लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लागिर म्हणजे काय ? >>

म्हणजे एखाद्याचे वेड लागणे...
शिम्पल मराठीत "लत लग गई" Wink

जांभुळ पिकल्या झाडाखाली गाण्यात आहे हा शब्द.

समिंदराचं भरलं गानं, उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी

सैराट हिट झाल्यापसून आता अजून एक दूसरी ग्रामीण कथा.. पहिली तुझ्यात जीव रंगला... जरा शहरी-ग्रामीण प्रेम कथा सोडून नवीन विषय नाहीत का...

अहो नटुकाकी, किती दिवस सैराटला शिव्या घालणार.. जरा गूगल केलं तर कळेल कि ही देशासाठी वेड्या झालेल्या जवानाची गोष्ट आहे!

ओह अस आहे होय.......... मला वाटल की परत प्रेम कथा आहे की काय..?? भावोजी अस मला ऐकू आल.. फौजी असाव .....
सैराटला शिव्या कुठ घातल्यात ..छान होता कि तो सिनेमा... तुझ्यात जीव रंगला च्या गान्यात सैराटची छाप दिसली होती म्हनुन....

पण तो लेका धा रुपयच्या कफनात... हा संवाद म्हणणारा इसम जर या सिरियल चा नायक असेल तर धन्य __/\__
>>
असे का? तो इसम नायक म्हणून योग्य नाही वाटला?

भावोजी अस मला ऐकू आल.. >> "लय आसतील मनमौजी, लाखात एक माझा फौजी" असं आहे ते. Happy माझ्या साबांनी पण भावोजीचं ऐकलं होतं. Happy

भावोजी Lol

नायक जर चंद्रकांत सूर्यकांत स्टाईल मध्ये चंद्रकोरी टिळा लावणारा असेल तर मग धन्यच आहे..

नायक मला बरा वाटला. हाईट छान आहे, स्मार्ट आहे, साईडचा दात मस्त दिसतोय. किडकिडीत आहे मात्र, तगडा नाहीये. अभिनय चांगला केलान तर आवडेल मला कदाचित.

आणखीन दुसरी एक ग्रामीण मालिका
<<लागिर म्हणजे काय ? >>
म्हणजे एखाद्याचे वेड लागणे...
शिम्पल मराठीत "लत लग गई ..>> म्हणजे परत सैराट झालं जी च
प्रोमो बघून तरी बघावीशी वाटत नाहीये Wink Happy

नायक मला बरा वाटला. हाईट छान आहे, स्मार्ट आहे, साईडचा दात मस्त दिसतोय. किडकिडीत आहे मात्र, तगडा नाहीये. अभिनय चांगला केलान तर आवडेल मला कदाचित.>>>> +111
नायिका पण गोड आहे.

नायक गोड आहे पण मी धन्य आहे या करिता म्हणाले की कोणताही माणूस्/बाई झी वाल्यांच्या हाती दिला
की ते त्यांचं माकड करतात.

नायक गोड आहे पण मी धन्य आहे या करिता म्हणाले की कोणताही माणूस्/बाई झी वाल्यांच्या हाती दिला
की ते त्यांचं माकड करतात. >>> पटलं, तथ्य आहे यात.

नायक मला बरा वाटला. हाईट छान आहे, स्मार्ट आहे, साईडचा दात मस्त दिसतोय. किडकिडीत आहे मात्र, तगडा नाहीये. अभिनय चांगला केलान तर आवडेल मला कदाचित.>>>> नायक तगडा नाहिये, मग तो आर्मीत कसा जातो?:अओ:

नायक तगडा नाहिये, मग तो आर्मीत कसा जातोp?:अओ: >>>>> आता हे काय नवीन? आर्मीचे कमी उंची चे तगडे नसलेले मेजर बघीतले आहेत. आणि त्यांचे कारणामे पण ऐकेलेत. 10 जणांना भारी पडतात ते.

ओ ssss फौजी.........तुमी बॉर्डर संबाळा ... ह्ये गावातलं (? शब्द समजत नाही!) आमी ) बगून घितोया.......
Happy

ओ ssss फौजी........ स्वडा की त्याला....... तुमी बॉर्डर संबाळा ... ह्ये गावातलं ला अँड आर्डर आमी बगून घितोया...................................

असंय ते! Happy

Pages