कांगावा करावा तर असा.

Submitted by Rajesh Kulkarni on 24 November, 2015 - 00:54

कांगावा करावा तर असा.
.
.
सत्यमेव जयते या सुंदर कार्यक्रमात केलेले दावे हे आमिर खान या व्यक्तीचे नव्हते, तर तो कार्यक्रम चालवणा-या पात्राचे होते, हे मधूनमधून दिसू लागले आहे.

आताच्या तथाकथित असहिष्णु परिस्थितीची कोणती झळ फाइव्ह स्टार गाड्या, गाद्या किंवा खुर्च्या सदैव ढुंगणाशी असणा-या त्याच्यासारख्यांना लागलेली असते, की त्यामुळे यांना देश सोडून जावेसे वाटते किंवा तसा विचार तरी मनात येतो? शिवाय हा बाण आपल्या पत्नीच्या माध्यमातून मारलेला. याचा अर्थ काय लावायचा, तर मी किंवा शाहरूख, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून केवळ आम्हालाच देशात असहिष्णु परिस्थिती आहे असे वाटत नाही, तर माझ्या हिंदू असलेल्या बायकोलाही तसेच वाटते.

कालच एक तुलना वाचण्यात आली. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी अलीकडेच झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी म्हणते की ती तिच्या दोन्ही मुलांना आर्मीमध्ये जाण्यासाठीच प्रोत्साहन देईल आणि हा इकडे हा दिवटा त्याला प्रत्यक्ष कसलीही झळ लागलेली नसताना किंवा लागण्याची शक्यताही नसताना देश सोडण्याची भाषा करतो आहे.

बरे, याची बायको त्याला खरोखरच तसे म्हणाली असेल किंवा नसेल, पण तू तरी तिला समजावलेस का, की बये, तुला वाटते तसे काही नाही. आपण या देशात सुखरूप आहोत. काही काळजी करू नकोस. तरी चांगला संदेश गेला असता की नाही? तसे तरी काही केल्याचे हा म्हणाला का? म्हणजे या त्याच्याही भावना आहेत का? त्या आहेतच. उगाच नाव मात्र बायकोचे घेतो.

एक विचार मनात येतो, काल सय्यदभाई हे महाराष्ट्रातले सुधारणावादी नेते समान नागरी कायदा आणण्याच्या दृष्टीने व देशातील इतर महिलांचेच हक्क मुस्लिम महिलांनाही मिळावेत या दृष्टीने आपले मत मांडत होते. तथाकथित असहिष्णुतेची झळ लागलीच तर ती आमीरपेक्षा त्यांच्यासारख्या सामान्यांनाच लागत असेल. ते त्याबद्दल काही न बोलता आपले कार्य करतच आहेत. इथल्या म्हणजे ‘हिंदूंच्या’ असहिष्णुतेचे सोडा, उद्या जर इसिससारख्या संघटनेचा येथे थोडा जरी जम बसला, तर सर्वप्रथम सय्यदभाईंसारखे आवाज बंद होणार आहेत. आमीरचे तसेही कशात काही नाही, तर त्याच्यासारख्याला काय धाड भरली आहे कोणास ठाऊक!

सिनेमात दुस-याने लिहिलेले संवाद बोलावे लागतात. सर्वांसमोर माइक हातात आल्यावर अनेकदा खूप बागडायला होते. आमीरचे तसेच झाले की हे संवादही त्याला कोणीतरी लिहूनच दिले होते असे वाटायला जागा आहे.

तेथे जेटलीसाहेबांनी तुझे कांगावखोर बोलणे शांतपणे ऐकून घेतले असेलही, मी तेथे असतो, तर तुला दोन प्रश्न निश्चितपणे विचारले असते.

तिकडे शाहरूख – सलमानचे अनेक वर्षांपूर्वीचे भांडण मिटते आहे, दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत, इकडे आमीर शाहरूखच्या सुरात सूर मिळवताना दिसत आहे. एरवी शाहरूखच्या बोलण्याला काहीही किंमत देण्यासारखे नव्हते.

