२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, धोनी काही बदल करणार नाही हे माहीत आहे म्हणून चर्चा करू नये असा मुद्दा आहे का तुमचा? मला खरच कळला नाही.

केदारच्या adaptation च्या मुद्द्याशी सहमत.

रोहित / धवण / रैना त्यासमोर बच्चे आहेत, जर तो वेळोवेळी अ‍ॅडॉप्ट करू शकतो तर सगळ्यांनी करायची तयारी दाखवावी लागते. > > आणि ते करत नाहीत असे तुला का वाटते ? धवन ने त्याचा ऑफ साईडचा ग्लाईड करायचा pattern किती बदललाय ? आधी लेग च्या बॉलवर तू फक्त ढकलून धाव घेत असे. सध्या तो हवेतून फ्लिक्स मारयला लागलाय. रोहितचा खेळ २००८ च्या down under दौर्‍यानंतर किती बदलला आहे ते पाहा. ODI मधे त्याचे template बनवायला त्याला गेल्या ३ वर्षांमधे जमले आहे. T-20 त्याचा खेळ ज्या प्रकारे आहे त्यामधे पटकन adjust होणारे नाहिये. समोरचा फुल फ्लोमधे खेळत असला कि त्याला सेट व्हायला वेळ मिळतो जो आता मिळत नाहि नि मग game force करायचा नादात तो उडतोय. रैना हा एकमेव खेळाडू आहे तुझ्या यादीतला ज्याने improve केल्याचे जाणवत नाही. adopt करा वगैरे बोलणे ठिक आहे. त्यांनी केल समजा (धवन च्या short ball handling बद्दल तूच बोललास) तर ते work out होतेय कि नाही हे ह्याच सामन्यांमधे दिसणार ना ? आणी नाही झाले तर परत बदल करणे जरुरी आहेच. मग असे फेल होणारे बदल होत असतील तर त्यांना सलग संधी नको द्यायला ? इथे मधे कुठेही कसल्याही domestic tournament किंवा IPL नाहीये काही इतर करायला. प्रश्न लोकांनी बोलण्याचा नाही तर प्रत्येक वेळी react होऊन बोलण्याचा आहे. ह्या स्पर्धेचे planning down under tour पासून सुरु झालेय. जे काही tuning. adoption, improvisationहोणार होते हे स्पर्धा सुरू होईतो. त्या नंतर 'जे काही आहे ते आहे' हे साहजिक आहे. आत्ता फक्त fine tuning शक्य आहे. भर स्पर्धे मधे २ सामने बाकी असताना 'हे बदला, ते बदला' हे कसे शक्य आहे ? बर बदला बदला हेही ठिक आहे. ह्या तिघांना काढायचे ठरवले समजा सेमी साठी उद्या तर धोनीने त्यांच्या जागी घ्यायचे कोणाला ? राहणे, भज्जी नि नेगी ? ते मायबाप वर जाडेजा नि बुमराहच्या नावाने शंख करताय. त्यांना काढून कोणाला घ्यायचे ? कालच इथे युवराजच्या नावाने शंख पण फोडून झालाय. प्रत्येक जण ह्याला उडवा त्याला उडवा शिवाय भाषा करायला तयार नाही. हे रॅशनल थिन्किन्ग आहे ?

यामुळे ह्यावर काउटंर ऑर्ग्युमेंट " इथल्या लोकांनी तिथे जाऊन खेळावे" असे नाही ना असू शकत. >> हा विनोद होता तात्या. कालपासून बुवा नि मी तुम्हाला हेच सांगतोय. पण तुमचे झाड सोडायला तयार नाही राव तुम्ही Sad

फे फे , गेल्या २-३ दिवसांमधल्या केदार, बुवा नि माझ्या पोस्ट्स बघशील तर तुला कळेल काय म्हणतोय ते.

कालपासून बुवा नि मी तुम्हाला हेच सांगतोय. पण तुमचे झाड सोडायला तयार नाही राव तुम्ही >>

अरे माझे झाड तुम्ही दोघे नाही आहात. भारतीय बॅटिंग बद्दल बोलू नये का? Happy माझे झाड भारत धावा करण्यात कमी पडतोय हे आहे. ज्यावर बुवांनी आणि तू आर्ग्युमेम्ट केले.

परत एकदा - मी त्यांना काढा असे म्हणालेलो नाही. त्यामुळे तुझे " प्रत्येक जण ह्याला उडवा त्याला उडवा शिवाय भाषा करायला तयार नाही. हे रॅशनल थिन्किन्ग आहे ?" हे मत जनेरिक असले तरी आपल्या चर्चेत लागू नाही. मला ते आवडतात हे खूप ठिकाणी, खूपदा लिहून झाले आहे. त्यामुळे त्याच्यापुढे जाऊन बोलू. मी म्हणालो की ह्या तिंघापैकी एकाला बसवून दुसर्याला चान्स द्या. मोस्टली रैनाला बसवा.

रैना वर "प्रोजेक्ट रैना बिगिन्स" असे दोन वर्षापूर्वी एक आर्टिकल आले होते. ज्यात त्याला नं ४ वर खेळवायचे होते. त्याच्याकडे तेवढी केपेबलीटीच नाही. किंवा जी होती ती त्याने घालवली. आणि लगेच मग त्याचा ४. ५० ओवर्स मध्ये डगमगला. पण टि २० मध्ये अजूनही आहे. माझ्यामते ही चूक आहे. तो पहिल्या बॉल पासून मारा, कॅटेगिरी प्लेअर झाला आहे. म्हणून त्याने ५ किंवा ६लाच यावे.

