रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl १० नम्बरच्या पानावरचे सगळे प्रतीसाद वाचुन मी हसून दमले,आईग! हसवेना आता. हॉरर कसली, भयानक विनोदी बनलीय ही मालीका.:फिदी:

वैभ्या, आई आणि ती दारात बसलेली मुलगी यांचे दोन वाटे आहेत रे. उगा हिशोब लावत बसु नकोस Lol

अण्णा लग्गेच भुत पण झाले.
का ते आधीचेच कुठले भुत असेल?
अण्णा म्हटलं की मला कार्दु मधले अण्णा आठवतात. श्श्या. >>>>>> सस्मित लोल .

मनाली , आपोआप कुठे ??? लटकलं कोनीतरी त्यावर .
त्यांना ' मेरी बेरीके बेर मत तोडो' गाणं आवडायचं>>> देवा !!!!

टिना, अजून यु ट्युबवर आलं नाहीये गाणं. Sad

आज तू ताईच्या घरी जा च आणि गाण्यासकट एक एपि बघ. Happy मग तुला इथली चर्चा वाचून पण सगळं पटकन कळेल. आणि एन्जाॅय पण करशील. Happy

<<<मनाली , आपोआप कुठे ??? लटकलं कोनीतरी त्यावर .>>>

स्मायलीतल्या झोपाळ्यावर लटकलेले जे दिसताहेत ना ते अण्णाच आहेत
पण आपण ते दिसत नाहीत अस समजायच कारण रिकाम्या झोपाळ्याची स्मायली नाही ना सापडली Proud Proud Proud
Wink Wink Wink

खालील पात्रांचा अण्णांशी (हे गेलेत) तसेच परस्परांशी नातेसंबंध सांगुन एका शब्दात नावं सांगा. (२० मार्क) Happy
१.एक मुलगी ताटात कडमडते -
२.एक मुलगी घराबाहेर घरासमोर बसलीये -
३. एक विधवा बाई -
४. एक मिसेस अण्णा - माई?
५. एक आपल्या घरात कोंबड्या नाssssय वाली -
६. एक ठोकळी शास्त्रज्ञ -
७. सापु साठी नवर्‍यामुलाकडे आलेली करारी बाणा असलेली वधु - देवकी?
८. ठोकळी शास्त्रज्ञ चा ठोकळा .. आपलं ..नवरा -
९. मिशीवाला माणुस (मला वाटतं आघकोंना वालीचा नवरा) -
१०. बेरि म्हातारा - नाना?

अजुन कोण राहिलंय?

बघणार्‍या, न बघ्णार्‍या, बघायला सुरुवात करणार्‍या, इथेच वाचुन बघण्याचा आनंद घेणार्‍या सगळ्यांना उपयोगी पडेल हे Happy

आता बोला, सहावा वाटा कुणाचा? आत्म्याचा, न बोलणार्या मुलिचा, अण्णाच्या कुणी मेलेल्या मित्राचा/ मेलेल्या भावाचा, अण्णाच्या मैत्रिणिचा :डोमा:, मैत्रिणिच्या मुलाचा, खुद्द अण्णाचा..... वगैरे.

१.एक मुलगी ताटात कडमडते - पुर्वा
३. एक विधवा बाई - छाया, अण्णांची मुलगी
५. एक आपल्या घरात कोंबड्या नाssssय वाली - अण्णांची सुन
६. एक ठोकळी शास्त्रज्ञ - अण्णांची ठोकळी सुन निलीमा

८. ठोकळी शास्त्रज्ञ चा ठोकळा .. आपलं ..नवरा - माधव
९. मिशीवाला माणुस (मला वाटतं आघकोंना वालीचा नवरा) - द्त्ता

सुरुवातीच्याच डायलॉग मधे सटपटली मी...
अरे काय ढीम्म आहे हि शास्त्रज्ञ..
कोणे कास्टींग करणारा..आणा त्याला इथं धरुन...

आर्चिस नाव पहिल्यांदा ऐकतेय..
आम्हाला फक्त ते ग्रिटींग कार्ड अन बदामाच्या आकाराच्या उश्या मिळण्याचं ठिकाण वाटायचं..
ती कसली मुज्जोर दाखवलीए.. नवरा बिच्चारा वाटतोय..

एक गाडी चालवणारा मुलगा >>>कुठली गाडी??>>> घोडागाडी! Biggrin :G:G:G:

तो आर्चीस आहे .ठोकळा ठोकळी च ठोकळ!

ए... मायबाप बैठक खोलीत बसुन असताना तिथं येऊन फोन कानाला लावणारं कुमारवयातील पोरगं मी पहिल्यांदाच पाहतेय.. हि नक्कीच भुताटकीची मालिका हय.. नो डाऊट..

आणी त्या बेरि ना बाहेर ओट्यावर / अंगणात काय झोपायला दिलंय? थंडीवार्‍यात. एखादी आतली / अडगळ खोली दाखवायची ना.

>>
>>>मला मेन कल्प्रिट कोण आहे ते लक्षात आलंय. सांगू का? <<<

पब्लिक फोरम आहे हा त्यामुळे नका सांगू. Wink

Pages