"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ११

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:14

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "

झब्बू म्हणून पाळीव/वन्य प्राण्यांची छायाचित्र द्यायची आहेत. कोलाज नको.

Animals_zabbu.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझा, कॉमन म्यान! Wink
monkey-1.jpg

या विषयावर देखिल माझ्याकडे काही मोजके क्लास फोटु आहेत पण सगळे हार्डकॉपी, अन स्कॅनर चालु नाहिये Sad

DSC_0100.JPG

fish.JPG

zabbu_lion.JPG

वाघाचा फोटो क्लासच, प्रिन्सेस. अचूक क्षणी टिपलेला आणि एकदम 'शुभ्र काही जीवघेणे' म्हणावा असा :).

हे पाडस योसेमिटीमधल्या 'हाफ डोम' ट्रेकच्या परतीच्या वाटेवर दिसलेलं -
Half_Dome_081508 104

मस्त आहेत सगळे प्राणी...पांढरा वाघ खासच!
सिंहाचा फोटो पण सही आलाय. शँपु लावल्यासारखी सिंहाची आयाळ दिसतेय. भारतात एवढा स्वच्छ सिंह दिसणे मुश्किलच !
चेतन जोडी सही टिपलीये.
सॅरीडॉन ! Lol
नंद, फोटोत पाडसे शोधावे लागले. लवकर दिसलेच नाही ! सहीये !

यान्ना तरी कोण दाखविणार?
miravaNuk3.JPG
बर्‍याच शोधाशोधीनन्तर हा ऑफिसच्या पीसीवर सापडला Happy

चेतन मस्ताय.
अभिजा ,केपी क्लास फोटो.
आता मीही शोधतो काही प्राणी सापडले तर ! Happy

Pages