तुला असे वाटतेय की रोहित / धवण ह्यांचा मी विरोध करतोय, तर तसे नाही. रोहितला किंवा धवणला पहिल्या बॉल पासून मार असे मी म्हणालेलो नाही. पण त्याच वेळी पहिल्या ६ ओवर्स मध्ये ३०-३२ धावा हे मान्य नाही. मागेही टि-२० मध्ये ह्याच दोघांनी ५० - ५० चे स्टॅन्ड दिले आहेत. त्यामुळे तुझे रोहित आणि धवण बद्दल्चे आर्ग्युमेंट पूर्ण बरोबर नाही. ( की त्यांच्या खेळच तसा आहे. )

मला प्रॉब्लेम आहे तो कॅज्युवली आउट होण्याचा. जेंव्हा बुवांनी एक आर्ग्युमेंट केले तेंव्हा मी म्हणालो," प्रॉब्लेम ते कसे खेळतात हा नाही, आपण बॅटिंग कशी करतो आहोत हा आहे. त्या पोस्ट मध्ये बुवांना, अहो मी बॉलिग नाही बॅटिंग बद्दल बोलतोय" असे सांगीतले, हे वरचे तिघेही ऑलमोस्ट प्रत्येक मॅच मध्ये बेजबाबदार पण आउट झाले आहेत. अपवाद एक दोन सोडता.

तू म्हणतोस मी झाड सोडत नाही, पण प्रत्येक वेळी मग तू ते कसे बरोबर आहेस हा मुद्दा घेऊन येतो आहेस. जो ५० ओव्हर्स साठी बरोबर आहे, पण टि२०त असेलच असे नाही. म्हणूनच पिटरसन, एबी, कोहली आणि जो रुट इथे चमकतात कारण दे इनोव्हेट. वी हॅव टू अ‍ॅप्रिशिएट द फॉर्मॅट अ‍ॅन्ड चेंज.

प्रत्येक वेळी ती दोघे ५० काढतील का? नाही. पण निदान तसे इंटेंट तरी दिसावे.

खरे तर अनेकदा तेच ते लिहून झाले आहे की मलाच कंटाळा आला आहे. आय गिव्ह अप. Happy सोडले झाड. गुरूवारी दिसेलच.

प्रत्येक वेळी ती दोघे ५० काढतील का? नाही. पण निदान तसे इंटेंट तरी दिसावे. >> अरे पण हे इंटेंट नाही हे तू कसे ठरवतो आहेस तेच कळत नाही मूळात. उलट ते दोघेही game force करायचा प्रयत्न करताना बाद होताना दिसताहेत. ते जे नाहि आहेत ते त्यांना मारून मुटकून बनवता येणे शक्य नाही. तसे असते तर प्रत्येक टीम मधे एक अ‍ॅबे नि एक गेल नि एक कोहली नसता का दिसला ?

'वी नीड टू गिव्ह देम रोप. ' इथून सुरू करून तू आता "मी म्हणालो की ह्या तिंघापैकी एकाला बसवून दुसर्याला चान्स द्या. मोस्टली रैनाला बसवा." सरकलास कि. Down under tour पासून रैना बर्‍यापैकी फ्लॉप ठरलेला आहे. त्याने धावा काढल्या तेंव्हाही तो convincing वाटला नव्हता. पण धोनीने पाकिस्ताननंतरच्या इनिंगनंतर स्पष्ट्पणे त्याला हात लावाणार नाही हे सांगितले आहे. मला वाटते स्पर्धेपुरता हा मुद्दा इथेच समाप्त होतोय. राहाणेला रैनाच्या जागी आणता येत असले तरी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या आहेत त्यामूळे ते होणे कठीण दिसतेय. Basically injury असल्याशिवाय player बदलता येत नाहीत अशा tournamentsमधे त्यामूळे आहेत त्यापेक्षा वेगळे combo शक्यच नाही.

तू झाड सोडलेस तरी आता मला त्यावर चढायला भाग पाडल्यामूळे मी लिहितोय Wink

तू झाड सोडले तरी........ >>>>>>> Lol
मी आधीच शप्पत घेतल्यामुळे महतप्रयासानी गप्प बसत आहे! Lol

मी आधीच शप्पत घेतल्यामुळे महतप्रयासानी गप्प बसत आहे >> लिहून टाक. लिही. Proud तू काही भिष्मप्रतिज्ञा केलेली नाहीस. Lol आपण मर्त्य लोकं आहोत.

मला त्यावर चढायला भाग पाडल्यामूळे मी लिहितोय डोळा मारा >> च्यायला चर्चा तुला वाढवायची / झाड सोडा झाड सोडा करत मुद्दे मांडायचे आणि मग मलाच म्हणायचे. Lol

वी नीड टू गिव्ह देम रोप. ' इथून सुरू करून तू आता "मी म्हणालो की ह्या तिंघापैकी एकाला बसवून दुसर्याला चान्स द्या. मोस्टली रैनाला बसवा." सरकलास कि >>

चूक. माझ्या तीन दिवसांपूर्वीच्या पोस्ट मध्येही मी तिघांपैकी एकाला रोटेट करा असे लिहिले आहे. परत वाच. मी जे लिहिले तेच तुम्ही समजावून घ्यायच्या ऐवजी दुसरे काही तरी फाटे फोड आहात.

जे काही tuning. adoption, improvisationहोणार होते हे स्पर्धा सुरू होईतो. त्या नंतर 'जे काही आहे ते आहे' हे साहजिक आहे. >> adoption, improvisation हे मॅच मध्ये करता येते हे तुला कसे मान्य नाही हेच कळत नाही.

जर रहाणेला धोणीला घ्यायचे नव्हतेच तर मग सिलेक्शन का केले? नोट मी धोणीला दोष देत नाहीये. प्रश्न विचारतोय कारण त्याच्या लिमिटेशन्स आधीपासूनच माहिती आहेत ना? मग त्यात नविन काय आहे? म्हणजेच प्लेईग ११ मध्येच adoption, improvisation हवे. ते मॅच कंडिशन नुसार ठरत असते. आधीच ठरवता येत नसते.

उलट ते दोघेही game force करायचा प्रयत्न करताना बाद होताना दिसताहेत >> मी इंटेंट नाही असे म्हणालो कारण त्यांच्या विकेट्स पाहा. त्या अतिशय कॅज्युअल आहेत. तू म्हणतोस की ते गेम फोर्स करत आहेत. गेम फोर्स म्हणजे काय? इज इट नॉट रिक्वायर्ड "ट्रेट" फॉर अ इंटरनॅशनल प्लेअर? . जर ते ही नसेल तर मग घरी बसावे. म्हणून हा मुद्दा निकाली. इनफॅक्ट रोहित इज की. तो चालला ( २०:१) की मॅच फोर्स करतो.

