काल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का?
स्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.
मोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.
तर त्या ऊलट रिलायन्स प्लस मोदी कॉम्बिनेशन काहीतरी स्वस्तात आणि फुकटात देतेय तर त्यात नक्कीच गडबड घोटाळा हे माझे मत.
दोघांची टोकाची मते पण सत्य काहीतरी वेगळे असणार. ते जाणून घ्यायला, या जिओ चे फायदे तोटे समजून घ्यायला, आणि आता या निमित्ताने जे युद्ध छेडले जाणार आहे त्याची चर्चा करायला हा धागा.
कस्काय वरील एक
कस्काय वरील एक संदेश......
जियोच्या फ्री डाटा वर अतिआनंदीत होणार्या बालकांनो. लक्षात ठेवा...........
सुरवातीला मजा देणारी फुकटची सिगारेट आणि दारू नंतर खुप महाग पडते.
बाकी धाग्यामध्ये मोदी सरकार आणले आहेस. त्यामुळे धागा सुरळीत चालावा यासाठी शुभेच्छा.
https://www.quora.com/What-is
https://www.quora.com/What-is-the-business-model-of-Reliance-Jio/answer/...
अरे काही सांगतो काय ५ तारखे
अरे काही सांगतो काय ५ तारखे पासुन आहे ना? आई पोराची एवढी काळजी करते लाईन लागु काय म्हणते आणि हे बाळ धागे काढून मोकळे होते.
90 days चा डेटा मिळतो. वापरा
90 days चा डेटा मिळतो. वापरा आणि मग बंद करा किंवा कचरापेटीत टाका. हाय काय नि नाय काय........ बाकी धागा काढून चर्चा करण्या इतपत यात काहीच नाही. आमच्या हाफिसात 15 ऑगस्ट पूर्वी याचे प्रमोशन झाले आणि अजूनही चालू आहे. केवळ 4g डेटा 90 डेज फ्री वापरायला मिळणार म्हणून लोक घेत आहेत.
इतर कंपन्यासुद्धा करतात कि प्रमोशन असले, ते दिसत नाही आणि हे दिसत इतकंच..
बाकी धाग्यामध्ये मोदी सरकार
बाकी धाग्यामध्ये मोदी सरकार आणले आहेस.
>>>>>
मोदी स्वत:च जाहीरातीत फोटोवर आले आहेत.
जिओ जिओ. एवढेच सांगू
जिओ जिओ. एवढेच सांगू इच्छिते कि जे आज 2g वर आहेत त्यांनी 90 दिवसानंतर टाकून देण्यासाठी जिओ घेऊ नका. कारण दारू सिगरेट सुद्धा लोकांना टाकवत नाही तिथे 4g च्या स्पीडने धावणारे नेटवर्क सोडून परत 2g वर येणे केवळ अशक्य. भयानक व्यसन लागते.
४g वापरण्याची वेळ पहाटे २ते५
४g वापरण्याची वेळ पहाटे २ते५ आहे.
मला कस्कायवर आलेला मेसेज
मला कस्कायवर आलेला मेसेज :
सावधान
करलो दुनिया मुठ्ठी में ....
अशी टॅग लाईन घेवुन रिलायन्स मोबाईलच्या क्षेत्रात उतरलं. भारतातला सर्वात मोठा उद्योग समुहांपैकी एक असल्याने यशाची खात्री होतीच. त्यात राजकारण्यांचं पाठबळ. ५०० रु. दोन फोन अशी स्किम दिली आणि अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. पुढे त्याची बिलं आल्यावर लोकांनी ते फोन फेकुन दिले आणि परत जुन्या ऑपरेटरकडे वळाले. रिलायन्सचा हा डाव फारसा यशस्वी झाला नाही. तोटाच झाला असावा.
आता परत एकदा तोच डाव खेळतेय तीच कंपनी. फोर जीचं आमिष देवुन.
अनलिमिटेड डाटा आणि कॉल्स फ्री आहेत तिन का चार महिन्यासाठी.त्यामुळे त्या सीमकार्डासाठी उड्या पडताहेत लोकांच्या . काल अनुभव घेतला त्याच्या स्पीडचा. भन्नाट स्पीड आहे. पण मागच्या अनुभवातुन यावेळी कंपनी शहाणी झालीय असं वाटतंय. मागच्या चुकांवर काहितरी तोडगे आणि उपाय केलेत असं दिसतंय.
