Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>उर्मीच्या आईचा मुलीला सोडून
>>उर्मीच्या आईचा मुलीला सोडून जाताना चा संवाद व वडिलांचे तिला मनातून काढणे शक्य नाही. तो सीन अगदी डोळ्याला पदर.... >> अमा, तुमच्या भावना कळतायत तरी व्यक्तिशः मला ते संवाद अज्जिबातच आवडले नाही. तिची आई एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून जगतेय आणि उर्मीच्या माहेरी पुरोगामी वातावरण आहे तरी आपल्या मुलीला (मनाविरुध्द) पण जुळवून घे सांगते ते आवडलं नाही. अगदी ती बोलली जे उर्मीच्या वडिलांना देव, देव पूजा आवडत नाहीत म्हणून मी सगळं लग्नानंतर बंद केले हे ही आवडलं नाही. एक मुलगी लग्न झाल्यावर आपली तत्त्वे, आपली मुल्ये, विचारसरणी घेऊन का सासरी राहू नाही शकत? खूप जणी अश्या स्वतंत्र, खंबीर विचाराने सासरी नांदतायत तरी हे असे दाखवून हे लोकं का खच्चीकरण करतायत. मला हे ही माहित आहे ह्या सिरीअल्स आहेत त्याचे काही ईतके मनावर घ्यायचे नसते, नाही बघायचे तर टिव्ही बंद करा वगैरे वगैरे. तरी ह्या सिरिअल्स बघणारा एक मोठा वर्ग आहे जो सिरिअल बघून ह्या गोष्टींचा स्वतःच्या जीवनाशी संबंध लावत असतात...मग तिथे कर्मकांड न आवडणार्या, स्वतंत्र विचार करणार्या सुनेला उर्मीचा उदाहरण सांगितलं जाईल की बघा उर्मी ईतकी शिकलेली असून (पीचडी करणारी) करतेय ना सगळे देवाचे, सोवळे, सासरच्यांच्या मनासारखे ई.. आणि तिची उच्चशिक्षित आईही तिला सांगतेय आता सासरशी घे जुळवून... गेल्या आठवड्यात उर्मी सासर्यांशी तडपदारपणे बोलते तेव्हा वाटलेले की किमान यात काही वेगळे घडेल पण नाही पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.. फारच वैतागवाणं आहे हे.. सिरिअल मध्ये काही वेगळे विचार दाखवण्याची कुठल्याच चॅनेलवाल्यांत उर्मीच नाही.. आणि कुवत पण.
कुठे त्या जुन्या जमानातल्या उडान, प्रपंच, ४०२ आनंदवन ई. सारख्या सिरिअल्स आणि कुठे ह्या...
उगाच आपली माझी चिडचिड
ऑ ..? अगं, पण कांदेपोहे
ऑ ..? अगं, पण कांदेपोहे कार्यक्रमात अजून लग्न कुठे ठरलं असतं.... शकुना $$$ च्या मेंदी ने.......वगैरे लाजत लाजत म्हणायला?
नीलू, छान पोस्ट. अहो मी अगदी
नीलू, छान पोस्ट. अहो मी अगदी परवाच मुलीला हॉस्टेल ला सोडून आले. तिच्या समोर रडता आले नाही. पण मग सिरीअल बघत असताना र डू आले( एकुलती एक असल्या ने जास्तच लाडात वाढवली आहे वगैरे. ) काल पण तिचे बाबा म्हणतात ना आपण तिला किती छान वाढवले आहे तिने ते सर्व वाया घालवता कामा नाही. किती जागरूक पालक दाखवले आहेत ते.
फक्त प्रेमा साठी उर्मीला किती काँप्रमाइज करावे लागते आहे व दोन्ही बाजूने तिच्या वरच दडपण येते आहे
मी नताशा धन्यवाद.
यॅस, विद्याला पटत \ आवडत नाही
यॅस, विद्याला पटत \ आवडत नाही म्हणून तिच्या आईने देव देव किंवा जे काही कर्मकांड ( हा शब्द किती सहज वापरतात हे लोक ) करणं सोडून देणं नाही पटलं.
तसा अजून एक शब्द डोक्यात जातो - दूरध्वनी - फोन वापरायचा आणि नाव मात्र घ्यायचं नाही ?
