माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल एक सीन पाहून राहिलो. त्यात राधिका एम डी एच च्या त्या आजोबांसारख्या (विदाउट पगडी) एका बिजनेसमॅनच्या ऑफिसात जाऊन राहते. माझ्या चाणाक्ष नजरेने लगेच ओळखले की माणूस मसाल्याचा व्यापारी असणार. तर, उशीरा येण्याबद्दल काही बाही कारणं राधिका देऊन राहते. त्यावर ते आजोबा तिला म्हणून राहतात का , " मिसेस सुभेदार, तुम्ही जरा वेड्याच आहात"
इथे मी चमकून बायको कडे पाहिलं. मी काय जास्तीचं ऐकलं आहे हे तिला लगेच समजलं. 'वेड्याच' नाही, 'वेगळ्याच' असं म्हणाले ते... असं स्पष्टीकरण न मागताच मिळालं.
मी आपला उगीचच चाट पडून राहिलो, की एवढे वास्तववादी संवाद कोणी लिहिले रे बाप्पा !!!>>> म्हणजे तो hotel चा नसून, company चा मालक होता तर. ती राधिका पण महान, आणि तो मालकही महान. शन्कराच्या पिन्डिवर अर्ध्या दुधाचा अभिषेक करणार्या बाईची गोष्ट सान्गत होता तिला.

राधिकाला आता ती ऑर्डर मिळणार. आणि ते आजोबा तिचे कर्तुत्व आ णि चिकाटी पाहुन तिला स्वतःच्या मुलासाठी (जो डिव्होर्सी आहे आणि भरपूर श्रीमंत आहे ज्याला एक मुलगी आहे पण संसार सांभाळायला कुणी नाही) पसंत करणार.
पण राधिका लग्न न करतात त्या मुलीच्या प्रेमापोटी त्या आजोबांच्या घ री राहाय्ला जाणार कर्तव्य म्हणुन. मग तो आजोबांचा मुलगा गॅरीची कंपनी विकत घेणार (कारण ती एक्स्पोर्ट कंपनी आहे आणि राधिकाला पण तिचे मसाले देशाबाहेर एक्सपोर्ट करायला एक सेटअप मिळेल म्हणुन) . राधिकाला ती कंपनी तो गिफ्ट करणार मग राधिका मालकिण म्हणुन त्या कंपनीत येणार आणि पुढे सगळी मज्जा.>>>> अशी स्टोरी तर एकताबाईन्च्या सिरियलीत असते. पण फरक इतकाच की, तिच्या सिरियलमध्ये राधिका दुसरे लग्न करेल त्या डिव्होर्सीशी. हि त्याच्यावर प्रेरु करु लागेल, नन्तर त्याची पहिली बायको हिला त्रास देईल, हि तिच्याशी सुद्दा लढेल आणि आपला सन्सार वाचवेल (दुसरा), तो डिव्होर्सी काही काळाने मरेल, राधिका आपल्या पहिल्या नवर्याकडे म्हणजे गॅरीकडे परत जाईल. ते दोघ त्या मालकाच्या नातीला साम्भाळतील, लीपनन्तर त्या नातीची स्टोरी दाखवतील.
बाकी शुभान्गी, तुझी स्टोरी मस्तच!

गुप्ते राधिकाचा हात पकडुन राहिले. शनाया चीप कमेंट्स करुन राहिली आणी नानानानी जाम पकवुन राहिले.

>>शुभान्गी, तुझी स्टोरी मस्तच!---+१

इकडे नानी राधिकाला सान्गते कित्येक बायकान्ना करियर करायला मिळत नाही, त्याच्या गुणान्च चीज होत नाही. दुसरीकडे समिधा नोकरी करते त्याचे तिला काहीच कौतुक नाही. दुसर्याना सान्गावे ब्रहमज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अस आहे नानीच.

राधिका नानीलाच गप्प करते," सग़ळया बायकान्नी घराबाहेर पडायच ठरवल, तर कुटुम्बाकडे ल़क्ष कोण देणार?" म्हणजे कुटुम्बाची काळजी फक्त बायकान्नीच घ्यायची असते का, पुरुषान्नी नाही?

गुरु बरोबर बोलत होता की राधिका सतत सहानूभूती गोळा करण्याचा प्रयत्न करते. >>> परवा त्या वस्तीतल्या बाईला पण असच सांगत होती , मी आनि माझा मुलगा आम्ही दोघच रहातो , मला एका मोठ्या कंपनीच कॉनेट्र्क्ट मिळालं , माझा भाउही अडचणीत आहे , मला ४ लाख जमवायचेत .
सरळ स्पष्ट बोलायच ना , मला मदत हविय , तुम्हाला त्याचे पैसे मिळतील .
सहानभूती मिळवून काय फूकट काम करून घेणार का?