होय, एकेका घटनेचा अर्थ लागत आहे.

आणि हो, आमिरखानला शिव्या द्यायच्या नाहीत. एवढा समजुतदार वाटला खरा, पण असा घसरला, इतके बेजबाबदारपणे बोलला, त्याबद्दल त्याच्यावर दया करायची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aamir's official statement: Statement from Aamir Khan:

First let me state categorically that neither I, nor my wife Kiran, have any intention of leaving the country. We never did, and nor would we like to in the future. Anyone implying the opposite has either not seen my interview or is deliberately trying to distort what I have said. India is my country, I love it, I feel fortunate for being born here, and this is where I am staying.

Secondly, I stand by everything that I have said in my interview.

To all those people who are calling me anti-national, I would like to say that I am proud to be Indian, and I do not need anyone's permission nor endorsement for that.

To all the people shouting obscenities at me for speaking my heart out, it saddens me to say you are only proving my point.

To all the people who have stood by me, thank you. We have to protect what this beautiful and unique country of ours really stands for. We have to protect its integrity, diversity, inclusiveness, its many languages, its culture, its history, its tolerance, it's concept of ekantavada, it's love, sensitivity and its emotional strength.

I would like to end my statement with a poem by Rabindranath Tagore, it's a prayer really :

Where the mind is without fear and the head is held high,
Where knowledge is free,
Where the world has not been broken up into fragments,
by narrow domestic walls,
Where words come out from the depth of truth,
Where tireless striving stretches its arms towards perfection,
Where the clear stream of reason has not lost its way,
Into the dreary desert sand of dead habit,
Where the mind is led forward by thee,
Into ever-widening thought and action,
Into that heaven of freedom, my father, let my country awake.

Jai Hind.

Aamir Khan.

भम
पूर्ण मुलाखत दिलेली आहे वर. याआधी अजय मक्तेदार यांच्या वॉलवरून नेमकं काय म्हणाला ते ही दिलेलं होतं. नंतर पुन्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ सांगितलेली एक पोस्ट दिली होती. आता पूर्ण मुलाखत दिलेली आहे. तरी देखील तो असं म्हणालाच हे चालूच राहील. मला वाटतं आता सोडून द्यायला हवं. त्यामुलाखतीच्या दरम्यान अरुण जेटली आणि सुरेश प्रभू देखील उपस्थित होते. जेटलींनी आमीरला प्रश्न देखील विचारला. त्यांनी सांगावं नेमकं काय ते !

(विपू पहा).

@ राकु

मला कौतुक वाटलं तुमचं. कारण धागा काढताना तुमची जी मतं होती ती तत्कालीन असून वस्तुस्थिती समजल्यानंतर ती बदलण्याइतकी प्रगल्भता तुमच्याकडे आहे याचं अत्यंत समाधान वाटलं.

तुम्ही ज्या मुद्याबद्दल आक्षेप घेतला आहे तो याच्यासाठी दिलेला आहे की मुलाखती दरम्यानचं एक वाक्य संदर्भापासून तोडून फोडून त्यावर वादंग माजवला गेला आणि त्याच्या धर्मावरून त्याला सीरीयाला जायचे सल्ले दिले गेले, तर ते वाक्यं आमीर बोलला असता तर केव्हढा गदारोळ झाला असता याची कल्पना सुद्धा करवत नाही. केवळ ते वाक्य उच्चारणारा व्यक्ती खान नव्हता आणि आता गोंधळ घालणा-यांचं दैवत होता म्हणून तो देशद्रोही ठरत नाही !!

आमीरने देश सोडून जाईन असं म्हटलंच नाही. शाखाच्या मुलाखतीचाही असाच विपर्यास केला गेला होता.

