Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही पण माणसं जोडली आहेत पण
आम्ही पण माणसं जोडली आहेत पण आम्हाला कोणी फुकटात नाही राहायला देत . आणि इतके दिवस? शक्यच नाही.
अशक्य तेच दाखवतात ना या मालिकांमध्ये. आणि तिनी एकटीने काय असं खंबीरपणे निभावलं ?
सगळ्यांच्या मदतीनेच केलं ना . काहीही
नविन प्रोमोज आले की एखादी
सिरीयल काही इतक्यात संपेल असं वाटत नाही,>>> असे नको प्लीज! >>> नविन प्रोमोज आले की एखादी सिरीयल संपायला आली असं समजतात ना. आता आहेत ते प्रोमोज जय मल्हारसाठी आहेत. त्यामुळे मानबा संपेल असं वाटत नाही आणि त्या शनायाला इशा भडकवते आहेना, त्यामुळे मी लिहीलं तसं वर.
गुरू म्हणजे दोन्ही घरचा
गुरू म्हणजे दोन्ही घरचा पाहूणा असून भरपेट आहे त्याची मजा. शनायच्या आधी राधिका, मग शनाया आता परत राधिका.
पण शनाया खरंच काम छान करते, तीच्या एकूण अॅपियरन्स वरून ती मला फार नाजूक आणि मुलायम वाटते. आनंद तिला जिलेबी ऑफर करतो आणि इतकं कुचकं बोलते पण तिची नजर मऊ कोमल आणि केविलवाणी दाखवली आहे.
शनाया काम चांगलं करते, आधी
शनाया काम चांगलं करते, आधी ऑफीसमधे ती इन्सल्ट करत असेल ना सगळ्यांचा, आता ते वचपा काढत असतील.
गुरू म्हणजे दोन्ही घरचा
गुरू म्हणजे दोन्ही घरचा पाहूणा असून भरपेट आहे त्याची मजा. - हो ना, आधी तो राधिकाकडून घरची कामे करुन घ्यायचा, नन्तर शनाया काहीच घरच काम करत नसली तरीही तिला चहा करायला, भातावर तूप वाढायला सान्गायचा. स्वतः मात्र काहीच करायचा नाही.
आज गुरु फिल्मी हिरो, दबन्ग
आज गुरु फिल्मी हिरो, दबन्ग स्टाईल फायटिन्ग करणार आहे.
आज गुरु फिल्मी हिरो, दबन्ग
आज गुरु फिल्मी हिरो, दबन्ग स्टाईल फायटिन्ग करणार आहे.>>कोणाशी?
नवीन प्रोमोवरुन वाटतंय की
नवीन प्रोमोवरुन वाटतंय की गॅरी शनायाने jealous व्हावं म्हणून राधिकाशी चांगला वागतोय
पण गॅरीने कबुल केलं की
पण गॅरीने कबुल केलं की स्वतःशी की त्याच्या मनात अजून शनाया आहे, त्यामुळे शनायासाठी सोपं आहे परत त्याची सहानुभुती मिळवणं. ती प्रुव्ह करेल रेवती, आनंदचा गेम होता. मग गॅरीने माफ केलं पैशासाठी खोटं बोलण्याबद्दल आणि तिला परत घेतलं तरी राधिका माह्या नवरा मी मिळवणारंच करेल का.
अथर्वला गॅरीची दाढी आणी
अथर्वला गॅरीची दाढी आणी झिंज्या ओढायला सांगायला लागणार आहे. नाहीतर एकीकडुन शन्या आणी दुसरीकडुन राधिका अशा दोघींनी हे पवित्र काम करावे. म्हणजेच दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी गॅरीबुवांची गत होऊ शकेल. मला आता ही मालिका किळसवाणी वाटायला लागली आहे. मला राधिकाचा पुळका आता अजीबात येत नाही आणी शन्यावर दया पण येत नाही. दोघी रांजण आहेत.
रश्मे किती राग तो
रश्मे किती राग तो
रांजण नको म्हणू हो, रांजणाचा अपमान कशाला
ह्या असल्या तद्दन फालतू सिरियल्स पाहूनच समाजात वारे पसरतात की नवर्याने कसे ही वागले तरी बायकोने सावित्री होऊन त्याला प्रत्येक यमरूपी प्रसंगातून ओढून आणावे आणि आपलेसे करावे..
