रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धटली | 25 February, 2016 - 00:31
क्लिओपात्रा स्वराने बघ बरोब्बर मांडले ठो चे त्या वाक्यात आलेले एक्सप्रेशन्स.<<<< Proud Proud Proud

रच्याकने अण्णांचं तेरावं कधी आहे ??...अभिरामची ती होणारी गूढ दिसणारी बायको शीर्षक गीतात कुठे दिसत नाही म्हणजे बहुतेक अण्णांच्या तेराव्याच्या आत ती गचकणार....तेवढीच वाड्यातल्या बाकीच्या भूतांना आणखी एक सवंगडी मिळेल Proud

चूल पेटवली का या प्रश्नाला दत्ताची बायको म्हणते की आमच्या घरात माणसं जास्त ना, मग रोज कोण देणार? > पण त्याच वेळी घरात अभिराम ची होणारी वधू आणि आई वडील ही दाखवले.
एकूण मालिकाच गंडली आहे. लेखक कन्फ्युज्ड आहे.

हो, माझ्याही मनात तोच विचार आला होता. तिथे ती "हाsss" वकिलाला म्हणते आहे, फ़क्त पहिल्या दिवशी शेजारयानी जेवण दिले, आज नाही तर त्याच वेळी ती अ.ची गुढ बायको आणि तिचे आई वडील परत जाताना दाखवले.

आपल्याला दाखवताना दत्ता कल्प्रीट आहे असे दाखवतायत..पण खरे कल्प्रीट कोणी दुसरेच असणार...
दत्ता त्या सुश्मा ला (नाथा ची मुलगी) पण हीडीस फिडीस करतो.

हे सुश्मा आणि नाथा कोण आहेत ??...तो लाकडं तोडणारा नोकर का ?? >>> होय. आणि सुश्मा नाथा ची मुलगी बहुतेक.

क्लिओपात्रा अग तिथे त्या म्हातार्‍याला खपवायला बसलेत सगळे आणि तु त्याच्यातोंडात थर्मामिटर काय देतेस? विडी समजुन झुरके मारतोय बघ तो
Lol Lol

ती बाहेर बसलेली मुलगी म्हणजे सुश्मा ला (नाथा ची मुलगी) होय.. ती हाssssssय नाsssssय वाली लिम्बु चिरुन खिडकी बाहेर का टाकते?
ते माधवचे पात्र तर पुर्ण गन्डलेले आहे.कहि अभिनय येत नाहि त्याला... चेहर्या वरचे भाव तर रस्ता चुकल्या सारखे वाटतात.

फक्त अण्णांच्या माईला .
बाकी सगळे नॉरमल दिसतायेत .

चेहर्या वरचे भाव तर रस्ता चुकल्या सारखे वाटतात.>> प्रोफेसर म्हणून का ?? आठवा नांसौभ चे हेमंतकाका Happy .

आज अर्चिसभाऊ पाण्यात बुडून मरणार बहुतेक >> तो अर्चिस पाण्यात बुडून मेला तरी तरी ती ठोकळी सायंटिस्ट (तितक्याच थंड ,मख्ख चेहऱ्याने ) त्या ठोकळ्या प्रोफेसर ला म्हणेल जावूदे रे पाय घसरून पडला असेल त्यात काय एवढे Uhoh

Pages