पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा! हे सगळं नव्हतं मला माहिती, फक्त एक अंदाज केला, इतकंच!! मालिका संपणार असल्याची न्यूज वाचली नुकतीच आणि तिच्या लग्नाचे व्हिडीओज youtube वर पाहिले होते मागे... बरेच डिटेल व्हिडीओज टाकलेत तिच्या फॅन्स नी. ती लग्नात गातांना, नाचतांना etc.

नवरा एकदम हँडसम आहे तिचा आणि त्यांची जोडी फारच मस्त दिसते. Happy

तिचं खरं आणि मालिकेतलं लग्न जवळपासच झालं बहुतेक, त्यामुळेच बहुदा ती इतकी सुंदर दिसतेय गेले काही भाग आणि साड्या सुद्धा एक से एक आहेत.. खऱ्या लग्नातल्या असाव्यात Proud

नाही, खरं लग्न होऊन बरेच दिवस झालेत, मालिकेत आत्ता झालं. फोटो खूप महिन्यांपूर्वी आले होते लग्नाचे. नवरा मला तिच्यापेक्षापण आवडला, छान आहे.

बरंच अवांतर झालं इथे पण एनीवे हि मालिका आता संपतेच आहे, शेवटचा आठवडा.

तो यश- संतोष जुवेकर सुद्धा जीवावर आल्यासारखा अभिनय करायला लागलाय, अचानक एकाच एपिसोड मध्ये सुरुवातीला क्लीन शेव्ह आणि नंतर दाढी आणि डोळ्यावर झोप अश्या अवस्थेत पाट्या टाकत डायलॉग्स बोलतोय, काय बेक्कार दिसतोय तो गेले काही दिवस!!>>>> स ह म त.

मी बघितली शेवटी थोडा वेळ. नंदिनी आणि सुनीलचं लग्न २४ ता. रजिस्टर पद्धतीने करणार आणि तो मोठा मुलगा मठाधीपती हे नीट कळले, वसु बहुतेक कॉलेजमध्ये शिकवणार असं उडत उडत ऐकलं मीन्स तेव्हा मी दुसरीकडे बिझी होते. उर्मीच्या माहेरच्यांना काही दिवस तिथेच राहायचा आग्रह केला, तो त्यांनी स्वीकारला.

अरे लिहा ना कोणीतरी शेवटी काय झालं ते. युट्युब वर १० मि. चाच आहे भाग. नंदीची पाठवणी झाली का ?>>> अनेक गोड Announcements झाल्या
वासू-उर्मीच लग्न कँसल त्याच मुहुर्तावर नंदीच सुनिलशी लग्न
राम मठाधिपती होणार
राम्-कुसुम कडे नविन पा।उणा येणाअर
वासू विद्यापिठात संस्क्रुत शिकवणार
इत्यादी....

पणा मला उर्मी आवडायची. बर्याच बाबतीत टिपिकल हिरॉइन सारखी नव्हती. म्हणजे बावळट, बिचारी, अती गुणी, सोशीक इत्यादी.

शेवटच्या भागात उर्मी पंजाबी ड्रेस मधे दिसली. त्याआधी भारतातली प्रचंड लोकसंख्या आणि शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांचा संयुक्त उल्लेख करून वासु - उर्मी बाळ दत्तक घेण्याचा निर्णय पटवून देतात.:) . शेवटी दोन्ही व्याही एकमेकांचे विचार वेगळे असले तरी काम चांगले असल्याचे सांगतात. नंदिनी एक्दम बदलून सुनील ला `ते' असे संबोधून लाजु लागते. मी थोडाच भाग पाहिला . Happy

वासु - उर्मी बाळ दत्तक घेण्याचा निर्णय पटवून देतात>> हे दत्तक प्रकरण बळच आणतात आज्काल सगळीकडे. त्या आदे-मेदे नी पण दत्तक घेतले होते. म्हणजे दत्तक घेणे हा निर्णय चांगलाच आहे पण काही बॅकग्राऊंड नसताना अस मधे दत्तक घ्यायचे म्हणजे ओढून ताणून आणल्यासारखे वाटते.

घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या की घटस्फोट झाला, अस नसत. ती बरीच मोठी प्रोसेस असते हे कोणीतरी सिरीयलवाल्यांना सांगायला हवय. दत्तक घेणे ही कल्पना चांगलीच आहे. पण ' मला अजून शिकायचाय, नोकरी करायची आहे', म्हणून दत्तक घेणे विचित्र. दत्तक घेतलेल्या बाळांसाठीही वेळ द्यावाच लागणार की.

ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड Happy

पण गोडाचा फारच अतिरेक झाला शेवटच्या भागात. त्या भरात मग नंदिनीच्या अविवाहित आत्यासाठीही वरसंशोधन सुरु करायला हवे होते. त्या अक्काला आणलं असतं परत तर अजून मजा आली असती.

बाकी उर्मी साडीमधे जास्त चांगली दिसते. तिचे दोन्ही सलवार कमीज नाही आवडले, तो पांढरा-रंगीबेरंगी असा काय जो होता तो शॉर्ट लेग्थ जास्त चांगला दिसला असता. जीजींनाही सलवार कमीज मधे बघायला आवडलं असतं Happy

Pages