त्या माई तर एकदम पुराण
त्या माई तर एकदम पुराण काळातल्या वाट्ट्तात. म्हणजे तसे पाहिलेतर ह्या बायकांचा इश्यू धर्म व कर्मकांडे मान णे न मानणे हा नसून पुरुष वर्चस्व वादाला सामोरे जाणे हा आहे. प्रत्येक बाई दबलेली आहे व पुरुषांचे अप्रोव्हल सीक करत आहे.
अमा, आपल्या कडे धर्म -
अमा, आपल्या कडे धर्म - धार्मिकता , कर्मकांड व पुरुषी वर्चस्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अविभाज्य!
पातिव्रत्य ,घराणेशाही, व्रतं वैकल्य हे त्याचेच बाय प्रॉडक्ट्स.
आपल्या कडे धर्म - धार्मिकता ,
आपल्या कडे धर्म - धार्मिकता , कर्मकांड व पुरुषी वर्चस्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अविभाज्य!
पातिव्रत्य ,घराणेशाही, व्रतं वैकल्य हे त्याचेच बाय प्रॉडक्ट्स.
>>अगदी अगदी..
काल ती उर्मीची जाऊ म्हणत होती.. "नंदिनी घरची पाहूणी आहे. तिला कशी सांगणार खोली खाली करायला?" यांच्या दुरध्वनीछाप मराठीत हे 'खोली खाली करा' बसते का?
आणि अजून एक म्हणजे ती जाऊ (तिचं नाव विसरले पुन्हा मधल्या काळात).. ती आता त्या नणंदेच्या त्या घरात राहाण्यावर का उठलीये? आधी तिला त्या नणंदेला आणि तिच्या नवर्याला मठ्ठाधिपती करतात कि काय अशी इन्सिक्युरीटी होती तीही गेली असेल ना आता? कारण पंतांनी आता वाश्याचं नाव ऑलरेडी डिक्लेअर केलंय ना मठ्ठाधिपती म्हणून? बरं.. उर्मीशी वाईट वागल्याचा राग (कारण ती धरुनच चाललीये कि त्या नणंदेनेच पंतांसमोर सगळं उघड केलं इत्यादी) तर जिथे उर्मीच्या मनात अदितीवंसंविषयी काही राग नाही तिथे हिने रागराग करून काय होणारे?
ती मोठी जाउ अगदी सासूवर
ती मोठी जाउ अगदी सासूवर गेल्ये, वारा वाहतो तस बोलणारी
नाव तोडून हाक नाही मारायची मग रामचंद्रला वाशा रामदादा म्हणतो ते कसं चालतं ? का भावी मठाधिपतीला सगळं माफ आहे ?
<< 'पसंत आहे मुलगी' हें खरंच
<< 'पसंत आहे मुलगी' हें खरंच वासु व उर्मिच्या लग्नासंदर्भात आहे, असंच मीं खुळ्यासारखं समजत होतों; तें नंदिनीच्या संदर्भात आहे, हें आत्तां लक्षांत आलं माझ्या !! >> ही आहे माझी ३१ मे २०१६ ची पोस्ट.; त्यांत थोडा बदल आवश्यक झालाय - 'हें आत्तां लक्षांत आलं माझ्या' च्या जागीं ' ही आतां खात्री झालीय माझी' असं कृपया वाचावं !
उर्मीची जाऊ - कुमुद
उर्मीची जाऊ - कुमुद
कालचा भाग पण अगदी पेन फुल
कालचा भाग पण अगदी पेन फुल होता. नंदिनी किती कारस्थानी आहे. व दाद्या माई तिच्यावरच विश्वास ठेवतात. कितीका समजूत दार असे ना व नवराबायकोचे प्रेम वगैरे असे ना आपली हुषार सुविद्य मुलगी, रात्री अंधारात गावात भांडी घासत बसली आहे हे मलादेखिल अॅक्सेप्ट करायला जरा जडच जाईल. उर्मी शूड लीव्ह ऑल दिस व पुण्याला येउन उच्च शिक्षण घ्यावे, परदेशी राहावे असे मला काल प्रकर्षाने वाट ले. हे घर सुधरण्यातले दिसत नाही. उमेदीची वर्शे एकदा गेली की परत येत नाहीत. तिच्या माहेरी किती मोकळे पणा आहे.
आस्तिक आणि नास्तिक असे दोन
आस्तिक आणि नास्तिक असे दोन विरुद्ध प्रवाह दाखवा. पण मत्सराचा / सुडाचा 3d कशाला?
