होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

kharay nidhii Biggrin :-G.. hi sampli tar sampli.. zee marathi kade kay vedachaarachi kami ahe ka..?? faar kaam ahe baba... :P:-P

त्या नवीन शिरेलीतले हीरो हिरवीण जरा first year / second year चे students च वाटतात ना?! बघायला सुरु करावे का नाही जरा विचार करवा म्ह्णते..!

सध्या शिरेलींबद्दलच्या स्क्रोल मध्ये येतय की श्री जान्हवी बघत आहेत बाळाची गोड स्वप्न... मी म्हणाले आता स्वप्न पूरे झाली आणा बाळाला एकदाच जगात, म्हणजे जान्हवीही सुटेल आणि आम्हीही

बाळाने दररोज एकाच वेळी हालचाल करावी असं का वाटतं त्या जानीला?
आता छोट्या आयला सांगितले तिने म्हणजे आता सगळ्या आया मिळून जंगी चर्चा करणार वाटतं.

किती टाईमपास चालू आहे त्यापेक्षा आज बाळाचा जन्म दाखवून मालिका संपवता आली असतो ...अजून दोन आठवडे काय दाखवणार आहेत? Uhoh

त्या नवीन शिरेलीतले हीरो हिरवीण जरा first year / second year चे students च वाटतात ना>> +१ ....लग्नाचे वय तरी दिसतंय का त्यांचे ..एवढ्या लहान मुलांचे शिक्षण वैगरे सोडून लग्न कसले लावतायत झी वाले Sad

डिलिवरी च्या आधी थोडासा त्रास सुद्धा होत नाहीये तिला फ़क्त बाळाच्या हाल चाली ची पडलीये जशी काय लेबर रूम मधून 5 मिनिटात बाहेर येइल .....

सेट वरील कोणत्याही नकोश्या असलेल्या वस्तु जानीच्या पोटाच्या उशीत कोंबतात की काय? काहीही आकाराचे आडवे तिडवे पोट दिसते तिचे. बिन बॅगसारखे...असोच.

कलाबाईनी सगळ्यात जास्त बोअर केलयं, अगदी भरवशाच्या....ला.... आहेत.
जर परत एक्स्टेन्शन मिळालेच तर परत कलाबाई पहिल्यासारखे वागतील काय?

<< जर परत एक्स्टेन्शन मिळालेच तर परत कलाबाई पहिल्यासारखे वागतील काय? >> एक्स्टेंशन नाहीं मिळालं तर खास कलाबाईंसाठीं " येणार सून ह्या घरची " अशी सिरीयल निघेलच !!

कलाबाईंचा ठसका नाही म्हटल्यावर ही सीरिअल झणझणीत फोडणीशिवाय केलेल्या भाजी-आमटीसारखी अगदी बेचव झालीय. त्यात त्या श्रीच्या आयांचं 'काय, झालं, काय. झालं' अशी कायकाय करत जानूच्या खोलीत झुंडीने चालून येणं,जानूने सतत पोटाखाली हात धरून पोटाला बांधलेली टोपली सांभाळत उठणं बसणं. जणू काही हिने धरून ठेवलं नाही तर ते पोट घसरून खाली पडेल. गरोदर बायका काय सतत पोट धरून वावरतात काय?
अगदी नकोशी झालीय ही सीरियल.

नकोशा होउन बंद पडायला आलेल्या शिरेली अश्याच होतात शेवटी शेवटी. उरल्या सुरल्या वेळेत शिरेलवाले सगळ कस छान छान करायला जाउन शेवटाचा पचका करतात. टिपरे, प्रपंच या मालिकांच अस नाही झाल कारण यांना बास रे बाबा म्हणायची वेळच आली नाही..

तरीपण आता १२ दिवस रहिले ही चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे रोज ८ ते८.३० हा अत्याचार असतो. आता बंद होईल त्या दिवशी काहीतरी सेलिब्रेशन करायचा विचार आहे.

सेलिब्रेशन कसं? नवी सिरियल सुरू होणार की तिथे. स्लॉट रिकामा होत नसतोय कधी Proud
नव्या सिरियलची नवी हीरॉईन नाही आवडली. तिच्या केसांचं काहीतरी विचित्रच केलंय Uhoh तो मुलगा आवडला. हॅपी गो लकी टाईपचा वाटला, नाटकी नाही.

तो हीरो "कन्यादान" मधल्या हिर्विणीचा छोटा भाऊ आहे ना? तिथे बारावी मधे दाखवला होता, आणि इथे मुलगी पसंत करतोय..

त्या स्लॉट मधे स्टारमधे सिया के राम चालू असतय.
मिथिलेच्या जनकाची कथा, आहिल्येचा उद्धार्/शापमुक्ती/ ताटिका वध्/सुबाहु वध अस बरच काही काही दाखवताहेत.

ओह तो हीरो कन्यादान मधला आहे का ?

'माझिया प्रियाला' ह्या मालिकेतला व्हिलन कन्यादान मधे हीरो होता, आता कन्यादान मधला भाऊ इथे हीरो आहे Happy

Pages