२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आज मांजरेकरला लांब ठेवा मैदानाच्या. >> त्यापेक्षां, 'जबरदस्त खेळ करून तोंडच बंद करा त्याचं', असं म्हणाना !! आणि, तसंच व्हावं व होणारही !!!

राहणे नि शर्मा ओपन करताहेत, पांडे रैनाच्या आधी येतो कि नंतर नि धोनी कुठे येतो हे बघणे interesting असेल.

Dhoni says he wanted to bowl first, because of the dew later and that it is a difficult ground to defend on >> Sad

रहाणे ला आणला की! ग्रेट! केदारचं एकलं बॉ धोनीनी! Lol
होपफुली ही विल फायर!
वानखेडे म्हणजे लै शॉर्ट बाऊंड्र्या बघा! पबलिक सुरु झालं तर अक्षरशा: पाऊस पडेल सिक्सरांचा.
मांजर्या म्हणतोय रन मेकिंग पिच आहे. बुमराह, पंड्या मेरे लालों मेरे चीतों! राज्यांनो नीट बॉलिंग करा बरं!

केदारचं एकलं बॉ धोनीनी! >> Lol
पांडेला पण आणलं. म्हणजे दोन्ही बाबती ऐकलं म्हणावं लागल. इतका वेळ असाम्या म्हणत होता की तो अन धोणी एकच विचार करत आहेत.

रहाणेचं पण होम ग्राउंड आहे.

आले आपले मुर्ती ल्हान किर्ती म्हान बॅट्समन. रहाणेला म्हणा भौ तू थोडा दाबून खेळ अन रोहितला सुटू दे मोकळा.
फाडडालो इन्को माँ की आँख!

आता केदारला मी नडणार नाही भौ! तो धोनीशी डायरेक टचमदी आहे. Lol

तू ठेव शांतीला अन त्याबरोबर येइल ते पाप सुद्धा तुझ्याच डोक्यावर ठेवून घे. Proud

तू ठेव शांतीला अन त्याबरोबर येइल ते पाप सुद्धा तुझ्याच डोक्यावर ठेवून घे. >> Rofl
अरे क्रिकेटवरची चर्चा वाचायला आले तर खुर्चीतून पडेस्तोर हसवलं बुवांच्या कमेंटनी.

थोडे बॉल खालले आत्त पण ठीक आहे. रोहितला म्हणा अजून थोडे बॉल घे पण नंतर दहा एक सिक्स मारुन मग जा हवं तर वडापाव खायला.
निधी Happy

मुकूंद कुठाय? चल उठ रे मुकूंदा.. झाली पहाट झाली... सुर्य बुडावर आला... मॅच सुरु झाली.

मायबोलीचं प्रेशरच फार धोनीला, आणला शेवटी रहाणेला.
अत्ता तरी रनरेट खास नाहीये, आगे आगे देखते है होता है क्या :).

पिच चांगलं आहे पण बोलिंग अतिशय टाईट ठेवलीये इंडिजनी. बॅट्समनच्या स्किल मुळे मिळाले रन. फक्त आपणही एक्स्ट्रिमली टाईट ठेवलं पाहिजे बॉलिंग मध्ये!

ठोकली......!

Pages