तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या मालिकेच्या धाग्यावर कोणी फिरकतच नाही . सध्या झी वर सुरु असणार्‍या सगळ्या मालिकांंमधे ही मालिका बेस्ट आहे.

ती दोघही छान नॅचरल अभिनय करतात. ओढुन ताणुन नाही अगदी. फक्त ती वहिनी की कोण आहे ती जरा लाऊड करते अभिनय बाकी सगळे छान आहेत

राणा जेव्हा तिला रात्री बोलावतो तेव्हाच वाटले होते कि काजवेच असणार.

यारीयां मध्य पहायची ना की खरे प्रेम असले की काजवे लगेच चमकतात म्हणे

यारीयां मध्य पहायची ना की खरे प्रेम असले की काजवे लगेच चमकतात म्हणे
>>> त्या नंदिनी कडे बरणीत असतात ना काजवे. त्या दोघांची केमिस्ट्री मस्त होती पण,
सॉरी विषयांतराबद्दल

यारीयां मध्य पहायची ना की खरे प्रेम असले की काजवे लगेच चमकतात म्हणे
>>> त्या नंदिनी कडे बरणीत असतात ना काजवे. त्या दोघांची केमिस्ट्री मस्त होती पण,
सॉरी विषयांतराबद्दल >>>>>>>>>>>

माझी सगळ्यात आवडती मालीका आहे ती अजुनही मी रोज बघते वुटवर
मनन............

खरच सॉरी अवांतराबद्दल पण रहावले नाही

सध्यातरी मी हि एकच मालिका बघते आहे. साडेसात वाजता मालिका चुकली तर रिपिट रात्री खुप उशिरा असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी www.ozee.com/zeemarathi वर २० मिनिटांत बघते. राणाजी आणि अंजली या दोघांची कामे छान आहेतच, पण बरकत आणि रेणूसुध्दा मस्त कामं करताहेत.
गेल्या आठवडयापर्यंत कॉटनकिंग मालिकेचा मुख्य प्रायोजक आणि विको सह-प्रायोजक होते. पण बहुदा कॉटनकिंग वाल्यांना या ग्रामिण बाजाच्या मालिकेला प्रायोजकत्व देणे पटले नसावे. त्यामुळे आता ते प्रायोजक म्हणुन बाजुला झाले आहेत आणि विको, चिंग (न्युडल्सवाले) आणि एलआयसी हे तीन सह-प्रायोजक आहेत.

मलाही खूप आवडते ही मालिका पण पाहता येत नाहीए.. ऑफिसमधून घरी पोहोचायला उशीर होतो ..
प्लीज कोणीतरी रा़खेचासारखे याचेही अपडेटस द्या..

मलाही खूप आवडते ही मालिका पण पाहता येत नाहीए.. ऑफिसमधून घरी पोहोचायला उशीर होतो ..
प्लीज कोणीतरी रा़खेचासारखे याचेही अपडेटस द्या.. >>>> मग मझ्यासारखे डाऊनलोड करुन प्रवासात पहा ना... वेळ पण चांगला जातो व गर्दीचा त्रासही जाणवत नाही (निदान मलातरी)

माझी अत्यंत आवडती मालिका, पण राणा त्याला पहायला येणार असतात त्यादिवशी वहिनीने दिलेल्या आयडियानुसार घर सोडून पळून जाणार असतो, त्या दिवसापर्यंत पाहिली. त्यानंतर काही ना काही कारणांनी पहायची राहून गेलीये. आता इतक्या दिवसांनंतर परत पुन्हा वेळ मिळतोय, पण स्टोरी बरीच पुढे गेलेली असणार. तर प्लिज कोणीतरी मला त्या भागानंतर आत्तापयंत काय झाले, याचे अपडेट्स थोडक्यात (वेळ असल्यास सविस्तरही चालेल्/धावेल) देता का? धन्यवाद

काजवे बघतानाचं गाणं मस्त आहे..
पुरुष गायकाचा आवाज आवडला खुप कोणं आहे गायक?

बाकी अशे काजवे गावाकडे खरच बघितले आहेत..एखाद्या तळ्यावर .. छोट्या ओहोळावर गर्दी करुन फिरणारे.. आणि जसं सिरियल मधे दाखवल तसचं दिसत खरोखर..
खुप मस्त वाटलं होत पहिल्यांदा अशे काजवे बघितले तेव्हा..

ती अंजली फार गोड बोलते आणि दिसतेही. कामं सगळेच छान करतात. मेन राणा आणि अंजली मस्त करतायेत. ती वहीनीही अगदी मिठी छुरी आहे. साहेबरावाचे डोळे मस्त आहेत.

दोन तीन भागंच बघितलेत.

ती वहीनीही अगदी मिठी छुरी आहे. >> मला कधीही सिरियलींमधल्या व्हिलन आवडलेल्या नाहीत. पण ही वहिनी चक्क आवडते मला. तीने बेअरिंग जाम जबरदस्त पकडलंय. बोलते पण कसली भारी. ते ऐकायला पण मस्त वाटतं. Happy

साहेबराव प्रचंड देखणा आहे.

Pages