नंदिनी मानसिक रुग्ण आहे. मला हे मान्य आहे की परिवाराला सदस्य मानसिक रुग्ण आहे हे समजायला बराच काळ जावा लागतो. आधी एकमेकांचे अहंकारच दुखवले जात रहातात. आणि तार्किकतेचा बर्याच परिवारांत अभाव असतो. आपण थर्ड पार्टी म्हणून बघतोय ना म्हणून आपल्याला अतार्किक विसंगत वागणी ठळकपणे जाणवतात. आपल्याच परिवारात असेच वागणार्या लोकांकडे आपण नाही का दुर्लक्ष करत?
मनोरुग्णांसाठी काही व्यावहारिक तोडगे अमलात आणून दाखवले तर मालिका वेगळ्या स्तरावर पोचेल.
नंदिनी मानसिक रुग्ण आहे.>>>>
नंदिनी मानसिक रुग्ण आहे.>>>> आ, हे कधी झाल?:अओ:
त्या दादांनी आपल्या मुलांची
त्या दादांनी आपल्या मुलांची नावं पुनर्वसू, रामचंद्र अशी भारदस्त ठेवली आहेत आणि मुलीचे एकदम मॉड नाव अदिती! तिचंही नाव सत्यभामा, आश्लेषा, शततारका असं काहीतरी हवं होतं
नंदिनी आणि कुमुदचं काम कोण
नंदिनी आणि कुमुदचं काम कोण करत आहेत? त्यांचा अभिनय आवडायला लागला आहे. त्या भूमिकेशी एकदम जुळून येत आहे. बाकीचे सर्व लोक डोक्यात जात आहेत.
कालच्या भागात आजीने उर्मीला
कालच्या भागात आजीने उर्मीला फटकारलं, या घरानं तुझा कणा काढून घेतलाय, तुला तुझी ओळखच नाही राहिलीय असं सगळं सुनावलं ते खूप पटलं आणि आवडलं
चीकू +१००००
चीकू +१००००
किती इरिटेटिंग बोलली ती उर्मी
किती इरिटेटिंग बोलली ती उर्मी काल... म्हणे, इतक्यात आज्जीला सांगतील, असं वाटलं नव्हतं.. अजून २-३ दिवस तरी लागतील असं वाटलं होतं!!! अरे काय्ये हे? इतके दिवस सहज सांगता आलं असतं, ते केलं नाही, २-३ दिवसात असं काय बदलणार होतं? फालतूची लपवाछपवी सुरु आहे. सगळं त्या नंदीच्या आणि तिच्या आत्याच्या मनाप्रमाणेच घडवायचा बेत दिसतोय दिग्दर्शकाचा, तो ही अगदीच बालिश पद्धतीने!
असो, चीकू + १ आज्जी तर मस्त बोललीच, पण तिचे वडिल आणि आई (उर्मी आणि वासू यांना 'पालक' संबोधतात शाळेतल्यासारखे.. फार हसू येतं ते ऐकतांना आधी फक्त उर्मीच म्हणायची, आता तिच्या सहवासात राहून वासूही असंच बोलायला लागला. पुढे मागे माई नानाही म्हणतील, उर्मीच्या पालकांना फोन लावा म्हणून ) यांचा संवादही फारच आवडला, वडिलांच्या प्रभावामुळे रजिस्टर लग्न करणार्या आणि वाचलेले पैसे दुष्काळग्रस्तांना देणार्या मुलाच्या पत्राचा उल्लेख करणारा..
उर्मीचे वडिल जसे नास्तिक, आणि बुद्धी प्रामाण्यवादी बाजू समर्थपणे मांडतांना दाखवले आहेत, तसेच नानाही आस्तिक मंडळींची बाजू फार छान मांडत आहेत.
नंदीनी, तिची आत्या, कुमुद या पात्रांचा इरिटेटिंग खलनायकी वावर सोडला, तर मालिका सुसह्य आहे. नंदिनीच्या आज्जीला आणावं परत. ती जरा लॉजिकल वागते, बोलते.
मी आत्ता ह्या सिरीयलचा एक शॉट
मी आत्ता ह्या सिरीयलचा एक शॉट बघितला, आजी आणि नातीचा शॉट छान होता, दोघींनी काम छान केलं. डायलॉग छान होते. उर्मी छान काम करते. पुढचा शॉट मात्र नाही बघु शकले.
झी कडे सध्या चांगलं काम करणारी मेन नायिका उर्मीच आहे बहुतेक.
