Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके. पण ती कशाला हवी आता?
ओके. पण ती कशाला हवी आता?
आणि मोने कुठे होते या
आणि मोने कुठे होते या मालिकेत?
होते. नन्दिनीच्या आधी त्या
होते. नन्दिनीच्या आधी त्या कुठ्ल्यातरी मुलीबरोबर वासुचे लग्न ठरत होते तिचे वडिल!
फारच डिमांड बाबा त्या मठ्ठ वासुला
मेघना वैद्य ला जरा वेगळ्या
मेघना वैद्य ला जरा वेगळ्या प्रकारच्या भुमिका मिळायला हव्यात. तिचा चेहेरा आवडतो मला. ही सीरियल मला `गंडा पुरुषदेव' (हो अशा नावाची एक सीरियल होती.) चीच आवृत्ती वाटली. तीच थीम. साधारण तशीच पात्ररचना. तीही अशीच गुंडाळली होती. आता ही सुद्धा!
मला उज्वला नावच आठवेना,
मला उज्वला नावच आठवेना, क्षिती चं आठवत होती.
रच्याकने, ह्या मुली किती लहान वयात मोठ्या बायकांचे रोल्स करतात, क्षिती, ऋग्वेदी जेमतेम तिशी ओलांडली आणि डायरेक्ट काकू \ सासू असे रोल्स
नन्दिनीच्या आधी त्या
नन्दिनीच्या आधी त्या कुठ्ल्यातरी मुलीबरोबर वासुचे लग्न ठरत होते तिचे वडिल!>> अच्छा! तरीच आठवलं नाही मला. सुरुवातीचे काही भाग मिसले होते माझे, त्यात आले असतील मोने!
गंडा पुरुषदेव? काय फनी नाव आहे! कोणत्या चॅनेल वर होती ही मालिका? मायबोलीकर झी मराठी सोडून दुसरं काही बघत नाहीत आणि बघितलं तरी धागे काढत नाहीत त्यावर, त्यामुळे कळायला मार्ग नाही.
गंडा पुरुषदेव?>>> गंडा नव्हे,
गंडा पुरुषदेव?>>> गंडा नव्हे, गुन्डा पुरुषदेव. Colors मराठी ई-टिव्ही मराठी असताना हि मालिका चालु असायची.
त्यात ही नायिकेचे सासर पुरुषप्रधान दाखवले होते. गुन्डा पुरुषदेव हे त्या घराण्याचे आदय दैवत असते. सुरुवातीला नायिका आधुनिक विचारान्ची होती. पण लग्नानन्तर ती सुद्दा त्या देवाच्या भजनी लागते. शेवटी ती नायिका आणि तिचे सासर सुधारते का ते काही माहीत नाही बुवा.
गंडा नाही गुंडा पुरुष देव, इ
गंडा नाही गुंडा पुरुष देव, इ टीव्ही वर होती. श्रीरंग गोडबोले यांची, मोठे मोठे दिग्गज होते, मालिका गंडली. मोहन जोशी, मनोज जोशी, शरद पोंक्षे, पियुष रानडे, सुकन्या कुलकर्णी, हरीश दुधाडे अजून बरेच होते, मी दोन भाग बघितले मग नाही बघितली. नंतर एकदा सर्फिंग करताना माझी भाची दिसली ती व्हिलन होती त्यात, एक शॉट बघितला बास तिच्यासाठी. ती आहे म्हणून तिच्यासाठी अजून नाही बघू शकले.
अच्छा! धन्यवाद सुलू, अंजू..
अच्छा! धन्यवाद सुलू, अंजू.. इतके दिग्गज कलाकार असूनही मालिका गंडणे दुर्दैवी आहे! असे का होत असावे बरे??
हे कुठे लिहावं, समजत नाही म्हणून इथेच लिहिते. कलर्स मराठी वर 'अस्स सासर सुरेख बाई' ही पण एक छान मालिका आहे, त्यातही संतोष जुवेकर सारखा मोठ्या पडद्यावरून आलेला यशस्वी कलाकार आहे, मृणाल दुसानीस सारखी सुरेख आणि गोड नायिका आहे, सही लव्ह स्टोरी आहे त्यांची.. संवाद मस्त आहेत यातले. व्हिलन सुद्धा चांगली आहे-ती विभा, तिचे वडील.. नवीन कलाकार आहेत का ते? आधी पहिलं नव्हतं कधी त्यांना , पण काम खुपच छान करतात. रीमा आणि तिचा नवरा हे पण नवीन कलाकार आहेत बहुतेक.. यशच्या घरची मंडळी पण छानच काम करतात, सगळे नवीनच दिसतात, (दादा वाहिनी सोडले तर. त्यांना पहिलंय आधी )आणि अविनाश नारकर तर आहेच महान कलाकार. स्टोरी लाईन ही इंटरेस्टिंग आहे, पण कुणास ठाऊक, ही मालिका फेमस आहे की नाही. वर लिहिल्याप्रमाणे मायबोलीवर झी मराठी सोडून बाकी कुठल्याच चॅनेल चे काहीच लिहिले जात नसल्याने, समजतच नाही, ह्या मालिका लोकांना आवडतायत की नाही.. मला तर कलर्सच्या काही मालिका फार आवडतात.
