सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
भारीच फोटो सर्वच.
भारीच फोटो सर्वच.
इथे एक सुंदर रंगाचे रानफूल
इथे एक सुंदर रंगाचे रानफूल दिसते. याला पाने कमी पण देठ लांब असतात आणि ते आठही दिशांनी लांबवर जातात.
त्यांना हि फुले येतात. हि किती पिटुकली असतात, ते या पहिल्या फोटोत बघा.
मग मी जरा झूम करुन फोटो काढले, तर त्यातले सौंदर्य दिसले ( साध्या डोळ्यानी, म्हणजे चष्मा लावूनही
हे जाणवले नव्हते !!! )
वॉव, क्युट आहे.
वॉव, क्युट आहे.
कित्ती गोडुली
कित्ती गोडुली
बकुळीची फळे>>>> स्निग्धा,
बकुळीची फळे>>>> स्निग्धा, तुझ्यामुळे पहिल्यांदा पहाता आली. >> मी देखिल पहिल्यांदाच पाहिली गं, तेही झाड उंच नाहिये म्हणुन दिसली तरी. मी आत्ता पर्यंत उंच वृक्षच पाहिलेत बकुळीचे.
मला आधी ते रोप पुनर्नवा चे
मला आधी ते रोप पुनर्नवा चे वाटले होते, पण ते नाही.
खुप्पच क्युट दिसतय ते रानफुल.
खुप्पच क्युट दिसतय ते रानफुल.. मला आजकाल जिकडे तिकडे जॅकरांदाच जॅकरांदा दिसतोय..
जॅकरांदा जेवढा दिसतोय त्याच प्रमाणात पिवळा अन पांढरा..हो पांढराच तबेबुयापन दिसतोय..
याच नाव सांगा कुणीतरी.
याच नाव सांगा कुणीतरी. खालच्या फोटोतली पान जरा कोवळी आहेत. थोडी जुन पानवरुन हिरवी आणि पाठीकडुन थोडी चंदेरी झाक असल्या सारखी दिसतात.
गेल्या महिनाभरा पासुन असा फुलोरा दिसत होता. आता थोडा कमी झाला आहे.
सिल्व्हर ओक.
सिल्व्हर ओक.
ओह, थॅक्स
ओह, थॅक्स
आमच्याकडे आकाशी रंगाचा एक
आमच्याकडे आकाशी रंगाचा एक छोटुसा पक्षी दिसतो. असतो तो खुप धीट अगदी जवळ येऊन वावरतो पण
त्याचा फोटो काढायला जमत नाही, कारण तो प्रचंड भिरभिरा असतो. एका जागी २/३ सेकंद सुद्धा थांबत नाही.
काल सकाळीच बाहेर पडलो होतो, तिथे याची अंघोळ चालली होती. हे फोटोही तेवढे स्पष्ट नाहीत म्हणा...
१)
२)
३)
४)
५)
६) कवड्याच्या तूलनेतही हा किती छोटा असतो बघा..
नेहमी दिसणारी ही दोन फुले !
नेहमी दिसणारी ही दोन फुले !
१)
२)
३) या कांचनाचा फोटो, मीच यापुर्वी पण दिला होता, पण तरी परत !!!
दिनेशदा, गूगल वर शोध घेतला
दिनेशदा, गूगल वर शोध घेतला असता blue waxbill असावा असं वाटतंय.
Angola cordon-bleu असंही नाव दिलंय. आणि common species of estrildid finch found in Southern Africa असंही.
फार गोड दिसतो आहे.
करेक्ट blue waxbill आहे हा.
करेक्ट blue waxbill आहे हा. याचा भाईबंद आपल्याकडे Silverbill असतो पण रंग नसतात.
आभार आदिजो !
आभार आदिजो !
काय मस्त पक्षी आहे दिदा...
काय मस्त पक्षी आहे दिदा...
यांची आंघोळ पाहणे म्हणजे एक विरंगुळा असतो..
कवड्या पन छान्च दिसतोय..
ते गुलाबी फुल बिग्नोनियासी कुटुंबातल वाटत्य का?
दिनेशदा फोटो मस्तच.
दिनेशदा फोटो मस्तच.
सर्वच फोटो मस्तच.
सर्वच फोटो मस्तच.
योगेश पिंपळ पालवी चे फोटो आणि
योगेश पिंपळ पालवी चे फोटो आणि वर्णन अप्रतिम....
दिनेश दा आणि जागु फोटो पाहुन डोळ्याचे पारणे फिटले...
बाकी गप्पा पण बहारदार..:)
वर्षु, चिंगमायवाल्यांना माहीत
वर्षु, चिंगमायवाल्यांना माहीत होते तुझे पावन चरणस्पर्श होणारेत ते आणि तेही चक्क दोन तीन महिने ठाण मांडून राहणारेत ते. तुला (चुकून) भारताची आठवण आलीच तर डोळ्यासमोर काहीतरी भारतीय म्हणून लावले असणार बकुल आणि तामन.