मागच्या योजनेत हॅंडसेट त्यांचाच होता,नंतर मग इतर वापरायला अलाउड केलं. या वेळीही ते हॅंडसेट देताहेत किंवा तुमच्याही हॅंडसेटवर हे सीम वापरता येतं.
अनलिमिटेड कॉलिंग आणि डाटा फ्री आहे म्हणुन लोक आता वापरु नंतर फेकुन देवु अशा मुडमधे आहेत. "फुकट घावलं अन बापलेक धावलं"अशा पध्दतीने लाईनी लावुन लोक फोन घेताहेत, पण सावधान ... कंपनीने यावेळी चाल खेळलीय. तुम्ही बरोबर सापडणार त्यांना.
ते सीम तुमच्या मोबाईल मधे घातलं की पहिले तुमचे मोबाईल मधे त्याचे अॅप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं. त्यात तुम्हाला आलेला अॅक्टिव्हेशन कोड टाकावा लागतो आणि मग तुमचा फोन सुरु होतो. म्हणजे तुमच्या फोनचा आयएमआयई क्रमांक त्यांच्याकडे नोंदला गेलाय. भविष्यात त्या पोर्टवरुन इतर कार्ड टाकुन फोन चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तोच नंबर त्याच फोनमधे वापरावा लागेल. जर दुसरा वापरायचा असेल तर अनलॉक किंवा कंपनीची परवानगी लागु शकते अशी शक्यता आहे . चार महिन्यानी बंद करता येणार नाही. आणि जर बंदच करायचा झाला तर रिलायन्स तुमच्याकडे मागच्या काळाचं बील मागु शकते. आपल्या महागड्या हॅंडसेटपेक्षा त्याचं बिल जास्त आलं नाही म्हणजे मिळवली.कारण यावेळीही सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि रिलायन्स बिलाच्या बाबत फार बदनाम आहे. त्यांचाच फोन घेवुन चार महिने वापरुन मग नंतर नसेल परवडत तर हॅंडसेट चे पैसे अक्कलखाती टाकुन फुकट डाटा वापरायचा असेल तर हरकत नाही.
नाहितर नेहेमीप्रमाणे रिलायन्स च्या जाळ्यात अडकुन "नाटक फुकट ,थेटर बाहेर पडायचे १०० रु " असला प्रकार होवु नये म्हणजे झालं
........................
बाकी धाग्यामध्ये मोदी सरकार
बाकी धाग्यामध्ये मोदी सरकार आणले आहेस.
>>>>>
मोदी स्वत:च जाहीरातीत फोटोवर आले आहेत.
>>जिओ ऋन्मेष!
पियू, तुम्हाला आलेला मेसेज
पियू, तुम्हाला आलेला मेसेज अर्धवट माहिती देतो. जिओ फक्त 4g enabled मोबाईल वर चालणार. माझ्या कडे जिओ आणि ऐरटेल 2g दोन्ही एकाच फोनमध्ये दुएल सिमवर चालतात. कुठल्याही कंपनीचे सिम डेटा साठी वापरायचे असेल तर duel सिमवर 1ल्या सॉकेट मध्ये घालावे लागते. असे केले नाहीतर फक्त voice चालते, डेटा नाही चालत. मी जिथे जिओ नेटवर्क नव्हते तिथे सिम सॉकेट बदलून ऐरटेल डेटा वापरला. मला कुठेही काहीही त्रास झाला नाही कि कोणाला फोन करून enable disable करावे लागले नाही.. सिमलेस चालले सगळे. अर्थात 4g ते 2g फरक त्रासदायक होतो एवढेच
फुकट फक्त सिम मिळतेय ना? 4g enabled मोबाईल फुकट मिळत नाहीये. तो कुठला घ्यायचा हे तुम्ही ठरवणार. कंपनी नाही. त्यामुळे 4 महिन्यानंतर तुम्ही 4g कार्ड फेकले तरी फोनला फरक पडत नाही.