हो न अन काय ते.. नवरा अन
हो न अन काय ते.. नवरा अन त्याचं लफडं दोन्ही सांभाळुन वर नवर्याला माफी.. फालतुगिरी एकदम.. कसला मेसेज देताहेत समाजात त्यांच त्यांनाच ठाऊक..
नवरा अन त्याचं लफडं दोन्ही
नवरा अन त्याचं लफडं दोन्ही सांभाळुन वर नवर्याला माफी.. फालतुगिरी एकदम.. > +१. कसली कणाहीन दाखवली आहे. आत्मविश्वास येऊन, येवढी सगळी फौज मदतीला असून शेवटी स्वाभिमान्शून्यता अगाध पतीप्रेमाच्या नावावर दडपून दाखवली आहे.
आज गुरु फिल्मी हिरो, दबन्ग
आज गुरु फिल्मी हिरो, दबन्ग स्टाईल फायटिन्ग करणार आहे.>>कोणाशी? >>>> ती राधिका एका Client ला भेटायला त्याच्या hotel च्या रुमवर जाते, तिथे तो Client तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. गुरु त्या Client ला ओळखत असतो, त्या Client ची बायकान्वर वाईट नजर असते हे त्याला माहीत असते. सो, गुरु तिच्या पाठलाग करत त्या hotel रूमवर पोहोचतो. Client तिच्यावर बळजबरी करत होता, गुरु त्याला फिल्मी हिरोस्टाईल धुतो. हि राधिका त्याच्या पाठिमागे हिन्दि सिनेमाच्या नायिकेसारखी घाबरुन उभी असते.
खरतर यात चूक राधिकाची होती. तो Client कोण आहे, कसा आहे याची काहीही चौकशी न करता, फक्त पेपरमधली जाहीरात वाचून त्याला भेटायला hotel मध्ये जाते. रेवतीला पण हे खटकत.
हिच चूक जर शनायाने केली असती तर राधिकाने तिच्या शि़क्षणाला टोमणे मारुन, तिला उपदेशाचे डोस पाजले असते.
अथर्वला गॅरीची दाढी आणी
अथर्वला गॅरीची दाढी आणी झिंज्या ओढायला सांगायला लागणार आहे. नाहीतर एकीकडुन शन्या आणी दुसरीकडुन राधिका अशा दोघींनी हे पवित्र काम करावे.
खरतर यात चूक राधिकाची होती.
खरतर यात चूक राधिकाची होती. तो Client कोण आहे, कसा आहे याची काहीही चौकशी न करता, फक्त पेपरमधली जाहीरात वाचून त्याला भेटायला hotel मध्ये जाते. >>>> तिकडे जाउन , "पण चोपडा भाउ , मी काय म्हणते ... " असं बोलण्याचा प्लान होता का तिचा???
अर्धवटपणाचा कळस आहे, मी का
अर्धवटपणाचा कळस आहे, मी का बघतेय दोन दिवस उगाच असं झालंय. शनायाचा हिशोब कर असं काहीतरी गॅरी म्हणाला होताना तिला ऑफीसमधून काढतांना, मग भक्तीचे पन्नास हजार द्यायला नाहीत तिच्याकडे, आता एक महिना काम करुन देऊ शकते मग आधीचे इतक्या महीन्याचे किती मिळाले असतील. गुरुच्या लक्षात आलं नाही का हे, लॉजिक गुंडाळतात सर्व मालिकेत पण काल का परवाचे सीन डायलॉग पण विसरतात का?
शनायाकडे तर ५००० रुपये पण
शनायाकडे तर ५००० रुपये पण नाहीत असे तिच एकदा बोलते. म्हणजे आला दिवस ढकल असे करते का ती?
कमाल आहे!! एखाद्याच्या जीवावर एव्हढी मजा करायची आणि खात्यावर एक दमडी पण जमवायची नाही?
अन्जू ... अगदी बरोबर...
अन्जू ... अगदी बरोबर...
मी तर आजकाल लॉजीक, मेंदु आणि बाकिच्या सगळ्या संवेदना बाजुला ठेवुन, फक्त डोळे आणि कान सोडुन, हि मालिका पाहतो...
