Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला डोक्यात जाऊ द्या - असे
चला डोक्यात जाऊ द्या - असे टायटल शोभले असते त्या मालिकेला.
होम मिनीस्टर समजु शकते पण जय
होम मिनीस्टर समजु शकते पण जय मल्हार आणी चला हवा येवु द्या .. बघने सोडा विचार करणे सुद्धा डोके दुखी आहे.
चला हवा येऊ द्या....? डोक्यात
चला हवा येऊ द्या....? डोक्यात जात नाही तुमच्या? ...> साबळेच डोक्यात जातो. तो जेव्हा 'हसताय ना' म्हणतो तेव्हा तर खूपच... एकदा भेटायला पाहिजे असे नेहेमी वाटते.
तो जेव्हा 'हसताय ना' म्हणतो
तो जेव्हा 'हसताय ना' म्हणतो तेव्हा तर खूपच... > +१ . आणि उठ्सूट कशाला ही निर्बुद्धपणे आणि एकाच टोन मधे `क्या बात है' म्हणतो ते ही डोक्यात जातं.
अगदी अगदी ....हसताय ना?
अगदी अगदी ....हसताय ना? ...... म्हटलं की एक झापड मारावीशी वाटते!!
::राग::
लोकांना न आवडणारी सिरियल न
लोकांना न आवडणारी सिरियल न बघण्याचा ऑप्शन असतो. तो लोक का वापरत नाही?
लोकांना न पटणार्या कमेंट्स न
लोकांना न पटणार्या कमेंट्स न वाचण्याचा ऑप्शन असतो. तो लोक का वापरत नाही?
सानी, रश्मी आणि मी नताशा
सानी, रश्मी आणि मी नताशा >>>>>>>
प्रहार मध्ये गौतम जोगलेकर हा माधुरी दिक्षीतचा प्रियकर दाखवला आहे. ज्याचे सैन्यात असताना पाय तुटतात, आणि नंतर तो गाव-गुडांशी लढताना मरतो.
झी वरच्या होम मिनिस्टर, जय
झी वरच्या होम मिनिस्टर, जय मल्हार (काही अंशी) आणि चला हवा येऊ द्या सोडली तर बाकी सगळ्या मालिका डोक्यात जातात >> डोक्यात जात नाहीत कारण त्यामध्ये कुटील कारस्थाने नसल्यामुळे डोक्याला पर्यायाने मेंदूला काही ताण येत नाही. आणि बाकी प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्नही येतोच की. नाही का?
लोकांना न आवडणारी सिरियल न
लोकांना न आवडणारी सिरियल न बघण्याचा ऑप्शन असतो. तो लोक का वापरत नाही? >> आमच्या घरी एकच टीव्ही आहे आणि 6.30 ते 9 फक्त झी मराठीच चालू असत. त्यामुळे कितीही ठरवलं बघायचं नाही तरी कै पर्याय नसतो
जय मल्हार एकदम स्ट्रेस बस्टर
जय मल्हार एकदम स्ट्रेस बस्टर आहे.
द्येव गडावर आले/ वाड्यावर आले?
द्येव जेवले?/ का न्हाई?
आख्यान/ परत आख्यान
काल द्येव म्हणे मी दोघींना सेम वागवतो. पण म्हणजे पहिलीचे अधिकार अर्धे झाले कि नाही?
चिप टीवीसमोर पडून भाकर चावत बसते मी.
अमा...... :: चिप टि व्ही समोर
अमा...... ::खोखो::
चिप टि व्ही समोर पडून...
आता पुन्हा आख्यान लावणारेत!! हरे राम!
द्येव गडावर आले/ वाड्यावर आले?
द्येव जेवले?/ का न्हाई?........ द्येवा रं द्येवा!
पण कॉस्च्युम्स च्या बाबतीत मात्र एक नंबर सिरीयल! म्हाळसा काय दिसते पांढर्या कपड्यांमधे !!!
आणि म्हाळसाच्या कपाळावरचं
आणि म्हाळसाच्या कपाळावरचं मिक्सरचं ब्लेडपण :p
सर्वच फार छान दिसतात जय
सर्वच फार छान दिसतात जय मल्हार मध्ये. बायकांचे दागिने, सवता द्येव. लै झ्याक. पहिले बानू ऑक्सिडाइज्ड सिल्वर ज्वेलरी घालत असे ते ही मस्त होते. आता राणी झाली. ती नटी पाचवारीत पण सुरेख दिसते.
मिक्सरचं ब्लेडपण >>>
मिक्सरचं ब्लेडपण >>>
अमा, सतत त्याच त्या काटकोनी
अमा, सतत त्याच त्या काटकोनी पॅसेज मधुन आलटुन पालटुन चालत जाणारे सर्व जण ( राजरा, राणी, परधानजी, सेवक, ), परमनियती, शिव्लीला ( असाच उच्चार अस्तो), हे राहिलं
आणि म्हाळसाच्या कपाळावरचं
आणि म्हाळसाच्या कपाळावरचं मिक्सरचं ब्लेडपण फिदीफिदी >>> मॅगी , हसून हसून मेले मी
सर्वच फार छान दिसतात जय
सर्वच फार छान दिसतात जय मल्हार मध्ये.>>+११
लक्ष्मी , म्हाळसा , बानु , म्हाळसाची आई, पार्वती...सगळ्याच छान आहेत दिसायला !