झी कडे सध्या चांगलं काम
झी कडे सध्या चांगलं काम करणारी मेन नायिका उर्मीच आहे बहुतेक.>>>+1
मला उर्मी आणि वासू, दोघंही आवडतात..
रच्याकने, कोणी एक गोष्ट नोटीस
रच्याकने, कोणी एक गोष्ट नोटीस केलीये का? वासू चा भाऊ , रामदादाचं पात्र साकारणारा प्रत्येकवेळी श चा उच्चार ष असाच करतो.. फारच विनोदी वाटतं ते
कुमुद तू अषी का वागतेस?
तू जरा षान्त राहायचं काय घेशील?
चीकू + १
चीकू + १
>>> सगळं त्या नंदीच्या आणि
>>> सगळं त्या नंदीच्या आणि तिच्या आत्याच्या मनाप्रमाणेच घडवायचा बेत दिसतोय दिग्दर्शकाचा, तो ही अगदीच बालिश पद्धतीने! <<<
दिग्दर्शक कोण आहे या मालिकेचा?
नंदीची कारस्थान न कळण्याइतका बुद्दु "मठाधीपति" असु शकतो का वास्तवात? ती इतक्या "लावालाव्या" करते साळसुदपणे, तरीही त्यांना काडीचीही शंका येऊ नये? की "मठाधिपति" या कॅरेक्टरला जाणुनबुजुन "मूर्खच" दाखवायचे आह?
का प्रेक्षकच मूर्ख आहेत असे दिग्दर्शक समजुन चालतोय? नाहीये हे वास्तव, नाहीये फिक्शन... झीवाले बिघडू लागलेत. ती दुसरी लग्ना आधी गरोदर मालिकाही तशीच..... आचरटपणाचा कळस दाखवितात..!
यामुळे लिंबी आता मराठी मालिकांकडुन हिंदी मालिकांकडे वळली आहे ... कधी कधी तर चक्क ते सिद्दू/कपिलचा शो देखिल बघत बसते
(येऊन जाऊन काय, तर टीव्हीचा रिमोट माझ्याकडे कधीच नसतो हे महान सत्य)
<< रामदादाचं पात्र साकारणारा
<< रामदादाचं पात्र साकारणारा प्रत्येकवेळी श चा उच्चार ष असाच करतो.. फारच विनोदी वाटतं ते >> त्याची बायको व नंदीनी ध चा मा करत असतात नेहमींच, त्यापेक्षां श चा ष बरा ना !
उर्मीची तात्विक चर्चा व ' त्यांच्यातली एक होवूनच मला त्यांच्यात सुधारणा करायचीय ' , हें आतां किती वेळां ऐकायचं ? फारच कृत्रिम व निरस व्हायला लागलंय हें !
लग्ना आधी गरोदर मालिका >>>
लग्ना आधी गरोदर मालिका >>>
खूप वर्षांपुर्वी मी
खूप वर्षांपुर्वी मी मित्राच्या बहिणीची पत्रिका मॅनिप्युलेट करुन दिली होती. मंगळ फार त्रास देत होता. मालिका पाहून ते आठवल.
कालच्या भागात आजी आणि उर्मी
कालच्या भागात आजी आणि उर्मी चे संवाद आणि अभिनय आवडले.
मठाधिपति" या कॅरेक्टरला
मठाधिपति" या कॅरेक्टरला जाणुनबुजुन "मूर्खच" दाखवायचे आह?
का प्रेक्षकच मूर्ख आहेत असे दिग्दर्शक समजुन चालतोय?>>
त्याची बायको व नंदीनी ध चा मा करत असतात नेहमींच, त्यापेक्षां श चा ष बरा ना ! >> खरंय
हि बंद होतेय बहुतेक, २२
हि बंद होतेय बहुतेक, २२ ऑगस्टपासून ८ वाजता नवीन सिरीयल चालू होणार आहे, अॅड बघितली. मालिकेचं नाव 'माझ्या नव-याची बायको'.
२२ ऑगस्टपासून ८ वाजता नवीन
२२ ऑगस्टपासून ८ वाजता नवीन सिरीयल चालू होणार आहे, अॅड बघितली. मालिकेचं नाव 'माझ्या नव-याची बायको'.>>> कस शक्य आहे? अजून तर उर्मीला तिच सासर सुधारायच आहे. मला वाटते ती झी young वरची मालिका असेल.
Pages