माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी गौरवमधला डान्स छान होता तिचा, तिच्याबरोबर कोण होती, तीपण छान नाचत होती.

शनाया म्हणजे रसिका तशी टॅलेंटेड आहे. गाणं, तबला, डान्स, अभिनय सर्वात तशी एक्स्पर्ट आहे. माझी भाची डोंबिवलीत ज्या शाळेत जाते तिथेच शिकलीय ती.

परवाच्या गॅरीच्या डायलॉगवरुन वाटले की राधिका रस्त्यावर आलेली, झोपडीत राहीलेली त्याला चालतेय फक्त ऑफीससमोर नको, त्याची नाचक्की नकोय व्ह्यायला.

अर्थात शनायाला ती घूस वगैरे म्हणाली ते पटलं नाही, गॅरीने आणलंय शनायाला घरात, संसारात.

ह्यापेक्षा अल्फा मराठीवरची 'दुहेरी' मस्त होती. गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर आणि गौरी यादव. कोणीही व्हिलन नव्हतं, बालिशपणा नव्हता. लिमिटेड एपिसोडस आणि गौरी यादवने ऐश्वर्यापेक्षा उत्तम काम केलं होतं. एकदम सहज. नंतर ती हिंदीत गेली, रमोला सिकंदची सिरीयल 'कही तो होगा' नाव बहुतेक.

आज गॅरीला माफी मागायला लावली तो सीन मस्त होता. त्याने आधी करायला लावलं होतं ते मी बघितलं नव्हतं. त्याने आणि शनायाने मिळून राधिकाचा अपमान केला होता असाच, हे मला आज कळलं. मग तिचं बरोबर होतं. पण गुरूला फक्त स्वतःची इमेज जपायची होती. शनायाला फार अपमानास्पद वाटलं, ती acting तिने छान केली पण त्याचबरोबर तुम्ही जेव्हा राधिकाशी असं वागलात तेव्हा राधिकाला पण असंच वाटलं असेलना.

पण तिचं ध्येय एकंच दिसतंय नव्-याला परत मिळवायचा. मेकओवर करणार, स्वतः ला सिद्ध करणार आणि मग नवऱ्याने हिला बोलावलं की जाणार, पटत नाही. काय कौतुक सौ. राधिका गुरुनाथ सुभेदार ह्या नावाचं, अग मुळात तू असताना, लग्नात असताना अफेअर केलं ही चुक आहे का गुन्हा, हेच तुला समजत नाहीये. कीव येते गं राधिका तुझी. उलट त्याने नंतर बोलावलं म्हणजे तुझ्या बाह्य रुपाला भुलला असं नाही का होणार. तू मेकओवर कर, सिद्ध कर पण अशा नवऱ्याने बोलावलं तर परत जाऊ नकोस. असो चालुद्या झी वाल्यांचे काय ते. दोन तीन दिवस बघितली ही सिरीयल. आता पेशन्स नाहीत.

स्वाभिमान शून्य राधिका। माणुसकी शून्य गैरी अक्कल शून्य शन्या आणि मालिका लेखक ..भंपक सीरियल आहे।

मी काहीतरी बनून दाखवेन पेक्षा ५० वेळा तेच तो मला मानाने परत घेईल. उबग आणणारा लोचटपणा आहे.
पण बिनडोक लेखकांनी ठरवल तर उद्या सुद्धा घेईल तो घरात.

झी च्या आभाळमायातही तेच होत कधी एकदा तो बदफैलीपणामुळे घालवून दिलेला नवरा परत येतोय.

आज गॅरीला माफी मागायला लावली तो सीन मस्त होता. >>>> सहमत

शनायाला फार अपमानास्पद वाटलं, ती acting तिने छान केली >>>> ती पहिल्यान्दाच एवढी रडली असेल. गुरुनाथ च्या आईचीही acting छान होती. आपल्या मुलाचा अपमान होताना बघून कुठल्याही आईला वाईट वाटेल. ते भारती पाटीलने perfect दाखवलय.

आज आल्या होत्या राधिका आणि गुरुची आई खवय्ये मध्ये. भारती पाटील माहेरची आगरी कोळी आहे, सासर नागपुरचे आहे. तरीच ती नागपुरी भाषा छान बोलते.

राधिका उर्फ अनिता दाते खर्या आयुष्यात सुगरण नाहिये बर का.

