Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मलाही पोल्स बघून वाटले होते
मलाही पोल्स बघून वाटले होते ट्रम्प येइल. मात्र ट्रम्प, क्रूझ व रुबिओ पहिले तीन म्हणजे मॉडरेट रिप. यायचे काहीच चान्सेस दिसत नाहीत.
काल दोन विकेट पडल्या - एक डेम व एक रिप. हकबी मुळात होता रेस मधे हेच लक्षात नव्हते.
हकबी ह्यावेळी दुसर्यांदा
हकबी ह्यावेळी दुसर्यांदा प्रयत्न करत होता ना?
बर्याच लोकांनां ट्रम्प जिंकेल असं वाटत होतं .. आता न्यु हॅम्प्शियर कधी आहे?
"होली कब है, कब है होली" च्या
"होली कब है, कब है होली" च्या टोन मधे का सशल? बहुधा ८ का ९ ला.
<<उदय, टेड क्रुझ आपला माणूस
<<उदय, टेड क्रुझ आपला माणूस आहे डोळा मारा>>
----- आपलाच आहे...
<<निसटता का होइना, हिलरीबाईंनी विजय जाहिर केला.. >>
----- खुपच निसटता विजय आहे. सॅन्डर्स कॅम्प पुन्हा मत-मोजणी करा म्हणत आहे...
<<आता न्यु हॅम्प्शियर कधी आहे?>>
------ आठवड्याने, पुढचा मन्गळवार, ९ फेब.
त्या डमॉय्/डमॉइन रजिस्टर चे
त्या डमॉय्/डमॉइन रजिस्टर चे प्रेडिक्शन्स सहसा बरोबर येत - जेव्हा ती अॅन सेल्जर करते. तिचे २००८ पर्यंत बरोबर होते. मागचे आणि हे दोनच चुकले
https://fivethirtyeight.com/features/the-final-des-moines-register-iowa-...
रॅण्ड पॉल रेस मधून बाहेर.
रॅण्ड पॉल रेस मधून बाहेर. रिप. मधला सर्वात सेन्सिबल वाटला होता तो. पण "नॉट इनफ कॉन्झर्वेटिव्ह" मुळे असेल.
फारेंडा, डे मॉइन
फारेंडा, डे मॉइन
थॅन्क्स टण्या. मला कायम
थॅन्क्स टण्या. मला कायम उच्चारताना डाउट असतो की नक्की बरोबर आहे का
आता ट्रंप रुसला ! आयोवाचे
आता ट्रंप रुसला ! आयोवाचे निकाल मान्य नाहीत म्हणे !
रूसला? सकाळीच एक भाषण ऐकलं
रूसला? सकाळीच एक भाषण ऐकलं त्यात तर एकदम पॉझिटिव टोन ब्ला ब्ला होतं.
आयोवात ट्रंपच्या फुग्याला एक
आयोवात ट्रंपच्या फुग्याला एक टाचणी बसली आहे. रुबियो हा कानामागून येऊन तिखट बनू लागला आहे.
हळूहळू जसजसे हरणारे उमेदवार गळत जातील तेव्हा त्यांचे पाठीराखे कुणाला साथ देणार ते बघणे उत्कंठावर्धक असेल. रँड पॉल आवडणारे फारसे नसल्यामुळे त्याच्या जाण्याने फार फरक पडू नये.
तसे होईल असे वाटत नाही पण न्यू हँप्शायरमधेही जर ट्रंप दुसर्या स्थानावर गेला तर तो गोत्यात येईल.
बर्नीबाबांनी जी कडवी लढत दिली ती पहाता तो जिंकल्यातच जमा आहे असे माझे मत. एक किरकोळ नगण्य उमेदवार अशी प्रतिमा होती, म्हातारा माणूस, फारसे पैसे गाठीशी नाही तिथून सुरवात करून एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी बनण्यापर्यंत त्याने केलेली प्रगती दैदिप्यमान आहे. नि:संशय हे त्याच्या विचारांचे, धोरणांचे फळ आहे. त्याच्याकडे बाकी काही मिळकत नाही. एक सुखद आश्चर्य म्हणजे तरूण वर्गाला तो जास्त प्रिय आहे.
वॉल स्ट्रीटवरील बड्या श्रीमंत कंपन्यांनी दिलेल्या पैशांवर गब्बर झालेली हिलरीसारखी उमेदवार त्या लोकांवर वेळ आल्यास शिस्तीचा बडगा उगारू शकेल असे मला बिलकूल वाटत नाही. त्यापेक्षा बर्नी बरा.