असो, अंजू, तुझी भाची म्हणजे "उंच माझा झोका' मधली विधवा आत्याच ना? छान आहे ती.. मला आवडलं होतं तिचं काम..
हो सानी तीच माझी भाची,
हो सानी तीच माझी भाची, thanx.
तुझ्या प्रश्नांची काही उत्तरं मला माहिती आहेत, मी सुरु झाली तेव्हा आठवडाभर ती मालिका बघितली मग कंटाळले, बहुतेक आता त्याचं लग्न झाल्यावर इंटरेस्टिंग झाली असेल मालिका. त्यातली विभा आवडते मला तिचे नाव श्वेता पेंडसे आणि बाबा गौतम जोगळेकर (सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांचा मुलगा) नानाच्या प्रहार मूवीमध्ये होता.
असो, बॅक टू पआमु, उर्मीचा
असो, बॅक टू पआमु, उर्मीचा बाबा आणि वासुचे दादा ऑलरेडी एकमेकांना सुरुवातीला भेटलेले आहेत, दादा त्यांच्या घरी जाऊन आलेले आहेत, बहुतेक पहिल्याच भागात, तेंव्हा त्यांना उर्मी आवडते, तिचे वडीलही चांगले वाटतात, ही गोष्ट लेखक, दिग्दर्शक पूर्ण विसरले का? या गोष्टीचा साधा उल्लेखही नंतर कधी केल्याचे आठवत नाही. त्या दोघांना समोरासमोर आणणं, या गोष्टीचाच उगाच बाऊ करत बसले आहेत, प्रत्यक्षात इतकं काही अवघड प्रकरण नव्हतं ते.. नंदिनी ट्रॅक मुळे बरेच छान डेव्हलप करता येतील असे ट्रॅक बनू शकले नाहीत, एका छान मालिकेची वाट लागली..
ओह ओके, नावं कळावल्याबद्दल
ओह ओके, नावं कळावल्याबद्दल आभार!!
खरोखर ती मालिका सुरुवातीला बोर झाली होती, पण संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानीस असे दोघेही आवडते कलाकार असल्याने, नेटाने पाहत राहिले, खरंच झी च्या कित्येक वैतागत पाहत राहतो आपण आणि चर्चा करतो, त्या मालिकांच्या तुलनेत फारच उजवी वाटली ही मालिका..
मी लवकर कंटाळते मालिकांना, मी
मी लवकर कंटाळते मालिकांना, मी सध्या मराठी कुठलीच नाही पहात. हिंदी एक बघते तीपण आता बोअर झालीय, एक नवरा बघतो म्हणून बघितली जाते.
बाबा गौतम जोगळेकर (सई परांजपे
बाबा गौतम जोगळेकर (सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांचा मुलगा) नानाच्या प्रहार मूवीमध्ये होता.>>>>>.हॉईं! क्या कह रही हो अंजू तुम. भला ये क्या बात हुई? हॉईं! मला वाटतच होते की याला कुठेतरी पाहीलय, पण नाव माहीत नव्हते. तुझ्यामुळे ते कळले.:स्मित:
हो ना, रश्मी, माझ्यासाठी ही
हो ना, रश्मी, माझ्यासाठी ही माहिती हा एक सुखद धक्का होता. (सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांचा मुलगा, ही माहिती)
कधीचा विचार करत होते, याला कुठे तरी पाहिलंय.. आता यांच्यासाठी प्रहार बघणार आहे पुन्हा..
आता यांच्यासाठी प्रहार बघणार
आता यांच्यासाठी प्रहार बघणार आहे पुन्हा.. >>> आज सकाळी कुठल्यातरी चॅनेलवर प्रहार लागला होता. रेकॉर्ड करायला लावला आहे. अर्थातच नाना आणि ट्रेनिंग साठी.
हो . २२ ऑगस्ट पासून नवी
हो . २२ ऑगस्ट पासून नवी मालिका सुरु होतेय. म्हणजे हि संपणार तर
क्षिती जोग कुठल्या मालिकेत काकू म्हणून आहे ?
आज उर्मीने मस्त डाय्लॉग मारला
आज उर्मीने मस्त डाय्लॉग मारला त्या फताड्या नंदीला, नंदी म्हणाली "हर कुत्ते के दिन आते है"
यावर उर्मी मस्त फटकारलं, "मला वाटलं तु स्वतःला माणूस समजतेस पण तु तर स्वतःला कुत्री समजतेस"
ह्या मालिकेत कुणी ना कुणी
ह्या मालिकेत कुणी ना कुणी दाराआडून बोलणे ऐकत असते. नंदिनी आणि आत्याबाई तर आहेतच पण कधी कुमुद वहिनी, उर्मी झालचं तर माई पण परवाच्या भागात साक्शात दादा!
