होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<मनाली , बनवून घेतल्यास का गं या स्पेशली ????>
नाही बनवून वगैरे नाही घेतल्या , नेटवर शोधल्यात
स्माईली शोधण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जी स्माईली हवी असेल ती गुगल सर्च कर
उदाहरणार्थ तुला सायकल स्माईली हवी असेल तर cycle smiley emoticon अस इमेज सर्च कर ,म्हणजे भरपूर सायकल स्माईलीज सापडतील,

इथे भरपूर स्माईलीज सापडतील,

http://www.smiley-lol.com/us/

मनाली जाम भारी Lol

एकूणच बर्याच दिवसांनी जानुबाईंचा हॉस्पिटल मधला अभिनय चांगला वाटला

असो ..|| इति श्री झी मराठीपुराणे मधुगंधा उवाच देवस्थळी कृतम श्री-जान्हवी श्रीफळ कथा सफल संपूर्णम ||

देवा, देवा, अजून या शिरेलीचे विनोद संपत नाहीयेत. ती डॉक्टर म्हणे, "ट्रॉली आणा. मी पुढची तयारी करते." मी घाबरले. आता "चला, उचला" म्हणते का काय! Uhoh

मनाली Lol
साबांच्या कृपेने मीही जानुबाईच्या ऐतिहासिक डिलीव्हरीची साक्षीदार झाले Proud .. त्यात पहिली १० मिनीट चुकली त्यांची म्हणुन आज तु नळीवर ते कसं शोधायचं नि बघायचं हे शिकुन घेतलयं Happy

नमस्कार सर्व सदस्यांना...... ज्यानी जुलै २०१३ मध्ये सुरू झालेली "होणार सून मी ह्या घरची..." ही कौटुंबिक कहाणी झी मराठीवर पाहायला सुरुवात केली आणि मालिका जितकी प्रथमपासून रंगत गेली तशी ती नंतर राहिली नसली (कारणांचा उहापोह करत नाही इथे मी...त्याची आवश्यकतादेखील नाहीच) तरी सलग सुमारे अडीच वर्षे या मालिकेने आपल्या नित्याच्या जीवनात अर्धातास अगदी बाजूला काढून ठेवायला भाग पाडले होते हे अमान्य होणार नाही. मालिकेचे कितीही कौतुक झाले आणि सादरीकरणाला नंतर संतापापोटी, हताशपणे, वैतागाने शिव्याशापही देणे झाले असले तरी जान्हवी, श्री आणि दोघांच्या घरातील आजीपासून पिंट्यापर्यंतची सारी पात्रे जणू काही आपल्या घरातीलच बनून गेले होते हे मी मालिकेचा सातत्यपूर्वक दर्शक या नात्याने सांगू इच्छितो.

"मायबोली" च्या सदस्यांनी इथे प्रकट झालेल्या धाग्यांना भरभरून प्रतिसाद दिले. यात महिला वर्गाचा वाटा अगदी ७५% पेक्षा जास्त असल्याचे आढळते. सुमारे ६०००+ प्रतिसाद लाभले या मालिकेच्या पानाला, ज्यामध्ये प्रेम तसेच कंटाळा आला आता अशा धाटणीचेही प्रतिसाद येत राहिले....ते मी सारे वाचत होतो.

सर्वश्री १. मधुरा कुलकर्णी,
२. दक्षिणा
३. मंजूडी
४. सारिका चितळे आणि
५. भगवती
~ अशा पाच सदस्यांनी मालिका प्रत्येकी २००० प्रतिसादानंतर नव्याने चालू केल्याचे दिसते आणि सर्वच भागांना सदस्यांनी प्रतिसाद दिले आणि मालिका आपलीशी केली.

आज रविवार दिनांक २४ जानेवारी २०१६ रोजी दोन तासांच्या सलग सादरीकरणानंतर श्री-जान्हवी यानी त्यांच्या "कृष्णा" सोबत काढलेल्या फोटोसोबत ही मालिका संपल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

प्रतिसादरुपी साधलेल्या संवादाबद्दल तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार.

JanhaviBaby.jpg

[फ़ोटो नुकतास विकीवर प्रसिद्ध झाला आहे, तेथून साभार घेतला आहे....]

मामा केवळ तुमच्यासाठी आत्ता रिपीट शेवटी २० मिनिटं बघितला. पण जानूच्या बाबांचा पाय बरा नाही झाला बघुन वाईट वाटलं.

कृष्णा नाव आवडलं.

पूर्वीप्रमाणे तुमच्या पोस्टीला पहिला प्रतिसाद माझाच. Lol

ह्या सिरीयलमुळे आपली ओळख झाली, तुमच्यासारख्या उत्तम व्यक्तीशी संपर्क झाला, केवळ त्यासाठी आज शेवटी काही मिनिटं मी बघितली ही सिरीयल.

अन्जू....

"...ह्या सिरीयलमुळे आपली ओळख झाली...." ~ होय....ही बाब माझ्यासाठी खूपच महत्त्वाची. मालिकेवरील संवाद आणि प्रतिसादांमुळे मला अनेक भाच्या मिळाल्या....आणि त्यांच्यासोबत जान्हवीची बाजू घेऊन वाद घालायला मला आनंदच होत गेला...मस्तच सारे होते ते....कायम लक्षात राहील माझ्या.