व्हॉइस फ्री आहे हे खरे आहे पण 4g LT E टेक्नॉलॉजि डेटा बेस्ड आहे. कॉल सुद्धा डेटा पॅक वापरतो. त्यामुळे हे व्हॉइस प्रकरण कसे फुकट आहे ते मला बघायचंय. माहिती काढते. शुक्रवारच्या चर्चेत मी भाग घेतला नाही त्यामुळे माहिती मिळाली नाही.
जिओ प्रतिस्पर्धी कंपनी
जिओ प्रतिस्पर्धी कंपनी काहींच्या काही मूर्खपणाचे मेसेज टाकताहेत. ज्यांना खरे जाणून घेण्यात रस आहे त्यांनी जवळचे जिओ स्टोर गाठा. फेसबुक वर ऑफिसिअल जिओ पेज आहे. तिथे विचारा. 20 वर्षांपूर्वी जे केले ते आता करता येणार नाही कारण तेव्हा या संदर्भात काहीही धड कायदे नव्हते. आता आहेत.
एका कॉर्पोरेट कंपणीच्या
एका कॉर्पोरेट कंपणीच्या जाहीरातीत देशाचा पंतप्रधान सामिल होतो.यासारखे दुर्दैव कोणते.मोदी सरकार कॉर्पोरेटधार्जिणे आहे असा आरोप त्यांच्यवर होत असतो,या जाहीरतीमुळे तो खरा असावा असे वाटते.
टग्या यांनी दिलेल्या लिंक वर
टग्या यांनी दिलेल्या लिंक वर सविस्तर सगळं दिलय. धन्यवाद टग्या.
टग्यांची लिंक खरंच छान. त्यात
टग्यांची लिंक खरंच छान. त्यात लिहिले आहे की जीओ चांगले आहे.
आणि वरच्या संदेशात म्हटले आहे की, 'हणजे तुमच्या फोनचा आयएमआयई क्रमांक त्यांच्याकडे नोंदला गेलाय. भविष्यात त्या पोर्टवरुन इतर कार्ड टाकुन फोन चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे.' >> हा चोरपणा अमेरिकेतल्या सर्व कंपन्या करतात. त्यात काही नवीन नाही.
सेल्समन ऑफ द इयर ची ऐतिहासिक
सेल्समन ऑफ द इयर ची ऐतिहासिक जाहीरात पान भरून दिली होती. आता तर टिव्हीच्या जाहीरातीमधे सुध्दा वापर केला जात आहे
ऐतिहासिक लांच्छनास्पद वर्तन
आधी महाजन आता मोदी
अंबानी बंधूंना म आडनाव लकी ठरते की ठरवून घेतात देव जाणे
बाकी मोदीआर्मीने जीओ कसे चांगले व स्वस्त आहे याची जंत्री सांगायला सुरूवात केलेली दिसते
जय राधा माधव
>>कुठल्याही कंपनीचे सिम डेटा
>>कुठल्याही कंपनीचे सिम डेटा साठी वापरायचे असेल तर duel सिमवर 1ल्या सॉकेट मध्ये घालावे लागते. असे केले नाहीतर फक्त voice चालते, डेटा नाही चालत.
ही माहिती चुकीची आहे. माझ्या २ वर्ष जुन्या तेव्हाच्या १० हजाराच्या फोन वर मी स्वतः दोन सिम कार्ड वापरतो. दोन्हीवर डेटा चालतो. सेटिंग मध्ये जाऊन डिफॉल्ट कुठलं सिम डेटा साठी वापरावं ते ठरवता येतं. माझं 4g सिम दुसऱ्या स्लॉट मध्ये आहे. मस्त पळतं
बीएसएनची रिलायन्स जिओला
बीएसएनची रिलायन्स जिओला टक्कर ; 1 रूपयात देणार 1जीबी डाटा
http://dhunt.in/1smFk
via NewsHunt.com
आता मजा येणार.
या झमेल्यात ग्राहक राजाचे अच्छे दिन येऊ शकतात.
पण पाण्यासारखे वाहते ईंटरनेट हे अच्छे दिन म्हणायचे की येत्या पिढीला आणखी नादाला लावणारे व्यसन म्हणायचे हे समजत नाही.