<<<आज गॅरीला माफी मागायला लावली तो सीन मस्त होता. >>>> सहमत
शनायाला फार अपमानास्पद वाटलं, ती acting तिने छान केली >>>> ती पहिल्यान्दाच एवढी रडली असेल. गुरुनाथ च्या आईचीही acting छान होती. आपल्या मुलाचा अपमान होताना बघून कुठल्याही आईला वाईट वाटेल. ते भारती पाटीलने perfect दाखवलय.
>>> खरच... गॅरी शनाया च्या ऍक्टींग वरून अस वाटत होत की त्यांना अपमान झाल्याचा राग आलाय... झक मारत त्यांना माफी मागावी लागली ह्याच त्यांच्या मनाला किती लागल हेही बरोबर दाखवले त्यांने... आणि जेव्हा राधिक्काचा अपमान झाला होता तेव्हा तिला अपमान झाल्याचं अनावर दुःख वगेरे झालय अस काहीच वाटलं नाही तीच्या अभिनयातून... उलट अस वाटलं की नेहेमीच अपमान करतो गुरुनाथ मग अजुन हा एक... त्यामु़ळे ती प्रचंड चिडलि गुरूवर आणि तीचा स्वाभिमान दुखावला गेलाय वगेरे काहीच नाही... म्हणजे तिला काय याची सवय आहे बाबा असंच वाटलं तीच्या कडे पाहून... या उलट शनायाचं रडणं आणि नंतर गुरुकडे जे आकान्ड तांडव केल जस्टिफाय होत....

तेच ना. ते राधिका कॅरॅक्टर मुळातच अजब आणी न पटणारं आहे. तिला दु:ख नाहीच आहे की नवरा दुसर्‍यावर प्रेम करतो, आपला तिरस्कार करतो. नुसतंच शनायावर खापर फोडुन मोकळी. गुरुला ती आवडतच नाही आणी त्याच्या आयुष्यात तिला साथीदाराचे काही स्थान नाही, असले तर मोलकरणीचेच हे काही त्या मठ्ठ बाईच्या डोक्यात शिरत नाही.

राधिकाची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी दाखवलीय. त्यात नवीन काहीच नाही. अगदी हेच उदाहरण मी, सासरी आमच्या लांबच्या नात्यातल्या एका वयस्कर जोडप्याचे बघीतलेय. ते काका बायकोची पंच्याहत्तरी उलटली तरी अजूनही तिचा चार चौघात सतत अपमान करतात. अगदी गॅरीचा अवतार आहेत, फरक इतकाच दुसरी कोणी त्यांना आवडली नाही हे त्यांचे स्वतःचे नशीब. मी एकदा त्या काकुना म्हणले की एकदा तरी नवर्‍याला फाडकन बोला, की आता या वयात चार चौघात काय अक्कल काढताय म्हणून. पण त्या म्हणाल्या की लग्न झाल्यापासुन हेच चालले आहे. एकदा बोलायला गेले तर जाम थयथयाट केला नवर्‍याने. तेव्हापासुन त्या गप्प आहेत.

आपण झी ला उद्देशुन बोलतो की काय कॅरेक्टर्स दाखवतात म्हणून, पण खरच अशी माणसे आहेत जगात, फरक एवढाच की टिव्हीवर सगळे उघडे दिसते, आणी खर्‍या खाजगी नात्यात तोंड दाबुन मुका मार असतो.

पण त्या स्वार्थी आणी बेशरम शनयाचा कसला आलाय स्वाभीमान? ती गॅरीची किप म्हणून रहाते मग असे मिरवताना तिचा स्वाभीमान कुठे जातो? उलट त्या स्वाभीमानासाठी ती रडतेय असे मला वाटलेच नाही, तर चार चौघात कशी तोंडावर आपटली याचा गर्व हरण झाल्याचे तिला दु:ख झालेय असे वाटले.

गॅरीच्या आईचा अभिनय लाजवाब!! १०० मार्क्स तिला.

