निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सगळे फोटो चर्चा मस्तच.

काही वर्षा पूर्वी मी अळूचे झाड पाहीले होते एका फार्म हाऊस वर.

अळूचे झाड?
अळूची पाने असतात न गं? त्याच्या वड्या करतात ती..
मी कनफ्युजतेय का?
फोटो बाकी मस्त..

टीना ती अळूची पाने भाजी, वड्यांची वेगळी.

मी वर दिला आहे ती आळू फळे आहेत. ह्याचे मोठे झाड असते. फळे पिकली की चॉकलेटी रंगाची दिसतात. आंबट गोड आणि एक विशिष्ट वास असतो ह्या फळांना. वटपौर्णीमेला ही फळे हमखास विकायला येतात.

जागू, या फळांचा वास आणि चव याचे नेमके वर्णन करणे अवघड आहे. पहिल्यांदा खाणार्‍यांना कदाचित आवडणारही नाही !

जागू ताई, पिकलेली अळूफळे फोडी करुन वाळवून मीठ लाऊन ठेवतात. ३/४ महिने टिकतात. आम्ही अळूची ऊसरी म्हणतो त्याला.

हो मी खाल्ली आहेत ती सुकवलेली फळे. मला खुप आवडलेली अजुनही तोंडाला पाणी सुटत त्या चवीच्या आठवणीने.

नमस्कार निगकर!
काय सुंदर सुंदर फोटो आहेत.
जिप्स्या, खूप दिवसांनी आगमन व छान फोटो .
टीना, मला बी निसर्गात येऊ द्या की ग!
शांकलीबरोबर फिरणं म्हणजे फारच सुखद अनुभव!

Botanical Name: Tabebuia rosea (गुलाबी टॅबेबुया)
Common name: Pink trumpet tree
हिंदी नाव :- बसंत रानी
स्थळः सागर उपवन (बीपीटी गार्डन, कुलाबा, मुंबई)
दिनांकः- २१.०२.२०१७
१.
 २.
 ३.
 ४.

Botanical Name:- Kigelia africana
Common name: Sausage Tree,
Hindi: बलम खीरा
Marathi: ब्रह्मदंड
Place: Sagar Upvan (BPT Garden, Colaba, Mumbai)
दिनांकः- २१.०२.२०१७

लोणावला भागात ही फळे "आडु" नावाने ओळखली जातात, एकदा खाल्ले आहे. ह्याची चव गोव्याकडे मिळणार्या "starfruit" सारखी असते का? ते ही असेच चकत्या करुन तिखट मीठ शिंपडुन मिळते, रानमेव्यासारखे.

जिप्स्या फोटो अप्रतिम नेहमी प्रमाणेच.

रेणू अगदीच आंबट नसते ते फळ पण वेगळीच चव असते. सांगता नाही येणार.

मागच्या वर्षी राणीच्या बागेत दिसलेला पांढरा बहावा.

नमस्कार निगकर्स Happy

आज सकाळला 'टॅबुबिया' चा फोटो आलाय, पण नांव दिलेय...'बहावा' Sad

IMG-20170223-WA0014_0.jpg

हे व्हॉट्स अ‍ॅपवर आलेले फूल व माहिती.५० वर्षांनी एकेदा फुलते म्हणे, मैसूर किला येथे.नाव शंख-पुष्प.

हा ऑर्किडचा प्रकार आहे का?

देवकी, हे ऑर्किडच आहे पण ५० वर्षानी नव्हे तर दरवर्षी फुलते. ( फोटो आडवा केलाय ) शंखपुष्पी वेगळी असते.

जांभळा गिरीपुष्प

पांढरा गिरीपुष्प

पांढरा गिरीपुष्प आणि काटेसावर एकत्र

मी काल पिकासा, फ्लिकर दोन्हीवरून फोटो अपलोड करायचा प्रयत्न केला. प्रयत्न करकरून थकले. पण फोटो दिसलेच नाहीत, चक्क लिंक टाईप केली तशी दिसायची. आता प्लीज कोणीतरी सांगा, कसे अपलोड करायचे.

जागू, दोन्ही गिरिपुष्प खूप सुंदर. पांढरा तर खूपच छान. सहसा मोठ्या झाडांना पांढरी फुलं नसतात ना. त्यामुळे विषेश वाटलं.
जिप्सी, त्या गुलाबी टॅबेबुया ला हर्षवायू झालाय असा फुललाय Happy

दिनेशदा, धन्यवाद!
५० वर्षांनी फुलते वगैरे खोटे वाटलेलेच.पण फोटो आडवा होता हे नव्हते कळले.

सुलक्षणा - फोटो वर राईट क्लिक करायचा. मग शेवटी इन्स्पेक्ट ऑप्शन येईल. मग बरच काही काही फॉर्म्युले येतील फोटोच्या बाजूला. त्यावरून कर्सर फिरवताना मधेच फोटोची छोटी इमेज दिसेल एका लिंक वर. ती लिंक परत राईट क्लिक करुन त्याला कॉपी एलिमेंट करुन ती पेस्ट करायची.

ऐसा क्या!!! आज घरी गेले की ट्राय करते.
तोच प्रश्न खूप वेळेस विचारल्या गेलाय म्हणून टाळत होते, पण उपलब्ध असलेली माहिती वाचून काही जमत नव्हतं. आज जमणार Lol

शाल्मलीचा पहिला फोटो खूप आवडला. असा पूर्ण फोटो बघून अगदी ते झाड बघितल्याचा आनंद मिळाला++++सुलक्षणा ताई, धन्स.
योगेश काय सुरेख फोटोस..:)
याची ठेवण पण खासच असते, पायर्‍यापायर्‍यांची.. सावर, पळस, पांगारा फुलावर असले कि पक्षी, खारी यांची नुसती लगबग चाललेली असते.+++ हे खुप आवडले..

हे प्रकाश चित्र साधारण ८ वर्ष पुर्वीचे . कोकण प्रवासात घेतले होते. कुठे ते नक्की आठवत नाही . याची कोणी काही माहिती देऊ शकेल का ? खुप
उत्सुकता आहे

Konkan.jpg

Pages