Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता उर्मी व वाशाचे 'विधीवत'
आता उर्मी व वाशाचे 'विधीवत' वैदिक पद्धतीने लग्न लावणार आहेत. कारण रजिस्टर मॅरेज हा एक करार आहे, लग्न नाही. (असे पंत म्हणतात!) व तोपर्यंत उर्मीला माहेरी पाठवणारेत!!! व नंदिनीला नित्य नवनवी पाकीटे वं काहीकाही गोष्टी मिळताहेत कट कारस्थाने करायला.
ह्या पंताना व त्यांच्या
ह्या पंताना व त्यांच्या गांवाला भारतीय संविधान, कायदे वगैरे कांहींच लागू होत नाहीं का ? कायदेशीर झालेल्या लग्नासाठी त्या कुटूंबाला वाळीत [ 'बहिष्कृत' हा गोंडस शब्द वापरतात पंत !] टाकलं जातं ? व पंत त्याचं समर्थन करतात ? आतां तर 'वाळीत टाकणं' हा गुन्हा आहे, माझ्या माहितीनुसार.ह्या गांवात ग्राम पंचायत, लोकप्रतिनिधी वगैरे कांहींच नाहीं; फक्त पंतांची एकहाती हुकमत ? शिकलेलीं, नविन विचारांची मुलं/ तरुण पण नाहीत ? सगळंच अजब !!
अगदी अगदी. वाळीत टाकणे काय
अगदी अगदी. वाळीत टाकणे काय काहीही चालू आहे. वासू पण अगदीच बुळचट आहे. त्याची आई तर इतकी इरीटेटींग बोलते. स्वतःच डोक वापरतच नाही कोणी.
त्या फताडी नंदिनीला उर्मीची (
त्या फताडी नंदिनीला उर्मीची ( तिच्या आजीची वगैरे) पत्रं कुठुन मिळतायत्?:अओ: पोस्टमन वर लक्ष ठेऊन चोर्या बिर्या करते का ती? आणी उर्मीची रसगुल्ला कम गुलाबजाम कम अनारसा ( सौजन्य अमा) आजी उर्मीला एकदाही फोन करुन का विचारत नाही की बयो माझे पत्र तुला मिळाले का?
तो मुर्ख शिरोमणी सुनील पण ठोंब्याच आहे. उर्मीला एकदाही काही सांगत नाही.
काल तो वासू म्हणे की
काल तो वासू म्हणे की उर्मीच्या आईवडिलांच मॅनेज करता येइल. म्हणजे काय खोटे आणणार का? वासूची आई म्हणजे मुरांब्यात अडकलेली माशीच जणू. तेच तेच तेच घोळून घोळून घोळून. बीपी हाय झाले त किती ते कौतूक. आम्ही सव सिरीअल मधल्या सर्व आज्यां ना हेट करतत. स्वानंदीची आजी आगाउ,
ही भैताड. आणि गौरीची भोचक.
मला एलदुगो मधली आजी आवडली
मला एलदुगो मधली आजी आवडली होती. जुनी मराठी चित्रपट अभिनेत्री होती ना ती? कोण होती आता आठवत पण नाही; पण छान काम केलं होतं तिने. तशीच चष्मेबद्दुर मधली दादीअम्मा पण मस्त! असो. फारच धाग्याला सोडून झालं !
रावी, रेखा होती ती जुनी
रावी, रेखा होती ती जुनी अभिनेत्री.
भाउ , रश्मी , अमा >>>>>
भाउ , रश्मी , अमा >>>>> +१११११११११११११११११
अन्जू , हां बरोबर! रेखा कामत!
अन्जू , हां बरोबर! रेखा कामत!
शेवटी खोटी पत्रिका बनवायला
शेवटी खोटी पत्रिका बनवायला भाग पाडलंच वासू ने. हे दोघे घर का सोडून जात नाहीत हे कळत नाही. खोटं बोलणं तरी बंद होईल
आता तो गावाताल्या शाळेत
आता तो गावाताल्या शाळेत शिकवतो आहे ना, मग घराबाहेर पडला तर मुलांच नुकसान नको म्हणून गावाबाहेर पडत नाही. अगदी रटाळ मालिका.
कोणी किचनमधे अडकवलेल्या मिरच्या पाहील्या का ? त्या खोट्या - शो साठीच आहेत ? का गावात अशा मिरच्या ठेवतात ? फ्रिज असताना कोणी ठेवणार नाही पण मठाधिपतींच काय सांगा
आतां विधीवत लग्न होईपर्यंत
आतां विधीवत लग्न होईपर्यंत वासू व उर्मीने वेगवेगळंच रहायचं, पंतांची आज्ञा ! म्हणजे, आतांपर्यंत एकत्र राहिले तें 'अनैतिक' ? गांवजेवण घालून विधिवत लग्न झालं कीं 'रिट्रॉस्पेक्टीव्हली' सगळं नैतिक होणार ? खरंच पंतांचं 'शास्त्रोक्त' लॉजिक अजबच !!
मुर्खपणा चाललाय सगळा. ती
मुर्खपणा चाललाय सगळा. ती उर्मी सुरवातीला जरा बरी वाटली होती आता बावळटासारखी कशालाही हो म्हणतिये.
काल मोठ्या सुनबाईंनी एक सेमी
काल मोठ्या सुनबाईंनी एक सेमी चावट जोक सांगितला. मठाधिपतींच्या घरी हे चालते

मी सांगू का आता उर्मी
मी सांगू का आता उर्मी त्याला भिजायला बाहेर नेणार मग त्यांचे रूप तेरा मस्ताना होणार. मग दाद्या
अजूनच गहन पेचात पडतील. अशीच परिस्थिती दिवस राहून येइल.