शनिवारच्या एपिसोडमध्ये, तो Taxi Driver शनायाला एकटक आरशात बघत होता , तर त्याला झापायच सोडून राधिका शनायालाच सुनावते," साम्भाळ स्वत:ला" त्याच Driver ने जर रेवतीला त्याच नजरेने बघितले असते तर तीने रेवतीला हाच उपदेश दिला अस्ता का? नाही. तो Driver राधिकाला मात्र वहिनी म्हणत होता. राधिका जशी त्याला दादा म्हणत होती, तशी शनायासुद्दा त्याला भैया म्हणत होती. तरीही त्याने तिला वेगळया नजरेने का बघाव तिला? तो तिला अस बघत होता जसे काही त्याने शनायासारख्या मुली आयुष्यात कधी बघितल्याच नाहीत. नक्की काय मेसेज दयायचाय यातून हयान्ना?

फूल.. अगदी अगदी..

ते खाजखुजली चा एपिसोड बघितला आणि बालिशपणाची कीव आली. फालतू मालिका आणि फालतू संदेश.

आणि तो राधिकाचा भाऊ स्वत: काहीच प्रयत्न करताना दिसत नाही पैसे कमावण्यासाठी. हिच्यावरच अवलंबून .
आता निदान त्या राधिकाचा गेट अप बदलावा zee वाल्यानी.
बास आता .

गुरु आधी राधिकाकडून सेवा करुन घेत होता, आता शनायाकडून करुन घेतोय. काय तर म्हणे, राधिकासारखा फक्कड आल्याचा चहा करुन आण माझ्यासाठी. अरे, एवढीच जर चहाची हुक्की आलीय तर स्वतःच किचनमध्ये जाऊन कर म्हणाव हयाला. आणि ती इशा शनायालाच विचारते, " तुला साधा चहासुद्दा करता येत नाही?" जशी काय ती इशा मोठी सुगरणच आहे ना. हाच प्रश्न गुरुला विचारायला हवा तिने. चहा करणे हे काम फक्त बायकान्नीच करायच असत का, पुरुषान्नी नाही?

समिधाने शेवटी स्पष्ट सांगितलचं आणि अगदी योग्य बोलली ती .
आधी राधीका , मग तिचा भाउ , मग तो मसाल्याचा कारखाना , अधून मधून डबे .. कोणालाही राग येईलच की .

नंतर कारखाना गुप्त्यांच्या घरात हलवला का?? रेवतीकडे का जात नाही ही रहायला ??? मला फारच मोठा प्रश्न पडलाय .
रेवतीला सोबत होईल , अथर्वला सोबत होईल , नेहाला डब्यात पोळी भाजी नेता येईल , कारखाना चालवायला मोठ घर मोकळं मिळेल , , रेवतीला अधून मधून चारउअपदेशाचे शब्द बोलता येतिल , समिधाच्या डोक्याचा त्रास जाईल .

त्या महाजन काकूंकडे बकुळा जेवण करायला जायची ना? मग आता ईथे येउन राधिकाला काय मदत करतायेत त्या ?
महाजन कुटुम्ब सारखं नाना-नानी पार्क( हा शनायाचा शब्द आहे ) मध्येच असतं काय ??

राधिका अथर्व सकट नानींकडे रहाते , बिन्धास्त कीचन मध्ये वावरते , तिच्या भावाला घेउन येते , आनंद खाली भेटला तर त्याला वर चल चहा प्यायला सांगते - आपल्या घरी बोलावल्यासारखी .. शप्पथ समीधाच्या जागी मी असते तर मी माहेरी निघून गेले असते.

त्या महाजन काकूंकडे बकुळा जेवण करायला जायची ना?
>>>
`जेवण करायला' नाही, `स्वयंपाक करायला'.... जेवण ती स्वत:च्याच घरी जाऊन करत असेल Proud

कालच रेवतीच स्त्रियान्वरच निवेदन "स्त्रीला अजूनही कमी लेखल जात" वगैरे आउटडेटेड वाटल.

राधिका म्हणते की, " काही माणसे चान्गली असतात, तर काही वाईट" किती बालिश आहे हे. मुळात कुठलाही माणूस पुर्णपणे चान्गलाही नसतो तसा वाईटही नसतो. माणसे ग्रे शेडची (करडया रन्गाची) असतात. अगदी जरी तो माणूस विकृत गुन्हेगार जरी असला तरीही तो आयुष्यात कुणाशी तरी चान्गला वागलेलाच असतो ना.
शनायाला तर completely खलनायिकाच करुन टाकले आहे हयान्नी. सुरुवातीच्या काही भागात तिला निरागस दाखवले होते, पण आता तेही दाखवत नाही. मुळात शनायाचा असा स्वभाव का झाला, ती असे का म्हणते ,"प्रेम हा फक्त शब्द आहे, खरे प्रेम वेम हे सबकुछ झुठ असते, माणूस फक्त स्वतःवरच प्रेम करतो." वै वै. हे मुद्दे हवे होते सिरियलमध्ये. ती अशी का आहे, तिचा background दाखवायला हवा होता हयान्नी. शनायाच्या आईवडिलान्चे काय? त्यान्च काहिच दाखवत नाही हे.

