शिरुन आपले पैसे परत घेईन आणि तिच्या कानाखाली आवाज काढून तिथुन निघून जाईल
ते एक लाख रुपये नक्की कोणाकडे राहणार शेवटी? म्हणजे त्या जुन्या बॉफ्रे कडे राहिले तर >>राधाक्का घेईल कि त्याच्याकडून, 'माह्या नवर्याचे पैसे आहेत हे' असे म्हणून
आता तो परत येईल ते काय अचानक
आता तो परत येईल ते काय अचानक राधीका आवडायला लागली म्हणून का आता एकटा पडला आणि सोबत हवी म्हणून....>>> त्याला राधिकाच प्रेम किती सच्च, खर आहे हे पटेल, आणि तो तिच्याकडे परत येईल म्हणे.
मला पडलेला एक प्रश्न --- ते एक लाख रुपये नक्की कोणाकडे राहणार शेवटी?>>> तिने कुणालला फक्त ७५,००० दिले आणि उरलेले २५,००० ती इशाबरोबर shopping मध्ये उडवेल.
फक्त शनायाला स्वार्थी दाखवून
फक्त शनायाला स्वार्थी दाखवून गॅरीची चूक दडपणार आहेत का..+ १
तिने कुणालला फक्त ७५,००० दिले
तिने कुणालला फक्त ७५,००० दिले आणि उरलेले २५,००० ती इशाबरोबर shopping मध्ये उडवेल.>> आधी २५००० देवुन झालेत
असं काय करता ? गॅरीची चूक
असं काय करता ? गॅरीची चूक होतीचं कुठे त्याला कळायला आणि दाखवून द्यायला ? सगळी तर शनयाची चूक, तिने भुलवलं त्याला - इति द ग्रेट राधाक्का आणि तिचे सासु सासरे...........
Jai Malhar sampnar ahe.Navin
Jai Malhar sampnar ahe.Navin malika tya jagi yenar ahe.
पण तो कुणाल मस्त आहे.. शनाया
पण तो कुणाल मस्त आहे.. शनाया ला शोभतो गॅरिपेक्षा.....! ती इशा तर डायरेक्ट गॅरी अंकलच म्हणते.
आणि आता शनाया म्हणत्येय की तुझ्या कडे येऊ का रहायला तर म्हणे...की नाही नाही...नको!
पण शनाया ने चांगला अभिनय केला काल. आणि खरं तर (मला तरी) तिची चूक वाटत नाहीये. तो तिचा आधीचा बॉय फ्रेंड होता. गॅरीला काय महान इंटेग्रीटीच्या अपेक्षा होत्या तिच्या कडून...? स्वतःही तर मॅरीड आहेच ना?
आणि ती तशीही त्या कुणाल ला हिडीस फिडीसच करत होती.
चिन्चे + १ .
चिन्चे + १ .
गॅरी पझेसिव्ह आहे आता तिच्या बाबतित . आणि ती म्हणाली की "कॉलेजमध्ये असताना सगळ्यान्ची अफेअर्स होतात . माझही होतं ".
पण ती गॅरीकडून पैसे घेउन लपून कुणाल ला देते ते चुकलं .
आनंद ने मस्त काम केलं कालच्या
आनंद ने मस्त काम केलं कालच्या भागात. बटर नाईफ ने काय नाय होणार ही धारदार सुरी घे म्हणत दुसरी सुरी पुढे करतो, मध्ये मध्ये इंग्रजी कळत नाही का? मराठी चा पण प्रॉब्लेम आहे म्हणत तिची मस्त उडवतो, गॅरी शनायाला बाहेर काढतो दाराच्या तेव्हा तत्परतेने तिची बॅग आणून देतो.
बघायला हवा कालचा भाग...
बघायला हवा कालचा भाग...
