होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूढच्या जन्मी सगळ्या आया श्री-जानीच्या घरी जन्माला यायच म्हणतायेत , कारण ते आई बाबा म्हणून एक्दम आदर्श आहेत असं त्यान्च म्हणण आहे .>>>>

अरे पण श्री-जान्हवी आत्ता कुठे आई बाबा होतायत्...मग ते आदर्श आई बाबा आहेत हे सिद्ध करायला त्यांना काही वर्षे तरी द्या की Happy

काल जानी म्हणाली "श्री, हॉस्पिटलमधे जाऊया". श्रीबाळ म्हणाला हॉस्पिटल Uhoh आता बायकोची डिलिवरीची वेळ जवळ आली आहे तर एवढे Uhoh होण्यासारखे काय आहे Uhoh Proud

Lol अग त्याला येवढ्यात डिलीवरी होईल अस वाटत नसेल अजुन

काल त्या हॉस्पिटलमधली डॉक्टर कसली होती, कोर्‍या चेहर्‍याने डायलॉग्ज टाकले तिने.

अग त्याला येवढ्यात डिलीवरी होईल अस वाटत नसेल अजुन > इतके दिवस त्या डिलीव्हरीत खाल्ल्यावर! नक्की हा सारकॅजम असणार. Light 1

ती मला बेबीची मेलेमें बिछडी हुई बहिण वाटली. तशीच होती दिसायला >>>>>>>>>>>

नताशा !!!! नही !!!!!!!!!!!!!!!!!!!!

आणखी एक आई वाढेल ना मग Sad

श्रीबाळ म्हणाला हॉस्पिटल >>> पर्यावरणाच्या द्रुष्टीने त्याला घरीच डिलिव्हरी व्हावी असच वाटत असणार .
नाहीतरी सहा-सहा दाया .. आपलं ते... आया आहेतच की घरी.

डॉक्टर सरळ सरळ म्हणतात आता डिलिव्हरी होणार..
आणि त्या वेळी जानू बाईचेएक्ष्स्प्रेशन्स म्हणजे कहर

आनंद + दु:ख (कसल काय माहित) + पेन (पोटात दुखतय म्हणुन) सगळ एकत्र दाखवायच होत तिला

अगदीच विचित्र वेडी बाई दिसत होती..

मालिका संपल्यावर प्रेक्षकांपेक्षा कलाकारांना जास्त आनंद होईल बहुतेक Wink

झाली बाबा जानी एकदाची बाळंत. हा दिवस इतिहासाच्या पानात परवडेल त्या Happy अक्षरांनी लिहिला जाईल.

बादवे.. तिची डिलिव्हरी ओ टी मध्ये झाली का कुठे? ओ टी मधुन नर्मदा बाई फोनवर बोलत होत्या? (असं अलाऊड असतं का?) आणि डिलिव्हरीच्या वेळेला हे दोघे आत होते. माझ्या माहितीप्रमाणे डिलिव्हरीच्या वेळेला जे कोणी नातेवाईक ओ टी मध्ये थांबणार असतील त्यांना स्वच्छ अंघोळ करुन निर्जंतुक कपडे किंवा किमान ते ओ टी चे हिरवे कपडे घालावे लागतात. ओ टी ची स्वच्छता मेंटेन करण्यासाठी. इथे श्री धुळ बसलेल्या बुटांसकट हापिसातुन डायरेक्ट आलेला दिसत होता. आणि नर्मदाबाई पण जश्या बाहेरुन आल्या तश्याच ओ टी मध्ये? Uhoh

*ओ टी: ऑपरेशन थिएटर

नै ग बाळे अस कै नै झाल.. परंपरेनुसार तिला लेबर रुममध्येच घेउन गेले आणि बाकी सगळे बाहेर थांबले होते... नक्को इत्की काळजी करु..

