होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता खरचं कंटाळा आलाय ,पण आईला बघायचीच असते ही मालिका
रोज तेच दळण
शशिकलाबाईंची तीच तीच नाटक
आणि गोखल्यांच्या घरातल्या बायका का ऐकून घेतात शशिकलाबाईंची फालतू बडबड ?
स्पष्ट सांगायचं 'आम्ही आमच्या घरात कुणाला ठेवायचं हा आमचा प्रश्न आहे , तुमचा काही संबंध नाही , आमच्या घरातून निघा '

द्यायचं ना सरळ हाकलून ......

आता महिन्याभरात काय काय होणार ते लिहूया.
१) जानीचं बाळंतपण तर होतंयच. त्यात काही वादच नाही.
२) मावशीचं लग्न
३) शशीकलेची सुलोचना होणार. एकदम गरीब गाय
४) बाबांचं पायाचं यशस्वी ऑपरेशन

बेबीआत्याचा संसार तेवढा मार्गी लावायचा राहिला. आणि मनोज जोशीच्या मुलीचा गोखल्यांकडे स्वीकार! Proud

अरे वा, तरीचं कलाबाई पटापट निवळत आहेतं आणि त्या सरूची गाडी पण ट्रॅकवर धावते आहे Wink

अजून बेबीचा नवरा कसा नाही आला ?

पूनम तुझी पोस्ट बघायच्या आधी टाकली पोस्ट.

मनोज जोशी आता गायब झाला गं, त्याची मुलगी कुठून आणणार आता ? शरू तर आता फोनवर पण बोलताना दाखवत नाहीत Wink

तिथे मनोज जोशींना एवढा चाणक्य करायला मिळाला, ते इथे कशाला थांबतील? आता शेवटी येणार असतील. चाणक्य देवाघरी गेला ना Sad .

यस्स! होणार मुक्त आम्ही या अत्याचारातून! >> “नाही होणार मुक्त तुम्ही इतक्यात” :अओ:... हे काय इतक्यात जात नाहीएय्त Sad
http://zeenews.india.com/marathi/news/kallabaji/honar-sun-me-will-closed...

अस्स कस्स, अस्स कस्स.. Uhoh
सकाळी न्युज चॅनेलवर दाखवत होते मंदेने सांगितलं शिरेल महिन्याभरात संपणार म्हणून.

मटा वाल्यांनी विशफुल थिंकिंग की काय ते केलेलं दिसतंय मग. निदान बातमी वाचून तरी झी, मंदे आणि मकुला शिरेल बंद करायची बुद्धी होईल, असं वाटलं असेल त्यांना. पण झी वाले सदा सुखी निघाले.

हे तर जानीला कितवा महिना चालू आहे ह्या गोंधळासारखेच आहे. मला वाटते कि झी-मराठीवाल्यांची हि चाल आहे, प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया जाणुन घेण्यासाठी.

अरेरे ! इत्क्यात बंद कशी करताय निर्दय कुठले. जानूच्या बाळाचे जावळ, बोरन्हाण, मुंज, श्रावणी, दहावी, बी ई, लग्न.

अमेरिकेतल्या सिमरनचा जानीच्या मदतीने झालेला स्वीकार, बेबीआत्याची पाठवणी, सुनिता आणि कलाबाईची नोकझोक, मोठीआई सिमरनचा मुलगी म्हणून करणारा सांभाळ, छोटी आई आणि बेबीआत्याने दत्तक घेतलेली मुलं. ई ई ….. किती किती दाखवायचे राहिले आहे…

Pages