माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिडिंबा (शब्द नटुकाकींकडुन साभार) बरी देईल डिव्होर्स. तिला अजुन लाथा खायची हौस आहेच. बादवे रेवतीचं काम करणार्‍या अभिनेत्रीचे खरे नाव काय?

तिला अजुन लाथा खायची हौस आहेच.>>तेही स्वतःच्या हिमतीवर Proud

पण खरेच हे किती योग्य आहे? ...अथर्व चे बाबा त्याला हवे ते घेऊन देऊ शकतात, पण ते आई नाही देऊ देणार. मग हा मुलगा नेहमी इतर मुलांकडे जे आहे त्याची मागणी करणार पण त्याला ते मिळणार नाही. ते आजी-आजोबाकडे जाऊन राहू शकतात पण आईला जायची ईच्छा नाही. ते शेजारच्यांकडेच राहणार. बाकीची मुले त्यावरुन त्याला सतत चिडवणार आणि त्याने ते सहन करायचे. आईकडे पैसे नसले तरी स्वाभिमान आहे तो ती त्याला देणार म्हणे.....या वयात स्वाभिमानाचे काय लोणचे घालणार आहे का तो मुलगा?
स्वतःच्या हिमतीवर ऊभे रहायची इतकी काय घाई झाली आहे या बाईला? जावे ना नागपूरला सासु-सासर्‍यांकडे, रहावे काही काळ, तिथे पैसे कमवावेत, मग ईथे चांगली रहायची सोय करून यावे.

रेवतीचं काम करणार्‍या अभिनेत्रीचे खरे नाव काय? >>> श्वेता ठक्कर मेहेंदळे. अभिनेता राहुल मेहेंदळे नवरा आहे तिचा.

Lol

हो ग, आता परत टाकलाय तुझ्याइथे, दिसतोय का बघ. मी मलाच लिहिला होता का, काही कळत नाहीये.

श्वेता ठक्कर मेहेंदळे. अभिनेता राहुल मेहेंदळे नवरा आहे तिचा.

>> हो का? राहुल ला मस्त शोभते मग ही. फार गोड दिसत असेल हि जोडी.

रेवती फार आव्डते मला. नाना नानी ची सून पण आव्डायला लागली आहे. सासू फारच दादागिरी करते तिची. कोणाला पण घरात घेतात इतके दिवस. मुंबईत अर्ध्या तासात घर रिकामे करून चोरून नेतात इतके असुरक्षित आहे. चुकीचा संदेश जातो.

रेवती काही काही सीन्समध्ये खुपच छान दिसते. तिचा तो नवर्‍यावरचिडण्याचा शाळेजवळचा प्रसंग मस्त होता. खरीच चिडलेय असे वाटत होते. आणि एकदम नॉर्मल, संतुलित असे एकमेव कॅरेक्टर आहे त्या सिरिअलमधले.

मी मधेच कधीतरी काही क्षण ओझरतं पाहतो, आणि मग तेवढं तरी का पाहिलं असं वाटत राहतं.
काल तेच झालं.. ती शन्या " आज ब्लू है पानी पानी " हे म.धु.सिंग यांचं गाणं "लिंबोणीच्या झाडामागे" च्या चालीत गात होती, त्या गुरुच्या मुलाला झोपवताना.. मजा आली पाहून; म्हटलं पुढे पाहूया फॉर अ चेंज..
पुढच्या प्रसंगात नंतर सकाळी एक भैय्या सदृश इसम इडली-डोश्याच्या पीठाच्या (बॅटर) पिशव्या राधिकाच्या हातात देतो, गुरुच्या दरवाज्याला लावतो, गुरु त्या पिशवीची रितसर दोरी सोडत ते पातेल्यात ओततो (सांडत सांडत)... काय आश्चर्य.. ते दूध असतं !!!
दोरी बांधलेल्या पिशवीतून दूध !!!

गुरु त्या पिशवीची रितसर दोरी सोडत ते पातेल्यात ओततो (सांडत सांडत)... काय आश्चर्य.. ते दूध असतं !!!
दोरी बांधलेल्या पिशवीतून दूध !!!>>>>>>>>>>>>आणि ते दूध इतके पातळ असते कि अर्धा लिटर दुधात २ लिटर पाणी टाकून चार पिशव्या बनवल्या सारखे , अर्ध्या राधिका काकूला आणि अर्ध्या गुरु अंकल ला.

मला पण रेवती आवडते... समिधा चे पॉईंटस् पण बरोबर असतात...आणि राधीका कायम साड्या च नेसते का??...... अगदी जीन्स स्कर्ट शॉर्ट नाही पण कधीतरी पंजाबी ड्रेस पण चालेल.... नेहेमी नेगेटिव केरक्टर च शॉर्ट कपड़े घालतात अस आहे का ? म्हणजे शनाया,मोनिका.... मोनीकाने एक दोन वेळा घातलेले दाखवलेले आहेत...आणि मान्शी कायम अनारकलीच....साधी जीन्स पण नाही....

