Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी केलय .
मी केलय . दुसर्या दिवशीही करता आल, ओप न कॅटॅगरी मधे ( पर्सन होल्डिंग आधार कार्ड / इंडियन पासपोर्ट अशी आहे ओपन कॅटॅगरी)
तेही आता संपलय दुसर्या दिवशी.
अरे वा लकी आहात इन्ना.....मी
अरे वा लकी आहात इन्ना.....मी आणि माझ्या मित्रान्नी बराच प्रयत्न केला ७ आणि ८ तारखेला...पण नाही झाल आमचे booking...
anyway भेटू सातार्यात marathon ला जर booking मिळाले तर
मी पण केलय...
मी पण केलय...
यावेळेस सातार्याला जायचा बेत
यावेळेस सातार्याला जायचा बेत नाही.
स्थानिक सातारकर मंडळींकरता नोंदणी अजून चालू आहे. पैसेही कमी लागतात. पण त्या करता सातारचा रहिवासी दाखला आवश्यक.
ह्यावर्षी (मागे हुकलेली) लडाख मॅरॅथॉन करणार आहे.
हर्पेन, मीही नाही यावेळी
हर्पेन, मीही नाही यावेळी सातार्याला. मी बहुधा यावेळी हैद्राबाद फुल.
लडाख !!!!!!! मस्तच !!!!!
लडाख !!!!!!! मस्तच !!!!!
मी पण एकदा करणारच आयुष्यात !!
हर्पेन, तुला लडाख मॅरेथॉनसाठी
हर्पेन, तुला लडाख मॅरेथॉनसाठी खूप शुभेच्छा.
हर्पेन, खूप शुभेच्छा!
हर्पेन, खूप शुभेच्छा!
हेम मस्तच, तुला आवडेल
हेम मस्तच, तुला आवडेल हैदराबाद मॅरॅथॉन. ऑल द बेस्ट
धनश्री - तथास्तु
आडो, मंजू ताई धन्यवाद. लडाख साठी शुभेच्छा खरंच खूप गरजेच्या आहेत.
हर्पेन, खूप शुभेच्छा !......
हर्पेन, खूप शुभेच्छा !......
सध्या तरी ड्रिम आहे लडाख मॅरॅथॉन चे....पण आधी सातारा....by hook or crook
हर्पेन लडाख करता शुभेच्छा !!
हर्पेन लडाख करता शुभेच्छा !! आणि बाकीच्यांना सातारकरता
मंडळी कृपया http://www
मंडळी कृपया http://www.maayboli.com/node/62645 पहा आणि आपले अमुल्य योगदान द्या ही विनंती.
इथे कळवणे राहून गेले होते
इथे कळवणे राहून गेले होते
मी ९ सप्टेंबर रोजी लडाख मधील ७२ किमी चा खार्दून्ग ला चॅलेंज १३ तास ५७ मिनिटात पूर्ण केले.
सविस्तर वृत्तांत वेगळा धाग्यावर लवकरच टाकेन.
यावेळी टाटा मुंबई मॅरॅथॉन मधे
यावेळी टाटा मुंबई मॅरॅथॉन मधे कोण कोण धावले?
माझ्या माहितीत एक आहेत, ते
माझ्या माहितीत एक आहेत, ते धावल्याचं कळलं. नाव आठवत नाहीए.
त्यांचं (४ ^ ४)^४ वेळा अभिनंदन.
हर्पेन, तुझं टायमिंग काय आलं
हर्पेन, तुझं टायमिंग काय आलं या वेळी मुंबई मॅराथॉनमध्ये?
मला इंग्रजी सबफोर (म्हणजेच
मला इंग्रजी सबफोर (म्हणजेच चार तासाच्या आत) करायचे होते पण झाले हिंदी 'सब' फोर.
४ तास ४ मिनिटे ४ सेकंद.
नेहेमी प्रमाणे चोख व्यवस्था, मुंबईकरांचा उत्तम सपोर्ट व्य वस्थित तयारी असे असतानाही मला शेवटचे १० किमी अतिशयच अवघड गेले.
पण मी माझ्या प्रयत्नांवर समाधानी आहे. यावर्षीच्या, माझ्या पाचव्या मुंबई मॅरॅथॉनमधे नोंदवलेली वेळ माझी सर्वोत्तम वेळ आहे. मला मागच्या वर्षी पेक्षा ८ मिनिटे कमी लागली.
या वर्षीची अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे स्पर्धकाला स्पर्धा संपव ल्या नंतर दोन मेडल दिली गेली त्यामागचे 'टाटा' कारण की आपण एकटे कधीच नाही पळत आपण धावू शकतो कारण आपल्या मेहेनती बरोबर आपले सगे सोयरे मित्र मेंटॉर कोच ट्रेनिंग पार्टनर ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा सहयोग हे असतेच तर त्यातल्या कोणा एकाला / प्रतिनिधी म्हणून Inspiration मेडल आणि आपल्याला Finisher मेडल.