शिवाय मी लिहितोय त्याला एक दोन मॅच किंवा ही सिरिजच कारणीभूत आहे असे नाही. मी ओव्हरॉल सिच्युएशन / अनेक मॅचेस वगैरे पाहून लिहितोय. भारताचे ओपनिंग ऑसीबरोबरची मॅच सुरू व्हायच्या आधी अ‍व्हरेज १२ वगैरे आहे. म्हणजे १२-१५ धावात विकेट. ज्याला तू जस्टीफाय तरी कसे करू शकतोस ते तुच जाणे. Happy

बट सिम्स नथिंग टू वरी अबाउट ची ट्युन मला शोलेची आठवण करून देते.

जाता जाता - जर मनिष पांडे खरोखर आला तर धोणीने त्याला खेळवावे. ही इज बेटर बेट.

झाडावरून उतरता उतरता. Wink

तू म्हणतोस की ते गेम फोर्स करत आहेत. गेम फोर्स म्हणजे काय? इज इट नॉट रिक्वायर्ड "ट्रेट" फॉर अ इंटरनॅशनल प्लेअर? >> No Sir, there is huge difference. They are trying force and not enforce. They are trying to "adopt" as you say by changing their natural style and let's be honest here, there are not many players who can do that on the fly successfully. (Last word is the key point here) They will need more time and more importantly right environment.

त्या अतिशय कॅज्युअल आहेत. >> हे अतिशय हार्श वाक्य आहे. एकीकडे ते फास्ट खेळत नाही म्हणायचे नि तसे खेळताना विकेट गेली कि कॅज्युअली विकेट फेकली म्हणायचे. मी ते game force करायचा प्रयत्न करताना विकेट घालवताहेत हे म्हणतोय ते ह्या संदर्भात. बाकी सगळे बाजूला ठेव, सातत्य दाखवले नाही तर आपण संघाबाहेर जाऊ नि एकंदर त्यानुषंगाने येणारे सगळे फायदे दुरावले जातील हे त्यांना कळत नसेल असे तुला खरंच वाटते ?

जर मनिष पांडे खरोखर आला तर धोणीने त्याला खेळवावे. ही इज बेटर बेट >> हो पण तो युवीच्या जागी येईलच हे लक्षात घे.

adoption, improvisation हे मॅच मध्ये करता येते हे तुला कसे मान्य नाही हेच कळत नाही. >> मला मान्य आहे, फक्त हि वेळ नाही हेही rational thinking मधे लक्षात घे हे सुचवतोय. सलामीची जोडी नक्की कशी असायला हवी नि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे कप्तानाने ठरवायचे आहे. ह्यात बदल हवा असेल तर तोही होईल फक्त स्पर्धेनंतर करणे योग्य ठरेल. नुसता अमक्याच्या जागी राहणे आणून problem सुटेल असे म्हणने सोपे आहे. राहाणे गेल्या काही T20 सामन्यांमधे खेळला तो फारसा वेगळा खेळला नव्हता. (हे तुझ्या संदर्भासाठी : http://www.espncricinfo.com/ci/content/player/277916.html) धोनी कुठल्या बेसीसवर त्याला आत आणेल ? इथे तो रैनाच्या जागी आणणार नाही हे उघड असल्यामूळे पहिल्या दोघांच्या जागीच येतोय असे धरून लिहितोय. ध्वन नि रोहित form मधे नसले तरी धोनीचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे ही नवीन न्यूज नाही. त्यामूळे अशा मोक्याच्या वेळी तो असे बदल करणे कठीण आहे. वर common sense बद्दल मी म्हटले ते ह्याच संदर्भात होते. सध्या जे चालू आहे नि जो संघ निवडी करता available आहे त्या मधे धवन नि रोहित हेच उपलब्ध पर्याय (तुझ्या भाषेत बेट्स) आहेत असे मलाही वाटते. चौथ्या क्रमांकावर जर लवकर यावे लागले तर रैनाच्या जागी राहाणे खेळून जाण्याचे चान्सेस जास्त वाटले तरी तो फक्त एक possible scenario आहे. युवी च्या जागी पांडे येत असेल तर चौथ्यावर त्याला ढकलून रैनाला खाली खेचता येईल. रैना जी देमार करू शकतो ती राहाणे नाही करू शकत (राहाणे इथे कमी पडणार). ह्यात शक्यताही आहे कि तो लगेच बाद होईल पण असे पट्टे फिरवायची वेळ आली तर तुझे बेट्स राहाणे वर असतील कि रैनावर ? धोनी नि माझे उत्तर सारखे आहे Happy

** झाडावर अडकलेला Wink

केदार Lol

आता बरीच पानं पुढे आलोत आपण पण फ्रॉम माय मेमरी बांग्लानी सुरवात चांगली केली तेव्हा तुझं वाक्य होतं "आपले प्लेयर टेंपरामेंट नीट दाखवत नाहीयेत. आपल्याला नाही जमलं पण बांग्ला नीट खेळत आहे"
आता तू हे वाक्य त्या मॅच मध्ये सध्या काय सुरु आहे त्याला अनुसरुन न म्हणता भारताच्या ओवरॉल म्हणजे मागच्या काही मॅचेस (खरं तर मागच्या २ मॅचेस मध्ये) मधल्या परफॉरमन्सला गृहित धरुन बोलत होतास हे मला किंवा इतर कोणाला कळणं शक्य नव्हतं.
तुझ्या ह्या वर्च्या वाक्याला मी उत्तर म्हणून म्हणालो की टेंपरामेंटचा थेट संबंध नाही म्हणता येणार ह्या मॅच मध्ये कारण धडधडीत दिसत होतं की पिच जरा विचित्रपणा करत होतं. मग पुढे आपली बॉलिंग पण लूज पडत आहे आणि फिल्डिंग मध्ये पण ३ कॅच सोडले हा मुद्दा मी आणि भास्कराचार्यांनी मांडला. In the context of that match, it didnt makes any sense whatsoever to question the players' batting abilities or temperament as we could totally see the pitch was causing problems which was putting more pressure on the batsmen eventually forcing them to take risks. In spite of this, the first four guys put up 100 runs. Kohli too succumbed (bowled). Further up, बांग्ला नीट खेळतय असं "वाटत" होतं कारण आपल्या बर्याच घोडचुका (ड्रॉप्ड कॅचेस, लूज बॉल्स) नडल्या.

