होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शी मला तर प्रोमो पण बघावा वाटत नाही. >> +१ .. तो हिरो पहिलं वाक्य बोलला तेव्हाच बंद केला मी प्रोमो!

निधी.. वरती लिंक दिली आहे बघ..

कोण आहेत? कधी लागतो प्रोमो?>>> हो ना मी पण नाही पहिला अजुन

बाकी काल श्री बाळाची आई त्या सरू मावशीवर का उगाच चिडली Uhoh एखादी १४-१५ वर्षाची मुलगी बॉय फ्रेंडबरोबर बोलली तर एखादी आई जशी वागेल तशी वागत होती ती.

चनस थँक्यू. बघितला.

ते दोघं हिरो-हिराॅइन वाटतात तरी काय?
कोणालाही उचलून आणून हिरो-हिराॅइन करतात का हे लोक? Uhoh

नवीन शिरेलीतले हिरो-हिराॅइन अगदी चम्या-चमी वाटतायत ...हल्ली झी कडे "लग्न " हा एकमेव विषय राहिला आहे मालिका बनवण्यासाठी जगातले सगळे विषय संपले ..आता ह्यांच्या प्रेमाचा प्रवास Uhoh

छान आहे लग्नसोहळा.
आता खालील गोष्टी या महिन्यात आटपणार आहेत का?
१. जान्हवीच्या बाबांचे ऑपरेशन
२. बेबीआत्याची पाठवणी (जर हे करणार नसतील तर मधल्या कुठल्यातरी भागात तिच्या नवर्‍याला आणण्याचे प्रयोजन कळले नाही.)
३. सुनीता आणि कलाबाई यांचा समेट
४. मोठ्या आईंचंही कुणाबरोबरतरी जुळवून देणं. (बहुतेक हे होईल असं वाटत नाही. मला आशा होती की त्याही लग्न करून नवीन आयुष्य सुरू करतील पण बहुतेक नाहीच होणार हे Sad )
५. फायनली, जान्हवीचे बाळ Happy

अरे ह्या लोकांचा निरोप समारंभ पुढे गेलाय का ?? :(.. ..दोन तीन दिवसांपासून त्या नवीन मालिकेचे प्रोमो एकाऐकी बंद झालेयत Uhoh ..एरवी तर कोणती नवीन मालिका येणार असेल तर झी मराठी जोरदार promotion करते

मी मगाशीच डी ३ बघतांना नव्-याला म्हणाले की नविन मालिकेचा प्रोमो आता का दाखवत नाहीत दोन दिवस.

Kharech sampu de re deva....ata tar navas bolen mi n sampli tar fednar suddha

यांनी मालिकेत इतका घोळ घालुन ठेवलाय कि इतक्या कमी वेळात आता हा सगळा घोळ निस्तरणे शक्य नाही याची बहुदा मंदेला जाणिव झाली असावी. एकतर मालिका वेळेवर संपवण्यासाठी नेहेमीप्रमाणे अर्धवट गुंडाळणे किंवा मालिका लांबवून सगळा घोळ निस्तरणे हे दोन पर्याय मंदेकडे आहेत. मालिका गुंडाळली तर लोक नंतर शिव्या घालतील म्हणून कदाचित मालिका लांबवली असेल.
तसाही नविन मालिकेच्या प्रोमोला फारसा चांगला प्रतिसाद नाही आहे.

मालिका संपेल पण मंदे म्हणाला तसे डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल असे सध्या तरी वाटत नाहीएय Sad ही कदाचित Publicit gimmick असेल त्यांची

मंदे ला एक सुचना द्याविशी वाटते. या मालिकेतील प्रत्येक ट्रॅक साठी वेगळी मालिका बनव आणि ही मालिका संपव (एकदाची) .................. Happy

आपण कसे एक प्रोजेक्ट जर का खुपच मोठ्ठे झाले, तर भारंभार सब-प्रोजेक्ट्स क्रियेट करतो, तसंच काहीतरी ....... Happy

काल बेबी आत्यानेही नवर्याच्या आठवणीने रडारड केली. आता मला भीती वाटतेय की मालीका एवढ्यात न संपवता हिचा संसार मार्गी लाऊनच संपवतात की काय

हल्ली नवीन सिरियल प्रोमो अजिबात दाखवत नाही त्यामुळे ही सिरियल लांबते की काय ही शंका घ्यायला वाव आहे.

काल बेबी आत्यानेही नवर्याच्या आठवणीने रडारड केली. आता मला भीती वाटतेय की मालीका एवढ्यात न संपवता हिचा संसार मार्गी लाऊनच संपवतात की काय>> +१

अन्जू हो ना. Uhoh मला पण आता अशीच भिती वाटतेय. माझ्या आनंदावर विरजण पडणार वाटतंय. Sad

ते जान्हवीची प्रेग्नंसी ह्या विषयावर तर दळण चालू आहे आपलं लोकं फार बडबडायला लागली म्हणून रोहन गुजरचा लग्न track केला. Thank God ही सिरीयल पहिले दोन महिने बघितली.

बेबड्याचे पण सगळे मार्गाला लागतेय बहुतेक. तो देव पप्पूचा मित्र आहे म्हणे.

म्हणजे शिरेल खरच संपणार की काय Happy

Pages