मी वाचली मुलाखत आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये. पण लोक त्यातलं एक वाक्य उचलून नाचत राहणार कारण बाकीच्या मुद्दयांवर बोलायला मुद्दे आणि कुवत बहुतेकांकडे नाही. गुलजार, राजन, इ. लोक बोलले तेव्हा इतका थयथयाट नाही झाला. याचं कारण काय? मीडियाने प्रसिद्धी दिली नाही का?

पहिल्याच पोस्टमधे कमल हसन ची मुलाखत दिलेली आहे. ती ही थेट. त्याबद्दल मौनच आहेत मंडळी. त्याचं वक्तव्य देशद्रोहाचं नाही, आमीरचं आहे या मागचं लॉजिक शोधा.

आज नवी पोस्ट फिरतीये.

सचिन तेंडुलकरने देशाची मान उंचावली.
आमीर खानला देशाने घडवला.

असहीष्णूतेचा आणखी पुरावा कशाला द्यायला हवा ?

वर राकु म्हणताहेत की मी अमीरला प्नश्न विचारले असते. तिथे विचारलेले त्याला प्रश्न आणि त्याने उत्तरेही दिलीत.

तो असंही म्हणाला की मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून का प्रश्न विचारता ? पूर्ण भारताचा प्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारले तर मला आनंद होईल.

बहुधा राग आलाय तो इसीसचा धिक्कार करत असतांना त्या मागच्या अतिरेकी विचारसरणीची चिंता वाटते. या संघटनेच्या जागी उद्या कुठलीही संघटना असू शकते जी अतिरेकी विचारसरणी पोसते... या वक्तव्याचा !!

हा पब्लिसिटी स्टंट असावा असं आता वाटत नाही. असल्यास आमीरचा धिक्कार करणा-यात मी पहिला असेन. अशा पद्धतीने अप्रगल्भतेचा फायदा घेणं त्याला शोभलं नाही. फार तर पैसे देऊन काही संघटनांना निदर्शने करायला लावतात तसं करायचं होतं.

आता एक नवा ट्रेण्ड सुरू झालाय. मुस्लिम नावाच्या लोकांकडून सहिष्णुतेचं सर्टिफिकेट घ्यायचं. ते दोन परदेशी पत्रकार झाले. मग तस्लीमा नसरीनने अमीरला सुनावलं. ते मॉर्फ्ड निघालं. आता छयपूरच्या एका मुस्लिम नावाच्या कवीची कविता आलीय. ........ऋन्मेषने काल लिहिलं तेच आज अमीर म्हणालाय. किरणला देशाएवजी नवरा बदल असं सांगून लोक आपले संस्कार दाखवताहेत.

बरं

कर्नल महाडिकांच्या पत्नीशी किरण रावची तुलना करण्याचं कारण तरी काय ?

अखलाखच्या आर्मीतल्या मुलाच्या निष्ठेबद्दल शंका घेणा-यांना शहीद कर्नल महाडिकांचं नाव घेण्याचा अधिकार असावा का ? जर कर्नल महाडीक शहीद झाले नसते तरीही आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेबद्दल त्यांना चिंता नव्हती. आर्मी मधे जिवाची बाजी लावणा-याला आपलं कुटुंब सुरक्षित आहे का या चिंतेने ग्रासलेलं असावं हे अखलाखच्या मुलाच्या नशिबी आलंय यातला फरक जाणवतोय का ? जाणवत असेल तर त्याला सहीष्णुता म्हणतात.

एक दीड वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात मातंग कुटुंबातल्या एका आर्मीच्या जवानाच्या तीन भावांना तुकडे तुकडे करून ठार मारलं आणि तुकडे सेप्टीक टँकमधे टाकले होते. त्या जवानाने पोलिसांना भावाला धोका असल्याचं कळवलेलं होतं.

आर्मीचा पुळका आलेल्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं. आणखी एका जवानाच्या म्हाता-या आईला मारहाण करून ठार मारलंय. त्याची पोस्ट फिरतेय फेसबुकावर. न्यायाच्या प्रतिक्षेत आहे तो. मी त्याच्याशी बोललो होतो.

