रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा नवरी मुलगी येते तेव्हा बाहेरच्या अन्गणात बाजूलाच एक सुन्दरशी मुलगी उदासपणे बसलेली दाखवलीय, बहुतेक निळ्या गाऊन की ड्रेसमध्ये, तिला पाहीलय का कुणी? ती कालच्या भागात कोणाची कोण असते ते कळलेच नाही.:अओ: निदान ती छाया त्या कुटुम्बातली मुलगी आहे आणी विधवा आहे हे कळले.

पाहिला कालचा भाग
ठीक होता ,
ती सायंटिस्ट सून कसली भयंकर विचित्र दाखवलीये , मला तर आधी अस वाटल कि ती आत्मा आहे कि काय Wink Wink Wink
scared-ghost-smiley-emoticon.gif

मला तरी कालचा एपिसोड आशादायक वाटला; बराच तपशील दाखवण्यामागे खूप विचार होता असं वाटलं. [ कोकणी वातावरण व भाषा असल्याने, सिरीयल नियमित बघणं माझ्यासाठी तरी अपरिहार्य ! Wink ]

ज्यांना भाषा खटकतेय त्यांनी ही मालिका कोकणाच्या बाहेरही पाहिली जाणार आहे हे लक्षात घ्यावं. कोकणी भाषेचा आभास निर्माण करण्यापुरतंच कोकणी ठीक आहे, समजलीच नाही तर बाकी कुणीही पाहणार नाही. मच्छिंद्र कांबळी हे सुद्धा त्यांच्या नाटकाचा पुण्यातला प्रयोग मराठीतूनच करायचे.

<<अशी थट्टा केलीत तर बंद करून टाकीन मालिका.>>
नको नको
अस करू नका , कारण मराठीमधे सध्या कुठलीही विनोदी मालिका नाहिये ही तरी सुरु राहू दे....:P Proud Proud

<<ज्यांना भाषा खटकतेय त्यांनी ही मालिका कोकणाच्या बाहेरही पाहिली जाणार आहे हे लक्षात घ्यावं. कोकणी भाषेचा आभास निर्माण करण्यापुरतंच कोकणी ठीक आहे, समजलीच नाही तर बाकी कुणीही पाहणार नाही. मच्छिंद्र कांबळी हे सुद्धा त्यांच्या नाटकाचा पुण्यातला प्रयोग मराठीतूनच करायचे..........+१>>

मला अस्सल मालवणी भाषा माहिती नाहिये , त्यामुळे मला तरी कालच्या एपिसोडमधे भाषा खटकली नाही

मला अस्सल मालवणी भाषा माहिती नाहिये , त्यामुळे मला तरी काळच्या एपिसोडमधे भाषा खटकली नाही
>>
मला पण नाही खटकणार
:बघू की नको या विचार पडलेली बाहुली:

<<या मालिकेतलं भूत टीव्हीतून घरात उतरतं तो एपिसोड येईपर्यंत काय चेष्टा करायचीय ती करा..>>

अस घाबरवू नका हो ..afraid-male-afraid-frightened-smiley-emoticon-000293-large.gif

मालिकेत एका कार च्या क्लोस अप ला एक काळ्या रंगाची कोंबडी दिसते.कुणाला काही कल्पना...तीचा काय रोल असावा...?

बावजूद सबके,बाकी मालिका आवडली.स्लॉट होता म्हणून त्यांनी काढली आणि आम्ही पाहिली.आजपण बघू.

कालचा पहिलाच भाग. त्यामानानी सुसह्य होता. भाषा खटकली नाही. मालवणी येत नाही.

<ज्यांना भाषा खटकतेय त्यांनी ही मालिका कोकणाच्या बाहेरही पाहिली जाणार आहे हे लक्षात घ्यावं.>>>> +१

आपण मराठीत इंग्रजी, हिंदी कसं खपवून घेतो तसंच धेडगुजरी मालवणी खपवून घेऊ. हाकानाका!

-- ती लग्नाची मुलगी कुठ्ल्याही अँगलनी लग्नाळू वाटत नाही. सलज्ज, बावरी वगैरे सोडाच. प्रचंड आत्मविश्वासू, करारी, किंचित तुसडा व संशयित असा भाव तिच्या चेहर्‍यावर सतत आहे. खुद्द सासर्‍यालाही नजर देते.
इथं रहस्याचा संबंध असावा का दिग्दर्शकाची डुलकी? Happy

ती लग्नाची मुलगी कुठ्ल्याही अँगलनी लग्नाळू वाटत नाही. सलज्ज, बावरी वगैरे सोडाच. प्रचंड आत्मविश्वासू, करारी, किंचित तुसडा व संशयित असा भाव तिच्या चेहर्‍यावर सतत आहे. खुद्द सासर्‍यालाही नजर देते<<< शुगोल आजकाल अशाच मुली असतात. सलज्ज बावरी अहो आजकाल बघायला मिळत नाहीत. नो कॅटेगरी अ‍ॅज लग्नाळू पोरगी आजकाल.
मालिका टाईम पास म्हणून पाहयला काय हर्कत आहे.बाकी चूका काढण्याचा पुणेरीपणा पासेबल.

मालिकेत एका कार च्या क्लोस अप ला एक काळ्या रंगाची कोंबडी दिसते.कुणाला काही कल्पना...तीचा काय रोल असावा...?>> बघितली ती कोंबडी. मालक खुश झाला असेल माझी कोंबडी झी वर दिसली म्हणून. Happy

ज्यांना भाषा खटकतेय त्यांनी ही मालिका कोकणाच्या बाहेरही पाहिली जाणार आहे हे लक्षात घ्यावं <<<<

हे सगळं ठिक.. पण अर्धे वाक्य मालवणीत आणि अर्धे मराठीत.. एक शब्द मालवणी, दुसरा मराठी असं करण्यापेक्षा २/४ गौण पात्राना मालवणी व इतराना मराठीत बोलायला लावले असते तरी कोकण वाटलं असते..

Pages