Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा एपिसोड थोडासा बघितला,
आजचा एपिसोड थोडासा बघितला, खुप डिस्टर्बन्स येत होता नेटवर्कमधे, त्यामुळे पुर्ण नाही पाहता आला.
त्या दुसर्या हिरोइनपेक्षा अनिता दाते बरीच उजवी वाटली ( मला मुख्य हिरोइन म्हणून आवडली नसली तरीही :फिदी:)
अभिजीत खांडकेकरला दाढी शोभत नाही अगदीच खप्पड दिसतो, खुललाही नाहीए अजुन, ते बच्चा वैगरे म्हणणे जरा अतिच नाटकी वाटले. अनिता दाते बरेच सदोष नागपुरी टोन मधे बोलते.
अनिता दाते बरेच सदोष नागपुरी
अनिता दाते बरेच सदोष नागपुरी टोन मधे बोलते. >> बरेच नकोच तिथे.. खुप भाषा मिक्स केल्याय तिनं.. त्यांच लव्ह मॅरेज आहे हे लॉजिकच पटत नाही मला..
टिने, आत्ता कसं माह्या मनातलं
टिने, आत्ता कसं माह्या मनातलं बोलली वं तू
नाही बघितली, बाहेर गेले होते.
नाही बघितली, बाहेर गेले होते. रिपिट जमल्यास बघेन.
बघितला एपिसोड रिपीट
बघितला एपिसोड रिपीट टेलीकास्ट. फार काही आज कळलं नाही. अनिता काम छान करतेय. तो छोटा मुलगा गोड आहे पण अभिजीत नाही फारसा आवडला. प्रेयसीपण काही खास नाही वाटली.
आणि ते प्रेयसीला बच्चा, बच्चा सारखं म्हणणं फार बोअर झालं, माझे कान किटले तेच तेच ऐकून.
साडी निथळंत ठेवते नायिका गॅलरीत ते पटलं नाही, हाताने धुतली असेल पण दोन मिनीटं ड्रायरला लावली असती तरी चाललं असतं.
बायको त्याला आवडत नाहीये, ते जाणवतंय पण हा मुलाशीपण बोलला नाही, की जवळ घेतलं नाही. एखादा सीन हवा होता मुलाचे लाड करतो किंवा निदान हाक तरी मारतो असा. त्याचं सगळं लक्ष प्रेयसीशी बोलण्यात आणि तिला बच्चा म्हणण्यात होतं म्हणून स्वत:च्या बच्च्याकडे लक्ष नाही गेलं बहुतेक त्याचं. खटकलं मात्र ते.
बच्चा आणि बेबी बोअर
बच्चा आणि बेबी बोअर झालं.
अनिता दातेसमोर अभिजीत खांडकेकर फिका पडणारे.
मालिका पहिल्याच भागात डोक्यात
मालिका पहिल्याच भागात डोक्यात गेली आहे. म्हणुन फक्त इथेच हजेरी लावणार.
अनिता दाते बरेच सदोष नागपुरी
अनिता दाते बरेच सदोष नागपुरी टोन मधे बोलते. >> बरेच नकोच तिथे.. खुप भाषा मिक्स केल्याय तिनं.. >> हे राखेचाच्या मालवणीसारखं असावं बहुतेक.
अनिता त्याला मिठी मारते तेव्हा तो ज्या पद्धतीत तिला दूर करतो, माझ्या नवर्यानं असं केलं असतं तर कचकचून भांडण झालं असतं आमचं.
अनिता दातेसमोर अभिजीत खांडकेकर फिका पडणारे.>>+१. पहिल्याच भागात जाणवलं ते.
बच्चा >>> खरच पकाऊ होतं ते
बच्चा >>> खरच पकाऊ होतं ते
पहिला एपिसोड तरी आवडला. ही
पहिला एपिसोड तरी आवडला.
ही मालिका आहे त्यामुळे चित्रपटासारखी टेक्नीकली करेक्ट बोली बोलली जावी अशी अपेक्षा नाहीये माझी. पण निदान हा लहेजा तरी शेवटपर्यंत टिकवून ठेवावा एवढी माफक अपेक्षा.
अनिता दातेसमोर अभिजीत खांडकेकर फिका पडणारे >>> अभिनयात तो कोणासमोरही फिकाच पडेल.
एपिसोडची सुरुवातच नायक वायरलेस रीसीव्हरवर बोलताना दाखवून केली त्यामुळे त्या फोनच्या प्रसंगात तो वायरलेस रीसीव्हरवर बोलतोय हे आधीच माहीत होते त्यामुळे त्यातली मजाच गेली. आणि कानाला ते यंत्र लावलेले असले म्हणजे नवरा फोनवर बोलतोय हे नायिकेला कळू नये ? कितीही गांवढळ असली तरी निरीक्षणातून तरी तिला ही बाब माहितीच पाहिजे!
