नवी गाडी
गेल्या महिन्यात आम्ही नवी गाडी घेतली. ह्या आधी आम्ही वापरत असलेली गाडी, सध्याची अर्थव्यवस्था, दोघेही investment banking मधे असल्याने आमच्या धोक्यात आलेल्या नोकर्या, पदरी एक मूल (अरेरे किती ते रंजले, गांजले) आणि गाडीचा काळा रंग अशा पार्श्वभुमीवर घरातील, बाहेरील मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रीया.
आम्ही नुकतेच गाडी घेउन घरी आलो होतो. शनिवारी डील करण्यात बराच वेळ गेला म्हणून गाडी घरी आणायला सोमवार उजाडला. येईतो रात्रीचे आठ वाजून गेले होते. मी घाई-घाई इशानच्या जेवणाचे बघतच होते तर फोन वाजला. भारतातुन मोठ्या बहिणीचा होता.
मी, "हाय, मी आज फोन करणारच होते. काय म्हणतेस ?"
ती, "का ग ? आज काय विशेष ?"
मी, "नवी गाडी घेतली ते सांगायला."
ती, "अरे व्वा, मस्तच बातमी, कुठली घेतली ?"
मी, "होंडा ऍकॉर्ड"
ती, "मस्तच...आई-बाबांना सांग बाई आधी फोन करुन. अमेरिकेत सध्या काय गोंधळ आहे. त्यांना फार काळजी पडलीये तुमची (:अओ:). बरं रंग कुठला ?"
मी, "काळा.."
ती, "अर्र काळाच का ?"
हे ऐकल्यावर मी फोन ठेऊनच दिला. कारण आमच्या आख्या खानदानात पहिली काळी गाडी ह्यांची. माझ्या भाच्याचा मुंजीत ह्या गाडीला कल्पकतेने थर्माकोलची सोंड वगैरे लावुन वरातीसाठी हत्ती बनवला होता. हत्ती करायची कल्पनाच मुळी गाडीच्या काळ्या रंगावरुन आली. म्हणतात ना, आपला तो बाब्या !!!
त्या दिवशी रात्री काही मला घरी फोन करणे झाले नाही. दुसर्या दिवशी सकाळी-
मी, "हॅलो बाबा"
बाबा, "बोला..." बाबांना कधीही मी कोण बोलते सांगावे लागत नाही. ते बरोबर ओळखतात. ह्याविरुद्ध मी, एकदा खुद्द आईला "बाई तुम्ही कोण बोलताय ते आधी सांगणार का ?" असे म्हणाले होते.
मी, "काल गाडी घेतली. तेच सांगायला फोन केला"
बाबा, "गाडी घेतली ? नवी ?"
मी- बारीक आवाजात, "हो, नवीच आहे"
बाबा, "वा छान छान. आम्ही इथे काळजी करतो. ओबामा निवडुन येइल तर बरे म्हणतो आणि तुम्ही तर गाडी घेतली !!!"
मी, "आता हिवाळा आला ना. दोन गाड्या हव्याच. पहिली विकुनही वर्ष-सहा महिने होत आले की आता."
बाबा, "ते ही खरच, बरं झालां घेतली. रंग कुठला ?"
मी (चाचरत), "काळा...."
बाबा, "तुझी आई बाहेर गेलीये. सकाळी फोन कर."
"काळा रंग ह्या मॉडेलला खूप छान दिसतो.." हे माझे शब्द ओठातुनच पोटात जातात. काळा रंग म्हणजे बाबांची साफ नापसंती असते. ते नेहेमी म्हणतात, "आपली गाडी रंग पांढरा असल्यामुळे कशी सगळ्यांच्या गाड्यांपेक्षा भारी दिसते."
ऑफिसमधील माझी मैत्रिण शीतलला आम्ही गाडी घेणार हे आधीच ठाऊक होतं. गाडी घरी आणल्याची सांगावं म्हणुन मी तिला मेसेज पाठवला. आता हा संवाद जसाच्या तसा दिला नाही तर त्यातली गंम्मत उरणार नाही म्हणुन इंग्रजीत.
