रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुत तर तो वेडा नोकर आहे ना? जाहिरातीतच तर सांगितलेलं.. तोच म्हणतो ना? " झाड़ म्हंजे कोन?? मीsssss!"

भुत तर तो वेडा नोकर आहे ना? जाहिरातीतच तर सांगितलेलं.. तोच म्हणतो ना? " झाड़ म्हंजे कोन?? मीsssss!" >> आपण म्हणतो ना तो?

अरे हो.. आपण!! पण म्हणजे तोच भुत ना? की तो झाड़ म्हणजे त्याला भुताने झपाटले आहे? >> हां, झाड म्हणजे ज्याच्या मानगुटीवर भुत बसतं तो माणूस. Proud

म्हणजे भुताटकीच्या घरात हिस्सा नको म्हणुन शास्त्रज्ञ सुन नकार देईल. धाकटी जाऊ घरात येण्या आधीच तिच्याविषयी संशय निर्माण करायचा. बापरे Uhoh

अरे झाड म्हणजे झपाटलेला माणुस. तो नोकर भूत नाहीये. पण समजा भूत असेल तर ते त्या नोकराच्या वेषात येत, कारण तो नोकर घरातलाच असल्याने त्या निलीमाचा पोरगा त्याच्या बरोबर रात्री- अपरात्री सुद्धा विश्वासानेच हिन्डणार की.

अरे झाड म्हणजे झपाटलेला माणुस. >> ज्या माणसाला पकडतो ते झाड.. अंगात असल्यावर त्याला झाड नाय म्हणत..ते सार्‍या समस्यांच मूळ होऊन बसत Proud

इथल्या भुतांना वेगवेगळे सदरे चढवता येत असेल कि..

मला वाटतय की या मालिकेमध्ये टिपीकल भूत नसून नारायण धारप यांच्या चेटकीण कथेमधील जशी अघोरी दुष्ट ताकद पुर्ण घरावर ताबा ठेवून घरातिल मेलेल्या माणसांच्या अत्म्यंना काबू करते अशा प्रकारचे वाटते .

नक्कीच मालवणी भुभु आहे . बेरी नाना असेच
बडबडले पण दत्ताने मुद्दामच सांगितलं बिडीचा वास
येत आहे. झोपाळा दत्तानेच हलवला व तो बाजूला
झाला . फोन मुद्दामच केला नाही व निरोप वेड्याकडे
दिला जेणेकरुन तो पोहोचू नये . लग्न होऊ नये म्हणून हा आटापिटा. प्रॉपर्टी इशूमुळे हे सगळ चालल आहे .

दत्ता प्रॉपर्टीसाठी हे सगळं करतो आहे .

ठोकळा ठोकळी च ठोकळ Rofl

सगळ्यात भारी ते बेरि नाना आहेत ..झोपल्या झोपल्या चांगला अभिनय करून वातावरणनिर्मिती तरी करतात...बाकी ठोकळा ठोकळी बद्दल न बोललेलेच बरे

काय हसत्येय मी वेड्यासारखी Lol बेरि नाना, अण्णा फोनवरून निवर्तले, ठोकळा ठोकळी! एक सेकंद ही मालिका न बघता उत्तम मनोरंजन!

अर्रे Rofl

बेरी नाना काय!

भु भु काय.

इकडच्या चर्चेमुळे उगीच आजचा एपिसोड बघत बस्लेय.
कोण महाबंडल अ‍ॅक्टर्स आहेत हे सगळे?

बादवे, कोणता वकील काळा कोट घालून घरगुती कार्यक्रमांत येतो?
काहीही! वकील म्हटले की काळा कोट दाखवायलाच हवा का!

काय नाय. इस्टेटीवरुन वकील काका लेक्चर देत बसतात. इस्टेटीत थोरला बन्ड्या ( ठोकळा-माधव), मधला दत्ता ( अडकीत जाऊ बाई, खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता, नाईक अण्णाना मुलगा झाला नाव ठेवले दत्ता), धाकटा अभिराम ( देवकीचा वुड बी), बहीण छाया, या त्रिमुर्तीन्ची आई असे वाटे आहेत. पण सहावा वाटा पण आहे, तो तेराव्याला कळेल.

अभिराम भडकुन दत्ता ला बोलतो की तो व्याह्याना उलटे का बोलला. इकडे दत्ताची सत्ता ( त्याची बायको) खूप रागवते. ती म्हणते इस्टेटीत वाटेच नको कारण सगळे तिच्या नवर्‍यालाच बघावे लागते. इकडे ठोकळी, ठोकळ्याला म्हणते की आता मुम्बईला जाऊन तेराव्याला परत येऊ, पण ठोकळा नाही म्हणतो. ठोकळी रागवुन पारावर जाऊन बसते, पण तो नाथा ( नोकर ) म्हणतो तिथे बसु नका. ती रागाने उठते तर मागुन फान्दी तुटुन पडते. पण ठोकळी हे सगळे आधी माहीत असल्यासारखे ओ एम जी बोलते.

इकडे अर्चीस ( पिल्लु ठोकळा), पूर्वा, खुळा पान्डु आणी अभिराम फिरायला जातात. जेव्हा दत्ताची सत्ता त्याच्याशी भान्डते तेव्हा ती रागाने लिम्बाचे दोन भाग करुन शाप देते की जो त्यान्ची जमीन घेईल तयला रक्ताची उलटी होईल.

पण हे असं दाखवून कोकणात भुताटकी, करणी, इस्टेटीची भांडणं हेच असतं की काय हा समज होईलना. एकाने लिहिलेय झी मराठीच्या पेजवर कितीतरी चांगल्या गोष्टी कोकणात असताना हे काय दाखवतायेत.

मला आवडतेय. खूप उसुकता. सगळेच कलाकार नवीन एक अण्णा सोडले तर . पण अण्णाना पहिल्या दोनच भागात ढगात पाठवलं . नंतर ते भूत म्हणून दाखवतील बहुतेक. अशा पद्धतीची मालिका खूप दिवसात आली नव्हती. गावाकडची वगैरे. सगळे कलाकार नवखे त्यामुळे स्वस्तात झाली असेल. पण सस्पेन्स मस्त ठेवला तर आवडेल बघायला. नाहीतर आत्ता पर्यंतच्या सगळ्या शहरी मालिका असा .आणि जाऊ द्या र.किती कीस पाडताय भाषा बिशा आणखी काय काय . बघा जरा. आगे आगे होता है क्या भिडू Happy
सहावा वाटा कोंबड्यांचा असेल बहुतेक Happy

अरे हो, आज त्या बाहेर फिरणाऱ्या मुलीचा स्टेट्स कळला. भूत बीत काही नाही, नाथा गड्याची मुलगी आहे ती आणि सगळ्यांना व्यवस्थित दिसते ती. फुकाचा सस्पेन्स दाखवत होते दोन एपिसोडमध्ये Sad

Pages