रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पलंग किती लहान तो..अरारारा.. सारे पाय बाहेर निघाले होते.. अशानं कशी झोप यायची..
बेरि नाना म्हणत जारे लोकांनो.. त्यांच नाव नाना हय ..
आता मी डिट्टेलवार साम्गते बगा..
तो टू व्हिलर वाला शास्त्रज्ञच्या चारचाकीला कट मारण्याच्या नादात पोचणार होता अण्णाच्या आधीच..

त्या नानांना बघुन चंद्रकांत गोखलेंचे आठवण झाली, अश्या प्रकारच्या भुमिका त्यांच्यासाठी खास होत्या, आणि एकदा तर वाटलंच की तेच आहेत की काय.

आणी त्या बेरि ना बाहेर ओट्यावर / अंगणात काय झोपायला दिलंय? थंडीवार्‍यात. एखादी आतली / अडगळ खोली दाखवायची ना.>> @ सस्मित ताई , बेरि चे झाड जवळुन दिस्त असेल अंगणातुन :G:G

टीना ती शास्त्रज्ञ आहे Lol
इथे कुणीतरी म्हणालेलं ना की ती शास्त्रज्ञ वाटत नाही. आता वाटते का? तिच्या वागन्ञावरुन?

,पहिल्याच एपिसोड मध्ये कोकणचा किती उथळ अभ्यास केला आहे हे समजले, कोकणात भुतं आहेत हे म्हणण्याआधी येथील चाली रितींचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते, सिंधुदुर्गातून सध्या या मालिकेवर टीकेची झोड उडत आहे,
--------
काय त म्हणा
रात्रीस खेळ चाले
अरे तेंका सांगा
आवशिचो घोव तुमच्या
आदि मालवणी तरी व्यवस्थित बोलाक शिका
मगे फुडचा..
–-------
कोणी तरी सांगा त्या वेड्याला... कोंकणात मुली साखरपुड्याला जात नाहीत...... तर मुलगा जातो नवरीकडे...
किती हे अज्ञान .......
आणि म्हणे रात्रीस खेळ चाले......
आवशीचो घो यांच्या.....
----------
रात्रीस खेळ चाले......
काल या मालिकेचा पहिला भाग बघितला उत्सुकता होती काहितरी चांगले बघायला मिळेल पण पहिल्याच भागाने अतिशय निराशा केली. जी भाषा या पहिल्या भागात बोलली गेली ती मालवणी म्हणायची????धड शुद्ध मराठीही नाही धड मालवणी.......आमच्या मालवणी मुलुखात कधिही साखरपुडा मुलाच्या घरी होत नाही मुलाच्या घरी होतो गोड जेवणाचा कार्यक्रम आणि मुलीच्या घरी साखरपुडा....नवरीमुलगी गोडजेवणासाठी मुलाच्या घरी जात नाही... या मालीकेची सुरूवातच चुकिची करण्यात आली. या मालीकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांना कुणीतरी सांगा. .....
--------
या काही निवडक प्रतिक्रिया
-----
मालवणी ची हेल जमलेली नाही त्यामुळे पात्रांच्या तोंडाची मालवणी ऐकू नये असे वाटते, लाऊड आवाज, आणि अनेक ठिकाणी पाहिलेली तशीच दृश्ये (त्यामुळे प्रेक्षक भीतील असा गैरसमज मालिका वीरांना वाटते )
कोकणातली भूतां या टॅग लाईन खाली कोकणचा केला जाणारा उपहास कधीच खपवून घेतला जाणार नाही...
पुढचे भाग तरी निदान चांगले असावेत हि अपेक्षा,,,
नाहीतर पडसाद तर उमटतीलच,,,

टीना अग तीच भूत असेल ;), त्या मनालीला वाटलं तसं म्हणून तिने स्मायलीपण लय भारी टाकली ना. त्यामुळे ती ढिम्म असेल Lol . (मनालीला वाटलं ते खरं असणार बघ).

मालवणी खरंच वाईटरीत्या गंडलेलं आहे. ही मालिका कोकणातच शूट करत आहेत. मग तिथलेच स्थानिक कलाकार घेतल्यानी असते तर मज्जा आली असती. (तळको़कणामध्ये गावागावांमधून स्थानिक कलाकार चिकार असतात)

हाआअय नाआअय असं हेल काढून बोललं म्हणजे ती मालवणी होत नाही.

वाट्टे का ही भूत ? नाय ना?>> आसा काय नाय हां. डरना मना है मधे विवेक ओबेरॉय भूत वाटतो का ? पण त्यात तोच भूत हा sssss !

वाट्टे का ही भूत ? नाय ना?>> आसा काय नाय हां. डरना मना है मधे विवेक ओबेरॉय भूत वाटतो का ? पण त्यात तोच भूत हा sssss ! >>>>>>
आसा हां काय ???? बर हां SSSSSSS!

नक्कीच मालवणी भुभु आहे . बेरी नाना असेच बडबडले पण मुलाने मुद्दामच सांगितलं बिडीचा वास येत आहे. झोपाळा त्यानीच हलवला व ते बाजूला झाला . फोन मुद्दामच केला नाही व निरोप वेड्याकडे दिला जेणेकरुन तो पोहोचू नये

आईग्ग किती तो प्रयत्न भुत शोधण्याचा...अजुन बरेच महिने ही सीरीयल चालायची आहे, शेवटीच सांगतील काय ते, आणि आपले सगळे अंदाज खोटे ठरवतील.

झोपाळा कुणी हलवला> नानांनी? अहो ते बेरि आहेत.
आणि नाना बिडी नको रे ओढु असं म्हणत असतात. तर ती धडपडी मुलगी कोणीच बिडी ओढत नाहीये म्हणते. वासाचं पण आलं होतं का? मी मिसलं वाट्त. मला जागरणाची सवय नाहीये. म्हणुन मधेच डोळे मिटतात. Happy

बाकी d3 मधेही सगळे नवे होते . त्याच्यापुढच पाऊल इथे सगळे नवे तर आहेतच पण कुणाला अजिबात अभिनयही येत नाही तरी मालिका पार्श्वसंगीत आणि वातावरण निर्मिती यावरच चालणार आहे

पण मुलाला पण वास येतो बिडीचा << भगवती तोच मुलगा ( दत्ता )तर आहे जो हे करतो आहे .
झोपाळा कुणी हलवला> तो मुलगा (दत्ता )जो वास येतो आहे अस खोटच बोलला त्यानेच . तो झोपाळ्यापासून 2-3 पावलच दूर होता . परत पहा ६ वाजता आहे repeat tel.

पण मुलाला पण वास येतो बिडीचा << भगवती तोच मुलगा तर आहे जो हे करतो आहे .
झोपाळा कुणी हलवला> तो मुलगा जो वास येतो आहे अस खोटच बोलला त्यानेच . तो झोपाळ्यापासून 2-3 पावलच दूर होता . परत पहा ६ वाजता आहे repeat tel.

म्हणजे दत्ता करतोय हे सगळ प्रॉपर्टीसाठी.......

Pages