कितीही गांवढळ असली तरी
कितीही गांवढळ असली तरी निरीक्षणातून तरी तिला ही बाब माहितीच पाहिजे!>> होना बाकी तर वाघीण दाखवलीय! एवढे कसे समजत नाही
पण ती किती डोक्यात जाते?!
पण ती किती डोक्यात जाते?! भयप्रदा आवडले. पण मला असे कोणी सकाळी बेल मारून घरी पोहे खायला बोलवले तर डोकेच फिरेल माझे. आणि टॉवर मध्ये राहतो हाय सोसायटी हे काय? तिचे बोलणे खूपच इरिटेटिन्ग आहे. गर्ल फ्रेंड बरी आहे.
मला एक कळत नाही की बाया,
मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील.
मला एक कळत नाही की बाया,
मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील. >>>
मला एक कळत नाही की बाया,
मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील.>>
पण खरंच रुमालाला का किस करत असाव्यात???
खासकरुन विबासं वाल्या
खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील. >>> मग त्या शिवाय कल्पनाशून्य कथालेखक / दिग्दर्शक मालिका कशी पुढे नेणार?
आणि मालिकेतल्या कुटुंबात रुमाल धूत नाहीत का? तरी बरे, ब्रेकमध्ये वॉशिंग पावडरी / साबणाच्या जाहिराती येतच असतात.
पण खरंच रुमालाला का किस करत
पण खरंच रुमालाला का किस करत असाव्यात??? >>> एकदा लेकीने विचारले होते की "हिरो हिरॉइनचे कान का चावतो" ते आठवले
हिरो हिरॉइनचे कान का
हिरो हिरॉइनचे कान का चावतो>>>> अगग
मला एक कळत नाही की बाया,
मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील.>>
अरे वर धाग्यात कलाकारमध्ये अनिता दातेचे नाव राहिले की.
आणि मालिकेतल्या कुटुंबात
आणि मालिकेतल्या कुटुंबात रुमाल धूत नाहीत का? तरी बरे, ब्रेकमध्ये वॉशिंग पावडरी / साबणाच्या जाहिराती येतच असतात. >>> कंपन्या जशा खाण्याचे , शाईचे , चिखलाचे डाग घालवण्याचे दावे करते , तसेच लिपस्टिक चे डाग घालवण्यासाठी पण करावी जाहिरात.
शेअरिन्ग द लोड मध्ये नवरा आपला शर्ट आणि रूमाल आपण धूतो कारण त्याला त्यावर लिपस्टिक चा डाग दिसतो.
अगं, तोंड पुसत असाव्यात किंवा
अगं, तोंड पुसत असाव्यात किंवा एक्स्ट्रॉ लिपस्टीक टिपत असतील...आपल्याला काय माहित!! आपण काही विबासं वाल्या प्रेयस्या थोडीच आहोत!
::खोखो::
आणि मालिकेतल्या कुटुंबात
आणि मालिकेतल्या कुटुंबात रुमाल धूत नाहीत का? अगदी काल हेच मनात आलं. अनिताचं पात्र जास्त अघळपघळ दाखवलंय, खांडकेकर फारच अभिनयशून्य वाटतायेत. मी माझिया प्रियाला प्रीत कळेना पण क्वचित पाहिलीय.
अभिजीत खांडकेकर व कादिप
अभिजीत खांडकेकर व कादिप मधल्या गवरीची जोडी शोभेल मग......दगडाला दगड साक्ष!
दगडाला दगड साक्ष!
दगडाला दगड साक्ष!
खांडकेकर फारच अभिनयशून्य
खांडकेकर फारच अभिनयशून्य वाटतायेत> होच..
मग अभिजीत गाण म्हणेल, गीत
मग अभिजीत गाण म्हणेल, गीत गाया पत्थरोंने...
एकदा लेकीने विचारले होते की
एकदा लेकीने विचारले होते की "हिरो हिरॉइनचे कान का चावतो" ते आठवले फिदीफिदी >>>>:हहगलो:
एकदा लेकीने विचारले होते की
एकदा लेकीने विचारले होते की "हिरो हिरॉइनचे कान का चावतो" ते आठवले >> हे भगवान. यावर तुझं का उत्तर होतं??
मला एक कळत नाही की बाया,
मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील
>>>
भयप्रदा आवडले.>>> कोण ही
भयप्रदा आवडले.>>> कोण ही भयप्रदा. मी ही मालिका बघितली नाही म्हणून विचारते.
त्यांच लव्ह मॅरेज आहे हे लॉजिकच पटत नाही मला.>>> सहमत. त्यान्चे लव्ह मॅरेज कसे झाले हे दाखवले का सिरियल मध्ये?
Pages