खर्‍या खाजगी नात्यात तोंड दाबुन मुका मार असतो>>>>>>>>> स ह म त.
ऑफिसात कोणाचंही ऐकून न घेणारी मी घरी मात्र सासऱ्यांच्या कटकटी समोर मूग गिळून गप्प बसते. सकाळी ४ किंवा ५ वाजता उठतात आणि तेव्हा पासून त्यांचा गजर चालू असतो उगीच खार खूर चालली असते. आणि त्यांना त्रागा करायला कुठलाही विषय चालतो अगदी वॊशिंग मशीनचा पाईप असाच का लावला हा ब्रश इथेच का ठेवला हि वस्तू तिकडे का हा कागद कसला इतक्या बारीक सारीक वस्तूंवर त्यांचे लक्ष असते कि मी सकाळी मुलींना शाळेत पाठवून लवकरात लवकर ऑफिसला कसे पोहचावे हे बघते. आणि संध्याकाळी घरी लवकर सगळे आटपून अगदी ९.३० / १० ला झोपायला मिळाले तरी चालेल अशी अवस्था जेणेंकरून वाद नकोत.

जेव्हा राधिक्काचा अपमान झाला होता तेव्हा तिला अपमान झाल्याचं अनावर दुःख वगेरे झालय अस काहीच वाटलं नाही तीच्या अभिनयातून>>> हे मी बघितलं नव्हतं पण परवा शॉट दाखवले त्यात राधिकाला त्रास होतोय अपमान झाल्याचा हे दिसलं मला. पण मुद्दा हा की तिचा अपमान केला गॅरीने तेव्हा शनायाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण हेच की स्वतःचा झाल्यावर कसं वाटलं. मग दुस-याचा करताना तेव्हा गॅरीला अजून प्रोत्साहीत करताना आनंद होत होता.

त्या गॅरीला न घरका ना घाटका दाखवा. शनायाचं ए टी एम कसं आहे ते शनायाला समजेल आता. शनायाने सोडायला हवं त्याला आणि राधिकाने पण परत येऊ नये. अर्थात असं होणार नाही ते माहीतेय, हे आपलं उगाच लिहीलंय.

मालिका संपणार अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

नवीन मालिकेचे प्रोमोज पण दिसायला लागलेत.

काय तो मेकोव्हर, चोर येणार, त्याला राधिका कशी काय पकडणार बरोब्बर त्याचं वेळी तिथे हजर राहून. विनोदी मालिका आहे समजून बघणे.

सिनीयरोटीनुसार जय मल्हार संपायला पाहिजे ना? >> असं कुठे असतं ? जय मल्हार नंतर आलेल्यी किती मालिका संपल्या असतील. सगळा टीआरपीचा खेळ.........

नक्की कुठली मालिका संपणार? ही की जय मल्हार?>>>
जय मल्हार संपणार आहे असं लोकसत्ता की लोकमत च्या फेसबुक पेजवर वाचलं..
या शिरेलीत अजून व्हायचंय ना बरंच काय.. गुप्ते-रेवती, जेनी- आनंद लव्ह ष्टोरी, शनायाचा ex boyfriend वगैरे..
काल खूप दिवसांनी शिरेल पाहिली.. तेव्हा रेवतीच्या हापिसातल्या एका मुलाला शनाया सबनीस चा फोन येत असतो असं दिसलं.. आणि शनाया पण तिकडे टेन्शन मध्ये होती..

या शिरेलीत अजून व्हायचंय ना बरंच काय.. गुप्ते-रेवती, जेनी- आनंद लव्ह ष्टोरी, शनायाचा ex boyfriend वगैरे..>>> हे सगळं शेवटच्या एकाच भागात पण हे लोक दाखवतील, काही सांगता येत नाही.

तेव्हा रेवतीच्या हापिसातल्या एका मुलाला शनाया सबनीस चा फोन येत असतो असं दिसलं..>>आता रेवती, राधिका शनायाला या एक्सबॉयफ्रेंड प्रकरणातून वाचवतील मग शनायाला साक्षात्कार होईल कि अरे या तर चांगल्या बायका आहेत, आपण उगाच यांचा राग-राग करतो.

काय तो मेकोव्हर >>> नैतर काय, नुसती हेअर स्टाईल बदलली, ब्लिचिन्ग, फेशियल वै केल की झाला मेक ओवर? Uhoh मला वाटल, मुम्बई फौजदार मध्ये रन्जनाचा जसा मेकओवर केला होता तसा करतील की काय. पण नाही. आणि मेकओवर करुन पण हिच आपल हाव ना, माह्या सुरुच.
ती शनाया जेव्हा गुरुला विचारते की, तु राधिका कडे एकटक का बघत होतास? का तर म्हणे ती माझी बायको आहे. अच्छा, म्हणजे राधिकेने आपल रुप काय बदलल, हया महाशयान्ना ती आपली बायको असल्याचा साक्षात्कार आज झाला! म्हणजे जर ती पुर्वीच्या रुपात पुन्हा आली तर गुरु हेच म्हणेल का, राधिका आणि माझी बायको शक्यच नाही. वा रे वा.