तेवढ्यात तुझी पोस्ट आली असामी. Happy

पट्टे फिरवायची वेळ आली तर तुझे बेट्स राहाणे वर असतील कि रैनावर ? धोनी नि माझे उत्तर सारखे आहे स्मित >>

अरे माझी पोस्ट नीट वाच की रे. मी अगदी वरच लिहिलं आहे भाऊ ". तो पहिल्या बॉल पासून मारा, कॅटेगिरी प्लेअर झाला आहे. म्हणून त्याने ५ किंवा ६लाच यावे." त्यामुळे नं ४ ला येऊन सध्या पहिल्या तीन विकेट्स लवकर घालवण्यापेक्षा त्याने ६ नं ला यावे.

त्यात आता युवी जखमी झालांय म्हणून मला मारामारी करायला रहाणेपेक्षाही पांडे चांगला वाटतो म्हणून मीच पांडेला खेळवावे असे लिहिले आहे.

नुसता अमक्याच्या जागी राहणे आणून problem सुटेल असे म्हणने सोपे आहे. राहाणे गेल्या काही T20 सामन्यांमधे खेळला तो फारसा वेगळा खेळला नव्हता. >>

तू एक गृहित धरतो आहेस ते म्हणजे. मी कुठल्याही परिस्थितीत रहाणेला घ्याच म्हणतोय असे तुला वाटतेय. तसे नाही. माझ्या मते कोणीही आणा. ( तिथे मी रहाणे नाव सुचवले) पण उद्देश असा की एक दोन मॅच कुणाला कधीकधी बसविणे देखील हिताचे आहे म्हणूनच धवणचेच टेस्ट मधील उदाहरण दिले होते.

सेहवागला मागे टेस्ट मध्ये बसवले. दिड वर्ष घेतलेच नाही. अन जेंव्हा घेतले त्यानंतर त्याने १५० च्या अनेक इनिंग खेळल्या. त्यामुळे रहाणेनी आधी काहीच केले नाही, म्हणजे तो काही करू शकणार नाही हे मत ही मला मान्य नाही.

माझ्यमते एखाद मॅच मध्ये एखाद्याला बसवून दुसर्‍याला संधी देणे एवढे काही वाईट नाही / नसते.

बुवा, मी एका मॅचवरून प्लेअरला कधीच मोडीत काढत नाही हो. ओव्हरऑल बोलतोय. त्यात आशियाकपच्या लेटेस्ट मॅच पण इन्कुल्ड आहेत. इनफॅक्ट मी तुमच्याच पोस्टीला उत्तर देताना म्हणालो होतो की "खूप क्रिकेट पाहतोय म्हणूनच जाणवतेय अन लिहितोय."

तसेही एका मॅचला धरून जयजयकार करणे किंवा त्याला हुडहुड करणे क्रिकेट मध्ये नाईव्ह असल्याचे लक्षण आहे. जे सध्या आंतरजालावर दिसतच आहे.

असो.

आपली पहिल्याविकेटची पार्टनरशिप चांगली ( आणि कमी ओव्हर मध्ये) व्हावी अशी इच्छा व्यक्त करून आता मी खरोखरच शेवटची स्टेप घेऊन पाय उतार होतो.

तू एक गृहित धरतो आहेस ते म्हणजे. मी कुठल्याही परिस्थितीत रहाणेला घ्याच म्हणतोय असे तुला वाटतेय. तसे नाही. माझ्या मते कोणीही आणा. ( तिथे मी रहाणे नाव सुचवले) पण उद्देश असा की एक दोन मॅच कुणाला कधीकधी बसविणे देखील हिताचे आहे म्हणूनच धवणचेच टेस्ट मधील उदाहरण दिले होते. >> तात्या, मघापासून तेच सांगतोय कि अशा स्पर्धांमधे injury sub allowed असतो. ह्याचा फॉर्म गेलाय तर त्याला बसवून आधी जाहिर केलेल्या १५-१७ च्या बाहेरचा आणता येत नाही. फक्त अपरिहार्य कारणांमधेच तसे करता येते. आता ह्या context मधे परत एकदा सगळे वाचा बरे.

आता तुम्ही 'मीच पांडॅला घ्या' असे सुचवले म्हणताय तर त्यावरून practical consideration लक्षात आणून देतो ते बघा. तीन वर कोहली आहे. युवीच्या जागी पांडे आहे. पांडे सुद्धा पहिल्या बॉलपासून उचलून मारू शकत नाही. तो more or less Dhawan, sharma category मधे जातो (IPL Knight Riders follow करा). परत तो बॉलिंग करत नाही, तेंव्हायुवीच्या part time गोलंदाजीसाठी रैना चा वापर करणे भाग आहे. आता राहाणे ला कोणाच्या जागी आणायचा म्हणता ? धवन नि शर्मा पैकि एकच ना ? मग आता प्रश्न उरतो कि unproven राहणे ला crunch मॅच मधे ढकलून चान्स घ्यायचा कि big matches player म्हणून लागलेल्यांना घ्यायचे ? I'm on Dhoni's side here. If there is law of averages then Dhawan and/or Sharma are due for big inning.

पहिल्या बॉलपासून उचलून मारायचे काम ह्या टीममध्ये रैना आणि पंड्याचे आहे. (मेबी धोनी इन्क्ल्युडेड?) पंड्या बांग्ला मॅचमध्ये तसा चोपायला सुरू झाला होता, पण सौम्य सरकारच्या एका अप्रतिम कॅचमुळे तो आऊट झाला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध तो बॅटींगला उतरलेलाच नाही.

