पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१३. वासुच्या बहिणीचा नवरा पश्चात्तापदग्ध होवून , पत्नीची माफी मागून तिला घेवून जाईल;>>> नाय ओ, आजच्या भागात वासुने मेव्हण्याला झाडले आणी अदितीला पण आता नांदायचे नाहीये. तिला शिकण्याची मात्र ईच्छा आहे.

१४. दादा आतां मठाधिपति नसल्याने शर्ट-पँट मधे व प्रसंगानुरूप टायही लावून दिसतील;
१५, माझ्यासारखे माबोकर 'आतां पिसं कुणाची काढूं ?', ह्या विवंचनेत पडतील !
Lol Lol Lol

नाही नाही नंदिनीला कट कारस्थानं केल्यबद्दल घराबाहेर काढतील आणि आदितीचं सुनीलशी लग्न लावून देती

<< नंदिनीला ... घराबाहेर काढतील आणि आदितीचं सुनीलशी लग्न लावून देती >> अहो, मलाही तसं म्हणायला आवडलं असतं पण तसं व्हायला अदितीच्या घटस्फोटासाठींच कित्येक महिने थांबावं लागेल; तयारी आहे तुमची आणखी इतका वेळ ह्या सिरीयलला द्यायची ? Wink

<< दादा लावतात ते वैदीक पद्धतीने लग्न >> मग तर अदितीला दुसरं लग्न दूरच राहिलं, ' विहीर जवळ करणे ' हा एकच सन्माननीय पारंपारिक पर्याय रहातो ! Sad
<< त्यात काय..शिरेल चक्क " सहा महिन्यानंतर..." अशी पाटी झळकवून पुढे न्यायची....!!>> मग हरकत नाहीं Wink

त्यात काय..शिरेल चक्क " सहा महिन्यानंतर..." अशी पाटी झळकवून पुढे न्यायची....!!>>>> +१११११

बहुतेक तो सुनील नंदिनीचं खरं स्वरूप कळल्यावर आपणहूनच लग्नाला नकार देईल.

आतापर्यंतचे अंदाज खरे ठरत आहेत Happy वैदिक लग्न नक्की होत नाही आता वासू उर्मीचं. आता मालिका संपते म्ह्णून बर्‍याच गोष्टी पटापट गुंडाळायला सुरवात झाली आहे. नाहीतर दादा आणि उर्मीचे बाबा यांचं मतपरिवर्तन व्हायला १-२ महिने तरी नक्की लागले असते!

तुम्ही लिहिलेल्या मुद्द्यांपैकी १,२ आणि ३ झाले. गुड जॉब. आता पुढचे ४ ते १० पण पटकन होवो.

९. नंदिनी मुकाटयाने सुनीलशी विवाह करून आपल्या सासरी जाईल.>> हे नाही होणार.
नंदी सुइसाइड किंवा मर्डर अटेंप्ट करून मनोरुग्णालयात भरती होइल. सुनिलबरोबर लग्न करायला आता ताई होतेच आहे मोकळी.

सहा महिन्यानंतर अशी लीप घेतली तर काय दाखवतील शेवटी याचा अंदाज Happy

१. उर्मीचे शिक्षण चालू आहे, ती आता साड्या नेसत नाही.
२. वासू कॉलेजमधे शिकवतो आहे, तो आता शर्ट पंट घालतो!
३. नंदिनी आणि तिची आत्या अक्कांकडे राहात आहेत, नंदिनी मानसोपचार घेत आहे.
४. रामचंद्र मठाधिपती आहेत.
५. कुमुदवहिनींकडे गुड न्यूज आहे Happy
६. अदिती सुनील यांचा विवाह पत्रिका न बघता आणि न्यायालयात संपन्न होतो Happy

<< अदिती सुनील यांचा विवाह पत्रिका न बघता आणि न्यायालयात संपन्न होतो >> म्हणजे , वासुच्या नांवाने केली होती तशी दादांची पुन्हा अदितीच्या नांवाने केलेली जाहीर आंघोळ दाखवणार ? Wink

<< कुमुदवहिनींकडे गुड न्यूज आहे >> म्हणजे रामचंद्र मठाधिपति झाला हीच ना ? कीं, मठाधिपतिला आतां वारसही येणार ही ? Wink