तेव्हा रेवतीच्या हापिसातल्या एका मुलाला शनाया सबनीस चा फोन येत असतो असं दिसलं..>>आता रेवती, राधिका शनायाला या एक्सबॉयफ्रेंड प्रकरणातून वाचवतील मग शनायाला साक्षात्कार होईल कि अरे या तर चांगल्या बायका आहेत, आपण उगाच यांचा राग-राग करतो. >> अगदी अगदी. ती रेवती कुणा लेडी पोलिस Officer ची मुलाखत आज घेणार आहे, जी महिलान्च्या सुरक्षेसाठी विशेष काम करते. रेवती त्या लेडी पोलिस Officer च्या मदतीने शनायाला वाचवणार. मग शनाया राधिकाने म्हटल्याप्रमाणे स्वतःहून गुरुचे घर सोडेल.

बादवे, तो एक्सबॉयफ्रेंड झालेला रवीन्द्र मन्कणी चा मुलगा आहे का? ओळखीचा वाटतो.

रेवती पण काय त्या स्वप्नालीच नाव ऐकुन एवढी भडकली . त्या स्वप्नालीबरोबर कॉफी प्या म्हणे , कीती हा बालिशपणा , ते एकच कॅरेक्टर जरा सेन्सिबल दाखवलं होतं .

राधीका रोजच्या रोज ती हेअर स्टाईल कशी करणार ब्वा?? तो नागमोडी हेअर बॅण्ड आणला आहे का?
कानातल्या रिंगा जाउन झुमके आले आणि त्या काठाच्या साड्यांएवजी नविन काहीतरी साडी दिसतेय .

सुरुवात चांगली झालीय , बर्यापैकी आत्मविश्वासही आलाय तिच्या , पण मह्या नवरा प्रकरण काय ती सोडत नाहीये .

बादवे, तो एक्सबॉयफ्रेंड झालेला रवीन्द्र मन्कणी चा मुलगा आहे का? >>> नाही. रोहन मंकणी आणि सुश्रुत मंकणी अशी त्यांची दोन मुलं आहेत, त्यापैकी कोणी तो नाहीये. पण ह्याला कुठेतरी बघितला आहे. प्रोमो दाखवतायेत, ते चोर प्रकरण काहीतरी त्यावरून हीच सिरीयल संपतेय की काय.

जय मल्हार मध्ये एका पाठोपाठ आख्यान प्रकरणं रंगवत असतील.

रेवती शनायाला कशी वाचवणार? उलट शनायाने, रेवतीच्या ऑफिसमधल्या ज्या मुलाला फसवले आहे ( जो रेवतीला काल हे शनाया बद्दल स्वतः सर्व सांगतो ) त्यालाच मदत करुन शन्याला गॅरी समोर उघडं पाडेल. राधिकाने ते केसांचे नागमोडी वळण घेण्यापेक्षा, छानसा अंबाडा ( आधूनीक भाषेत हेअर डु) घातला असता आणी वर गजरा गुंडाळला असता तर जास्त छान दिसली असती. एखादी डिझाईनर साडी आणी मेगा स्लिव्हचा ब्लाऊज घालुन मस्त दिसली असती.

हो ना, त्या मुलाच्या बोलण्यावरून तरी शनाया फ्रॉड आहे हे रेवती-राधिका गॅरीला पटवून देतील.

गुप्ते-रेवती जुळायला काय वेळ लागायचा ? गुप्ते कधीचे सिग्नल देत होते, रेवती पण " गुप्तेच्या त्या" मैत्रीणीवर चिडलेली दाखवल्ये म्हणजे ती पण तयार असेल. फक्त "द ग्रे राधिका" ने अजून एक्दा समजावलं तिच्या भाषेत की रेवती लग्नाला तयार.

जेनी-आनंद जुळेल अशी लक्षणं नाहीयेत.

Pages