माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समिधा बोलते ते काही चुकीचं नाही वाटलं >>> ती नेहमी बरोबरच विचार करते . फक्त त्या शनाया आणि ईशाच्या नादी लागून पोरखेळ करते ते पटतं नाही .
परवा पण राधिका त्या गॅरीच्या हुकलेल्या अवॉर्ड ची गोश्ट सांगत होती , तेन्व्हा ती बरोबर विचार करत होती .

जो नवरा काडीची किंमत देत नाही तिच्यासाठी हीचा किती अट्टाहास आणि तोही आमच्या जीवावर.

फक्त त्या शनाया आणि ईशाच्या नादी लागून पोरखेळ करते ते पटतं नाही>> ती राधाक्काने तिच्या घरातून बाहेर पडावे म्हणून तसे करते.

आता काही मुलीन्ना, बायकान्ना लहान मुले आवडत नाहीत, त्यात गैर असे काही नाही. असतो एकेकाचा स्वभाव >>> अगदी अगदी, मलापण नाही आवडत लहान मुले.

माझी मम्मापण मला याबद्दल माणुसघाण म्हणते पण आता नाही आवडत लहान मुले तर काय करणार

हल्ली एपिसोडसचे Editing गन्डत चाललेय की काय? परवाच्या भागात गुरु office बाहेर गोन्धळ, आवाज कसले येतात म्हणून आनन्द आणि जेनीकडे तक्रार करतो, पण राधिका त्याच्या office बाहेर झोपडी करुन राहते हे कालच्या भागात दाखवलेय. कस शक्य आहे हे?

ती नेहमी बरोबरच विचार करते . फक्त त्या शनाया आणि ईशाच्या नादी लागून पोरखेळ करते ते पटतं नाही .>>>> सहमत. काल रेवती सुद्दा हेच म्हणत होती.

शन्या ने भ या ण डान्स केला काल । अरे अस झोपड़ी घालून कुणी राहील का। रधिकाच्या सासऱ्याना तिला घरी घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे?

रधिकाच्या सासऱ्याना तिला घरी घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे?>>>ते तर आधीपासून राधाक्काला नागपूरला रहायला बोलावत आहेत. पण तिलाच तिकडे जायचे नाही. 'माह्या नवर्‍याला मी इथच राहून परत मिळवणार' असा तिचा हट्ट आहे. आता झोपडीत राहून गुरुनाथला सुनावण्याचा राधाक्काचाच प्लॅन असतो.

ह्याच पण पसंत आहे मुलगी सारख होणार बहुतेक.. म्हणजे तिथे नंदिता अगदी शेवटचा भाग येईपर्यंत दुष्ट दाखवली आणि शेवटच्या भागात एकदम फुल पलटी.. अचानक तिला सगळ्या चुका समजतात आणि एकदम शहाणी बाळ होते ती.. तसच गॅरी आणि शनायाला शेवटच्या भागात एकदम उपरती होईल..मग एकमेकांबद्दल कोणालाच काही अढी नाही असंही दाखवतील.. मोठ्या मनाने सगळे एकमेकांच्या चुका माफ करणार.. मग सगळ आधीच विसरून गुडी गुडी... मग मीच माह्या राजाची आणि घराची राणी.. आणि शनायाला पण तिच्या वयाचा राजा मिळेल..

मला काल पहिलेच गुरुनाथ चे दया आली किंवा कीव वाटली. कपल्स नॅचरली सुद्धा ग्रो अपार्ट होतात. ( हे वाक्य मराठी समजून घ्या. ) तसे त्याचे झाले असेल. स्वार्थी पणा सोडल्यास शनाया वाइट नाही. जर त्याला ही नकोच आसेल तर त्याला घटस्फोट मिळायला हवा. असेकाहेएट केल्यासरखे सात जन्म ह्याच्याशीच हे आता अगदी अनाकलनीय आहे. झोपडी एपिसोड पॅथेटिक आहे. सासरे सासू पण अक्कल नसल्यासारखे तिथे बसतात. त्यापेक्षा तिला समजावून नागपूरला न्यायला हवे. त्यात पोराची आबाळ. आणि ही वेडी बाई तिथे पण किचन लावून आणि धुणी भांडी करते हे अगदी विचित्र आहे. मुंबई सारख्या ठिकाणी अर्ध्या दिवसात घर भाड्याने मिळू शकते. त्या सासर्‍याला तरी कळायला हवे हे. त्यात नागपुरी लोक प्रतिष्ठेला खूप वेटेज देतात. ते असे रोड साइड गंमत म्हणूनही राह्णार नाहीत.

झी चित्र गौरव अवॉर्ड मध्ये एका स्किट मधे अनिता दाते केळकर बाई, 'प्रिया बापट' बनली होती वजनदार मधली पण तिथे हि माह्या माह्या करायला लागली, म्हणजे आधी बरोबर प्रिया बापट च्या क्यारेक्टेर मध्ये होती आणि अचानक तिच्यात राधिका शिरली आणि माह्या, हवना सुरु झाले.