देशाचं रक्षण करणा-यांच्या कुटुंबाचं रक्षण कोण करणार ?
कशाला उगीच कर्नल महाडिकांच्या पत्नीचं उदाहरण आमीरच्या पत्नीला चिकटवायचं ?

आणखी एक गंमत म्हणजे आमीरचं हे दुसरं लग्न आहे हे सुचवणं. त्याच्ञा पहिल्या बायकोचंही म्हणणे आमीरने द्यायला पाहीजे म्हणे !

ते त्याची पहिली बायको बघून घेईल ना ? इथे एक गुजराती महीला म्हणतेय की अमूक तमूक यांची पत्नी असून मला भीती वाटते .. त्याबद्दल मौन आहे सर्वांचं.

बरं, आमीरच्या पहिल्या बायकोच्या मुलांबद्दल बोलायचंय , ते ही व्हिडीओ न पाहताच तर कमलने स्पष्ट म्हटलंय की देश सोडून जाईन म्हणून ! त्याची किती लग्नं झालीत ? त्याच्या पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलांचं काय ? की हे वाचाळवीर सांभाळ करतात त्यांचा ?

तो प्रश्नही विचारला काल झी न्यूजच्या सुधीर चौधरीनी. त्यांना कशासाठी अवॉर्ड मिळाला याबद्दल कुतूहल आहे.

हे पहा. शहाबुद्दीन केस माघारी घेणार. कारण वाचा..

http://crimeindiaonline.com/news.php?news_id=924

व्यापम घोटाळ्यातील मृत्यू, आसाराम केसमधील साक्षीदारांचे संशयास्पद मृत्यू ही सर्व सहीष्णूतेची उदाहरणं आहेत बहुधा. प्रकरण जुनं झालं म्हणजे संपलं !
लोक विचारतात कुठे आहे असहीष्णुता !!

जक्कलने चार खून केले तेव्हां आख्खं पुणे दहशतीच्या वातावरणाखाली होतंं. जर सरकारमधील मंत्र्यांनी त्या वेळी समर्थन केलं असतं तर ? हत्या किती झाल्या हे महत्वाचं की आमीर म्हणतो तसं सुरक्षित वाटणे महत्वाचे ? माझं काही झालं तर न्याय मिळेल ही भावना महत्वाची ?

माझ्या मते पुरेसं झालं यावर आता.

मला तर नाही असहिष्णुता दिसत असं म्हणणार्यांनी स्वसंवेदना तपासायची गरज आहे. त्या शाबूत असल्या तर ते लोक वाढत्या असहीष्णुतेचा भाग आणि कारण आहेत असं म्हणावंसं वाटू लागलंय. ......अमुकतमुक पटत नाही, मग जा पाकिस्तानात असं म्हटलं गेलं तेव्हा गप्प बसलेल्यांनी अमीरला बोलायचा हक्क गमावलाय असंही.

मी धागा आताच पाहिला.प्रतिक्रिया वरवरच वाचल्या आहेत.(सविस्तर नंतर वाचेन)
पण एक प्रश्न.
जेव्हा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती रागाच्या भरात म्हणते 'मी जाते/जातोच घर सोडून' किंवा 'माझी या घरात घुसमट होते,मला नाही राहायचं इथे'
अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीला कुठे जाता येईल याचे पर्याय सांगता की असं काय झालं,हा/ही अशी भाषा बोलतोय.तुला काही अडचण आहे का,आपण बसून बोलू... काय म्ह्णता..

आमिर वरची टिका पाहून मला माझ्याच भारतीय बांधावांचं आश्चर्य वाटत आहे. कुठेतरी मलाच 'इन्सेक्युअर' वाटतय.

हे घ्या, हे राहीले होते..

आमीर आणि शाहरूखचं शीर धडावेगळं करायला पाहीजे..

http://lokbharat.com/nation/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%...