समिधाने शेवटी स्पष्ट सांगितलचं आणि अगदी योग्य बोलली ती .
आधी राधीका , मग तिचा भाउ , मग तो मसाल्याचा कारखाना , अधून मधून डबे .. कोणालाही राग येईलच की .>>> सहमत

आजचा भाग फार संतापजनक होता . राधिका असल्या मूर्ख माणसासाठी जीव टाकते आहे जो तिला काडीचीही किंमत देत नाही ! रायटर, डिरेक्टर डोक्यावर पडलेले दिसतात !

स्वराली >>+१

किती तो पाणउतारा करतो ऑफिसात. बाकी तो आनंदला म्हणाला की राधिकाला त बोलतोय तो त्याचा पर्सनल मॅटर आहे मग असे स्वतःचे पर्सनल मॅटर्स ऑफिसात एक्झिक्युट केलेले चालतात का?
ही राधिका पण काय जगात एकच माणूस शिल्लक असल्यासारखी त्या गुरुकडे पुनः पुनः जातेय अपमान करुन घ्यायला? तिलाच आधी हाणल पाहिजे मग त्या गुरुला धडा.

किती तो पाणउतारा करतो ऑफिसात. बाकी तो आनंदला म्हणाला की राधिकाला त बोलतोय तो त्याचा पर्सनल मॅटर आहे मग असे स्वतःचे पर्सनल मॅटर्स ऑफिसात एक्झिक्युट केलेले चालतात का?
ही राधिका पण काय जगात एकच माणूस शिल्लक असल्यासारखी त्या गुरुकडे पुनः पुनः जातेय अपमान करुन घ्यायला? तिलाच आधी हाणल पाहिजे मग त्या गुरुला धडा.>>>>१०१%

राधिका असल्या मूर्ख माणसासाठी जीव टाकते आहे जो तिला काडीचीही किंमत देत नाही ! रायटर, डिरेक्टर डोक्यावर पडलेले दिसतात !>>>> +१

तिलाच आधी हाणल पाहिजे मग त्या गुरुला धडा.>> +१

खुप दिवसांनी ह्या धाग्यावर कालचा एपिसोड पाहिल्यामुळे आले.किती तो मुर्खपणा.राधिका सारख्या बायका दाखवुन शिरेली च्या निर्मात्यांना नक्की काय सिदध करायच आहे ???? राधिका ला इतकी वाईट वागणुक दिल्यानंतरही,, ती जेव्हा टॉप ला जाईन तेव्हा ही मागच सगळ विसरुन गुरुनाथ ला परत स्विकारेन :रागः नेहमीचाच फॉर्म्युला.

आणि संवाद ही किती फालतू आहेत, माह्या घराला, माह्या नवर्याला मिळवून दाखवेन....रेवती साऱखं स्वयंसिद्धा कॅरेक्टर सुद्दा वाया घालवलं आहे, काहिही बालिश प्रसंग दाखवतात.....कधी ही मालिका विनोदी आहे की हॉरर समजत नाही...

आता कपूर सरांची एंट्री हओईल बहुतेक, गुरूच्या मनमानी कारभाराला वेसण घालायला आणि राधिका ला ४ लाख १० दिवसात उभे करायला :ड

अगं..मधेच तिच्या भावाच्या मुलाचा अ‍ॅक्सिडेंट झाला व तिला दोन लाख भरावे लागले 'सुजय' च्या ऑपरेशन साठी.....
म्हणून ती गयावया करत्येय गुरुला की मुदत वाढवून द्या .....
Sad

मला तर काल राधिकाच्याच एक मुस्कटात माराविशी वाटली... शी किती तो अपमान अन याचं काहिच नाहि हिला.. इतकं करुन त्याने मुदत दिली का? मग जे दिवस हातात होते त्या दिवसात प्रयत्न करुन द्यायचे ना पैसे परत.. अजिबात नाहि आवडलं कालचं काहिच...

सध्या झी च्या प्राईम टाईम सिरेल सगळ्याच टुक्कार आहेत!

बिचार्‍या खंडोबाला पण उगाच ताटकळत ठेवलयं! एक १०-१२ एपिसोड झाले की आख्यान...
त्या खंडोबाच्या कथेचा पार बाजीराव मस्तानी शिनेमा केला झी वाल्यांनी!
ती नवर्‍याची बायको तशीच.. ती खुकखु तीच तर शीव गवरी तशीच..

त्या झीच्या फेसबुकवर सिरीयल सुरु झाल्यानंतर लिहून आले होते, हा असला नवरा तुला कशाला परत हवा राधिका, एक शनाया गेली तर दुसरी आणेल तो. जो नवरा अपमान करतो, त्याला तुझी किंमत नाही त्याला सोड तू आणि स्वत:च्या पायावर उभी रहा. तो अपराधी आहे तुझा. त्याला शिक्षा कर. तेव्हा मला काहीजणांच्या लाईक्स पण मिळाल्या होत्या. काय उपयोग, त्यांना दाखवायचं तेच दाखवतात. मी बघत नाही ते बरं असं वाटलं हे सर्व वाचून.

Pages