गॅरी शनायाला बाहेर काढतो
गॅरी शनायाला बाहेर काढतो दाराच्या तेव्हा तत्परतेने तिची बॅग आणून देतो.>>>> आणि कपड्यांने भरलेली ती जडगच्च बॅग जेव्हा फेकतो तेव्हा मालिकेच्या कथानकाप्रमाणेच पोकळ असलेली ती बॅग टण्णकन बॉल सारखी उडून पडते
मी ही सिरिअल त्या दिवशी
मी ही सिरिअल त्या दिवशी पहाणं सोडलं, ज्या दिवशी शनायाच्या ex bf ने रेवतीला सांगितलं कि शनाया महाभयानक आहे, धोखेबाज आहे, तिच्यापासुन सावध रहा इ इ. का तर म्हणे मी तिच्यावर एक लाख रुपये खर्च केले. मग असं काही असतं का कि bf ने तिच्यावर खर्च केला आणि काही कारणाने आता त्यांचं जमत नाही तरीही तिने त्याला धरुन रहायचं? कि त्याने हॉटेलिंग, फुलं, चॉकोलेट्स दिली त्याचा हिशोब मांडुन ते पैसे परत द्यायचे. शनाया बद्दल मला किंचितही सहानुभुती नाही, पण लेखकाच्या मुर्खपणाबद्दल मात्र अगदी तिरस्कार आहे. शनायाला धोखेबाज दाखवायचं तर मोठा गफला किंवा काही तरी जबरी शेंडी लावलेली तरी दाखवयाची ना. हे काय तिच्यावर खर्चे केलेले पैसे वसुल करायचे? बरोबरच आहे, शनायाने असल्या चिल्लर एक लाख खर्च केलेले अकांउंट मांडत बसणार्या bf ला सोडुन दिलं. आता गॅरी पण नंतर हेच म्हणणार का कि शनायाने मला चीट केलं? तो काही लहान नाही, ती त्याचं क्रेडित कार्ड वापरते ते त्याच्या परवानगीने. ते एकत्र रहातात ते म्युच्युअल कन्सेंटने. जर पुढे नाहीच पटलं तर त्याने ते पैसे परत मागणं हे तुमच्या मते बरोबर आहे का? मग शनायाने पण त्याच्याबरोबर रहाण्या-झोपण्याचे पैसे मागावेत का? शनाया स्ट्युपिड आहे, स्वार्थी आहे पण तो bf पण किती चीप आहे. तिच्या प्रेमात असताना तिच्यावर खर्चे केलेले पैसे त्याला परत हवे आहेत. कथा महामंद लेखकाने लिहिली आहे झालं.
मनिमाऊ... अगदी अगदी...
मनिमाऊ... अगदी अगदी....इतकी वैतागू नकोस!
मे बी हे पैसे त्याने तिच्या वर खर्च केलेले नसून तिला दिले असतील उधार वगैरे...!!
आणि तू म्हणजे अगदी इतक्यातच बंद केलीस की ही मालीका बघणे..........कुणाल ची एंट्री लेटेस्टचे.
स्वस्ति.......हो....तिने गॅरी कडून पैसे घेऊन कुणालला दिले हे चुकलं...बाकी काही चुकलं नाही!
गॅरी काय कमी धोखेबाज (:-) ) आहे का?
शनाया हि केवळ दुसऱ्याच्या
शनाया हि केवळ दुसऱ्याच्या पैशावर मौज मारणारी आणि स्वतःवर प्रेम करणारी मुलगी आहे आणि या साठी ती केवळ गुरु ला धरून होती. या मालिकेत तिला आधी आळशी दाखवली आठवा ती जेव्हा त्या टीचर सोबत होती, मग धोरणी म्हणजे आता आपले इथे काहीच होणार नाही म्हणून दुसरीकडे नोकरी करू वैगरे. यामध्ये ती कधीही महाभयानक आहे, धोखेबाज आहे, तिच्यापासुन सावध रहा अशा टाईप नाही वाटली. उलट तो गुरूच तुसडा चकमक मिळाली म्हणून बायकोशी हिडीस फिडीस वागणारा, लोक लेखकाला शिव्या देऊ लागलीत म्हणून मुलाबरोबर चांगला दाखवलेला, ग फ्रे साठी आई वडिलांशी सुद्धा भांडणारा. आणि केवळ ग फ्रे ला दुसऱ्या यंग मुलाबरोबर बघितला म्हणून जेलस होणार. त्याला कधीही सारासार विचार करताना दाखवले नाही केवळ आपल्याकडे पॉवर आहे आणि दुनियेबरोबर आपण अप टू डेट आहोत (त्याचा मते ) म्हणून बायकोला कमी समजतो. ती राधिका हि अडाणीपणाची कळस आहे. जाऊ दे सुरुवातीला ज्या जाहिराती दाखवल्या होत्या त्यानुसार हि मालिका कधीच न्हवती.
सुरुवातीच्या झायराती जाउंदे
सुरुवातीच्या झायराती जाउंदे टायटल सॉंगम्धे पण दाखवतात ना काहीही
होय हो पार निराशा केली या
होय हो पार निराशा केली या मालिकेने .
कथा महामंद लेखकाने लिहिली आहे
कथा महामंद लेखकाने लिहिली आहे झालं. > +१ मालिकेच्या सुरुवातीला गुरुचे प्रमोशन कळल्यावर "I want a car.." वगैरे म्हणताना दाखवल्ये शनाया! आणि मग १ लाख एकदम येवढी मोठी रक्कम का वाटायला लागली ? शनाया लबाड असते तर १ लाख असेच मागितल्यावर देते?? तिला नक्की कसे दाखवायचे हे अजुन लेखकाचे पक्के ठरले नाहीये!
Pages