माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल इशा राधिकाला म्हणाली तु काय रोज रात्री लिहुन ठेवतेस का की उद्या काय डायलॉग मारायचा Proud

तो श्रेयस कुठे गायब झाला ? शनाया बद्दल गुरु ला काहीच माहित नाही, ती काय १०० डेज मधली राणी आहे का ? काहीही दाखवतात...

शनाया बद्दल गुरु ला काहीच माहित नाही, ती काय १०० डेज मधली राणी आहे का ? काहीही दाखवतात... >>>> गॅरी इतका शहाणा आहे होय, शनाया त्याची ऑफीसमधली मैत्रीण. जी मुलगी आपल्याला पैशांना फसवत्ये, वाट्टेल तसा खर्च आपल्या कार्डवर करत्ये हे ज्याला कळत नाही तो तिच्या बद्दल काही माहीती काढेल असं कसं वाटलं ?

जो गॅरी राधिकच्या इतकुशा मेकओव्हर वर पाघळतो, त्याच्या आयुष्यात दुसरी शनाया कशावरून येणार नाही ?

एक्सबॉयफ्रेंड ऐवजी शनायालाच पूर्ण वाईट करून टाकले की या लोकांनी.
जो गॅरी राधिकच्या इतकुशा मेकओव्हर वर पाघळतो>>>तो मेकओव्हर होता हे मला नंतर कळले. आधी वाटले गुढी पाडवा आहे म्हणून डोक्यावरुन नांगर फिरवला आहे, पण आता रोजच.

बहुतेक संपतेय. नवीन मालिकेचे प्रोमो झळकायला लागले . अगदी १०० डेज मधल्या राणी सारखाच चाललंय . शनाया फ्रॉड आहे . तिने मला एक लाखाला गंडवलाय . तिच्या पासून सावध राहा वगैरे . अगदीच चोथा करून टाकला मालिकेचा . एक ना धड . त्या ऐवजी ज्यावेळी गॅरी घर देत होता ( भले ते खोट का असेना पण उघडा पडला असता ना ) तेव्हा घ्यायचं आणि स्वतःच्या घरातून त्या राधिकाने सासू सासऱ्यांच्या मदतीने बिझनेस सुरु करायचा असं दाखवलं असत तर ? त्याऐवजी ते सोसायटीतले खेळ काय सगळा पोरकट पणा दाखवत बसले. आणि त्या टेम्पररी झोपडीतून नानींच्या घरी परत कधी येतात ? गेले चार पाच दिवस बघितलंच नाही

सुजा, तो गॅरी, समिधा आणि शनाया माफी मागतात राधिकाची आणि ती नानींच्या घरी येते म्हणजे गॅरी आणि शनायाला ती मागायला लावते, जसं तिचा ऑफीसमधे या दोघांनी अपमान केलेला असतो तसाच ती करते. तो सीन छान झाला. मला आवडला. मग नंतर मात्र मी नाही बघितली.

एक्सबॉयफ्रेंड ऐवजी शनायालाच पूर्ण वाईट करून टाकले की या लोकांनी. >>> हो ना. तिला फक्त ग्रे शेड मध्ये दाखवायला यान्च काय जात होत? याच्यापेक्षा त्या हिन्दी सिरियल्स तरी बर्या. जर एखादे पात्र ग्रे किव्वा खलनायकी असेल तर ते तस का आहे हे सुद्दा दाखवतात. इतर मराठी channels वर सुद्दा. पण इथे तर सगळा आनन्दी आनन्दच आहे.

सवत माझी लाडकी, बिवी नम्बर वन मध्ये वर्षा उसगावकर आणि सुष्मिता सेनला कुठेही खलनायिका म्हणून दाखवले नव्हते. उलट त्यान्च्या characters बद्दल सहानुभूतीच जास्त वाटत होती.

गॅरी इतका शहाणा आहे होय, शनाया त्याची ऑफीसमधली मैत्रीण. जी मुलगी आपल्याला पैशांना फसवत्ये, वाट्टेल तसा खर्च आपल्या कार्डवर करत्ये हे ज्याला कळत नाही तो तिच्या बद्दल काही माहीती काढेल असं कसं वाटलं ? >>> आणि हा म्हणे CEO आहे.

जो गॅरी राधिकच्या इतकुशा मेकओव्हर वर पाघळतो>>>तो मेकओव्हर होता हे मला नंतर कळले. आधी वाटले गुढी पाडवा आहे म्हणून डोक्यावरुन नांगर फिरवला आहे, पण आता रोजच. >>>> राधिका बरोबर रेवतीचा सुद्दा मेकओवर केला होता की काय? काल जरा वेगळी वाटत होती ती.

अचानक सगळे पटापट योगायोगाने जुळून येत आहे म्हणजे मालिका संपत आहे....बहुतेक संपतेय. >>> हे, पण आज मटा आणि ABP मध्ये वेगळीच बातमी आलीय, जय मल्हार सम्पतेय म्हणून. नक्की कुठली मालिका सम्पतेय , हि का ती? Uhoh

शनायाचे समोरचे दात खरच गेले कि काय ते नकली chocolate चावून? Uhoh

>>>म्हणून डोक्यावरुन नांगर फिरवला आहे >>>>--- हा हा
अगदी अगदी. फ्लॉप दिसतंय ते. रेवती मात्र मस्त दिसते साडीत.