ओपनर्सनी जास्त तडाखेबाज सुरूवात करून द्यायला हवी, हे खरेच आहे. पण रहाणेला एका ओपनरच्या जागी आणणे ह्या स्थितीत प्रॅक्टिकली शक्य नसावे.

आत्तांच्या चर्चेत बारीक निरीक्षणावर आधारलेले बरेच चांगले मुद्दे आलेत . वाचून बरं वाटलं.
'पॉवर प्ले'च्या पहिल्या ६ षटकांत आपली धांवसंख्या व्हायलाच हवी तशी होत नाहीं, ही खरी चिंतेची बाब आहे. धवन हा आहे तसा स्विकारूनच त्याला सलामीला पाठवतात. त्यांत धोका आहेच पण तो क्लिक झाला तर प्रचंड फायदाही आहे. हें 'क्यॅल्क्यूलेटेड रिस्क' आहे, कधी फसेल, कधी फळफळून यश देईल. पण नेमकं कधीं तें सांगणं कठीण. या स्पर्धेपुरतं तरी आतांपर्यंत तें फसलं आहे व आतां तें फळ देईल याची शक्यता वाढली आहे. पण याची गॅरंटी नसतेच व त्याबद्दल कुरकूर करणंही चूकीचं. रोहित हा त्या अर्थाने 'रिस्क' नसून त्याला सध्यां सूर गवसत नाहीय. मीं वर म्हटलंय तसं तो टी-२०ला आवश्यक त्या 'स्ट्रीट स्मार्टनेस'मधे कमी पडत असेल किंवा इतरही कारणं असूं शकतात. तो अनुभवी आहे, टॅलंटेड तर आहेच व काय चूकतंय हें शोधून काढण्याची व तें सुधारण्याची कुवत व ईच्छाशक्तीही त्याच्याकडे आहे. यात तो सफल होईल अशी आशा करणं किंवा स्पर्धेच्या ऐन ओघात त्याला बदलून दुसर्‍या कोणाला घेणं हे दोन्ही पर्याय धोक्याचेच आहेत. [कदाचित, पंड्याला धवनबरोबर सलामीला पाठवून रोहितला ४थ्या क्रमांकावर पाठवणे हाही पर्याय असूं शकतो]मला वाटतं हा निर्णय कठीण आहे व तो धोनीच्या 'गट फीलींग'वर सोडणंच बरं.

एक रांगडा विचारही माझ्या मनात डोकावतो. ५- ६ जागतिक दर्जाचे व २-३ बर्‍यापैकीं टॅलंटेड फलंदाज घेवून फक्त १२०चेंडूंचा सामना खेळताना आपण दबावाखालीं कां असावं. ठीक आहे, नाही झाला एखादे वळीं हवा तसा स्कोअर वरच्या फलंदाजांकडून तरीही धोनी, जडेजा, पंड्या व आश्विन यांच्याकडूनही टी-२०ला साजेशी भरीव कामगिरी होवूं शकतेच कीं; किंबहुना टी-२० संघाची निवडच तशा अपेक्षेवर आधारीत असते ना !!!

दुसरा रांगडा विचार असाही येतो कीं 'पॉवर प्ले'मधे आपला हवा तसा स्कोअर होत नाही, या चिंतेने ग्रासल्याने आपल्या विरुद्ध मात्र 'पॉवर प्ले'मधे सगळे संघ सातत्याने भन्नाट स्कोअर करतात, याकडे आपलं दुर्लक्ष तर होत नाहीना ? माझ्या मतें , यावरही लक्ष केंद्रीत करणं तितकंच महत्वाचं असावं.

तरी बर आपण भारतात स्वतःच्या देशात स्वतःच्या खेळपट्टीवर खेळतोय तरी ही अशी अवस्था आहे. मग विचार करा पुढचा टी२० कप इंग्लंड मधे आहे तिथे काय दिवे हे सलामीचे दिवटे लावतील ?

आपल्या विरुद्ध मात्र 'पॉवर प्ले'मधे सगळे संघ सातत्याने भन्नाट स्कोअर करतात, याकडे आपलं दुर्लक्ष तर होत नाहीना ? >> हो होतेय बहुधा, आपण तसेही बॅटींग सेंट्रिक असल्यामूळे असेल.

मग विचार करा पुढचा टी२० कप इंग्लंड मधे आहे तिथे काय दिवे हे सलामीचे दिवटे लावतील ? >> पहिली गोष्ट हि कि वर्ल्ड कप सारख्या स्पर्धांसाठी बर्‍यापैकी बॅटींग ला धार्जीण्या खेळपट्ट्या बनवल्या जातात, मग तो कुठेही असो. दुसरी गोष्ट हि कि २००७ चा आफ्रिकेचा T20, 2011 champions Trophy in England , २०१६ मधे डाउन अंडर वगैरे मधे आपले सलामीचे फलंदाज चांगले खेळले होते. त्यामूळे दिवेच लावतील असे जरुरी नाही.

पहिली गोष्ट हि कि वर्ल्ड कप सारख्या स्पर्धांसाठी बर्‍यापैकी बॅटींग ला धार्जीण्या खेळपट्ट्या बनवल्या जातात >>>
आता परत विचार करा की भारतातील सुसाह्य वातावरणात बॅटींग धार्जिण्या खेळपट्ट्यांवर सुध्दा दिवे दिवटे लावत असतील. तर इंग्लंड मधल्या स्वींग होणार्‍या वातावरणात तर ट्युबलाईटीचाच प्रकाश पाडतील.
अगदी वैयक्तिक रित्या धवन अजिबात पटत नाही कुठे ही याचे सातत्य नाही. जेव्हा ८-९ इनिंग फ्लॉप नंतर डोक्यावर टांगती तलवार असेल तर एखादी मॅच मधे जवाबदारीने खेळतो मग परत पुढच्या मॅच पासून बेफिकीरीने शॉट खेळून आउट होतो. अश्या फलंदाजाला कोणी किती आनि का म्हणून बॅकिंग करावे.?
रोहीत सुध्दा सुरुवातीला मॅगी मॅनच होता ना. बाहेर बसवल्यावर आयपीएल मधे त्याने सातत्य राखले त्यानंतर टीम मधे आला. जेव्हा तुमच्या कडे पांडे, रहाणे सारखे फार्मात असलेले फलंदाज असताना त्यांना फार्म जाऊ पर्यंत का बाहेर ठेवायचे. मग अचानक एखाद्या मॅच मधे खेळायला लावाय्चे तिथे ते फ्लॉप ठरले की परत बेंच वर बसवायचे. हे चुकिचे आहे. ऑस्ट्रेलियामधे वन डे मधे पांडे ने मॅच जिंकवून दिली ते ही चांगलीच फटाकेबाजी करून मग त्याला टी२० मधे स्थान कसे दिले नाही.? पांड्याने असे कोणती कामगिरी केली होती जिच्या मुळे पांडेच्या जागी त्याची वर्णी लावली?