"Hi"
"Hey...whatz up ?"
"have a news to share with u.."
"so soon ? Ishan is just a year old...;)"
"ha...sooner than u can expect...the baby is home already..."
"really...which one ?"
"Honda Accord..2009.."
"noooooooooo..."
"yessssssss.."
"I was so proud of you guys..."
"you have many other reasons to be proud of us :)"
आधीच आम्ही इतकी मस्त स्पोर्ट्स कार विकून मोठ्याच पापाचे धनी झालो होतो. त्याबदल्यात होंडा ऍकॉर्ड म्हंटल्यावर तर जगबुडी नक्की !!! आणि मग जसे काही आम्ही केलेल्या पापाचा धक्का सहन न झाल्याने ती तरातरा माझ्या डेस्कपाशीच येउन उभी राहिली आणि "How can you do this..." वगैरे वगैरे बोलायला लागली.
मग जेवणाच्या सुट्टीत बाराकर वैद्यांच्या बायकोला फोन केला. आम्ही गाडी घ्यायचे ठरवले तेव्हापासून सर्व शोधाशोधी वगैरे ह्या नवरा बायकोला माहिती होती.
मी, "कामात आहेस का ?"
ती, "बोल.."
मी, "गाडी घेतली बरं एकदाची..."
ती, "कुठली घेतली शेवटी ?"
मी, "होंडा ऍकॉर्ड २००९..."
ती, "तू तुझ्या खतरुडपणाने नवर्याचं स्टँडर्ड* घालवलं आहेस.."
मी, "ठेऊ का फोन ?"
ती, "बाय"
* हे स्टँडर्डचं समीकरण अगदी सोप्पं आहे.
माझ्या नवर्याने उकरुन काढलेले खर्च + वैद्य कुटुंबीयांचा पाठिंबा = स्टँडर्ड. वैद्य पाठिंबा देतील नाहीतर काय.
एव्हाना मी रचना, आरतीला इपत्र पाठवले होते. रचनाने गेल्याच महिन्यात काळ्याच रंगाची वॅगन-आर घेतली. मी चुकुन सँट्रोला मोठी बहिण झाली असे लिहिले. त्यावर त्यांचे उत्तर-
आरती- हो ? कस्स्काय ? पण जबर्या !!!
रचना- सहीSSSSS लेकीन येह सँट्रो कौन है भाय ? काळा रंग बाबांना सांगितलास का ?
हे लिहिताना रचना खुदुखुदु हसत असणार आणि तिच्या नव्या गाडीवर बाबांनी टाकलेला तु. क. आता मला झेलावा लागणार ह्या विचाराने तिला आसूरी आनंद होत असणार हे मला शंभर टक्के माहिती होते.
आई आदल्या दिवशी भेटली नाही म्हणुन मी परत फोन केला.
मी, "आई..."
ती, "ह्म्म मला कळालं नवी गाडी घेतली...रचनाने सांगितलं मला..."
मी, "रचनाने ? अगं मी काल बाबांना फोन केला होता...त्यांनी नाही का सांगितलं ?"
ती, "अगं बाई काही बोलले नाहीत मला. बाबांचं हे असंच आहे. बागेत घोसाळ्याला घोसाळी लागली की सगळ्या गावाला बातमी आणि महत्वाचं ते सांगायच नाही. आता घोसाळ्याला घोसाळी नाहीतर काय आंबे लागणारेत ?" इथे मी काहीच बोलत नाही. मागे एकदा मी आईची बाजुन घेउन कायसं म्हणाले तर बाबा दुसर्या लाइनवर ऐकत होते.
मग आईच पूढे म्हणाली, "छाssssन झालं...आम्हाला आपली काळजी वाटते रोज बातम्या ऐकुन...तुम्ही नवी गाडी घेतली म्हणजे मग आम्हाला चिंता नको. रंग कुठलाय ?"
