निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव सायली मस्त..
पळसाची फुलं खुप जास्त आवडतात मला..
उन्हाळ्यात या दिवसात प्रवास करताना कडूलिंबाच्या झाडांबरोबर र्स्त्याच्या दोन्ही बाजुने आणि जंगलात अगदी कुठही ठळक उठून दिसतात..खुप मस्त वाटत.. आणि त्यांचा तो मखमली स्पर्श.. वाह...

माझा एक प्रश्न आहे .
मी एक अनंताच रोप लावले आहे साधारणपणे १-२ ft उंच असताना आणले होते. त्याला झाल जवळजवळ १ वर्ष . अजिबात म्हणजे अजिबातच वाढल नाही . एक दोन पान आली असतील नसतील पण वर्षभरात जाणवण्या इतपत काहीच वाढ नाही . झाड अगदी healty दिसते . आजूबाजूची झाड वाढतात.
अनंत ची वाढ इतकी कमी असते का ? कोणाकडे असेल तर please फोटो टाकाल का ?
म्हणजे मी ज्याला अनंत म्हणतीये तो तोच का हे मला कळेल >
( मला फोटो नाही टाकता येत नाहीतर टाकला असता )

जागू, माझा आवडता खाऊ... शाळेपासूनचा !!!

मृणाल १, झाड कुंडीत आहे का ? बहुतेक जागा कमी पडतेय वाढीला. आणि अनंताचे झाड लहरी असते. एक अंधश्रद्धा म्हणजे ग्रहण लागले असता त्याची छाटणी केली, तर त्याला फुले येतात. झाड हेल्दी आहे म्हणजे असाच काहीतरी उतारा करावा लागेल !!!

मला कधी सवड मिळणार कुणास ठाऊक, पण हा खजिना कधी तूमच्यासमोर मांडतोय असे झालेय खरे..
तर हि दार्जीलिंगची "रानफुले" !!!

DSCN0912.JPG

ही तर चक्क उभ्या कातळावर, भिंतीवर सगळीकडे होती..

DSCN1003.JPG

@ दिनेशदा - झाड कुंडीत नाहीये . त्याच्या शेजारी जास्वंद, कडीपत्ता, जाई चा वेल आहे . शेजारी पाम पण आहे .
मला अनंत ची फुले आणि वास खूप आवडतो म्हणून काहीतरी करावे लागेल. तुम्ही सांगितलेला उपाय बघू करून Sad Sad Sad

वॉव...... दार्जिलिंग ची फुलं किती सुर्रेख...... आहाहा..काय रंग आहेत!!!

जागू, तोंपासु होतंय खाऊ बघून..

सायु, इकेबाना शिकतेयंस?? छान रचना!!! Happy

दिनेश दा, कीत्ती सुंदर फुले, ती गुलाबी कसली गोड आहे..
वर्षु दी, हो ग, सगळ्यांना ईकेबानाचा अनुभव सांगायचा आहे, पण लिखाणाचा कंटाळा...
मृणाल, उन लागत नाहीये का अनंताला, बाकीच्या झाडांची सावली येते आहे का?
रच्याकने माझ्या कडे कुंडीतले अनंताचे रोप आहे, आणि त्याला कळी धरली आहे...:)

माणिकमोती, इथे सायू म्हणून ज्या सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांनी चाफा यशस्वीरित्या फुलवला आहे.

पुदीन्याची जुडी आणली कि त्यातल्या जाड देठाची खालची टोके कापून पाण्याच्या ग्लासमधे ३/४ दिवस ठेवा. त्यांना मूळे फुटतील, मग ती कुंडीत लावा. पुदीना सहज रुजतो, पण नंतर मात्र सर्व कुंडी व्यापून टाकतो. नियमित खुडावा लागतो.

सायु, खरच लिही इकेबाना बद्दल. खूप इंटरेस्ट आहे त्यात. आजची पुष्प्रचना ही सुंदर.

जागू, रानमेवा उचलुन तोंडात टाकावासा वाटला आता खर तर अशा गोष्टी खायच वय निघोन गेलं आहे तरी ( स्मित)

दिनेश, झलकच एवढी छान तर चित्रपट किती सुंदर असेल. उत्सुकता ताणली गेलीय.

मृणाल, माणिक मोती इथे तुमच्या समस्या नक्कीच सोडविल्या जातील. ( स्मित)

मृणाल तू म्हणतेयस त्याच्या झाडाबाजूला एवढी झाडे आहेत म्हणजे नक्कीच उन कमी पडत असणार. आणि अनंत तसा संथच वाढतो. इतर झाडांप्रमाणे भराभर नाही वाढत. त्याला उन मिळेल असे बघ.

सायू.. या झाडाची पाने माझ्या दोन्ही तळव्यांपेक्षाही मोठी होती !

जागू, या फुलाच्या कळीचा आकार बदकासारखा असतो. कुंपणावर सोडायला चांगली वेल आहे हि !

दिल्ली विमानतळावरून दिसलेला मावळता सूर्य !

DSCN1541.JPG

दिनेशदा, वरचा वेल आमच्या शेजार्च्या कंपाउंडवर होता. mosquito replant म्हणून उपयोगी आहे असं वाचलं होत.

मागे एक फुलबाज्या फुलाचा फोटो टकलाय ते जिरानियम चे रोप.ते हि mosquito replant म्हणून उपयोगी आहे.
त्याच्या पानांना एक आंबूस वास येतो. मला फार आवड्तो.त्याची फुलेहि विविध रंगात येतात.

Pages