तुम्ही कदाचित फॉर्म हा भाग लक्षात घेतला नसावात. हेच दोघेतुम्ही ज्या इंग्लंड बद्दल चिंता व्यक्त करत आहात तिथेच नि त्याच T20 फॉर्म मधे दणकून खेळले होते नि आपण जिंकलो होतो ह्याची नम्रपणे आठवण करून देउ इच्छितो. परत हेच दोघे तेंव्हाही असतील असे जरुरी नाही तेंव्हा आत्तापासूनच 'आत्याबईला मिशा असत्या तर' मधे कशाला शिरा. तेंव्हाच्या बाफावर जे कोणी असतील त्यांच्या नावाने निवांत पणे भांडू Happy

ऑस्ट्रेलियामधे वन डे मधे पांडे ने मॅच जिंकवून दिली ते ही चांगलीच फटाकेबाजी करून मग त्याला टी२० मधे स्थान कसे दिले नाही.? पांड्याने असे कोणती कामगिरी केली होती जिच्या मुळे पांडेच्या जागी त्याची वर्णी लावली? >> Please tell me you are not a bit serious here. Pandya single-handedly won Syed Mushtaq Ali Trophy for Baroda this year, not to count his IPL heroics which turned events for MI. These earned Pandya call in the side for his all rounding abilities and not purely for his batting skills. (Dhoni has been asking for fast balling aallrounder for a while now - Binny, Rishi Dhawan to name the few tried before). Manish Pandey is pure batsman, Do not count on his tweakers for a bit. He rarely bowls in domestic. Pandey is never considered as hard hitter like Pandya is. If you want someone to hack few boundaries in couple of balls you want to send Pandya in (or Dhoni or Raina) and not Pandey. Pandey is an aggressive batsman but needs time to get eye in.

अरे मराठीत लिहा. वरचे मराठीत लिहिल्यावर खाली परत इंग्रजी कशाला? Uhoh ?
मी स्पॅनिश पोर्तुगिज बुल्गेरिअन मधे सुध्दा लिहू शकतो लक्षात राहू द्या Light 1 Happy

. Pandey is never considered as hard hitter like Pandya is <<<<< काय सांगता? आयपीएलमधे पहिला भारतीय आहे तो शतक ठोकणारा. त्यानंतर सुध्दा तो सातत्याने खेळला आहे. कर्नाटक आणि केकेआर तर्फे खेळताना त्याने किती सातत्य दाखवले आहे. केकेआरला कप जिंकण्यामधे त्याच्या कित्येक खेळी कारणीभुत होत्या. पांड्याचे जिथे तुम्ही कौतुक करत आहे त्याने बाहेर गेल्यावर वाईड चेंडूची खैरात किती केली होती अजुन ही त्याचे ते चालू आहे. ऐन क्षणी त्याला फलंदाज धुतात आणि त्याचे परिणाम टीम वर होतात. ऑसींविरुध्द शेवटची ओव्हर मधे १५ धावा गेल्या ते ही जास्त निघाल्या असत्या जर पहिल्याच चेंडू वर फॉक्नरने आत्मघाती फटका खेळला नसता तर. बांग्लादेश विरुध्द १५ धावा केले पण त्यानंतर आउट झाला शेवट पर्यंत टिकला नाही. जेव्हा तुमच्या समोरचा फलंदाज (रैना) चुकिचा फटका मारून आऊट झाला तर दुसर्‍याच चेंडूवर मोठा फटका खे़ळण्याची गरज नव्हती. या आधी न्य्झीलंडच्या विरुध्द तर ० वर आउट झाला. नंतर पाकिस्तान विरुध्द २ ओव्हर मधे २५ धावा दिल्या. जिथे बाकीचे गोलंदाज ४-५ चा अ‍ॅवरेज वर धावा देत होते..

असामी, पांड्या बद्दल सहमत. बुमराह देखील डोमेस्टीक मधून परफॉर्म करून आलाय.

पण धोनी ने सांगितलय की तो संघ बदलणार नाही म्हटल्यावर रैना ला बदलायचा प्रश्नच येत नाही हे म्हणणं जरी खरं असलं तरी ईथे आपण चर्चाच करायला जमलो आहोत. आणी रैना फॉर्म मधे नाहीये म्हटल्यावर त्याला बदलणं हा लॉजिकल चॉईस आहे असं मला सुद्धा वाटतं.