ती शन्या " आज ब्लू है पानी पानी " हे म.धु.सिंग यांचं गाणं "लिंबोणीच्या झाडामागे" च्या चालीत गात होती >> हो मस्तच होतं ते . आणि तिचे /गुरुचे एक्प्रेशन्स पण मस्त होते .
अथर्व आल्यामुळे तिची जाम चिड्चिड होतेय . अथर्व पण धमाल करतोय आणि गुरु अंकलची दोन बच्चे सांभाळताना तारांबळ होतेय .

अथर्वला विचारते , तुला शर्टाची बटणं पण लावता येत नाही का ? तो म्हणतो येतात . रोज मीच करतो , पण आज माझा मूड नाहीये .

३-४ दिवस सिरीयल नाही पाहिली, मध्येच गुरु अंकल अथर्वची तयारी करताना दिसले. मुलगा राधिकाकडून गुरुकडे कसा काय आला राहायला?

या झीच्या सर्व सिरिअल्स मध्ये एखादा प्रॉब्लेम दाखवला तर त्याबाबत निगेटिव्ह कॅरेक्टर इतकं स्पष्ट दाखवले जाते आणि मेन कॅरेक्टर गोंधळलेले, असे का ?

काही म्हणा पण गॅरीचं खरच प्रेम आहे शनायावर. किती छान सांभाळुन घेतो तो तिला. आणी शनायाची अंगाई मला क्युट वाटली. हल्ली मला गॅरी आणि शनाया आवडु लागलेत की काय!

मला पण शनाया आवडते मस्त मॅनिप्युलेट करते गॅरीला. गॅरी प्रेमात आहे शनायाच्या आंधळेपणे आणि ऑफिसात, त्या राधिकाला अक्कल शिकवताना मात्र फारच तुसडा वागतो. स्प्लिट पर्सनेलिटी वाटते मला ती. Wink

राधिका तर महानच आहे. बावचळलेली असते कायम गूरु समोर आल्यावर. बाकी तिला न्युटनभाऊंचा तिसरा नियम माहिती नाहिये जणू, जेव्हडा बावळटपणा/कुरघोड्या/कुरापती/मुर्खपणा/बालिश खोड्या ती करेल त्या शनायासाठी त्या सगळ्या तिच्यावर उलटणार आहेत.

शनायाला बाहेर काढल आपण तर गुरुनाथ आपल्याला घरात घेइल या अंधश्रद्धेच मला जाम कौतुक वाटत. लगे रहो राधिका

शुभांगी...ती अंधश्रद्धा इव्हन 'झी' वालेही बाळगून आहेत...त्यामुळे ते खरे होणार सरते शेवटी....अ‍ॅक्च्युअली गुरुच्या मनात असो वा नसो, त्याला लेखकाच्या म्हणण्याला मान तुकवून तिला घ्यावेच लागणार घरात!!!!
Happy

काल एक प्रसंगात तो गुप्ते राधिकाला कर्जासाठी सुचवितो तेंव्हा 'बँकेत जा अर्ज करा जाताना फोटो आयडी आणि आधार कार्ड घेऊन जा!'
फोटो आयडीसाठी आधार कार्ड चालते ना?

किशोर, त्याला फोटो आयडी म्हणजे आयडी प्रुफ आणि आधार कार्ड म्हणजे अ‍ॅडरेस प्रुफ असे वेगवेगळे हवे असतील व्हेरिफिकेशनसाठी. नशिब पॅनकार्ड आणि लाईटबीलची झेरॉक्स पण घेऊन जा नाहि म्हणाले ते राधिकाला

अ‍ॅक्च्युअली गुरुच्या मनात असो वा नसो, त्याला लेखकाच्या म्हणण्याला मान तुकवून तिला घ्यावेच लागणार घरात!!!!
>>> याचसाठी तर केलाय ग सगळा अट्टाहास झी वाल्यांनी. Lol

गेले दोन दिवस एक भन्नाट प्रोमो दाखवतायंत मानबा चा...
अथर्व च्या शाळेतल्या दोन बाया इंग्रजीत गॅरिला अथर्व विषयी कम्प्लेन्टस आहेत त्याची कारणं विचारतायत. तो आय डोन्ट नो म्हणतो. तर राधिका उठून म्हणते "मॅम शॅल आय स्पिक इन इंग्लिश?" Uhoh
"शॅल आय स्पिक इन इंग्लिश?" बोलण्यासाठी परवानगी मागायची असेल तर, "कॅन आय से समथिंग" विचारायला हवं ना?
झी च्या शिरेलिंसमोर साष्टांगच.. हसावं की रडावं तेच कळत नाही.

हम्म दक्षे करेक्ट.

मी आज एक शॉट बघितला त्यात ती समिधा चुकीचं इंग्रजी सांगत असते, राधिका ग्रॅज्युएट आहेना मग बोलता येत नाही फ्लुएंट ते ठीक पण ती चुकीचं सांगतेय एवढं तरी समजायला हवंना. की समजलं आहे पण मुद्दाम दाखवतेय, ते उद्या कळेल.

Pages