<< ह्या मालिकेत कुणी ना कुणी
<< ह्या मालिकेत कुणी ना कुणी दाराआडून बोलणे ऐकत असते.>> ह्या सिरीयलचा तो तर स्थायीभावच आहे ! ही बघा माझी २२ जूनची पोस्ट - << ...आतां, नंदीनीला तें चोरून ऐकतां यावं म्हणून ती हें उर्मीला परत बाहेर व्हरांड्यात बसून सांगते. नंदीनीला तपशील ऐकूं गेला नसेल तर तो तिला मिळावा म्हणून उर्मी मग वासुच्या बहिणीला हें लिहून काढ व फाडून टाक असा सल्ला देते. मग नंदिनी तो कागद चोरून वाचते ! अरे, किती कल्पनाशून्य पद्धतिने कथानक रचताय ? आणि, किती बिनडोकपणे आम्ही हें बघावं अशी अपेक्षा करताय ? >> !!
हो ना दादा पण दाराआडून ऐकतात
हो ना दादा पण दाराआडून ऐकतात म्हणजे हाईट झाली.
क्षिती कुठल्याशा हिंदी मालिकेत सासू होती - पाहीलं नाही ऐकलयं मैत्रिणीकडून.
आता त्या आदितीचं लग्न त्या सुनीलशी लावता येईल. अर्थात पुनर्विवाहास धर्माची मान्यता असेल तर
आता त्या आदितीचं लग्न त्या
आता त्या आदितीचं लग्न त्या सुनीलशी लावता येईल.>>>आँ नंदिनीचे काय मग? पंतसचिव चिंतेने ...तील की!
क्षिती जोग कुठल्या मालिकेत
क्षिती जोग कुठल्या मालिकेत काकू म्हणून आहे >> ये रिश्ता क्या केहेलाता है नामक मालिकेत सासु आहे बहूतेक
खरे तर वाशाचे नंदिनी शी लग्न
खरे तर वाशाचे नंदिनी शी लग्न लावून द्या व ऊर्मीला कुठे बाहेर शिकायला / जॉब ला पाठवा.
तशीही ती नंदिनी, "ते, त्यांना..." असं जणू काय तो तिचाच नवरा आहे अशी बोलत असते!
सो सिक!
ही मालिका आता संपत आलीय पण
ही मालिका आता संपत आलीय पण आता आवडायला लागली आहे
क्षिती जोग "नव्या" मध्ये
क्षिती जोग "नव्या" मध्ये नव्या ची आई होती.
<< तशीही ती नंदिनी, "ते,
<< तशीही ती नंदिनी, "ते, त्यांना..." असं जणू काय तो तिचाच नवरा आहे अशी बोलत असते!
सो सिक! >> त्या नंदीनीच्या पात्राला अवास्तव महत्व व वेळ दिल्यानेच ही संपूर्ण मालिकाच ' आऊट ऑफ फोकस ' गेलीय, असं जाणवतं.
त्या नंदीनीच्या पात्राला
त्या नंदीनीच्या पात्राला अवास्तव महत्व व वेळ दिल्यानेच ही संपूर्ण मालिकाच ' आऊट ऑफ फोकस ' गेलीय, असं जाणवतं.>>> हो ना. मूळ हिरो हिरवीण राहिले बाजूलाच आणि ह्या नंदी वरच जास्त फोकस केलं गेलं. नंदी आली नव्हती तोपर्यंत चांगली चालली होती मालिका. नंदीच त्या सुनील बरोबर लग्न लावून दिल असत आणि उर्मी , वासू वर लक्ष दिल असत तर अजून वाढवता आली असती मालिका
झी मराठी वर हल्ली असल्या मालिका खूप झाल्या आहेत. अरे आम्हाला काय टेन्शन कमी असतात का कि असले कट कारस्थाने बघायला लावतात... NSB का बंद करत नाहीयेत. उगाच मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढवत जातायत.. ती स्वानंदी अगदी डोक्यात जाते
झी वरच्या होम मिनिस्टर, जय मल्हार (काही अंशी) आणि चला हवा येऊ द्या सोडली तर बाकी सगळ्या मालिका डोक्यात जातात
आता त्या झी युवा वरच्या मालिकेत असलं काही नसावं एवढीच अपेक्षा !!
चला हवा येऊ द्या....? डोक्यात
चला हवा येऊ द्या....? डोक्यात जात नाही तुमच्या?
नवल आहे!
चला हवा येऊ द्या....? डोक्यात
चला हवा येऊ द्या....? डोक्यात जात नाही तुमच्या?
नवल आहे!>>>> + १११११११११११११११११११
Pages