पण जानूच्या बाबांचा पाय बरा नाही झाला बघुन वाईट वाटलं. >>>> हो ना. जानु आपटे सारख्या माणसाशीसुद्धा लग्न करायला तयार झाली होती त्या ऑपरेशन पायी, पण नंतर येवढ्या मोठ्या उद्योगपतीशी लग्न होउन पण पायाच दुखण तसच. इकडे शेवटी शेवटी पिंट्याने घर पण घेतल पण बाबांच्या पाय जैसे थे च.. .

मुग्धटल्ये......राहू दे गं पायाचं दुखणं तसंच ! क्या फ़र्क पडता है ? जगात जानूच्या बाबासारखे अगणित लोकआहेत, तरीही ते पाय ओढीतच आपापला संसार चालवीत आहेतच ना.

[उद्या यदाकदाचित मालिकेचा दुसरा भाग चालू करण्याची परवानगी झी ने दिली तर त्या वेळी करेल नात कृष्णा त्या आजोबाच्या पायाच्या ऑपरेशनबद्दल विचार.]

उद्या यदाकदाचित मालिकेचा दुसरा भाग चालू करण्याची परवानगी झी ने दिली तर>>>>>>>>> नहीssssssssss +१

शिवाय कृष्णा त्यांच्या पायाच ऑपरेशन करायच्या वयाची होईतो पाय अजुनच निकामी झाला असेल मामा.. आणि शेवटी ती जानुचीच मुलगी त्यामुळे ती सुद्धा विचारच करत बसेल, कृती इल्ला.

राहुन गेलेली आणाखी एक गोष्ट म्हणजे श्रीचे बाबा.
श्रीच्या जन्मानंतर ते बायकोला सोडुन अमेरिकेला गेले. नंतर अनेक वर्षानंतर (कथानकाच्या सोयीसाठी) ते परत आले. मधल्या काळात त्यांनी अमेरिकेत मुलगी (सिमरन) दत्तक घेतल्याचे दाखवले. इथुन त्यांना तिच्याशी फोनवर बोलतानाही दाखवले. नंतर पुन्हा (कथानकाच्या सोयीसाठी) त्यांना मालिकेतून कायमचे गायब करण्यात आले. त्यांचे आणि त्यांच्या दत्तक मुलीचे पुढे काय झाले? मालिकेत पाणी घालण्याच्या नादात आपण नक्की कथानक कुठे नेत आहोत हेच लेखिकेच्या लक्षात राहिले नाही. त्यामुळे मालिका संपवताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

विसावा बघुन मामा खुश होतील.

ते मेमरी लॉस आणि प्रेग्नंसी प्रकरणावर तर घालवली सर्व मालिका ते पहिले काही महिने वगळता. सिमरन प्रकरण दुसऱ्या भागात दाखवतील Lol

तिकडे मस्त चाणक्य करायला मिळाला मनोज जोशीला, इथे कशाला राहील तो.

बरोबर, त्यावेळी ती नवर्‍याबरोबर भारतात येणार अस पण होत, पण नुसतच ऐकीव, तिला समोर आणली नाही अजिबातच.

ऑर्किड म्हणतात (सिमरनच्याबाबतीत...) ते बरोबर आहे. फोनवरील संवाद दाखविला होतो तो...एक दोन मिनिटांचा. सिमरनने तिच्या बॉयफ्रेन्डशी लग्न केले असा उल्लेख....म्हणजे तिला इकडे भारतात आणण्याचा पतंगच कापला गेला.

काल शेवटचा भाग म्हणून नामकरण समारंभाला गोकुळ इंडस्ट्रीजमधील श्री ऑफिसमधील शिपाई नंदन तसेच जान्हवीच्या बॅन्केतील शिपाई कार्यक्रमाला आल्याचे दाखविले गेले. नंदनला लग्नापूर्वी बराच मोठा रोल होता. लग्नानंतर मात्र तो गायबच झाला....असो, सर्वांना (वजा सुनिता...) दाखविले गेले ते बरे झाले.

रच्याकने, सुनिता का गायब होती काल ? किती वेळा ती का नाहीये बारशाला ह्यावर बोलले सगळे जण एकमेकांशी - उदा. जानी-पिंट्या, कला-जानीचे बाबा, कला-पिंट्या.

बहुधा ती अन्यत्र शूटिंगमध्ये व्यस्त असणार....कारण कथानकात असे दाखविले की तिच्या बाबांना हार्ट अटॅकचा त्रास नेमक्या त्याच दिवशी होऊ लागला आणि डॉक्टरांनी त्याना दवाखान्यात अ‍ॅडमिट केले पाहिजे असे सांगितल्यामुळे सुनिता बापाला घेऊन तिकडे गेली.....असे रोहनने जान्हवी आणि इतरांना सांगितले. त्यामुळे सुनिताची गैरहजेरी.

मला वाटतं, बेब्याला नाव ठेवायला द्यायचं म्हणून सुनिता गायब Wink , कारण तशी ती आत्या झाली असती.

बाकी इतक्या समजूतदार कलाबाई बघवत नव्हत्या Proud

Pages