२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथले कुणी 'रात्रीस खेळ चाले..' बघतं का ?

अहो, गांवच्या गुरवाचा फोन होता- " आतां सेमी-फायनल आहे. ऑस्ट्रेलियासारखीच
वे. इंडीजवरही 'लिंबू-मिरचीची करणी' करायची असेल, तर डबल पैसे पडतील !"
karani.JPG

जेंव्हा जडेजा किंवा आश्विन गोलंदाजीला येतात तेंव्हा त्यांच्यात आणि धोनीमध्ये मस्त नेत्रपल्लवी चालू असते.... विशेषतः लेगला बॉल टाकायचा असेल तर धोनी मस्त खुणावुन सांगत असतो!

शिंचे कॉमेंट्रेटर सतत आता अवघड आहे, रन रेट अकरा वर आहे असं सांगत राहतात त्यांनी आण्खिनच प्रेशर येऊन आता आपण हरणार असं वाटत राहायचं>>> +१ ह्यात तो मांजरेकरांचा संजय आघाडीवर ! काल हर्षा भोगले ला मिस केला. हर्षा भोगले ने हे बोललं असतं तर कदाचित काही वाटलं नसतं, पण मांजरेकर बोलल्यावर सतत 'तू गप ना जरा बाबा' असलं फील येतं Happy नंतर हायलाइट्स पाहिल्या, त्यात सेहवागची हिंदी कॉमेन्ट्री होती. सेहवाग आणि त्याचा तो साथीदार अक्षरशः आरडाओरडा करत होते, नक्कीच खुर्चीतल्या खुर्चीत उड्या मारत पण असतील.
टी-२० ला रनर घेता येत नाही हे माहित नव्हतं. पण रिटायर हर्ट पण होता येत नाही का ? उगीचच बिचार्‍या विराट ला प्रत्येक मॅच मधे प्रेशर कुकर मधे बसवतात. मॅच नंतर फेबु वर सगळीकडे 'कॅन्सर मधून बाहेर पडून सुद्धा, आजच्या मॅच मधे जखमी होऊन सुद्धा फाइट केलं.. रिस्पेक्ट युवराज' असल्या कॉमेंट्स आणि फोटो पाहून कीव आली. मान्य आहे त्याची ही जिद्द स्तुत्य आहे. त्याच्या जिगरला सलाम आहेच. तरीही अनेक मॅचेस नंतर कधीतरी खेळल्यावर एकदम हे असं इमोसनल ब्लॅकमेल ! अर्थात तो एकटाच फेल जात नाहीये म्हणा. विराट खेरीज कोणीच कन्सिसटंट नाहीये सध्या. आज बाबा योगराज काय म्हणतात पहायला हवं. कोणीतरी उत्साही पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला जाईलच.
राहून राहून उगीचच एक वेडा विचार मनात आला, रोहित-शिखर ने कन्सिसटंटली फेल जाणे हा ही गेम प्लॅनचा भाग नसेल ना. शत्रूला गाफील ठेवायचं आणि शेवटच्या मॅचेस मधे त्या दोघांनी कुबल कुबल कुबलायचं.

कालच्या दोन्ही सामन्यांनी रविवारची संध्याकाळ बनवली. अफगाण विजयाने आपली मॅच सुरू व्हायच्या आधी मूड रिफ्रेश केला आणि मग संध्याकाळी जोरदार धमाका.. समोर मोठ्या आवाजात टीव्ही चालू आणि बघायला सोबत मित्रमंडळी नसल्याने व्हॉटस्सपवर ऑनलाईन कट्टा भरला होता.. समोरचा चेंडू पाहिला की लगेच डोके मोबाईलमध्ये खुपसले.. आई पण शेवटी ओरडली, अरे प्रत्येक बॉलची कॉमेण्टरी तिथे लिहिलीच पाहिजे का Proud