धवन हा एक बेभरवशी खेळाडू आहे आणी रोहित शर्मा विषयी मी ईथे माझं मत बरेच वेळा मांडलय. तो ज्या पद्धतीनं बाद होतो, ज्या पद्धतीनं थोड्या कालावधीसाठी भरपूर रन्स करून एक मोठा काळ त्या पुण्याईवर घालवतो, त्याच्या त्या टॅलेंट चं कौतुक (आपल्यालाच. तो तर नेहेमी म्हणतो, की मी फार हार्डवर्किंग आहे, तुम्ही उगाच टॅलेंटेड म्हणू नका. हे म्हणजे लौकिकार्थानं सुंदर नसलेल्या नट्यांच्या अभिनयाबद्दल बोलण्यासारखं आहे). ह्या सगळ्या गोष्टींचा मला तरी (वैय्यक्तिक मत) फारसं कौतुक नाहीये. बॅटींग करणं ह्या कामावर त्या दोघांची नियुक्ती झालीये आणी ते काम ते सद्ध्या करत नाहीयेत, तस्मात थोडा काळ त्यांना बाहेर बसवून त्यांचे जे काही ईश्युज आहेत, ते सॉर्ट आऊट करण्याची संधी द्यावी. शर्माचे गेल्या ८ आंतरराष्ट्रीय टी-२० मधे स्कोअर्सः १२, १८, १०, ५, १, ३९, १५, ०. धवनः १३, २३, ६, १, ६०, १६, १, २

माझं मत ईथे मरठी संकेतस्थळावर मांडल्यामुळे तिथे धोनी काही संघबदल करणार नाहीये हे मला माहीत आहे, पण म्हणून ह्या कडमडेकर जोश्यान आपलं मत मांडूच नये की काSSSSय!

(आपल्यालाच. तो तर नेहेमी म्हणतो, की मी फार हार्डवर्किंग आहे, तुम्ही उगाच टॅलेंटेड म्हणू नका. हे म्हणजे लौकिकार्थानं सुंदर नसलेल्या नट्यांच्या अभिनयाबद्दल बोलण्यासारखं आहे).>>>> Lol भारी!
क्रेक्टेय तुमचं म्हणणं शर्मा बाबत.
त्याच्याकडे इतके सुंदर शॉट उपलब्ध असताना तो असा अक्रॉस द लाईन का मारतो हे त्याचं त्याला माहित.

काय सांगता? >> तुम्ही खरच एकदा परत चेक करा. ते शतक मारल्याला दोन ते तीन वर्षे झाली आहेत. मागच्या आयपील मधे पांडे फारसा फॉर्ममधे नव्हता. तो संघात आला तो त्याच्या रणजी कामगिरीच्या जोरावर. तीच गोष्ट पंड्याची आहे. इथे नगाला नग मांडणे एव्हढेच असेल तर पंड्याच्या जागी पांडे कशाला, तुम्ही नि मी सुद्धा चालतील हो. टीम कंपोझिशन वगैरे काही विचारत घ्याल तर बरे होईल. कमीत कमी दीपक हूडा, मनन व्होरा वगैरे नाव नगाला नग म्हणून हार्डहिटर म्हणून घेतले हार्ड्तरी समजू शकतो. हार्ड हिट्र नि अ‍ॅग्रेस्सिव बॅट्समन ह्यांच्यामधे मूलभूत फरक आहे हो. परत तुम्ही पंड्याच्या बॉलिंग बद्दल लिहिले आहे. पांडेच्या बॉलिंग्चे काय होईल ह्याची कल्पना करू शकता मग ? Wink

फेफे. बदलाला ना नाहिये. कधी बदलायचे हा कळीचा मुद्दा आहे. तू धोनीच्या जागी असलास तर पुढच्या सामन्यासाठी किती बदल करशील ? युवराज बाहेर निघालाय नि एक unknown factor आत येतोय. आता तू कितपत बदल करू शकशील ?

त्याच्याकडे इतके सुंदर शॉट उपलब्ध असताना तो असा अक्रॉस द लाईन का मारतो हे त्याचं त्याला माहित. >> बुवा कारण ते फोर्स करायला बघताय. कमी बॉल असल्यामूळे वेस्ट झालेले बॉल मेकप करायचा प्रयत्न. सॉफ्ट हँड्स नि खेळून स्ट्राईक रोटेट करणे दोघांचिही खासिञत नाहि. त्यामूळे बाऊंड्र्या अडकल्या कि डॉट बॉलचे प्रेशर नको नको ते करवते.

आपल्यालाच. तो तर नेहेमी म्हणतो, की मी फार हार्डवर्किंग आहे, तुम्ही उगाच टॅलेंटेड म्हणू नका. हे म्हणजे लौकिकार्थानं सुंदर नसलेल्या नट्यांच्या अभिनयाबद्दल बोलण्यासारखं आहे >> विनोद म्हणून ठिक आहे पण त्यात काही फार गैर आहे असे नाही. त्याला शॉट्स लेझी elegance असलेले वाटतात ह्यात त्याची चूक आहे का ? आणी तू दुर्लक्ष केलेस तरी कमीत कमी ODI मधे गेले २-३ वर्षे रोहित मिडास टच असल्यासारखा खेळलाय. तेच कौशल्य त्याला T20 मधे आणायला जमत नाहि आहे. टेस्ट बद्दल मी तो नसावा ह्यात कंपूमधे आहे.

भाऊ हा लेख तुम्हाला खचितच आवडेल. तुम्ही विराट लवकर मॅच्युअर व्हावा अशी प्रार्थना केली होतीत. त्याचाच भाग आहे.
https://prempanicker.wordpress.com/2016/03/29/rage-of-angels/#more-9266

असामी, तू सांगतोय ते समजतय आणि पटतय पण वर केदार अन फेफा म्हणत आहेत तसं तो बराच वेळा फेल गेल्यामुळे पबलिकच काय धोनीही आता अपेक्षा ठेवणार आहे की त्यानी नीट बॅटिंग करावी. We cannot say anymore that that's his style. He needs to perform right now and hopefully that happens on Thursday,

असामी, लेझी एलेगन्स चा प्रश्नच येत नाहीये. कन्सीस्टंसी चा मुद्दा आहे. टी-२० आणी टेस्ट बद्दल तरी आपलं एकमत आहे. वन-डे बद्दल तो तुलनात्मक दृष्ट्या पुष्कळच चांगला खेळतोय (तीनातल्या एका सामन्यात त्याचा ५०+ स्कोअर आहे). २०१३ मधे ९३४ धावा (२८ सामने), २०१४ मधे ५६० (१२ सामने), २०१५ मधे ७५८ धावा (१७ सामने), हे चांगलं आहे.