आधी बरोबर प्रिया बापट च्या क्यारेक्टेर मध्ये होती आणि अचानक तिच्यात राधिका शिरली आणि माह्या, हवना सुरु झाले.>> ते मुद्दम असते.

स्वार्थी पणा सोडल्यास शनाया वाइट नाही>>>>>> हे मात्र अजीबात पटलेले नाही. उद्या चार चौघांसमोर लग्न झाल्यानंतरही बायकोत नवीन दोष दिसायला लागले, तर त्या व्यक्तीने शनायासारखी शोधायची का? मग बायकोने नवीन गुरुनाथ का नको शोधायला?

मुळात ह्या गॅरी-फॅरीला आधी कळले नाही का की बायको आधूनीक नाही ते. झापडं लावुन बसला होता की लग्नाच्या वेळी झोकुन बसला होता? भरीस भर पोरं पण होऊ दिलं मग ह्या मुर्खाला दृष्टांत झाला की बायको गावंढळ आहे.

सिरीयल, कथानक सगळं विचीत्र आहे, पण म्हणून शनाया पटलेलीच नाही. शनयाचा डान्स अतीशय भयाण आणी किळसवाणा होता. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला असे नृत्य होते ते.

शनयाचा डान्स अतीशय भयाण आणी किळसवाणा होता. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला असे नृत्य होते ते.>>> कोणता डान्स ती कधी नाचली या सिरीयल मध्ये. हा काल झी गौरव मध्ये नाचली खरी, पण किळसवाणी वैगरे काय , छान कपडे घातले होते कि व नाचलीही छान. अगदीच किळसवाणी वैगरे शब्द तिच्यावर राग म्हणून वापरने गैर नाही का ? आणि हो नवऱ्याची बायको मध्ये तीच एक बघणीय आहे (समिधा आणि राधिकाची मैत्रीण सुद्धा छान दिसतात).

मुळात ह्या गॅरी-फॅरीला आधी कळले नाही का की बायको आधूनीक नाही ते. झापडं लावुन बसला होता की लग्नाच्या वेळी झोकुन बसला होता? भरीस भर पोरं पण होऊ दिलं मग ह्या मुर्खाला दृष्टांत झाला की बायको गावंढळ आहे. >>> गुरुही आधी तसाच होता पण मुंबईत येऊन तो बदलला. राधिका बदलली नाही. वागायला, बोलायला अधुनिक झाली नाही किंवा कालानुरुप बदलली नाही हा प्रॉब्लेम आहे

अगं अपर्णा, मी झी गौरव बद्दल बोलतच नाहीये. राधिकाला घराबाहेर जावे लागते तेव्हा शनया घरात भयाण डान्स करते त्या बद्दल लिहीले आहे मी.
https://www.youtube.com/watch?v=dSrgyArdVSw इथे बघ तो नाच.

शनाया नुसती स्वार्थी नाहीये, त्या राधिकाला पाण्यात पहाते जशी राधिका बघते तशीच. दोघी बालिशपणा करुन एकमेकींवर कुरघोडी करायला जातात. त्या समिधाने बिनडोक शनायाचं ऐकलं ते चुकीचं आहे. फक्त एक आहे गॅरीला बायकोच्या सर्व चुका दिसतात आणि सतत अपमान करतो पण शनायाने केलेल्या चुका कायम दुर्लक्षित करतो. तिला सांभाळून घेतो.

तिला सांभाळून घेतो.>> तो पझेसिव पण आहे तिच्या बाबतीत. पण त्यांचे काही का असेना आता राधिकात इम्टरेस्ट नाही हे क्लीअर केल्यावर तिने सन्मानाने बाजू व्हावे. तर ते नाही. त्याचा वैताग येतो.

ते तिने आधीच करायला हवं होतं, डीवोर्स घ्यायच्या आधी दोन दिवस जेलमधे पाठवायला हवं होतं चांगला बुकलून, मग भरपुर पोटगी घेऊन डीवोर्स. झीच्या फेसबुकवर मी लिहीलं होतं.

राधिकाला घराबाहेर जावे लागते तेव्हा शनया घरात भयाण डान्स करते >>> आजिबात नाही. अगदी शन्याच्या कॅरेक्टरला शोभेल असाच डान्स आहे तो. आणि बरा आहे की. किळसवाणा तर आजिबातच नाही. किळ्सवाणा का वाटला रश्मी तुला? त्यात तिने किळस येण्यासारखे काहीही हावभाव पण केले नाहीत. बिचारी खुशीत एखाद्या अडनिड्या वयात असलेल्या बावळट मुलीसारखी नाचलीये.