दोन वर्षांपूर्वी ह्या दिवसातच सज्जनगडावर गेलो होतो. तिथे आकाशाला टेकलेल्या बकुळींचे बन आहे आणि खाली माकडांनी ओरबाडून टाकलेल्या नारंगी फळांचा सडा होता. झाडे इतकी उंच की फळे बघितली नसती तर मी झाड ओळ्खलेही नसते.
मागे ताडोबाला dormitari परिसरात एक बकुळींचे झाड दिसलेले जे उंचीला 5 फूट होते, फुलेही भरपूर होती पण ती झाडाला सोडायला तयार नव्हती. झाडावरच सुकलेली काही फुले ही पाहिलेली. खाली पडलेली देठासकट पडलेली. हल्लीच असे एक झाड माझ्या ऑफिसच्या सर्व्हिसरोडवर पाहिले. कदाचित नवी लागवड असावी.
नविन कलमी बकुळ असेल.
नविन कलमी बकुळ असेल.
आंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीच्या आवारत बकुळीचे प्रशस्त झाड आहे.
हे बघा
हे बघा
वॉव भारीच. इथे मेन रोडवर
वॉव भारीच. इथे मेन रोडवर बकुळीची खूप झाडं आहेत सरळसोट वाढलेली. मी रोज बघते कुठे फळं दिसतात का, नाहीच दिसत. तशी लहान आहेत झाडं.
हाहाहा..
हाहाहा..
केपीचा फोटो बघुन मला भारंभार तोंडात फळ भरुन घेणारी खार आठवली...
मस्त कॅच केपी..
मी परवा एम्प्रेस गार्डन गेलेली तिथे मला राखाडी धनेश/Grey Hornbill दिसला...आणि एक पिवळा पक्षी जो हरियाल होता अशी मला ९५% खात्री आहे... तृप्त झालेली मी
सहिच टीना. तिथे दिसतोच धनेश.
सहिच टीना. तिथे दिसतोच धनेश. मला रविवारी कर्वेनगरात दिसला. एम्प्रेस गार्डनला Alexandrine Parakeet पण आहेत खूप
मला धनेशाची जोडी दिसली..
मला धनेशाची जोडी दिसली...पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहत असल्यामुळे खुप कौतुक वाटत होत...
Alexandrine Parakeet आणि साध्या पोपटात काही फरक आहे का?
कारण मला हे पक्षी सुद्धा दिसले ज्यांना मी पोपट म्हणुन बाजुला केलं.. अगदी जवळुन उडत गेले..
त्यांनी मला आत नाही जाऊ दिलं पन...फारच हिरमोड झाला माझा... आणि इकडे तिकडे कुठं झाडं पाहावी म्हटली तर हरेक झाडाला पकडून एक एक जोडपं बसलेल नको त्या अवस्थेत..काय बघावं प्रश्नच पडल्लेला मला.. श्या
Alexandrine Parakeet आणि
Alexandrine Parakeet आणि साध्या पोपटात काही फरक आहे का?>>
खालील गोष्टी शोध.
Rose Ringed Parakeet (common)
Alexandrin Parakeet (common)
Malabar Parakeet (only in western ghat)
Plum Headed Parakeet (somewhat common but not in cities)
Slaty Headed Parakeet (Northern)
Red Breasted Parakeet (rare)
Vernal Hanging Parrot (only parrot species in India. हा एकटा भारतातला पोपट बाकी सब पॅराकीट)
कांदापोहे,
कांदापोहे,
फोटो भारी आहे. ते गुलाबी फळांचे झाड कोणते आहे? असाणा?
>>आंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीच्या आवारत बकुळीचे प्रशस्त झाड आहे.>>
आंजर्ल्याच्या गणपतीचा आख्खा डोंगरच बकुळीचा आहे. पुष्कळ झाडे आहेत तिथे.
आंजर्ल्याच्या गणपतीचा आख्खा
आंजर्ल्याच्या गणपतीचा आख्खा डोंगरच बकुळीचा आहे. पुष्कळ झाडे आहेत तिथे.>> येस आदिजो
लाबी फळांचे झाड कोणते आहे? >> वडाचाच प्रकार आहे बहूतेक. या वेळी नेहेमी फळे असतात व त्यावर अनेक पक्षी दिवसभर ताव मारत असतात.
वाह सर्व फोटो सुंदर. दिनेश
वाह सर्व फोटो सुंदर. दिनेश चे निळे पक्षी तर खासच
साधना.. हाहा असेल असेल तसंच..
Pages