सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मानुषी, फारच सुर्रेख आहेत
मानुषी, फारच सुर्रेख आहेत फुलं.. डॉगवुड बद्दलही रंजक माहिती कळली.. शोध आता तुझ्या परिसरात हे फूल.
खरंच मस्त गप्पा आहेत इकडल्या..
(No subject)
वा! पांढरी सावर
वा! पांढरी सावर मस्त!
इंद्रधनुष्य, या Clematis gouriana/ मोरवेल / गोमेटीच्या मिशीवाल्या बिया.
वॉव, ईन्द्रा, मोरवेल
वॉव, ईन्द्रा, मोरवेल पहिल्यांदाच बघते आहे... कुठला फोटो?
आदिजो-----/\------ कीत्ती माहिती आहे तुम्हाला, चटकन ओळखलात..
डॉगवुड, मी पण काल गुगलुन पाहिले तेव्हा मानुषि ताईने टाकलेल्या फोटो पेक्षा वेगळे वाटले..
मॅग्नोलिया , शेफ्लोरा खुप
मॅग्नोलिया , शेफ्लोरा खुप मस्त..
हेमा ताई गजब रंग संगती आहे फुलांची.. सुरेखच
धन्यवाद अदीजो सायु हा फोटो
धन्यवाद अदीजो
सायु हा फोटो नाशिक, बागलाण मधिल मोरागडा वरचा
व्वा! व्वा! काय सुंदर सुंदर
व्वा! व्वा! काय सुंदर सुंदर फ़ोटो आहेत. मेजवानीच आहे डोळ्यांना
शांकलीने हे पांढर्या शेवरीचे
शांकलीने हे पांढर्या शेवरीचे फोटो आहेत असं पुढच्या पानावर सांगितलंय!!!
अगं शेफ्लेरा हे त्याचे बोटॅनिकल नाव आहे. इथे मराठी भाषेत त्याची प्रांतागणीक वेगवेगळी नावे असतील.
Clematis gouriana/ मोरवेल /
Clematis gouriana/ मोरवेल / गोमेटीच्या मिशीवाल्या बिया. >> मस्त फोटो. इथल्या काही क्लेमाटिस च्या बिया अशाच शेप मधे पण आकाराने लहान असतात.
साधना, त्याचं बोटॅनिकल नाव
साधना, त्याचं बोटॅनिकल नाव Ceiba pentandra आहे. शेफ्लेरा दुसरंच शोभेचं झाड असतं ना! इथे बघितली मी अजून काही माहिती पांढर्या शेवरीची:
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kapok%20Tree.html
सर्व गप्पा आणि फोटो
सर्व गप्पा आणि फोटो मस्तच्ग... मी रोमात/कोमात असणारे काही दिवस अथवा महिने..
संबाळुन घ्या माझ्याबगैर.. भांडू बिंडू नका.. काळजी घ्या..
फोटो सुंदर सर्वच. टीना .
फोटो सुंदर सर्वच.
टीना . लवकर शुद्धीवर ये. आम्ही वाट बघू .
टीना हाहा . लवकर शुद्धीवर ये.
टीना हाहा . लवकर शुद्धीवर ये. आम्ही वाट बघू डोळा मारा .
अन्जू.....यू आर म्हण्जे .......:खोखो:
इंद्रा पांढरी सावर काय नाजुक आहे!
रस्त्याकडेची फुलं
इंद्रा पांढरी सावर काय नाजुक
इंद्रा पांढरी सावर काय नाजुक आहे! मम मानुषीताई. मी अजून हि सावर बघितली नाहीये.
ताई रस्त्याकडेची फुलं सुंदर. पिवळी लिली आहेका ती. तिच्याशेजारी ती निळसर जांभळट फुलंपण क्युट आहेत.
पिवळे डॅफोडील्स आहेत. आम्ही
पिवळे डॅफोडील्स आहेत. आम्ही पण ह्या सर्वांची वाट पाहातो आहे.
धन्यवाद नलिनी. मी डॅफोडील्स
धन्यवाद नलिनी. मी डॅफोडील्स नाही बघितली कधी. ती कविता मात्र आठवली इंग्रजी.
येस्स नलिनी तेच लिहायला आले
येस्स नलिनी तेच लिहायला आले होते.
अन्जू..... हे घे....माझी आवडती कविता....विल्यम वर्ड्स्वर्थची ...डॅफोडिल्स
wandered lonely as a cloud
That floats on high o'er vales and hills,
When all at once I saw a crowd,
A host, of golden daffodils;
Beside the lake, beneath the trees,
Fluttering and dancing in the breeze.
Continuous as the stars that shine
And twinkle on the milky way,
They stretched in never-ending line
Along the margin of a bay:
Ten thousand saw I at a glance,
Tossing their heads in sprightly dance.
The waves beside them danced; but they
Out-did the sparkling waves in glee:
A poet could not but be gay,
In such a jocund company:
I gazed—and gazed—but little thought
What wealth the show to me had brought:
For oft, when on my couch I lie
In vacant or in pensive mood,
They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
And then my heart with pleasure fills,
And dances with the daffodils.
छान छान. धन्यवाद मानुषीताई.
छान छान. धन्यवाद मानुषीताई.
आहाहा.. मानु... शाळेची आठवण
आहाहा.. मानु... शाळेची आठवण करून दिलीस.. डॅफोडिल्स.. वर्ड्सवर्थ प्रिय प्रिय !!!!!!!!!!