ती रेवती बरोबर म्हणत होती काल, 'राधिका बघेल तिच स्वत:च काय करायच ते, मी कशाला पडू या फन्दात." खरतर हा approach तिने सुरुवातीपासूनच ठेवायला हवा होता राधिकाच्या बाबतीत. मग अशी वेळ आली नसती पस्तावण्याची.

आनन्दने तर सिक्सरच मारला परवा. तुला एखादी मुलगी आवडली तसे राधिकाला सुद्दा कोणी आवडू शकतो. तिला सुद्दा Life Enjoy करायचा हक्क आहे.

काल त्या युनियन एपिसोडमध्ये शनायाला तिची काही चूक नसताना उगाचच अडकवल असच वाटत होत. खरी चूक इशाची होती, तिला मात्र पकडले नाही. राधिका आणि बकुळा मुद्दाम शनायाला अडकवण्याचा plan केला असच बघणार्याला वाटेल. काल शनाया मला बिचारी वाटली.

काल त्या युनियन एपिसोडमध्ये शनायाला तिची काही चूक नसताना उगाचच अडकवल असच वाटत होत. खरी चूक इशाची होती, तिला मात्र पकडले नाही. >>> मम. काहीही होता तो शॉट.

काल गुप्ते रेवतीजींच्या किती जवळ उभा होता ........ >>> हो मलाही तेच नवल वाटलं . एवढ्या मोठ्या गॅलरीच्या एवध्याशा कोपर्यात उभे राहून कॉफी पित होते दोघे Happy .
ते सीतफळ मातीच होतं . राधिका म्हणाली , आता ते चॉकलेट बनवत बसलायस . नंतर शनाया चॉकलेट खाल्लं तर म्हणाला , लाकडाचं आहे म्हणून.
आता काय शनायाच भांड फोडलं की संपली मालिका .

आता काय शनायाच भांड फोडलं की संपली मालिका . >> आस्कसं आस्कसं ? मोठी उद्योजिका बनायचं आहे, गुरूच्याच (कशाला काय माहित) हापिसात त्याच्या वरच्या पोस्ट ला यायचं आहे...

मला वाटते संपतेय मालिका काल अनिता दाते कुठला तरी नविन शो सुरु होतोय त्याच्या प्रोमो मध्ये पाहिली!

बिच्चार्‍या राधिकाचे गुरुची बॉस बनून ऑफिस मध्ये जायचे स्वप्न भंगणार दिसतेय!
चांगलयं लवकर संपवा अशी पराकोटीचे बाळबोध प्रसंग आणि संवाद असलेली मालिका!

आता काय शनायाच भांड फोडलं की संपली मालिका . >> आस्कसं आस्कसं ? मोठी उद्योजिका बनायचं आहे, गुरूच्याच (कशाला काय माहित) हापिसात त्याच्या वरच्या पोस्ट ला यायचं आहे... >>> Biggrin तिला मोठी उद्योजिका बनायचयं , पण ते नवरा परत मिळवण्याअसाठी . रादर नवर्याने शन्याला घराबाहेर काढून तिला परत घरात घ्याव म्हणून .

काल गुप्ते रेवतीजींच्या किती जवळ उभा होता >>> रेवतीला बरं नव्हत तर राधिका तिला आणि गुप्ते तिच्या मुलीला भरवत होते. जरा गुप्तेला चान्स द्यायचा होता ना रेवतीला प्रेमानी भरवायचा Wink

रेवतीला बरं नव्हत तर राधिका तिला आणि गुप्ते तिच्या मुलीला भरवत होते. > रेवती आणि राधिकाचं भांडण मिटलं का?

रेवतीला बरं नव्हत तर राधिका तिला आणि गुप्ते तिच्या मुलीला भरवत होते. जरा गुप्तेला चान्स द्यायचा होता ना रेवतीला प्रेमानी भरवायचा >>> नशीब गुप्तेनी चुकून राधिकाला नाही भरवलं Wink

नशीब गुप्तेनी चुकून राधिकाला नाही भरवलं >>>> Proud
काल किती समांतर घास भरवणे आणि पाणी पाजणे चालू होते दोघांचे. जस काय एखाद्याने आधी घास भरवला असता तर पचला नसता रेवती किंवा तिच्या लेकीला.

बिच्चार्‍या राधिकाचे गुरुची बॉस बनून ऑफिस मध्ये जायचे स्वप्न भंगणार दिसतेय! >>> असे काही नाही झीच्या मनातं असेल तर अगदी शेवटच्या एक-दोन एपीमध्ये सुद्धा बनवतील तीला गुरुची बॉस... त्यासाठी काही क्वालीफीकेशन किंवा अनुभव लागत नाही त्यांना

ती चार लाखाची ऑर्डर पूर्ण करायला राधिकाने १० बायका मदतीला घेतल्या , आता काय ४०-४० रूपयाचे मसाले बनवते का?
काही करताना दिसत नाही . फक्त नानांबरोबर पाकिटांचे हिशोब करत होती .

काही करताना दिसत नाही . फक्त नानांबरोबर पाकिटांचे हिशोब करत होती .>>> हो ना. सध्या ती काहीच काम करताना दाखवलेली नाहीये. नवरा परत मिळाल्यानन्तर राधिका बिझनेस बन्द करणार वाटत.

Pages