परवा एक मित्रा सोबत चर्चा सुरु होती..त्याला लो ब्ल्ड प्रेशरचा त्रास आहे, म्हणुन तो काही तरी औषध घ्यायच म्हणत होत..
त्याला म्हंटल, अरे औषध काय घेतोस.. फक्त "माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला व खुलता कळी खुलेना" हे रोज पहा थोडे दिवस. नाही तुझा लो ब्ल्ड प्रेशर हे हाय झाल तर विचार...!!!
(No subject)
कमाल आहे!! एखाद्याच्या जीवावर
कमाल आहे!! एखाद्याच्या जीवावर एव्हढी मजा करायची आणि खात्यावर एक दमडी पण जमवायची नाही?>>> ती गुरुच्याच ऑफीसमधे जॉब करत असतेना, गुरुच्या जीवावर मजा करते मग तिचा पगार तर सेव्ह असेलना, का तोही उडवत होती. बरं ठीक आहे पण गुरु काढतो नोकरीवरुन तेव्हा हिचा हिशोब करा सांगतो, तर तो निदान एका महीन्याचा पगार आणि अजून काही रक्कम तरी असेलंच ना. मग तरी कफल्लक कशी? जाऊदे दोन तीन दिवस बघितली तरी डोकं चालवायचं नाही आपलं हे अजूनही कळत नाही मला, नव्हते बघत ते बरं होतं
नव्हते बघत ते बरं होतं >>>
नव्हते बघत ते बरं होतं >>> अगदी अगदी
या मालिकांचे लेखक फक्त ठरवत असतील कि आज कसा वेळ घालवायचा बरे.... हा आज तू हॉटेलच्या खोलीवर बोलणी करायला जा(काहीही विचार न करता), हा आज तू पेपर तपासायला बस आणि तू बाहेर पूजेला बस अन तिला त्रास दे, आज जात्यावर दळा
ह्या मालिकेचा लेखक/लेखिका कोण
ह्या मालिकेचा लेखक/लेखिका कोण आहे _/\_कसे काय सुचते लिहायला असे , राधिकाच्या भाषेत काहीच्याकाही !
खरतर यात चूक राधिकाची होती.
खरतर यात चूक राधिकाची होती. तो Client कोण आहे, कसा आहे याची काहीही चौकशी न करता, फक्त पेपरमधली जाहीरात वाचून त्याला भेटायला hotel मध्ये जाते.>>> नुसतीच भेटायला जात नाही तर त्याला हॉटेलच्या लॉबीमधे न भेटता रुम मधे भेटते. तो दार उघडताना हातात दारुचा ग्लास असतो तरी आत जाते. खरच बावळट आहे ती
गॅरी Client शी मारामारी करू
गॅरी Client शी मारामारी करू शकतो तर राधिकेने एक वेणीचा रट्टा दिला अस्ता तरी काम झालं अस्तं!
(No subject)
दक्षु, अगं खरच कंटाळवाणी
दक्षु, अगं खरच कंटाळवाणी झालीय ही मालिका. त्यापेक्षा राखेचा बरी होती, मजा यायची. कशाचा कशाला पायपोस नसला तरी उत्सुकता असायची. या मध्ये नुसती ठिगळं जोडत चाललेत हे लोक.
रावी
रावी
>>>राधिकेने एक वेणीचा रट्टा
>>>राधिकेने एक वेणीचा रट्टा दिला अस्ता तरी काम झालं अस्त >>>
काल गुरु, राधिका व पोरगा
काल गुरु, राधिका व पोरगा पिझ्झा खायला गेलेले दाखवले . राधिका नव्या नवरीगत लाजत होती गुरु कडे पाहून! आधीच्या त्याच्या वागण्याबद्दल काडीचाही मागमूस नाही चेहेर्यावर! आणि ती गुरु पेक्षा किती मोठी दिसते! त्याची मोठी बहिण वाटते लिटरली. अथर्व त्याची आई व लहान मामा आले आहेत असे वाटत होते.
आणि वर गुरु म्हणे..की तुलाही परदेशात जायची वेळ आली तर कसे करशील? पिझ्झा न खाऊन?
तर अगदी कृतक कोपाने का कायसेसे हसली !!!!
Pages