<<आतां वारसही येणार ही ... बरोबर हीच गुडन्युज आहे कुमुदवहिनींकडे.>> नवरा मठाधिपति होणं, हें कुमुदवहिनींचं ऑब्सेशन आहे , म्हणून फक्त शंका आली एवढंच ! Wink

सहा महिन्यानी कुमुदचे बाळ पंतसचिवांच्या मांडीवर दाखवतील आणि बाळा तुला काय व्हायचे ते हो असे त्याला सांगतील (3 idiots मधला बोमन नातवंडाच्या कानात सांगतो तसे)

सहा महिन्यानी कुमुदचे बाळ पंतसचिवांच्या मांडीवर दाखवतील आणि बाळा तुला काय व्हायचे ते हो असे त्याला सांगतील (3 idiots मधला बोमन नातवंडाच्या कानात सांगतो तसे)
Lol

नऊ महिन्यांनी म्हणायचय का तुम्हाला? Happy

नऊ महिन्यांनी म्हणायचय का तुम्हाला? स्मित>>तसे म्हणा

शी बाई!! माबोकरांच्या आधीच्या सर्व वल्गनांवर पाणी फिरविण्यासाठीच नंदिनीच बदलली अन्‌ सुनीलशी लग्न करायला तयार झाली.

झालं झालं नंदिनीचं मतपरीवर्तन झालं, ती वाशा ऐवजी सुनीलला "ते" म्हणू लागली. कुमुद कडे गूड न्यूज आहे. आता फक्त रामचंद्रला मठाधिपती करणं बाकी आहे.

कुणी तरी भक्ताने मठासमोर दोन चार साखरेच्या गोणी गुपचुप आणून ठेवल्या असाव्यात; अहो, पंतांच्या घरांत सगळंच गोड गोड म्हणजे किती चाललंय !!!! Wink

ही मालिका तर संपतेय. आता 'झी'वरच्या आणखी एकदोन मालिकासुद्धा अशाच लवकर संपोत हे देवाकडे मागणं.
एक ती नांदा सौख्यभरे मालिका. कायच्या काय चाललंय. तो नंदीबैल नील. बुगू बुगू. संपवा बुवा हा खुळेपणा एकदाचा.
त्या मानाने कलर्सच्या मालिका बर्‍याच चांगल्या असतात. संत तुकारामांवरची तू माझा सांगाती छान आहे. महात्मा फुल्यांवरची तर फारच छान चाललीय. पण संपत आलीय वाटतं. अगदी अस्सं सासर सुद्धा 'झी'पक्षा बरी आहे.

हिरा, महात्मा फुले अजून दोन किंवा चार भाग असतील, एकेक व्यक्तीरेखा घेऊन आठ किंवा दहा भाग केलेत त्या मालिकेत.

आज दोन मिनीटं बघितली, उर्मी खूप लाडकी झालेली दिसतेय दादांची, तिच्यासारखीच नात होऊदे असं म्हणत होते.

अगदी अस्सं सासर सुद्धा 'झी'पक्षा बरी आहे.>> अगदी खरं! मी ही हेच लिहिलं होतं बहुतेक ह्याच धाग्यावर काही दिवसांपूर्वी.. पण 'असं सासर.. ' सुद्धा संपतेय काही दिवसांनी.. ३०० एपिसोड्स यशस्वीपणे पार पडले, पण आता TRP कमी झालाय, म्हणून गुंडाळत आहेत ती पण, असं कारण सांगतायत.

शिवाय लीड रोल मृणाल दुसानीस चं नुकतंच झालेलं लग्न, हे ही एक छुपं कारण असू शकतं..

आता तो यश- संतोष जुवेकर सुद्धा जीवावर आल्यासारखा अभिनय करायला लागलाय, अचानक एकाच एपिसोड मध्ये सुरुवातीला क्लीन शेव्ह आणि नंतर दाढी आणि डोळ्यावर झोप अश्या अवस्थेत पाट्या टाकत डायलॉग्स बोलतोय, काय बेक्कार दिसतोय तो गेले काही दिवस!!

संपणार आहे का अ सा सु बा? बहुतेक मृणालला अमेरीकेत जायचंय, नवरा तिथे असतोना, त्यामुळे नवीन contract करायला तिची तयारी नसणार म्हणून कदाचित संपणार असेल अ सा सु बा. कारण त्या दोघांपैकी कोणी बदललं तर मालिका चालणार नाही.

लग्न झालं तेव्हाच तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं, एक वर्षाचं contract आहे तिचं.

Pages