तेंव्हा डॅफोडील्स म्हंजे नक्की कोणती फुलं ते माहीत नव्हतं.. पण आमचे सर रंगवून ही कविता शिकवत होते आणी भर थंडी च्या दिवसातले सकाळचे कोवळे , सोनेरी ऊन वर्गाच्या एका कोपर्याला न्हाऊन टाकत होते.. बस्स त्या दिवसापासून डॅफोडील्स आणी सोनेरी ,पिवळा रंग यांचे कनेक्शन फिक्स झाले डोक्यात. अजूनही नुस्तं हे दृष्य जरी आठवलं तरी मन प्रसन्न होतं , फ्रेश वाटतं अगदी!!!
मानुषी, इन्द्रा.. सुपर सुपर फोटोज!!!
मस्त डॅफोडिल्स! फुलं पण, आणि
मस्त डॅफोडिल्स! फुलं पण, आणि कविता पण.
इंद्रा फोटो झकास. मानुषी,
इंद्रा फोटो झकास.
मानुषी, धन्स डॅफोडिलस साठी.
मी जेव्हा लंडन ला एप्रिल महिन्यात गेले होते तेव्हा हीथ्रोच्या बाहेरच एक उतारावर ही मुद्दाम लावलेली होती. ही माझी डॅफोडिलसशी झालेली प्रथम प्रत्यक्ष भेट. बाकी वर्ड्स्वर्थच्या कवितेमुळे ती मनात एक स्वर्गीय फुलं म्हणून कायमच रुजलेली होती. लंडनचं ते करडं आकाश, जमीनीवर हिरवळ आणि त्यात आपल्या माना हळूच उंचाचून जगाकडे बघणारी ही हार्यांनी फुललेली पिवळीजर्द फुलं. ही प्रथम भेट मनात कोरली गेलीय कायमसाठी. मग नंतर आठ पंधरा दिवस सतत रस्त्याच्या कडेला, घरासमोरच्या बागेत, सार्वजनिक उद्यानात, रेल्वे स्टेशनवर वगैरे ही भेटतच होती. मी इतकी भारावून गेले होते की गुगलून ही कविता तेव्हा परत परत वाचली होती
तुला मी सांगणारच हेते ह्या फुलांचे फोटो पाठवायला पण न सांगताच तु भेट घडवून आणलीस आमची ( स्मित)
ही माझ्या कडची
From mayboli
आणि ही जवळून
From mayboli
ही प्रथम भेट मनात कोरली गेलीय
ही प्रथम भेट मनात कोरली गेलीय कायमसाठी >> सहीच.
डॅफोडिलस फक्त यशराजच्या चित्रपटातच बघितले आहेत.
मानुषीताई काय सुंदर फुले
मानुषीताई काय सुंदर फुले टाकतेस ग. छानच.
शेल्फेरा आणि मोर वेल पहिल्यांदाच पहातेय.
मी डॅफोडील्स नाही बघितली कधी.
मी डॅफोडील्स नाही बघितली कधी. >>>>>>>>मी पण नाही पाहिली कधी!
मानुषी, खूपच सुंदर फोटो आहेत तुझ्याकडे. कसली सुंदर दिसतायत ती लव्हेंडर, पिवळी, निळी फुलं. सुरेखच. इंद्रा मस्त फोटो.
साधनाने दिलेले दोन्ही
साधनाने दिलेले दोन्ही गिफ्ट माझ्या अंगणात फुलतायत.
डबलचे अडेनिअम. हे तिने नर्सरीतून आणले होते.
हे अडेनिअम तिच्याच घरच्या अडेनिअम परीवारातून जन्माला आलेले तिने दिले होते.
ममो. सुरेख आहेत फुलं. जवळून
ममो. सुरेख आहेत फुलं. जवळून खूपच छान दिसतायत. (प्रत्यक्ष कधी बघायला मिळाणार? :अओ:)
जागू, मस्त आहे रंग फुलांचा.
तुम्हा सर्वांमुळे विविध फुलं पहायला मिळतात. धन्यवाद सर्वांना !
प्रत्यक्ष कधी बघायला
प्रत्यक्ष कधी बघायला मिळाणार?>>> भारतात हे फुलतील का ? पुढच्या भारतवारीत ह्याचे कंद मी आणू शकते. त्यानिमित्ताने नि.ग. करांना भेटणे देखील होईल.
हेमाताई, इंद्रधनुष्य, जागु
हेमाताई, इंद्रधनुष्य, जागु फोटो मस्त, मस्त, मस्त.
भारतात हे फुलतील का
भारतात हे फुलतील का ?>>>>>>>>>>.दिनेशदा, उत्तर द्या.
पुढच्या भारतवारीत ह्याचे कंद मी आणू शकते. >>>>>>आण. आण. लावून बघूया.
त्यानिमित्ताने नि.ग. करांना भेटणे देखील होईल.>>>>>>..नक्की. नक्की.
वर्षू आणि ममो....सुंदर
वर्षू आणि ममो....सुंदर पोस्टी. सर्वांना धन्यवाद.
इथे आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग असतो वसंतातला वेगळा .... कुठेही कॅमेरा धरा क्लिक करा. नक्की सुंदर फोटोच मिळणार.
जागू ड्बल एडेनियम सुंदर.
Pages