रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चकवा लागणार आता >>>
चकवा आपण म्हणजे प्रेक्षकांनाच लागला. तो १/२ मिनिटाचाच सीन होता, पण आपल्याला १० मिनिटं दिसला !!! Wink

हो ना... अण्णा कशामुळे गेले हे सांगायची पण गरज नाही वाटली...नको तिथे रहस्य..आधी चेहर्या वरचे हावभाव बरे करा...
तो अभिराम इतका चालत होता कि देविका च्या घरापर्यंत चालत जातात कि काय असा वाटू लागलं...

चकवा आपण म्हणजे प्रेक्षकांनाच लागला. तो १/२ मिनिटाचाच सीन होता, पण आपल्याला १० मिनिटं दिसला !!! >>>>> :G:G

मालिकेत एका कार च्या क्लोस अप ला एक काळ्या रंगाची कोंबडी दिसते.कुणाला काही कल्पना...तीचा काय रोल असावा...?>> क्क्क्क्क्क्क्क्क्काय????? कोंबडी ????? आपल्या घरात कोंबडया नाSSSSय!!! Uhoh

>>> ईन जनरल नाय वो<<<<

कोकणात साखरपुड्याक नवरी मुलगी मुलाकडे जाना नाय, तर नवरो मुलगो मुलीकडे जाता. जल्ला, अर्धवट डोकी ह्यांची.

निधी..वेल डन..
आता पात्रांची ओळख द्या..

शास्त्रज्ञ नाव
तिचा नवरा- नाव
त्याचा पोरगा- नाव
ये साला देवकी कौन है..
अण्णा कळले
बेरि म्हंजी ?
नणंद- नाव ?
भावजय आहे का ?
ज्याच लगीन असत तो कोण?
नार्वेकर कोण ?

शास्त्रज्ञ नाव
तिचा नवरा- नाव- माधव
त्याचा पोरगा- नाव - आर्चिस
ये साला देवकी कौन है.. देविका - अभिची होणारी बायको
अण्णा कळले
नणंद- नाव ? - छाया
भावजय आहे का ?
ज्याच लगीन असत तो कोण? - अभि अण्णांचा धाकटा मुलगा
नार्वेकर कोण ? अभिचे सासर

राहिलेली ना आठवेनात.

त्यांना ' मेरी बेरीके बेर मत तोडो' गाणं आवडायचं.>> Rofl
टिना, अगं ते बेडरिडन आहेत ना, म्हणून बेरि - बेडरिडनचा शाॅफाॅ.

पहिल्या भागात टपकते ते कोण ?>>>>
अण्णा चे पप्पा का ? >>>>>

Nidhii | 24 February, 2016 - 13:53

अगं अण्णाच टपकते.>>>>>>

त्यांना ' मेरी बेरीके बेर मत तोडो' गाणं आवडायचं>>>>>>>>
खोखोखोखोखो!!!!!!
:G:G: :ह्ह्गलो

<<<अगं अण्णाच टपकते.>>>
हो पण अण्णा परत आलेत ना भूत बनून ........scary ghost.gif
विडीचा वास येतोय ….cigar_smoker-3517.gif
झोपाळा हलतोय आपोआप ........28.gif

अण्णा लग्गेच भुत पण झाले.
का ते आधीचेच कुठले भुत असेल?
अण्णा म्हटलं की मला कार्दु मधले अण्णा आठवतात. श्श्या.

अरे पण मागच्या पानावर कोणीतरी माहिती लिहिलिय त्यात तर ते चार भाऊ म्हणलेल आहे ना.. अजूनपर्यंत तीनच भाऊ दाखवतायत. चौथ्याचा उल्लेख पण नाय. की तो आधीच मेलाय?

अरे पण मागच्या पानावर कोणीतरी माहिती लिहिलिय त्यात तर ते चार भाऊ म्हणलेल आहे ना >>>> ४ भाउ नाय , ४ भावन्डे. तीनच भाऊ आणि एक बहीण असावी.

Pages