हे स्टेटमेण्ट देणारे खालील लिंकमधल्या वक्त्यांनापण देशद्रोही ठरवतील का ? कि पाकिस्तानात पाठवणार ?

https://www.facebook.com/photo.php?fbid=1708009192747914&set=a.150802661...

बहुतेक कुणीतरी पाकिस्तानची ट्रॅव्हल एजन्सी घेतलेली दिसतेय साड्या ठेवून घेतांना.

http://zeenews.india.com/marathi/news/india/bjp-mla-commented-on-kiran-r...
उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्याचे भाजपचे आमदार सतीश महाना टीका करत होते. 'आमिर खानची पत्नी किरण रावला अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याची इच्छा असेल. कदाचित अमेरिकेच्या एअरपोर्टवर कपडे उतरवून तपासणी करून घ्यायचीय, म्हणून तिला अमेरिकेला जायचं असेल' असं निंदनीय वक्तव्य महाना महाशयांनी केलं.

- आता ही भाजपाची सहिष्णुता आहे ?
आमिर खानच्या वक्तव्याने सगळ्या भारताचा सहिष्णुतेचा बुरखा फाटला आहे. हे खेदपुर्वक नमुद करावे लागत आहे.

आमिर खानच्या वक्तव्याने सगळ्या भारताचा सहिष्णुतेचा बुरखा फाटला आहे. हे खेदपुर्वक नमुद करावे लागत आहे.<<< बरोबर