भरत
भरत
अभिनंदन हर्पेन, सब ४ भारीच!
अभिनंदन हर्पेन, सब ४ भारीच!
>>>
आपल्या मेहेनती बरोबर आपले सगे सोयरे मित्र मेंटॉर कोच ट्रेनिंग पार्टनर ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा सहयोग हे असतेच तर त्यातल्या कोणा एकाला / प्रतिनिधी म्हणून Inspiration मेडल आणि आपल्याला Finisher मेडल
>>
हे फारच छान
काल अजून तीन मायबोलीकर पण
काल अजून तीन मायबोलीकर पण होते मुंबई मॅरेथॉन मध्ये.. हेम - फुल, मध्यलोक - हाफ, आणि रोहित एक मावळा - ड्रीम रन
कोंडुस्कर ट्रॅवल्सच्या
कोंडुस्कर ट्रॅवल्सच्या बसमध्ये प्रत्येक सीटच्या मागे कोल्हापूर मॅराथॉनचा स्टिकर. फुल, हाफ आणि ५०किमीची अल्ट्रा मॅराथॉन. भारतात रनिंग कल्चर एकदम जोमात!
हो हिम्या, हेम मलाही
हो हिम्या, हेम मलाही स्पर्धेच्या आधी भेटला.
बारिशकर पण होता. त्याने ४ तास १४ मिनिटात फुल मॅरॅथॉन पुर्ण केली.
टण्या, भारतात आता ही एक नवीन इंडस्ट्रिच झाल्ये
अरे वा हर्पेन अभिनंदन.
अरे वा हर्पेन अभिनंदन. बाकीच्या माबोकरांचे पण अभिनंदन ! असेच पळत रहा
सर्वांचे अभिनंदन.
सर्वांचे अभिनंदन.
मुंबई धावणं मला खूप अवघड वाटतं, तिथल्या दमट हवेमुळे. त्यामुळे सर्व धावपटूंचे विषेश अभिनंद्न. कीप इट अप.
मागच्या वर्षीच्या मुंबई
मागच्या वर्षीच्या मुंबई मॅरेथॉन नंतर सुरु झालेला माझ्या पायाच्या दुखण्याचा प्रवास मसल स्वेलींग, पर्फोरेटेड व्हेन्स, कंपार्ट्मेंट सिंड्रोमची शक्यता ते फायनली स्ट्रेस फ्रॅक्चर पर्यंत येऊन पोहोचलाय. २ महीन्यांच्या विश्रांतीनंतर ३१ डिसेंबर पासून पुन्हा अगदी हळू सुरुवात केली, ती आता १३ के पर्यंत येऊन पोहोचले आहे. पेस अजूनही अतीशय कमी आहे, पण सध्या फोकस त्रास न होऊ देता एंड्यूरन्स वाढवणे ह्यावर ठेवलाय.
डॉ च्या मते, माझ्या पायांचे मसल्स विक आहेत आणि रनिंग सुरु करायच्या आधी कधिही कोणत्याही प्रकारच्या खेळात नसल्याने हा त्रास झाला आहे.
सुरुवातीला मी पूर्ण लक्ष वेग वाढवणे ह्यावरच केंद्रित केले, व्यायाम व्ह्यायचा नियमीत पण तिकडे मी फार लक्ष दिलं नाही., शिवाय मी ज्या बॅच मध्ये जायचे तिथे ९९% रनर्स आणि त्यातही ९९.९९% पुरुष आहेत. प्लॅन्क्स आणि पुश अप्स सोडता बाकी सगळे प्रकार मी त्यांच्या बरोबरीने करु शकते ह्या आनंदात मी 'ह्या व्यायामामुळेच आपण दुखापत टाळू शकतो' हा विचार कधी केलाच नाही. ही चुक माझ्या आता लक्षात येतीये.
तर ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न विचारायचे आहेत.
१. कोअर, फ्लेक्झीबिलीटी, स्ट्रेन्थ हे सगळे प्रकार आठवड्यात किती वेळा व्ह्यायला हवेत ? आमच्या ग्रुप मध्ये आठवड्यात ३ वेळा व्यायाम असतो. हे सगळे प्रकार आलटून पालटून असतात, पण ते ' सब घोडे १२ टके ' ह्या न्यायाने.
२. आमचे हे व्यायाम शरीराचे वजन वापरुन केलेले असतात. कोणतेही इतर साधन नाही. क्वचितच जिम बॉल टिआरेक्स वगैरे. तर अश्या प्रकारे केलेल्या व्यायामाचा उपयोग होतो की जीम मध्ये जाऊन करावेत ?