@ मोदींचा जाहीरातील फोटो. आज एका व्हॉटस्सप ग्रूपवरही हेच घमासान चालू होते.
पर्सनली मला यात काही गैर वाटत नाही.
जर देशासाठी खेळणारा सचिन किंवा ऑलिंपिक पदक मिळवणारे खेळाडू जाहीरात करू शकतात, अगदी विदेशी उत्पादकाण्चीही करू शकतात तर मग एका देशी कंपनीची जाहीरात पंतप्रधानांनी केल्यास काय हरकत आहे.
बाकी याबाबत आपले संविधान काय म्हणते हे जाणून घ्यायला आवडेल. एखादा मंत्री वा नेता जर भ्रष्टाचार करून कमावण्याऐवजी जाहिरातींच्या माध्यमातून कमावत असेल तर काय वाईट आहे.
देशासाठी खेळणारा सचिन किंवा
देशासाठी खेळणारा सचिन किंवा ऑलिंपिक पदक मिळवणारे खेळाडू जाहीरात करू शकतात, अगदी विदेशी उत्पादकाण्चीही करू शकतात तर मग एका देशी कंपनीची जाहीरात पंतप्रधानांनी केल्यास काय हरकत आहे.
>>
पंतप्रधान हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे ब्रांड अँबेसेडर म्हणून देशाचे पंतप्रधान आणि सचिन, आॅलिंपिक पदक विजेते यांची तुलना करणे योग्य नाही.
देशातील सर्व कंपन्यांच्या बाबतीत पंतप्रधान, मंत्री, सरकारी अधिकारी इ. यांचे धोरण समान असले पाहिजे.
एका खाजगी कंपनीची जाहिरात करणे हे पंतप्रधान या पदाला शोभत नाही.
ऋन्मेऽऽष मला वाटलेच तुझा
ऋन्मेऽऽष मला वाटलेच तुझा ह्या विषयावर धागा येईल ,
मोबाईल हे व्यसन आहे आणि हे जाणुनच हा प्लॅन बनवला आहे असे मला वाटते. हल्ली वॉईस आणी SMS पेक्षा कितीतरी अधिक पटीने डेटा वापरला जातो आणि त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. आणि हे लक्षात घेउनच सगळे प्लॅन बनवले आहेत.
१४९ रुपयाचा प्लॅन मध्ये डेटा फक्त ३०० Mb आहे आणि तो नविन पिढीला नक्कीच पुरणार नाही. त्यामुळे त्याना कमित कमी ४९९ रुपयाचा प्लॅन घ्यावा लागेल ज्यात ४ GB data मिळेल . त्यमुळे कंपनीला ४९९ रुपये हमखास मिळतिल.
रात्री २ ते ५ पर्यन्त डेटा फुकट आहे पण त्यावेळी जास्त कोणी डेटा वापरत नसल्याने रिलायन्स ने तो जे ४९९ पेक्षा जास्त बिल भरतात त्याना फुकट देउ केला आहे. ( म्हणजे जो माणुस वाशीचा ब्रिज दिवसा १ तरी वापरतो त्याला रात्री जेव्हा ट्रॅफिक नसते तेव्हा एकदा फुकट वारायला दिला आहे)
मागच्या वर्षी भारत भेटीत BSNL कढुन पुण्यात ६९ रुपयात १GB ( ७ दिवसासाठी) घेत होतो त्या पेक्षा हा दर जास्तच आहे. फक्त त्याला free voice call & SMS घातल्याने हा प्लॅन जास्त जास्त चर्चिला जात आहे. थोड्याच दिवसात बाकी सगळे फोन कंपन्या पण free voice call & data देतिल.
voice call मध्ये १ तासाला फक्त ०.०३ GB डेटा लागतो तर १०००० SMS केले तरी ०.०१ GB डेटा जात असेल त्यामुळे free voice call & data दिला तरी कंपन्याचे काही नुकसान होत नाही.
टग्या, मी माझा अनुभव लिहिलाय.