काल अमीरखान आणि त्याची जोडीदार यांच्या नावाने व सहिष्णुता यावर बराच कालवा इथे चालला होता.
अमीरखान जे म्हणाला , ते खाजगीत मला सांगणारे आजवर किती लोक भेटले याची सहज उजळणी मनात चालली होती..
पुण्यात आलो की पुण्याला नावं ठेवणारे लोक भेटले..पुण्यात असलेल्या कारकुनांची बदली कोल्हापुरात झाली किंवा अमरावतीला झाली की बँकेच्या व्यवस्थापनाच्या नावानं शंख करणारे भेटले..
माझी लक्ष्मी रस्ता शाखेतून बदली वानवडीला झाली तर " शनिवार रविवार पुण्याला येतोस का ? " असं काळजीपोटी विचारणारे लोकही भेटले...
मजा वाटते.
ही माणसं साधी सरळ असतात. त्यांच्या पोटात मुळात माया, समवेदना असतेच असते..माझ्या टोळीच्या बाहेर पडलात तर मला वाईट वाटेल, कुठंतरी तुटल्यासारखे वाटेल..आणि ती माझ्यापासून अंतरु नकोस,हेही वाटत असतं...
मला अमीरखान परदेशी गेला तर आनंद वगैरे मानायचं काहीच कारण नाही..माझी कितीक माणसं परदेशात आणि परमुलुखात आहेत . सगळी स्वखुशीनं गेलीत. पोटापाण्यासाठी गेलीत...शिकायला गेलीत.
अनेकदा विचारतात.." काय आणू ? "
माझा उत्तर काहीलोकांना ठरलेलं असतं ," तुझ्या घरच्या लोकांना आणतोस त्यातलं काही नको आणुस. आणायचं असेल तर तिथला एक छोटा दगड आण. एखादं वाळून पडलेलं झाडाचं पान नाहीतर फूल आण. पोस्टाची दोन तिकिटे आण. आणि खूप आठवणी आण...मुख्य म्हणजे तू ये."
पूर्वी परदेशी रंग, चित्रांसाठी ब्रशेस , कागद आण , असंही सांगायचो....
आता माझं घर मोठं होत चाललं...आणि पोट भरलंय..असं वाटतं, परमुलखात जाणाऱ्या माणसाला आपण जाताना काहीतरी द्यायला हवं..मग मी माझी दोनचार रंगवलेली चित्रं देतो.. भेटपत्रे देतो. भरपूर देतो...सांगतो...ज्या घरात राहणार आहेस, तिथल्या यजमानाच्या हातात प्रेमानं दे, त्याला संग, खास तुझ्यासाठी दिलीप लिमये या माझ्या मित्रानं दिलंय.
तुम्हाला सांगतो..जो परमुलुखात चाललाय, त्याला प्रेम द्या..माया लावा. त्याला सांगा..".तू मला इथे दिलेला स्नेह तसाच राहू दे. तो तिथे पेर. तिथं तुझ्या लावलेल्या रोपांचे वृक्ष होतील.त्याला फळं येतील..ती तिथंच ठेव..पण त्याच्या बिया मला पाठवून दे."
----
अमीरखान इथून गेलाच , तर मला मात्र काहीतरी तुटल्यासारखं वाटेल..इथल्या बक्कळ माणसांनी त्याला एकत्र येऊन लई श्राप दिले. मला या माणसाच्या पडद्यावरील सहवासाने नक्कीच आनंद दिलाय. आण्णा हजारे यांना दिल्लीच्या त्यांच्या उपोषणाच्या वेळी शाल पांघरणारा आमीर मला तेव्हाही खोटा वाटला नाही..सत्यमेव जयते पाहून त्याने मला अनेकदा अस्वस्थ केलेय...कोकाकोलाच्या जाहिरातीत त्यानं उभा केलेला गुरखा आणि बंगाली बाबू यांना मी मनापासून दाद दिलीय...खोटं का म्हणून लिहू ?....इथल्या चिल्लर माणसाला त्यानं दुखवावं असं मला आज सुद्धा काही जाणवलं नाही....
उद्या तो गेलाच तर त्याला निरोप नक्कीच देईन,.." गड्या, इथल्या गावकीनं आणि भावकीनं तुला जी काही शब्दांची आणि माणुसकीची शिदोरी बांधून दिली, तेवढीच त्यांच्या घरात होती...जे होतं, तेच दिलं...इथून पुढचा तुझा जगण्याचा प्रवास सुखाचा होवो..."
-----
ज्या पद्धतीनं काल जे वाचलं, त्यामुळं मला वाटलं, अमीर सुपात आहे,आणि कितीतरी जात्यात आहेत...आता ही एका मोठ्या झुंडीच्या आक्रमक होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे..." मोदींच्या कार्यपद्धतीविषयी तक्रार आहे का, मग हो आमच्या देशापासून बाहेर..संघाविरुद्ध बोलतोस ? खाजगीतसुद्धा बोललास तर याद राख....मुसलमान जातीत जन्मलेल्या माणसांशी मैत्री करतोस ?चाल निघ पाकिस्तानात..." या मनोवृत्तीची माणसं एकेकटी होती...आता त्यांना समजलं की, आता आपण एकत्र दंगा करू शकतो. मनातलं शल्य इथ लिहिलं की काही चार ठराविक माणसं एकदम लिहायला लागतात..एरवी माझं लिखाण, चित्रं, छायाचित्रं त्यांनी आपली म्हणून पाहिलेली नसावीत..कारण प्रतिसाद कधी मिळत नाही...पण लिमये त्याचे राजकीय निष्कर्ष मांडतोय,,मग लिहायलाच हवं...
--------
अयोध्येत असहिष्णू वृत्तीनं रामाचं वादात सापडलेलं मंदिर पडल्यानंतर एक वल्गना होती.." यह तो केवल झांकी है...."
--------
अमीरखान व मंडळी..
भारतीय आणि चेहरा झाकून घेतलेल्या अतिभारतीय समाजाने इथून पुढच्या आयुष्याला नवीन वळण देणारा एक ओंगळ आणि अविवेकी धडा काल दिला, त्यातून डोळे उघडे ठेवणाऱ्या सगळ्या माणसांनी--माझ्यासह सगळ्यांनी--काहीतरी शिकावे, असे मला वाटते.
२६/११/१५

दिलीप लिमये यांच्या वॉलवरून साभार.

Pages