<< जेंव्हा जडेजा किंवा आश्विन गोलंदाजीला येतात तेंव्हा त्यांच्यात आणि धोनीमध्ये मस्त नेत्रपल्लवी चालू असते >> यशस्वी होवो न होवो, पण धोनी व सहकार्‍यांचे प्रत्येक फलंदाजासाठीं निश्चित डांवपेंच असतात, असं नेहमीं जाणवत रहातं, हें नक्की.
<< सेहवाग आणि त्याचा तो साथीदार अक्षरशः आरडाओरडा करत होते, नक्कीच खुर्चीतल्या खुर्चीत उड्या मारत पण असतील.>> अहो, सेहवागचं काय घेवून बसलाय, गावसकरसारखा स्थितप्रज्ञही काल शेवटच्या दोन-तीन षटकांत ओरडत होताच - "धिस इज ग्रेट! ", " धिस इज फँटॅब्युलस !!" "अनबिलीव्हेबल !!"
<< अलका कुबलच झालीये >> रोहितकडून आतां मात्र खूपच अपेक्षा आहेत; नाहीं तर आतां मुंबईत त्याला " माहेरची साडी" आहेच !! Wink
<< काल हर्षा भोगले ला मिस केला >> एका अर्थी, तो नव्हता तें बरंच झालं; कसली तरी जुनी आंकडेवारी देवून उगीचच समोर घडत असलेल्या अविस्मरणीय नजार्‍यावरचं लक्ष विचलीत केलं असतं !!

काल शोएबची सेहवाग फार फार खेचत होता. प्रत्येक शॉटला " हा बघ असा मी/सचिन आदींनी तुझ्या बॉलिंगवर अमुक तमुक मॅच मधे मारलेला" सतत त्याच्या बॉलिंगची धुलाई आनि पाकिस्तानचा पराभव यावरच सेहवाग प्रत्येक कमेंट्स घेऊन जात होता. शोएबच्या बोलण्यावरून तो वैतागलेला वाटत होता Wink

<< बघायला सोबत मित्रमंडळी नसल्याने ... >> मलाही मित्रमंडळीत बसून आतां मॅच नाहीं पहातां येत, ही खंत आहेच !बघूं, सेमि व फायनल निदान मुलगी, जांवई व, मुख्य म्हणजे, नातवाच्या कंपनीत तरी बसून पहातां येते का !!
<< रा खा चे च्या धाग्यावर पण टाका.> टाकलंय.

एक प्रकारचा किव्क फ्लिक इन्वॉल्व्ड असतो त्याच्या फटक्यांमध्ये म्हणजे चक्क क्रिकेटच्या हैसियतसे ते जुगाडू आणि चोरटे शॉट वाटतात मला पण ते प्रचंड इफेक्टिव आहेत कारण तो हवं तिथे लिलया स्टियर करतो बॉल! इथेच त्याच्या स्टाईलचं वेगळेपण दिसून येतं. शर्मा वगैरे त्याच्यापेक्षा खुप देखणे शॉट मारु शकतो. इन फॅ़क्ट शिखर सुद्धा पण ही पबलिक सहसा पुढे वगैरे आली की कधी कधी बीट होतात. दॅट्स व्हेअर कोहलीज अबिलिटी इज जस्ट फिनॉमिनल. झटकल्या सारखा शॉट मारतो, आपल्याला वाटतं १-२ रन निघतील तर कस्लं काय? गॅप मध्ये प्लेसमेंट असते अन बॉल बाऊंडरीकडे चाललेला असतो बिगीबिगी.
अतिशय लेट खेळतो तो! त्यानी एक सिक्स मारला तो स्लोवर बॉलला होता. इथे कित्येक लोकं धारातिर्थी पडतात पण त्यानी अगदी शेवटच्या क्षणाला त्याचा शॉट मॉड्युलेट केलेला असतो. बरोब्बर लोवर हँडनी जास्त जोर लावलेला असतो अन बॉल त्या पावर मुळे आरामात बाऊंडरी क्रोस करतो. जस्ट मार्वलस! शॉट देखणे नसतात त्याचे बट टु सी धिस होल प्रोसेस अ‍ॅट वर्क इज सच अ ट्रिट टु वॉच! >>> अगदी अगदी बुवा... भाऊ म्हणतात तस, तोच विराटचा स्ट्रीट स्मार्टनेस आहे.

खुप झाले कौतूक

आता जरा मुख्य गोष्टींबद्दल सुध्दा बोला. जास्त गोडाने "मधुमेह" होतो. जो की कधीही बरा न होणारा रोग आहे.

<< तोच विराटचा स्ट्रीट स्मार्टनेस आहे.>> विराटची 'स्किल लेव्हल'च अत्युच्य असल्याने ही 'स्ट्रीटस्मार्टनेस'ची जोड त्याला विशेषतः टी-२०मधे एका भलत्याच उंचीवर नेवून ठेवते !!