टग्या, मी माझा अनुभव लिहिलाय. माझ्या मोटो जी3 3र्ड जेन मध्ये मला हा प्रॉब्लेम आला. मी दुसऱ्या स्लॉट मध्ये जिओ घातले तेव्हा चालत नव्हते. मला कस्टमर केअरने पहिल्यात घालायला सांगितले. तेव्हाच ते सुरु झाले. जेव्हा पासून ऐरटेल 2ऱ्या स्लॉटमध्ये घातलेय, त्याचा फक्त व्हॉइस सुरु आहे, डेटा बंद आहे. माझ्या गावी जिओ बंद पडले पण तिथे ऐरटेल चालते. पण जेव्हा त्याला 1स्ट स्लॉटमध्ये घातले तेव्हाच डेटा प्लॅन सुरु झाला. जिओच्या क्षेत्रात आल्यावर परत स्लॉट बदलावा लागला.
जिओ कार्ड घेतलेल्या बहुतेकांनी ते आधी दुसऱ्या स्लॉटात घातलेले आणि त्यांनाही माझ्यासारखेच अनुभव आले म्हणून मी generalise केले. काही फोन्सवर हा त्रास नसेल तर ठिक.
हे ट्राय करून बघा सेटिंग्ज ->
हे ट्राय करून बघा
सेटिंग्ज -> सिम कार्ड्स -> प्रेफर्ड सिम फॉर सेल्युलर डेटा
सेटिंग बदलल्यावर साधारण ५-१० मिनिटात बदल जाणवायला हवा.
टग्या, लिंक्स साठी
टग्या, लिंक्स साठी धन्यवाद!
रिलायन्सची ही खूप मोठी उडी आहे व मार्केट मध्ये कोणत्या पद्धतीने उतरायचे हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे.
खटकणारी गोष्ट ही कि मोदीची जाहिरातबाजी. व शंका हि कि रिलायन्स वर भरोसा ठेवू शकत नाही.
डिजिटल इंडियात फेबु सोबत रिलायन्सही होते. येता काळ सांगेल काय ते पण ह्या लबाडांच्या लुबाडणाऱ्या जाहिरातींपासून सध्या तरी दूर राहिलेले बरे.
टग्या धन्यवाद. मला माहिती आहे
टग्या धन्यवाद. मला माहिती आहे हे सेटिंग. तेव्हा फायदा झाला नव्हता पण तरीही आता परत करून बघेन आणि सांगेन.
दुसऱ्या सिम साठी मोबाईलमध्ये
दुसऱ्या सिम साठी मोबाईलमध्ये डेटा ऍक्टिव्हटेड आहे की नाही ते पण चेक करा.
व्होडाफोन, एअर टेल आणि बीएसएनएल ही तीन सिम चेक केली आहेत. व्यवस्थित डेटा देतात दुसऱ्या स्लॉट मध्ये
माझ्या कॉलेजमधील मित्रांनी
माझ्या कॉलेजमधील मित्रांनी ब्लॅकमध्ये ३०० रू ला घेतले आहे हे सिमकार्ड.
डिजीटल इंडीया चे ढोल चायनामेड
डिजीटल इंडीया चे ढोल चायनामेड आहे
भारताचा चायनामेड डिजीटल विकास
जय राधा माधव
टग्या यांनी दिलेल्या लिंक मधे
टग्या यांनी दिलेल्या लिंक मधे आहे की, चीनमधे आऊटडेटेड झालेले फोन रिलायन्सवाल्यांनी घेतलेत म्हणून!
साधना, माझ्या मोटो जी ३र्ड
साधना, माझ्या मोटो जी ३र्ड जनरेशनमध्ये एअरटेलचे ४जी सिम दुसऱ्या स्लॉटमध्येच घातलेलं आहे. चालतंय नीट.
पहिला स्लॉट रिकामाच आहे सुरवातीपासून.
काय गोंधळ घालायचा तो घाला, पण
काय गोंधळ घालायचा तो घाला, पण दया करा, व्हॉइस फुक्ट करु नका रे!
उलट व्हॉइसचे दर भरपूर वाढवा, लोकांनी दहावेळा विचार केला पाहिजे हा कॉल करु की नको, आणि केला तर थोडक्यात बोलून कॉल कसा आवरता येईल याचा.
उठसुट कोणीही फोन करतं आणि बोलणं आवरता आवरत नाही आजकाल.
.
.
Pages