रावी, आणि त्या काटकोनी
रावी, आणि त्या काटकोनी पॅसेजेस मधून चालतांना अगदी थांबून प्रधानजी व लक्ष्मी देवी एकमेकांकडे बघतात नेहमी ! ..... वेगवेगळ्या अँगल्स नी सेम महाल दाखवितात वेगळ्या खोल्या म्हणून....
अमा, सतत त्याच त्या काटकोनी
अमा, सतत त्याच त्या काटकोनी पॅसेज मधुन आलटुन पालटुन चालत जाणारे सर्व जण ( राजरा, राणी, परधानजी, सेवक, ), परमनियती, शिव्लीला ( असाच उच्चार अस्तो), हे राहिलं>>>>>>> आणि सारखं सारखं दायित्व दायित्व पण कायतरी बोलतात.
मिक्सरचं ब्लेड >>> सिरियल
मिक्सरचं ब्लेड >>>
सिरियल पाहिली की खंडोबाच्या अवतारात देवाने केवळ म्हाळसेला आणि बानूला त्यांच्या पूर्वायुष्याबाबत ज्ञान देण्याचेच महत्कार्य केले असे वाटते.
अन् म्हाळसेचा मत्सर हा नंदिनीच्या मत्सरापुढे कमी पडतोय की काय, अशी भिती वाटते.
नंदिनीचा मत्सर फारच भ्यानक
नंदिनीचा मत्सर फारच भ्यानक वाटला मला. उर्मी काल खूप छान बोलली नेहमी प्रमाणेच. आदितीने आता शिक्षन व स्वावलंबन हाच मार्ग स्वीकारायचा आहे असे ठरिवले आहे. म्या हे पहिलंच म्हटलं होतं . बानू नं बी त्येच कराव.
जय मल्हार सिरीयलवर धागा नाही
जय मल्हार सिरीयलवर धागा नाही काढला का कुणी?
सापडला जय मल्हार चा
सापडला जय मल्हार चा धागा
http://www.maayboli.com/node/59604
अमा, मॅगी,रावी जय मल्हार
अमा, मॅगी,रावी जय मल्हार कमेंटस भन्नाट
तिकडे जय मल्हार धाग्यावर पण टाका ह्या.
अमा आणी मॅगी तुम्ही कठिण
अमा आणी मॅगी तुम्ही कठिण आहात.:हाहा:
चला हवा येऊ द्या....? डोक्यात
चला हवा येऊ द्या....? डोक्यात जात नाही तुमच्या? >>>>>>>>>>> डोक्यात जाण्याच्या पलिकडे गेलेली मालिका आहे ती ......................
पआमु मधे पुढे काय होईल याचा
पआमु मधे पुढे काय होईल याचा अंदाज
१.वासू आणि उर्मी आपण पत्रिका खोटी बनवली होती आणि आपला संसार टिकण्याशी पत्रिकेचा काहीही संबंध नाही हे सांगतील, दादा त्यांना माफ करतील.
२.दादा अदितीच्या घटस्फोटाला संमती देतील, तिच्या नोकरी आणि पुढील शिक्षणालाही मदत करतील.
३.रामचंद्र आणि कुमुद यांचा समेट होईल
४. वासू आपल्याला मठाधिपती होण्यात रस नाही हे सांगेल, दादा रामचंद्रला मठाधिपती घोषित करतील, वासू गावातच कॉलेजमधे शिकवेल.
५. उर्मीच्या शिक्षणाला/नोकरीला दादा संमती देतील. तिला हवे ते कपडे परिधान करण्यास ते मान्यता देतील. उर्मी गावातच मानसोपचार करू लागेल.
६. आता वासू उर्मीच्या वैदिक विवाहाची गरज भासणार नाही, दादा त्याची जरूर नाही असे सांगतील
७. त्यामुळे नंदिनीला उर्मीच्या बाबांशी बोलायचे कारणच नाहिसे होईल.
८. उर्मीचे बाबा दादांना भेटतील पण तो पर्यंत उर्मीच्या सासरी मतपरिवर्तन झाले असल्याने त्यांना खोड काढण्यास वाव मिळणार नाही, व्याह्यांची दिलजमाई होईल.
९. नंदिनी मुकाटयाने सुनीलशी विवाह करून आपल्या सासरी जाईल.
१०. अशा प्रकारे शेवटी सर्व गोड होईल!
११. माई पुन्हा कविता करूं
११. माई पुन्हा कविता करूं लागतील;
१२. उर्मीच्या बाबाना भांडायला वावच नसल्याने ते वैतागून आध्यात्माकडे वळतील;
१३. वासुच्या बहिणीचा नवरा पश्चात्तापदग्ध होवून , पत्नीची माफी मागून तिला घेवून जाईल;
१४. दादा आतां मठाधिपति नसल्याने शर्ट-पँट मधे व प्रसंगानुरूप टायही लावून दिसतील;
१५, माझ्यासारखे माबोकर 'आतां पिसं कुणाची काढूं ?', ह्या विवंचनेत पडतील !
माझ्यासारखे माबोकर 'आतां पिसं
माझ्यासारखे माबोकर 'आतां पिसं कुणाची काढूं ?', ह्या विवंचनेत पडतील ! हे भारी भाऊकाका. पण वरी नॉट, झी मराठी हाजीर है, असे चांस वारंवार देण्यासाठी.
Pages