<<वॉल स्ट्रीटवरील बड्या
<<वॉल स्ट्रीटवरील बड्या श्रीमंत कंपन्यांनी दिलेल्या पैशांवर गब्बर झालेली हिलरीसारखी उमेदवार त्या लोकांवर वेळ आल्यास शिस्तीचा बडगा उगारू शकेल असे मला बिलकूल वाटत नाही. त्यापेक्षा बर्नी बरा.>>
---- हिलरीचे तेच ते बोलणे एकुन कन्टाळा आला आहे. ईमेलचा किती प्रचन्ड घोळ... त्यातली काही टॉप सिक्रेट होती. मेल पाठवताना सिक्रेट (लेवल) नव्हती नन्तर त्यान्ची सिक्रेसी लेवल वाढवली.... सम्पुर्ण प्रकरण लाजिरवाणे आहे. हिलरीने जे ५५००० कागदे दिलीत ते तरी पुर्ण आहेत का नाही या बद्दल शन्काच आहे.
बर्नी लाख पटीने चान्गला आहे... तरुणान्मधे कमालीचा लोकप्रिय आहे. उपराष्ट्राध्यक्ष बायडन यान्नी पाठिम्बा दिलेला आहे. मन्गळवारी बघायचे काय होते...
बर्नी लाख चांगला असेल, पण तो
बर्नी लाख चांगला असेल, पण तो किंवा ट्रंप आले कि ब्लूमबर्ग पण उतरणार असे म्हणतोय. तो उतरला कि तो Dems ची मते खाणार हे नक्की.
पण तो किंवा ट्रंप आले कि
पण तो किंवा ट्रंप आले कि ब्लूमबर्ग पण उतरणार >>>> म्हणजे क्रूज किंवा हिलरी आली तर ब्लूमबर्ग नाही उतरणार असे आहे का?
हे असम वाट्टेल तेव्हा रेस
हे असम वाट्टेल तेव्हा रेस मध्ये उतरता येतं का? (पण मग ह्या ब्लूमबर्ग ला पैसे रेज करावे लागणार नाहीत का? की पुर्वपुण्याई आहे त्या बाबतीत?)
तो अपक्ष म्हणून येईल ना? आणि
तो अपक्ष म्हणून येईल ना? आणि त्याच्याकडे तयार असतील बॅगा.
स ब्लूमबर्ग कडे २२ बिलीयन
स ब्लूमबर्ग कडे २२ बिलीयन आहेत त्यातले १ बिलीयन स्वतःचे तो निवडणूकीत टाकणार म्हणतोय !!
https://en.wikipedia.org/wiki/Michael_Bloomberg#Wealth
पण अपक्ष ला काही चान्स तरी
पण अपक्ष ला काही चान्स तरी असणार आहे का जिंकायचा?! कशाला पैसा वाया घालवावा ? व्हॉट्स द पॉइन्ट!
ब्लूमबर्ग सारख्या माणसाला आहे
ब्लूमबर्ग सारख्या माणसाला आहे तो चान्स असे वाटते आहे. कारण तो सोशली डेम आहे आणि इकोनॉमी च्या दृष्टीने रिप !!
ब्लूमबर्ग सारख्या माणसाला आहे
ब्लूमबर्ग सारख्या माणसाला आहे तो चान्स असे वाटते आहे. कारण तो सोशली डेम आहे आणि इकोनॉमी च्या दृष्टीने रिप !! >> बरोब्बर. १ बिलीयन स्वतःचे घालायला तो तयार आहे. NY सारख्या लिबेरल hold मधून आलेला Republic आहे तो. त्याची मते centrist आहेत नि firm आहेत, वारा वाहल्यासारखी मते बदलत नाही. तो उभा राहिला तर बराच लिबरल crowd attract करेल असे म्हणतात, त्याचा gun control, contraception, health, global warming etc पवित्रा बघून. पर्यायाने Dem च्या मतांवर परीणाम होउ शकेल. त्याचे म्हणणे आहे कि polarizing figures असतील तरच तो उतरेल.
चालूगिरी आहे!!! आणि बर्नी
चालूगिरी आहे!!!
आणि बर्नी सॅन्ड्रर्स पोलरायझिंग झाला का? आणि कोण येणार हे कळायला अजून बराच अवकाश आहे. तो पर्यंत हा शांत बसणार... आणि कुणाला तरी हरवायला उतरणार. लोक थारा देणार नाहीत.
चालूगिरी आहे की राजकारण आहे?
चालूगिरी आहे की राजकारण आहे?
>>म्हणजे क्रूज किंवा हिलरी
>>म्हणजे क्रूज किंवा हिलरी आली तर ब्लूमबर्ग नाही उतरणार असे आहे का?<<
बहुतेक हो. त्याच्या मते ट्रंप/क्रुज आणि सॅंडर्स हि जोडी एक्स्ट्रिम राइट, एक्स्ट्रिम लेफ्ट आहे, रिस्पेक्टिवली. त्याला असं वाटतं कि तो स्वत: या दोन्हि आयडियाॅलजीच्या मध्यावर असल्याने दोन्हिकडची मतं खाउन जिंकायचा त्याला चांस आहे...
