"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ९

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"

झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.

jhabbu_khadyapadarth.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा! हा झब्बू पाहिलाच नव्हता.

हा घ्या माझ्याकडून!
गावाकडनं बसमधून आणताना शेजारच्या प्रवाशास आपल्या सुगंधानं हैराण केलेलं यानं. :p
Image_135_.jpg

defenceParty.jpg

papad.jpg

पुन्हा मोदकच पण ताजे ताजे मी स्वतः केलेले, आता बाप्पालाच आवडतात म्हटल्यावर काय करणार? Happy
modak2.jpg

खूपच कॅलरीजच मारा चालू असल्याने,हे घ्या फॅट फ्री, सुगरफ्री तरीही चवीष्ट असे घरचे ब्लुबेरी मफीन्स. Happy
muffins 003.jpg

ही पुण्यातल्या 'जोशी स्वीट्स' वाल्यांकडची संत्रा-नारळ बर्फी

IMG_1335.jpg

नेहमीच्या खव्याच्या बर्फ्यांपेक्षा मला खूप जास्त आवडली!

वा! संत्रा-नारळ बर्फी हे सही कॉम्बिनेशन आहे. हे म्हणजे विदर्भाच्या भेटीला कोकण आल्यासारखं झालं की Happy

आजच्या लंचला हा एक वेगळाच पर्शियन पदार्थ चाखायला मिळाला. Tah Chin नावाचा. फारसीत याचा अर्थ वेगवेगळे थर रचून केलेला पदार्थ असा होतो म्हणे. (हे नाव चायनीज वाटतं म्हटल्यावर काऊंटरवरच्या काकूंनी उचकून दिलेलं उत्तर :)) चिकन, केशर, बासमती तांदूळ, बटर इ. कॅलरीसमृद्ध पदार्थांनी बनलेला (रेसिपी इथे).

Tah Chin
[मोबाईल कॅमेर्‍याने घेतलेला असल्याने क्वॉलिटी इतकी चांगली नाहीय]

अरे वा, इंटरेस्टिंग! हे पर्शियन पदार्थ भारी असतात. कश्क-ओ-बदेमजान म्हणून पर्शियन रेस्टॉरंट मध्ये वांग्याच्या भरीतासारखं मिळतो एक प्रकार. काय सही लागतो! अजून एका इराणी मैत्रीणीने खाऊ घातलेली सोहान ही मिठाई पण जाम आवडली होती.

हे बटरनट स्क्वॉश आणि रताळ्याचं सूप. न्यू यॉर्क टाईम्सची रेसिपी इथे. बटरनट स्क्वॉश ऐवजी तांबडा भोपळा घालता येईल.

DSC00822.JPG.

हा झब्बू चालू झाल्यापासून मी इतर झब्बूंकडे टोटल दुर्लक्ष केलंय. इथेच रेंगाळतीये :p

नलिनी नुसते फोटो नका टाकू हो, पोटात कावळे नाही तर घारीच ओरडू लागल्यात. आता त्याना शांत कसे करायचे तुम्हीच सांगा. Happy

प्रीति, मंचुरियन म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म मस्त आहे.

सध्या मालदीव मध्ये रमजान सुरु आहे......... दिवस भर उपवास असतो... इतराना देखील ऑफिस मध्ये खायला प्यायला बन्दी असते........ सन्ध्याकाळी मात्र सगळे हॉटेल्स भरुन जातात.. रमजान स्पेशल ब्रेक फास्ट च्या पार्ट्या झडत असतात..

आमच्या कम्पनीनेही एक पार्टी दिली गेल्या आठवड्यात..... त्यातला हा 'स्वप्नामधील गावा'चा ( पेरूचा) ज्यूस अप्रतिमच होता , सोबत तोन्डी लावायला खजूर होते... Happy IMG0123A.jpg

हे काय इथे एकही नवीन फोटो नाही? Sad

ही घ्या माझी पावभाजी आणि पटापटा काहीतरी नवीन टाका, आज शेवटचा दिवस!

DSC00525.JPG

sanjorya.jpg

नकुल रोज लाळेरे? डिहायड्रेशन होइल.. पाणी पी.. Proud Proud Proud
खरच, लोक असले जबरदस्त फोटो टाकुन आम्हाला मारुन टाकणार. Happy

थांबा थांबा, माझा अनंतचतुर्थीचा महाप्रसाद येतोच आहे.... सुट्टी घेवून तयारी चालु आहे इथे आजचा झब्बू द्यायची... Happy

थांबतो घाई नको...पण चतुर्थी पर्यंत नाही Wink आज चतुर्दशी आहे.

तो पर्यंत तुझ्या रेसिपीने केलेला बनाना ब्रेड

संध्याकाळच्या नाश्त्याला रगडा पॅटीस चालेल का? पांढरे वाटाणे नव्हते घरात म्हणून रगडा काबूली चण्यांचाच केलाय....
DSC01586.JPG

Pages