एका तर्हेने, मालिकेच्या शिर्षकातच हे दिसून येतं की राधिकानी ते जवळपास अ‍ॅक्सेप्ट केलय की शनाया त्याच्या नवर्याची बायको आहे....बाकी सगळं विनोदी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न आहे फक्त....

एखादे जोडपे लग्नाच्यावेळी अनुरूप वाटले तरी ते जसे वयाने अनुभवाने वाढतात तसेत्यांची व्यक्तिमत्वे बदलत जातात अनुरूप राहतीलच असे नाही. राधिका त्याला सपोर्ट सिस्टिम म्हणून वागते पण पार्टनर आहे का चांगली. ते कुठेच व्यक्त होत नाही. शिवाय तिच स्वतःची एक व्यक्ती म्हणून काय वाढ झाली आहे? वागणे गावंढ ळ असू शकते पण एक वैचारिक वाढ व्हायला हवीना. मी पण पाच वर्शांपूर्वी मुंबईत आले तेव्हा आणी आताची मी ह्यात खूप फरक आहे. इथे वागायची एक पद्धत आहे. लोक जास्त व्यवस्थित चटपटीत राहतात.
नाक खुपसत नाहीत आणि जास्त जवळीक पण करत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर हिचे वागणे जरा अति वाट्ते. इतके दिवस लोकांच्या घरी राहणे मुंबईत शक्यच नाही. कोणीच ठेवून घेणार नाही.

सॉरी सस्मित, मला खरच आवडला नाही तो नाच. बाकी कुणी कुणाला इतके दिवस ठेऊन घेत नाही हे खरे आहे, पण आम्ही यातुन गेलो आहोत. अर्थात राधिका सारखे उदाहरण नाही, पण बाबांचे एक किर्तनकार मित्र, बायको व लहान बाळा समवेत आमच्या घरी राहीले होते बरेच दिवस. मी सातवीत होते त्या वेळी. पण त्या लहान बाळाची ट्र्जेडी झाल्याने आम्ही त्या नवरा-बायकोना काही बोललो नाही. उलट नंतर त्यांच्याशी आणखीन चांगले नाते निर्माण झाले.

वर्षभर परदेशात असतांना एक चांगले उदाहरण बघायला मिळाले होते. एक तमिळ मुलगा त्याच्या बायको समवेत आला होता. बायकोला ईंग्लिशचा हाय थँक्यु इतपतच सराव होता, पण त्या तरुणाने ऑफिसमधून घरी आल्यानंतर इंग्लिश लिहायला-वाचायला व बोलायला शिकवुन तिच्यात आत्म विश्वास निर्माण केला. नंतर ती मुलगी जॉब पण करत होती. अशी उदाहरणे पाहिल्यावर हे गॅरी सारखे स्वार्थी पुरुष डोक्यात जातात. आणी दुसरीचा संसार उध्वस्त करणार्‍या शनया सारख्या मुली पण डोक्यात जातात.

यातुन एकच घेण्या सारखे आहे की अशा स्वार्थी पुरुषांना अद्दल घडवुन स्वतः खंबीर राहुन स्वतःचे आयुष्य घडवावे. गुरुनाथ मुंबईत आल्यावर बदलतो कारण तो बाह्य जगात एकरुप झालेला दाखवलाय, राधिका मात्र चूल आणी मूल यातच व्यग्र राहील्याने बदलत नाही किंवा बदलु पहात नाही. पण रेवती सारखी आधूनीक मैत्रीण असतानाही राधिका हावं ना, वगैरे बोलत रहाते हे कळत नाही.

गॅरीने बायकोला शिकवायला हवं होतं, ती अशी आहे म्हणून अफेअर करणं हे बरोबर नाही. बरं अफेअर आहे तर कंप्लीट मॅन टायटल कशाला हवं, इतका स्वार्थीपणा का, खोटेपणा का. तेव्हा गावठी, न आवडणारी बायको उद्योजिका आहे असं सांगतो. एरवी कधीच त्याला तिचं कौतुक वाटत नाही.

एकंदरीत मला तिघंही आवडत नाहीत राधिका, गॅरी, शनाया. नीट कॅरॅक्टर्स उभीच केली नाहीयेत.

एकंदरीत मला तिघंही आवडत नाहीत राधिका, गॅरी, शनाया>>>>> + १ मला तर नानानी, गॅरीचे आईबा चा ही राग येतो. कसली भंपक कॅरेक्टर्स आहेत. त्यांच्यापुढे मग ही विलनीश मंडळी खरी वाटतात आणि पटु लागतात.

अगं अपर्णा, मी झी गौरव बद्दल बोलतच नाहीये. राधिकाला घराबाहेर जावे लागते तेव्हा शनया घरात भयाण डान्स करते त्या बद्दल लिहीले आहे मी.>>>> ओके म्यडम.

Pages