मुगे.. मी व्यवस्थित पाहिलं.. ती कळा देतांना आणि बाळ होतांना श्री आणि नर्मदाबाई तिथेच होते.
इन फॅक्ट श्रीने जानीचा हात हातात धरला होता आणि जानी कळा देतांना तोही रडत होता.
काका, पिंट्या, बेबी, सरु आणि मोठी आई बाहेर होते.
मुलगी झाल्याची बातमी श्री नेच बाहेर येऊन सांगितली.

नुसता हात धरुन नाही काही. तो तिला बर्‍याच गोष्टी आठवण करुन देत होता. काहीही. जीवघेण्या लेबर पेन मधे हे असं आठवायला आणि पेन विसरायला होत असेल?

पियु झोपेत होतीस काय एपि बघताना.. लेबर रुमात डॉक्टर्स आणि नर्सेसच होत्या. डॉकने सांगितल मुलगी झाल्याच. तु जे बघितलय्स ते त्या आधीच आहे.

अय्या मी का झोपेत? तो श्री खरंच असं करत होता. हा आता तो लेबर रुमात होता की ओटीत ते मला नाही माहीत. मी विंट्रेस्ट घेउन बघत नाही ओ. Happy

तो लेबर रुमात होता की ओटीत >>> दोन्हीकडे नव्हता तो.. ती रूम दाखवलेली ज्यात जानुला अ‍ॅडमिट केल होत. कळा सुरु झाल्या रे झाल्या की लेबर रुमात नेत नाहीत.

जानूला बाळंतकळा सुरु झाल्यावर आई सोडून भावाला का बरे बोलावले? पिंटुकला आईला म्हणाला...आई तुम्ही येउ नका..मी जातोय ना.. अन त्यावर ती म्हणाली ठिक आहे ठिक आहे....हे सग्ळे बरे आहेत ना?

अरे लेबर रुम मधेच होते श्री आणि त्याची आई . नाहीतरी अशी आजकाल राहू देतात कि बाबाला आणि आई नाहीतर सासूला. इतक काही स्ट्रीक्ट नसत. ती लोक ( मुलाचा बाबा आणि आज्यांपैकी ) घट्ट मनाची असली ती लेबर रूम मध्ये पण असू शकतात म्हणजेच ओटी मध्ये Happy
तर जानू बाईला मुलगी झालेली आहे आणि रविवारी २ तासांचा महा एपिसोड आहे आणि शिरेल संपेल Happy

चला झाली एकदाची जान्हवी बाळंत ..........animated-smileys-babies-012.gif
मुलगी झाली images.png
आता आईआजी खुर्चीत रिकाम बसून राहण्यापेक्षा जरा बिझी राहील grandpa-and-child-smiley-emoticon.gif
गोखल्यांचं कुटुंब पूर्ण झालं..........animated-smileys-family-007.gif

आता बारसं झाल कि संपल crib-3355.gif
झाली एकदाची प्रेक्षकांची सुटका ..........joy-smiley-emoticon.gif

मनाली Lol

आता मला एक सांगा. जान्हवीच्या मेमरीचा काही भाग डिलीट झाला होता, तो रिकव्हर झालाय की नाही?

जान्हवीने अ‍ॅक्सिडंटनंतर हॉस्पिटलबेडवरून लाजत लाजत आपलं लग्न आपटेंशी ठरल्याचं सांगितलं, तेव्हापासून ही मालिका बघायची सोडली. आता संपतेय म्हणूनही पाहायची हिंमत होत नाही.

मी श्री जानुबैचं लग्न झालं, बहुतेक मालिका सुरु झाल्यानंतर दोन तीन महिन्यांनी त्यानंतर ती जानुबै माझ्या डोक्यात जायला लागली आणि मी मालिकेचा निरोप घेतला. तिचं ते खोटं खोटं हसणं मी नाही ब्वा सहन करू शकले. जी काय पहिले काही महिने बघितली ती शशांकसाठी. Happy

Pages