मग त्यांचे रूप तेरा मस्ताना
मग त्यांचे रूप तेरा मस्ताना होणार. मग दाद्या
अजूनच गहन पेचात पडतील.>>>>>>> मग आतापर्यंत भजन करत होते काय दोघे?
मग आतापर्यंत भजन करत होते काय
मग आतापर्यंत भजन करत होते काय दोघे?>>>>येस्स!
खेळ मांडीयेला मठाधिपतींच्या अंगणी, खेsssssळती वासु आणी उर्मी घरी
दादा आणी वहिनी टाळ वाजविती, चिपळ्या हाणीतसे नंदिनी ताई
अक्का आणी माई, दोघींना झाली घाई
लग्न उरकायचे पटावरचे दोन्ही
नंदिनीची आत्या धाकली बरी,
करीतसे कारस्थाने वेळोवेळी
फताडी नंदिनी मध्ये काड्या कsssरी
नाव अदितीचे येई सामोरे पाही
खेळ मांडीयेला...
अगग रश्मी. माझी नोकरी जाइल ना
अगग रश्मी. माझी नोकरी जाइल ना अश्याने.

सस्मित आज माझा विडंबनाचा मुड
सस्मित
आज माझा विडंबनाचा मुड आहे.:खोखो: माझी मुलगी आजकाल एक खेळ खेळते. टिव्हीवर कोणतेही कार्टुन लावते, आणी टिव्हीचा आवाज बंद करते. दुसरीकडे कंप्युटरवर विडंबनात्मक गाणी लावते. म्हणजे असे वाटते की ते कार्टून्स गाणी म्हणतायत.:फिदी:
रश्मी.. लेकीचे वय काय हो?
रश्मी.. लेकीचे वय काय हो?
पियु १० वे लागलेय् तिला.
पियु १० वे लागलेय् तिला.
मग लेक आईवर गेलीये म्हणायची..
मग लेक आईवर गेलीये म्हणायची..
हो. पियु हे
हो.:खोखो: पियु हे बघ.
https://www.youtube.com/watch?v=6Hxvmrd4Hok
आणी हे पण.
https://www.youtube.com/watch?v=tWjIaaBWNZE
मला आणी मुलीला असले आवडते.:फिदी:
परवाचा एक तासाचा भाग व पुढील
परवाचा एक तासाचा भाग व पुढील भाग छान आहेत उर्मीच्या आईचे आपल्याला नॉर्मल वाटणा रे वागणे
गावात किती खटकते. आ ता शहरात तरी आपण नवर्याला अरे तुरे करणे, नावाने हाक मारणे, सलवार कमीज घालणे ह्याला काही डोळे वटारत नाही. हे पंतसचीव कुठे राहतात नक्की? निदान टीव्हीवर तरी पाहिलेच असेल.
मला उर्मीने कार्यक्रमात म्हटलेले गाणे फार आवडले ते शब्द मिळतील का? ते कोणाचे आहे?
फुललेले क्षण माझे फुलले रे. असे काहीतरी आहेत. कंपोझिशन सुरेख व अवघड आहे. मोडकांचे आहे का?
उर्मीच्या आईचा मुलीला सोडून जाताना चा संवाद व वडिलांचे तिला मनातून काढणे शक्य नाही. तो सीन अगदी डोळ्याला पदर.... नुकतेच लेकीला हॉस्टेलला सोडून आले आहे. घरोघरी अश्या गुड गर्ल्स उर्मी असतील. आणि त्यांना नशीबी असला वरवंटा.
नंदी नी ची उर्मी बद्दल हेट्रेड किती रिमोर्स्लेस आहे. मला असे लोक्स नाही आवड्त.
फुलले रे क्षण माझे फुलले
फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या.. शकुनाच्या मेंदीने
सजले रे क्षण माझे सजले रे
झुळूक वार्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्शाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
खुलले रे क्षण माझे खुलले रे
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या ऊरात, स्पर्शात, रेशिम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारे
मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
हसले रे क्षण माझे हसले रे
रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
भुलले रे क्षण माझे भुलले रे
गीतकार : नितीन आखवे, गायक :
गीतकार : नितीन आखवे, गायक : आशा भोसले, संगीतकार : श्रीधर फडके, चित्रपट : - / Lyricist : Nitin Aakhave, Singer : Asha Bhosle, Music Director : Shridhar Phadke, Movie : -
गीतकार : नितीन आखवे, गायक :
गीतकार : नितीन आखवे, गायक : आशा भोसले, संगीतकार : श्रीधर फडके, चित्रपट : - / Lyricist : Nitin Aakhave, Singer : Asha Bhosle, Music Director : Shridhar Phadke, Movie : ->>> कुठल्या चित्रपटातले हे गाणे आहे?
चित्रपटात आहे की नाही माहित
चित्रपटात आहे की नाही माहित नाही पण `ऋतु हिरवा' अल्बम मधे आहे.
नॉन फिल्मी आहे. आशा भोसले आणि
नॉन फिल्मी आहे. आशा भोसले आणि श्रीधर फडकेंचा अल्बम आहे "ऋतु हिरवा" त्यात आहे.
९५% लग्नाळु मुली हे गाण म्हणतात कांदेपोहे कार्यक्रमात "तुला गाता येत का?" अस विचारल्यावर
९५% लग्नाळु मुली हे गाण
९५% लग्नाळु मुली हे गाण म्हणतात कांदेपोहे कार्यक्रमात "तुला गाता येत का?" अस विचारल्यावर>>>> अजुनही?
Pages