<<खुप झाले कौतूक >> आतां मायबापच जर असं म्हणाया लागले, तर ह्या पोरानी कवतुकासाठी कुणाच्या तोंडाकडे बघायचं !! Wink

भाउ जल्लोष ठिक आहे पण ज्या उणिवा गेल्या ५-६ मॅच मधून प्रकर्षाने दिसत आहे. त्यावर बोलायला हवे.
सगळे गुडीगुडी अजिबात नाही आहे. जितके आपण कोहलीचे कौतूक करत आहे. तो ऐनवेळेस अपयशी ठरल्यावर तितकेच त्याला बोलणार आहोत. त्यावेळेस आपण हे विसरून जाऊ की बाकीचे कोणीही खेळत नाही. दरवेळेस कोहलीच खेळला पाहिजे असा अट्टाहस नको. हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द ची गेल्यावर्षीची विश्वकप मधली मॅच मधे कोहली बेजवाबदार फटका मारून आउट झालेला पण त्यानंतर कोणी खेळले नाही हे विसरून गेलो आणि विराटला आणि बिचारी अनुष्काला बरेच काही बोलले गेले होते. (यात मी सुध्दा होतो. मी काही अपवाद नाही. भावना विस्कटतात तेव्हा सगळेच सैरभैर होतात)

वर जितके ही विनोद आले आहे. त्यातील विनोद बाजुला ठेवला तर बरेच विनोद हे कटू सत्य सांगणारे आहे असे म्हणावे लागेल.

धोनी १४ ओव्हरला बॅटींगला आलेला. तेव्हा कोहली ३० चेंडूमधे ३४ धावा काढलेल्या.
India 94/4 (67 runs required from 36 balls, RR: 6.71, RRR: 11.16)
भारताला अजुन ६७ धावांची गरज होती. जेव्हा मॅच संपली तेव्हा कोहली ५१ चेंडूत ८२ धावा वर होता आणि धोनी १० चेंडू मधे १८ धावा काढून उभा होता याचा अर्थ ६७ धावांपैकी ४८ धावा एकट्या कोहलीने काढल्या आणि धोनी ने १८ धावा. एकून धावसंख्येत कोहलीच्या ८२ धावा ५१ चेंडूंमधे आणि ५ फलंदांजांचे मिळून ७८ धावा ६९ चेंडूंमधे.

त्यात ही रोहीत शर्माने १२ धावांसाठी तब्बल १७ चेंडू खर्ची केले. ज्या भारतीय खेळपट्टीवर ख्वाजा आणि फिंच सारखे अवघ्या २० चेंडूंमधे ५० पेक्षा अधिक धावा कुटतात तिथे आपले सलामीचे फलंदाज चाचपडत खेळत होते. तरी बरे आपल्या गोलंदाजांनी २०० धावा दिल्या नाही. ज्या त्वेषाने इंग्लंडच्या सलामी फलंदाजांनी आफ्रिकेवर आक्रमण केले होते तो त्वेष आपल्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांकडे नाही षंढासारखे बेफिकरीने खेळत आहे. करा या मरा सामन्यात जो त्वेष दिसायला हवा होता तो या दोघांमधला हरवला आहे. नुसता मागे कोहली आहे तो करून घेईल आपण आपले धावा बघू या आशेवर अतिसंथपणा दाखवला. हीच दोघ आता आयपीएल मधे सुरुवातीपासून आक्रमण करतील. Angry
रैना पांड्या आणि जाडेजा हे तिघे ही निव्वळ नशिबाने टीम मधे आहे. रैना फिल्डींग आणि जाडेजा पांड्या थोडीफार गोलंदाजी चालली म्हणून संघात आहे. बाकी फलंदाजीमधे तिघांनी दिवे लावलेले आहे. जाडेजा पेक्षा हरभजन तरी फलंदाजी चांगली करतो असे म्हणावे लागेल आता. स्ट्राईक बदलने सुध्दा जमत नाही.
रैना जाडेजा पांड्या हे तिघे खेळले असते तर आपण न्युझीलंड पाकिस्तान बांग्लादेश विरुध्द आरामात जिंकलो असतो दरवेळेचे रडत रखडत तरी झाले नसते. पांड्या तर नशिबाचा चमचा घेऊनच मैदानात उतरतो असे वाटते. ऐनवेळेस त्याला विकेट्स मिळतात त्यामुळे त्याने दिलेले वाईड, षटकार चौकारची खैरात याकडे दुर्लक्ष होते.
मोक्याच्या वेळेस त्याला बसलेला मार हा सगळ्या संघावर भारी पडण्याची शक्यता आहे. नेहरा, इशांत हे दोघे या स्थितीतून गेले आहे. त्यांनी शेवटच्या टप्प्यात दिलेले प्रचंड धावा हे सामन्याचा कल बदलणारे ठरलेले.