कालची डेमो डिबेट चांगली झाली.
कालची डेमो डिबेट चांगली झाली. आयोवाची लढत अटीतटीची झाल्यामुळे आता हिलरी आणि बर्नीकाका हातघाईवर आलेले आहेत. शर्करावगुंठित वगैरे भानगडीत न पडता रोखठोक आरोप केले जात आहेत हे चांगले आहे. बर्नीचे मुद्दे बिनतोड वाटतात. वॉल स्ट्रीटवरील गब्बर मंडळी कायद्याशी वाट्टेल तसे खेळतात त्यांना शिक्षा होत नाही. मात्र एखाद्या तरूण काळ्या मुलाला काही ग्रॅम अंमली पदार्थ बाळगला तर आयुष्याचा बट्ट्याबोळ झालेला पहावा लागतो. आणि हिलरीसारखे लोक जे ह्या मालदार असामींकडून पैसे घेतात त्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे पैसेवाले लोक जास्त सोकावतात.
जाता जाता: अशा पैशाने माजलेल्या लोकांचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून श्क्रेली ह्या इसमाकडे पहा
http://www.thenewcivilrightsmovement.com/davidbadash/smug_shkreli_smirks...
आयला शेंडेनक्षत्र, तुम्ही
आयला शेंडेनक्षत्र, तुम्ही हळुहळु बर्नीकाकांच्या गोटात शिरताय का?
राज जिमी कार्टर ने क्रूझ व
राज
जिमी कार्टर ने क्रूझ व ट्रम्प मधे ट्रम्प ला आपले वोट दिले आहे. एकूण क्रूज च्या विजयानंतर रिपब्लिकन्स ना सुद्धा ट्रम्प जास्त बरा आहे असे वाटू लागलेले दिसते. अनेक लोकांनी तसे मत दिलेले वाचले. कारण ट्रम्प डीलमेकर आहे, डेमोक्रॅट्सशी निगोशिएअशन्स करून अडकलेली बिल्स मार्गी लावेल वगैरे वाटते लोकांना. क्रूज म्हणे आडमुठा आहे.
शेंडेनक्षत्र, तुम्ही रिप आहात
शेंडेनक्षत्र, तुम्ही रिप आहात असं समजायचो.
बर्नीकाका पण डीलमेकर नाहीत ना? २५ वर्षांत फक्त ३ बिलं त्यातीलही २ नाव बदलणारी आणली वाचलं.
>> शर्करावगुंठित वगैरे
>> शर्करावगुंठित वगैरे भानगडीत न पडता रोखठोक आरोप केले जात आहेत हे चांगले आहे
पण हेच तर ट्रम्प ही करतो ना?
>> आयला शेंडेनक्षत्र, तुम्ही
>> आयला शेंडेनक्षत्र, तुम्ही हळुहळु बर्नीकाकांच्या गोटात शिरताय का?
विश्वास बसो वा ना बसो. मला ट्रंप आणि बर्नी दोघेही आवडतात. जे काही मत आहे ते छक्केपंजे न करता रोखठोक मांडणे हे दोघांच्या बाबतीत लागू आहे. दोघेही लॉब्यांकडून पैसे घेत नाहीत. बड्यांचे मिंधे नसल्यामुळे ते काही वेगळे करू पहातील अशी एक अंधुक आशा!
अर्थात धोरणांच्या बाबतीत ते दोन विरुद्ध ध्रुव आहेत ह्याची जाणीव आहे. पण माझ्याकरता हेच दोन पर्याय आहेत. पुढची वाटचाल बघून नक्की कुणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवेन.
रिपब्लिकन उमेदवारात उबग येईपर्यंत धर्माचा जप करणार्या, उठता बसता प्रभू येशूची कवने गाणार्या लोकांचा मला तिटकारा आहे. त्यांच्या मानाने ट्रंप चांगला आहे. न्यू यॉर्क सारख्या मोठ्या, वैविध्यपूर्ण शहरात वाढलेला असल्यामुळे तो इतका धर्माला चिकटून असेल असे वाटत नाही. देवाकडून आज्ञा आली म्हणून मी निवडणूक लढतो आहे असले श्रद्धाळू डायलॉग त्याने आजवर मारलेले नाहीत. (अर्थात साऊथ क्यारोलिनाची निवडणूक अजून व्हायची आहे!)
हिलरीसारख्या प्रस्थापितांना रजा दिलेली बरी या मताचा मी आहे. केवळ आता एका स्त्रीला राष्ट्राध्यक्ष बनवायची वेळ आली आहे त्यामुळे कुठली तरी स्त्रीच निवडा हा विचार मला साफ अमान्य आहे.
ओके. मेक्स सेन्स, समजलं
ओके. मेक्स सेन्स, समजलं शेंडेनक्षत्र. वर बदल करतो.
Pages