जर त्याला हे टी-२० च्या बाबतीत जमत नसेल, तर मारून मुटकून त्याला तिथे खेळवायचा अट्टाहास का? तीन वेगवेगळ्या टीम्स खेळवाव्यात ना (जशा बरेच देश हल्ली खेळवतात). केदारच्या मुद्द्याप्रमाणे ह्या खेळात (टी-२०) जो स्फोटक खेळ लागतो, तिथे आपली टीम कमी पडतीये.

आपण आपल्या संघातील अपयशी खेळाडूंबद्दल चर्चा करतानाच, कांहीं सकारात्मक गोष्टींचंही भान ठेवायला हवं -
१] या स्पर्धेत उतरलेला प्रत्येक संघ पूर्ण तयारीत आला आहे व प्रत्येक संघात कांहीं 'मॅच विनर' खेळाडू आहेतच. पण खेळातलं कसब जितकं महत्वाचं तितकंच कठीण स्थितींतही धीर न सोडतां जिद्दीने खेळणं. आपल्या बहुतेक सामन्यात, हुकमी खेळाडूंच्या अपयशाची कसर आपण निश्चितपणे जिद्द दाखवून भरून काढली आहे. याचा आपल्याला पुढील सामन्यांत निश्चितच लाभ होणार आहे व याचा प्रतिस्पर्धी संघांवर दबावही रहाणार आहे;
२] प्रत्येक सामन्यात निश्चित अशा डांवपेंचांची आंखणी झालेली असते व त्यांत 'कॅलक्यूलेटेड रिस्क'ही असतंच. कुणी जास्त धांवा दिल्या , कोण फटकेबाजी करताना बाद झाला याबद्दल दोष देताना तो आधीं ठरल्या प्रमाणे खेळत होता का, हेंही पहायला हवं. फक्त पंड्याचंच उदाहरण घेवूं- पंड्याने गोलंदाजीत धांवा दिल्या; पण तो सातत्याने आंखूड टप्प्याचीच गोलंदाजी डांवपेंचाचाच भाग म्हणून करत होता, हें लक्षात येत होतं व समालोचकही याला दुजोरा देत होतेच. बंगलाविरुद्ध शेवटचा चेंडू नेहरा व धोनी यानी सुचवल्यानुसार त्याने नेमका टाकला, हेंही त्याच्या गुणवत्तेचाच भाग मानला पाहिजे. त्याला फक्त दोनच सामन्यात फलंदाजीची पाळी आली; न्यू,झीलंडविरुद्ध तो १वर बाद झाला तरीही बंगलाविरुद्ध त्यावेळीं अत्यत आवश्यक अशा वेगाने त्याने ७ चेंडुत १५ धांवा काढल्या [ २चौकार, एक षटकार!] त्याने मोठा स्कोअर केला नाही म्हणून दोष देण्यापेक्षां त्या वेळीं अपेक्षित असाच तो खेळला याचंही भान ठेवायला हवं;
३] पाकिस्तान, बंगला व ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघानी पहिल्या सहा षटकांत खास विकेट न गमावतां मोठा स्कोअर केला. तरीही, पुढच्या ६-७ षटकात त्याना लगाम घालण्यात व १५व्या षटकाच्या आसपास उलट त्यांच्यावरच दबाव टाकण्यात आपला संघ यशस्वी झाला. आपली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, सांघिक भावना व धोनीचं नेतृत्व याचा तिथं लागलेला कस हा पुढील सामन्यांसाठी एक महत्वाचा सकारात्मक घटक ठरणार आहे;
४] रोहित, धवन, रैना हे कसलेले खेळाडू अजूनही अपयशीच ठरत रहातील, यापेक्षां ते आतां चमकतीलच असा सकारात्मक विचार कां नको ? ' भगवानके घर देर है, अंधेर नही ' असं ते म्हणत असतीलच व आपणही म्हणूंया कीं !!!

असामी, लेझी एलेगन्स चा प्रश्नच येत नाहीये. कन्सीस्टंसी चा मुद्दा आहे. >> timing चा मुद्दा आहे रे. ऐन स्पर्धेमधे हे करायची खरच गरज आहे का ? कोण alternative आहे जो स्फोटक सुरूवात देणार आहे ?

ऐन स्पर्धेमधे हे करायची खरच गरज आहे का ? >> इंट्रेस्टिंग प्रश्न ! पण उत्तर ऑलरेडी धोणीनेच अनेकवेळा दिले आहे.

जोंगिदरला बॉलिंग दिली तेंव्हाही म्हणता येईल किंवा पांड्याला दिली तेंव्हाही. कारण हे दोघेही अनुनभवी होते, तरी इट पेड ऑफ. (अर्थात बांग्लाच्या वेळी त्यांनीच चूक केली ते सोडा) म्हणजेच काय गॅम्बल केले होते. जे ऐन स्पर्धेतच केले होते. तिसरे उदाहरण हवे असल्यास कालही युवराजला ऐन वेळी बॉलिंग दिली. ज्याने कधीही (अशात) बॉलिंगच केली नव्हती.

आणि हे सर्व ऐन स्पर्धे मध्येच होत आहे. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग धोणी नेहमीच करतो की. मग हा प्रश्न तुला का पडावा?

मग हा प्रश्न तुला का पडावा? >> कारण बॅकप कोण आहे ? धोनीचा विश्वास नसलेला राहाणे ? राहाणे ने RR ला सुद्ध स्फोटक सुरूवात दिल्या नाहियेत रे. त्याचा strike rate १२०-१२५ पर्यंत वगैरे जातो. मग हा बदल नक्की काय देईल ? परत माझा मूळ प्रश्न राहाणे एकाच जागेवर येऊ शकतो. धवन नि रैना आहेतच. सलामीच्या जोडिने स्फोटक सुरूवात देणे हि अपेक्षा असेल तर त्याची सुरूवात domesticन्किंवा गेला बाजार IPL पासून करावी लागेल. श्रेयस अय्यर, हूडा, सँअसन, मनन वोहरा असे काही earmark करून करावे लागतील.

जोगिंदर, पांड्या ला ओव्हर देणे नि सेटल बॅटींग लाईन बदलणे ह्यात फरक नाही का ?

Pages