आता दोन सामने राहिले आहे. त्यात धोनी काही बदल करणार नाही हे सत्य आहे पण स्पर्धा संपल्यावर या गोष्टींकडे लक्ष दिलेच पाहिजे.

मस्त झाली मॅच. कोहली तर अफलातून आहे. पण आपण बॅटींग मधे ३ लायेबिलीटीज घेऊन खेळतोय - नोहिट, धवन आणी रैना. युवराज सुद्धा, he is a pale shadow of his yesteryears म्हणावं असाच आहे. एकट्या कोहली वर अवलंबून रहाणं धोकादायक आहे. धोनी आता संघात बदल करणार नाही. पण पांडे, रहाणे ह्यांना रोटेशन मधे ठेवलं असतं, तर आऊट ऑफ फॉर्म लोकांवर वचक ही राहीला असता आणी ते दोघंही मॅच फीट राहीले असते.

युवराज विश्वचषक बाहेर
त्याच्या जागी मनिष पांडेची वर्णी लागली

युवराज विश्वचषक बाहेर
त्याच्या जागी मनिष पांडेची वर्णी लागली >> हे काय आहे नक्कि ? कुठे ? कधी ?

मनिष पांडे? बघायला पाहिजे. एक खेळाडू कमी म्हणून त्याला घेतील पण रहाणे आधीच स्क्वाड मध्ये असताना मला नाही वाटत त्याला खेळवतील. रोहित शर्मा सध्या तरी टोटल गँबल वाटत आहे. शिखर पण फायर होईना. आता सेमीज मध्ये सगळी कसर काढा म्हणा बाप्यानो! अत्यंत गरज आहे पहिल्या जोडीनी कमीत कमी ७० रन तरी ठोकायची. ते ही पटकन. निसटतं, ओझरतं, कोहली चालला म्हणून पेक्षा डॉमिनेट करुन जिंका म्हणा!

पांडेचे नक्की नाही झालेले अजून. शक्यता आहे असे म्हणतायत. मुंबईमध्ये स्टँडबाय म्हणून बोलावले आहे.

खर म्हणजे टी २० चा मी एवढा फॅन नाही पण विराटची या वर्ल्ड कपमधली कामगीरी बघुन आपल्या मायबोलीवर परत २०१५ च्या ५० ओव्हर्स वर्ल्ड कप नंतर यायला भाग पाडले... हॅट्स ऑफ विराट.. त्याच्या प्रत्येक विनिंग चेसची खेळी बघीतल्यानंतर असेच वाटते की ही त्याची आता पर्यंतची अत्य्युच्च खेळी होती .. पण एकापेक्षा एक सरस अश्या खेळी तो आपल्या पोतडीतुन काढतच राहतो.. कालची खेळी खरच तोंडात बोट टाकणारी होती.. शब्दच नाहीत..काय प्लेसमेंट्..काय टेंपरमेंट्..काय त्याचा मॅच अवेअरनेस.. सगळच थक्क करुन टाकणारे.. खरच प्रत्येक भारतियाला त्याचा अभिमान वाटावा असा तो क्रिकेटपटु आहे.

पण वर कोणीतरी योग्य लिहीले आहे.. एकटा कमावणारा बाप... Rofl

वैद्यबुवा...नेहमी प्रमाणे मजा आली तुझ्या कॉमेंट्स वाचुन Happy

अरे मुकुंद, हय किधर तुम? दिखताईच नई आजकल?
आता सेमीज ला ये भाऊ इथे चकाट्या पिटायला. Happy मी सुट्टी घेऊन घरी बसणार आहे गुर्वारी.

Pages