मी, "काळा"
आई, "तरीच बाबा काही बोलले नाहीत बरका. काळा का घेतला ? बाळाला आवडेल असा घ्यायचा ना."
आता आजीबाईंचा नातू आहे सव्वा वर्षाचा. त्याला आवडणारे रंग म्हणजे भडक लाल, पिवळा, निळा. अशा रंगाची गाडी घ्यायची का ? पण त्याच्या आजीला कोण समजावणार. मांजराच्या गळ्यात घंटा !!!
नवरा आणि त्याचा मित्र. ह्या दोघांनी संगनमताने पहिल्या महागडया गाड्या घेतल्या होत्या. प्रत्येकवेळी भेटल्यावर आपापल्या गाडीच्या कौतुकात तासनतास घालवले होते. त्याने ही थोडे दिवसांपुर्वीच पहिली गाडी विकुन "क्यामरी" घेतलीये.
हा, "हाय.."
तो, "क्यु बे साले बाप बन गया तो फोन करना बंद कर दिया.."
हा, "तु है ना लाइन मे..सब समझ जायेगा..."
तो, "हा यार...मेरी बिवी तो अभी से मम्मी मोड मे आ गयी है | मै फस गया यार तीन तीन मम्मीयों के बीचमें |" तीन मम्म्या म्हणजे ह्याची आई, सासू आणि बायको.
हा (अत्यंत केवीलवाण्या आवाजत), "अच्छा सुन, कल नयी गाडी ले आये यार.."
तो, "अबे तो रो क्यु रहा है ? कौन सी ?"
हा, "होंडा ऍकॉर्ड.."
तो, "साला देसी...आ गया ना औकात पे..."
आणि मग इशान दचकुन उठला इतकं हा मोठ्याने हा हा हा करुन हसला !!!
बाकी, 'अॅकॉर्ड'' ऐवजी
बाकी, 'अॅकॉर्ड'' ऐवजी 'ऍकॉर्ड' लिहिल्यामुळे कळलंच होतं, की हा लेख जुना असावा.
>>>>
बघा जातीचे इतिहाससंशोधक कसे 'ओळींच्या मध्ये' वाचतात आणि सुतावरून स्वर्ग गाठतात.
फार छान लिहिलं आहेस. माझी ही
फार छान लिहिलं आहेस. माझी ही होंडा अकॉर्ड आहे...
हेहे ... सही लिहिलं आहे.
हेहे ... सही लिहिलं आहे.
काळ्या गाडया दिसतात झकास हे खरं, पण फार स्वच्छ ठेवाव्या लागतात. म्हणून मला आवडत नाही. आमचं आपलं सगळं मळखाऊ.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंड्रेला, अभिनंदन. अॅकॉर्ड
सिंड्रेला, अभिनंदन. अॅकॉर्ड ही चांगली टिकाऊ गाडी आहे. आजकाल गाड्यांचे रंग चमकदार असतात. त्यामुळे काळा रंग झकास दिसतो. आता पुढल्या वर्षी लेक्सस घ्याल तेंव्हा अॅकॉर्डला जास्त पैसे मिळतील.
त्येच्या परीस 'मारती ८००' का
त्येच्या परीस 'मारती ८००' का नाय घेटली म्या म्हंटो.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
झक्कास! माझी आधीची अॅकॉर्ड
झक्कास! माझी आधीची अॅकॉर्ड होती आणि आत्ताची २ दाराची सिव्हीक. २ दाराची गाडी घेताना मला देखील लोकानई बरेच सल्ले बगैरे दिलेले. हम करेसो कायदा ह्या स्थायीभावानुसार मी मस्त्पैकी २ दाराची मळकट सिव्हीक फिरवते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त खुसखुशीत लिहिलंय
मस्त खुसखुशीत लिहिलंय सिंडे..... तुझं ते 'बेमर' पण आठवतंय अजून..
मस्त लिहिलय!! मी नॅनो बूक
मस्त लिहिलय!!