३. भारतात मिळणार्या ' फास्ट अॅण्ड अप' सारख्या https://www.fastandup.in/ सप्लीमेंट्स चा वापर तुम्ही करता का ? करावा का ? आजवर मी फक्त पाणी प्यायले आहे लाँग रन्स ला. रेसेस ला तिथे असणारे ज्युसेस वगैरे. एनर्जी जेलचं पाऊच एका रेसच्या किटबरोबर मिळालं होतं तेव्हा वापरलं होतं.
४. माझं स्वतःबद्दल असं ऑब्झर्वेशन आहे की, मी दमते कमी पण मला धाप लागते आणि फार म्हणजे फारच वॉकींग ब्रेक घ्यावे लागतात. आजपर्यंत केलेल्या हाफ मॅरेथॉन्स ( अॅव्हरेज वेळ २.२०/३० ), प्रत्येक रेस मी जवळजवळ ९० + वेळा वॉकींग ब्रेक घेऊन केलेली आहे. तर धाप लागणे कमी करण्यासाठी काय करु ?
प्लीज मार्गदर्शन करा.
बरेच दिवसांनी या धाग्यावर आलो
बरेच दिवसांनी या धाग्यावर आलो. मुंबई मॅराथॉनला माझी थोडी ट्रॅजेडी झाली. मॅरथॉनआधी १५ दिवस कंपनीत एक लोखंडी रॉड पायावर आपटून दुखापत झाली. मांडीचे स्नायू फाटून इन्टर्नल ब्लडिंग झालं. डॉकनी १५ दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली पण मुंबई धावू शकशील सांगितले. या १५ दिवसात स्ट्रेचेस कुठलेही केले नाहीत. मॅराथॉनच्या दोन दिवस आधी ५ किमी धावून पाहिलं. मॅराथॉनदिवशी मी जरा सावधपणेच धावत होतो. चार तासांत ३४ किमी पारही केले होते पण नंतर मात्र मांडीच्या मागे व बाजूला असे एकाच वेळी दोन क्रॅम्प्स आले आणि दोन वेळेला. अक्षरशः दोन्ही वेळेला रस्त्यावरच लोळण घेतली मात्र मेडिकल सपोर्ट उत्तम मिळाला. आयसिंग, मसाज, स्ट्रेच व्यवस्थित देऊन थोडं अंतर माझ्यासोबत येऊन मला रवाना केलं गेलं. त्या ८ किमी ला दिड तास घेवून ५.३४ मधे पूर्ण झाली.
आलेलं पूर्ण डिप्रेशन व संताप माबोकर मध्यलोक, रोमा व इन्द्राने घालवला. इन्द्राने तर त्या दिवशी माघी गणेश जयंती असल्याने घरून आणलेले उकडीचे मोदक खाऊ घातले.
नंतर लगेच १५ दिवसांत झालेल्या नासिक पोलिस मॅराथॉनमध्ये मी हाफ धावलो. वेळ २.०४ आली. आता तयारी पुणे अल्ट्रा ५० साठी.
अभिनंदन
अभिनंदन
मुंबई मॅराथॉन २०१९ ची नोन्दणी
मुंबई मॅराथॉन २०१९ ची नोन्दणी आज सकाळपासून सुरु होतेय..
काल AACR Philadelphia
काल AACR Philadelphia Marathon पळालो.
Boston, New York, Chicago, Marine Core (Washington D. C.) नंतर प्रतिष्ठेची समजली जाणारी ही मॅराथॉन पाळायला काल 30000 धावक होते.
मी 26.2 मैलांचे (42 किमी ) अंतर 4:22:22 वेळेत पूर्ण केले.
ट्रेनिंग नुसार
13-14 मैल - 2 तास
19-20 मैल - 3 तास
आणि उरलेले 6 मैल 4 तास असा प्लॅन होता.
ट्रेनिंग बरहुकूम पाहिले 20 मैल पूर्ण झाल्यानंतर नेमके hamstring pull झाल्याने शेवटाच्या 7 मैलांना चालत, थांबत, पळत अशी 1 तास 22 मिनिटे लागली आणि 4 तासांचे टार्गेट मोठया फरकाने मिस झाले.
चालायचेच (काय कोटी झाली )
पुढच्या वर्षी Chicago Marathon ला पूर्ण करू टार्गेट.
एकंदर खूप खूप मजा आली.
सकाळी 32 डिग्री फॅरनहाइट (0 डिग्री सेल्सिअस) मध्ये लाकडं झालेले पाय घेऊन पाहिले दोन मैल पळताना पावलांना बसणार्या धक्क्यांमुळे आता पायांची बोटं अलगद वेगळी होऊन तुटून पडणार असं वाटत होतं
अभिनंदन हायझेन्बर्ग
अभिनंदन हायझेन्बर्ग
स्पर्धा किती वाजता सुरु झालेली
नंतर सगळ्यत जास्त तपमान किती होतं
Pages