मी नॅनो बूक करू या का असं नवर्याला विचारलं तर तो म्हणे "नको, ती पडते दीड लाखाच्यावर. आणि जो तो चिडवणार की एकच लाखाची गाडी!!"
त्यापेक्षा मारूती ८०० बरी ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पुन्हा एकदा, सर्वांना धन्यवाद
पुन्हा एकदा, सर्वांना धन्यवाद
हा लेख अप्रकाशित ठेवला होता अनेक दिवस आणि खरे तर डिलीट करणार होते. पण इतके मोठे छापलेच आहे तर प्रसिद्ध करुन टाकु असे म्हणून प्रकाशित केला. इतके प्रतिसाद बघून भारी वाटतेय ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप मस्त लिह्तेस तु. Keep it
खुप मस्त लिह्तेस तु. Keep it up.
साधा काळा आहे की मेटॅलिक ?
साधा काळा आहे की मेटॅलिक ?
का ?
का ?
मेटालिक यू बेट
मेटालिक यू बेट
सांग तर खरं
सांग तर खरं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्रिस्टल ब्लॅक आहे.
क्रिस्टल ब्लॅक आहे.
मेटॅलिक असती तर वा वा म्हणालो
मेटॅलिक असती तर वा वा म्हणालो असतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गंमत केली..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला होंडा वाल्यांनी भारतात सांगितले होते की ब्लॅक मध्ये मेटॅलिक मिळत नाही म्हणून विचारलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<मला होंडा वाल्यांनी भारतात
<<मला होंडा वाल्यांनी भारतात सांगितले होते की ब्लॅक मध्ये मेटॅलिक मिळत नाही म्हणून विचारलं >>
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
अस्सं? मला वाटले आजकाल भारतात काय वाट्टेल ते मिळते. (फक्त कधी कधी (बहुतेक नेहेमीच)संपलेलें असते. पुनः केंव्हा येईल माहित नाही!)
स्थळ जनसेवा , पुणे. खरवस?
स्थळ जनसेवा , पुणे. खरवस? सम्पला. कधी येणार ? तसे सांगता येत नाही.
सुजाता कॉप्युटर ;- वायरलेस की बोर्ड व माऊस आहे? हो. किंमत? १६०० रु. --द्या एक. -- ओह सॉरी शिल्लक नाही.उद्या बहुधा मिळेल.
स्थळ नाशिक . कायनेटिकचे टायर आहेत का? नाहीत. चारेक दिवसानी चौकशी करा.
दोन दिवसातले तीन प्रसंग.
मस्त झालाय लेख...सहीच असतात
मस्त झालाय लेख...सहीच असतात तसे तुझे सगळेच लेख. (ह्याआधीचे रोमात वाचलेत.)
तो जनसेवा चा खरवस तर संपलेला
तो जनसेवा चा खरवस तर संपलेला कधि नसतो तेच कळत नाही ....
मस्त लिहिलं आहेस..
मस्त लिहिलं आहेस..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आरती खरे तर जनसेवा वाल्यानी '
आरती खरे तर जनसेवा वाल्यानी ' येथे खरवस सम्पलेलाच असतो ' असा पर्मनन्ट बोर्ड रंगवून घ्यायला पाहिजे....
छान लिहीलाय लेख! पंचेस आवडले.
छान लिहीलाय लेख! पंचेस आवडले. खास करुन 'आ गया ना देशी....'![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्यात सेफ्टी फिचर्स जास्त चांगले आहेत...आणि फ्युएल इफिशिअंट पण...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
इथे ही टोयोटा कॅमरी आणि होंडा म्हणजे 'करी कार्स'...
म्हणुन आम्ही माझदा घेतली...
आमची बघुन अजुन ओळखीच्यातल्या ४-५ देश्यानी माझदा घेतली...
ज्या देसींना आपण फार देसीपणा
ज्या देसींना आपण फार देसीपणा करतोय असे वाटते होंडा/टोयोटा घेऊन ते लोक निसान/माझदा घेतात.. >>>>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages