कांगावा करावा तर असा.
.
.
सत्यमेव जयते या सुंदर कार्यक्रमात केलेले दावे हे आमिर खान या व्यक्तीचे नव्हते, तर तो कार्यक्रम चालवणा-या पात्राचे होते, हे मधूनमधून दिसू लागले आहे.
आताच्या तथाकथित असहिष्णु परिस्थितीची कोणती झळ फाइव्ह स्टार गाड्या, गाद्या किंवा खुर्च्या सदैव ढुंगणाशी असणा-या त्याच्यासारख्यांना लागलेली असते, की त्यामुळे यांना देश सोडून जावेसे वाटते किंवा तसा विचार तरी मनात येतो? शिवाय हा बाण आपल्या पत्नीच्या माध्यमातून मारलेला. याचा अर्थ काय लावायचा, तर मी किंवा शाहरूख, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून केवळ आम्हालाच देशात असहिष्णु परिस्थिती आहे असे वाटत नाही, तर माझ्या हिंदू असलेल्या बायकोलाही तसेच वाटते.
कालच एक तुलना वाचण्यात आली. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी अलीकडेच झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी म्हणते की ती तिच्या दोन्ही मुलांना आर्मीमध्ये जाण्यासाठीच प्रोत्साहन देईल आणि हा इकडे हा दिवटा त्याला प्रत्यक्ष कसलीही झळ लागलेली नसताना किंवा लागण्याची शक्यताही नसताना देश सोडण्याची भाषा करतो आहे.
बरे, याची बायको त्याला खरोखरच तसे म्हणाली असेल किंवा नसेल, पण तू तरी तिला समजावलेस का, की बये, तुला वाटते तसे काही नाही. आपण या देशात सुखरूप आहोत. काही काळजी करू नकोस. तरी चांगला संदेश गेला असता की नाही? तसे तरी काही केल्याचे हा म्हणाला का? म्हणजे या त्याच्याही भावना आहेत का? त्या आहेतच. उगाच नाव मात्र बायकोचे घेतो.
एक विचार मनात येतो, काल सय्यदभाई हे महाराष्ट्रातले सुधारणावादी नेते समान नागरी कायदा आणण्याच्या दृष्टीने व देशातील इतर महिलांचेच हक्क मुस्लिम महिलांनाही मिळावेत या दृष्टीने आपले मत मांडत होते. तथाकथित असहिष्णुतेची झळ लागलीच तर ती आमीरपेक्षा त्यांच्यासारख्या सामान्यांनाच लागत असेल. ते त्याबद्दल काही न बोलता आपले कार्य करतच आहेत. इथल्या म्हणजे ‘हिंदूंच्या’ असहिष्णुतेचे सोडा, उद्या जर इसिससारख्या संघटनेचा येथे थोडा जरी जम बसला, तर सर्वप्रथम सय्यदभाईंसारखे आवाज बंद होणार आहेत. आमीरचे तसेही कशात काही नाही, तर त्याच्यासारख्याला काय धाड भरली आहे कोणास ठाऊक!
सिनेमात दुस-याने लिहिलेले संवाद बोलावे लागतात. सर्वांसमोर माइक हातात आल्यावर अनेकदा खूप बागडायला होते. आमीरचे तसेच झाले की हे संवादही त्याला कोणीतरी लिहूनच दिले होते असे वाटायला जागा आहे.
तेथे जेटलीसाहेबांनी तुझे कांगावखोर बोलणे शांतपणे ऐकून घेतले असेलही, मी तेथे असतो, तर तुला दोन प्रश्न निश्चितपणे विचारले असते.
तिकडे शाहरूख – सलमानचे अनेक वर्षांपूर्वीचे भांडण मिटते आहे, दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत, इकडे आमीर शाहरूखच्या सुरात सूर मिळवताना दिसत आहे. एरवी शाहरूखच्या बोलण्याला काहीही किंमत देण्यासारखे नव्हते.
होय, एकेका घटनेचा अर्थ लागत आहे.
आणि हो, आमिरखानला शिव्या द्यायच्या नाहीत. एवढा समजुतदार वाटला खरा, पण असा घसरला, इतके बेजबाबदारपणे बोलला, त्याबद्दल त्याच्यावर दया करायची.
मी नमोभक्त अजीबात नाही. हे
मी नमोभक्त अजीबात नाही. हे बर्याच ठिकाणी मी लिहुन झालेय. आता तुमच्यासाठी शेवटचे लिहीतेय. अमीर किन्वा सलमान यानी जी मदत केलीय त्याबद्दल कृतज्ञ आहोत, पण म्हणून बाकी विधानाबद्दल काही बोलुच नये अशी तुमची जबरदस्ती का हो?
आणी काय आहे ना, प्रत्येक वेळेस जे प्रत्येकाने केले आहे त्याचा डन्का वाजवलाच पाहीजे असे काही नाही. त्यामुळे उगाच थयथयाट करु नये.
असो, तर मुळ मुद्दा कांगावा
असो, तर मुळ मुद्दा कांगावा करण्याचा आहे.
अमिरने कांगावा केला आहे असे पुर्णपणे खरे वाटत नाहीये.
थयथयाट तुम्ही करत आहे माहीती
थयथयाट तुम्ही करत आहे माहीती नसताना आता माहीती दिल्यावर थयथयाट बंद होईल अशी अपेक्षा आहे
जयन्त १ किन्वा २,३ असाल ते.
जयन्त १ किन्वा २,३ असाल ते. जरा तुमची आधीच्या पोस्टमधली भाषा बघा आणी मग लिहा,ओके?:स्मित:
जयन्त १ किन्वा २,३ असाल ते.
जयन्त १ किन्वा २,३ असाल ते. जरा तुमची आधीच्या पोस्टमधली भाषा बघा आणी मग लिहा,ओके?:स्मित:
आधी आपली भाषा बघावी मग
आधी आपली भाषा बघावी मग इतरांना सल्ला द्यावा.
अहो असे फु. सल्ले द्यायला मी
अहो असे फु. सल्ले द्यायला मी तुमच्या इतकी हुशार नाही हो. आणी कुठली कन्सलटन्ट पण नाही.:अरेरे:
मुळात आमिरच्या विधानाला
मुळात आमिरच्या विधानाला कांगावा का बरं ठरवलं गेलं?? त्याच्या बायकोला असुरक्षित वाटलं, आपण हा देश सोडुन दुसरीकडे जाऊ अस तिला वाटणं यात कांगावा कसला बुवा?? आणि आमिरने बायकोला समजावलं की नही हे त्याला आणि तिलाच माहित्,पण हे महाशय लागलीच बायकोच्या नथीतून तीर वगैरे वगैरे..????
आज असच एक व्हॉटसअॅप आलंय, काय तर म्हणे National मेमोरीअल ला ईजा पोचवली गेली तेव्हा आमिरला असुरक्षित वाटल नाही कां, जेव्हा याकुबच्या अंतयात्रेला १५००० लोक जमले तेव्हा असुरक्षित वाटल नाही कां? तेव्हा का नाही तोंड उघडलं?? किती हिंदु स्टार्स नी आपली तोंड उघडली होती तेव्हा?? कितीजण हुतात्मा स्मारकाकडे धावले होते??? पण तरीही ते देशभक्त आणि याने आपल्याला वाटलली काळ्जी बोलुन दाखवली म्हणुन लगेच याला कुठे जाणार, सिरीया, पाकिस्तान की बांगलादेश, असे प्रश्न?? हीच असहिष्णुता वाढीला लागलिये देशात.
आणि हि बातमी देखील पहा, मग सगळं आलबेल आहे का ठरवा
नवी दिल्ली : २०१५ या वर्षातील सहा महिन्यांच्या काळात गत वर्षातील याच काळाच्या तुलनेत जातीय दंगलींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या जूनपर्यंत देशात जातीय दंगलीच्या ३३० घटना घडल्या, ज्यात ५१ लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, १०९२ जण जखमी झाले आहेत.
http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=7429602
आणि हि आजची बातमी
http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=9668207
राजेश कुलकर्णी, कांगावा हा
राजेश कुलकर्णी,
कांगावा हा शब्द योग्य वाटत आहेच पण त्याहून अधिक तो प्रायोजीत कांगावा वाटत आहे.
'एखाद्याने असे म्हणावे' ह्यासाठी त्याला आमीष दाखवून प्रवृत्त करणे ह्यातील प्रकार वाटत आहे. आमीर खान लाखोंच्या गळ्यातील ताईत आहे. कयामत से कयामत तक पासूनच! त्याने नुसती सुरक्षितता मागीतली तर सर्वधर्मीय त्याच्या घराभोवती कडे करून उभे राहतील. तो किंवा त्याची पत्नी म्हणते तितकी परिस्थिती गंभीर आहे असे निदान जाणवत तरी नाही.
आता लवकरच अमिताभचे स्टेटमेन्ट अपेक्षित आहे.
हो सगळॅच प्रायोजित आहे फक्त
हो सगळॅच प्रायोजित आहे फक्त अनुपमखेर रविना इ. लोकांचे मोर्चा वगैरे हे प्रायोजित या राजकिय नाही
अमिताभ या वादात पडणारच नाही
अमिताभ या वादात पडणारच नाही हे माझे वै. मत आहे. मात्र आता चॅनेलवर लाईव्ह चर्चेत ( मी मराठी वगैरे) लोकानी अमीरची साफ काढली. ८० टक्के ( हा चॅनेलचा आकडा, माझा नाही) लोक म्हणाले की अमीरला इथे भय वाटत असेल तर त्याने स्वतःहून देश सोडावा हे बरे.
दुतोंडी ====== दुतोंडीपणा
दुतोंडी
======
दुतोंडीपणा माझ्यात भिनत चाललाय.
व्यक्त व्हायचं माध्यम हाताशी आहे आणि व्यक्त होण्यासारखे नॉन इश्युज आसपास ढिगाने आहेत. पूर्वी नॉन इश्युज पासून स्वत:ला लांब ठेवता येत होतं. पण आताशा या गावगप्पांचा मी एक भाग झालो आहे. गावगप्पांमधे तीन चार पारांवर मंडळी जमतात. काही उभ्यानेच ऐकणे पसंद करतात. पारावरच्या मंडळींमधे युद्ध पेटलंय. काल काय बोलले ते आज लक्षात नाही आणि आज काल बोललं ते उद्या ध्यानात राहणार नाही अशी अवस्था आहे सा-यांची.
मग या पारांवर कुणीही सुटलेलं नाही. महापराक्रमी शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे. दोघेही पराक्रमाच्या बाबतीत वंद्य. पण हल्ली यांची वाटणी झालीय. भावना दुखावण्यावरून. कुठल्या महापुरूषावरून कुणाच्या भावना दुखणार हे अलिखित नियम ठरलेले आहेत. पलिकडे आणखी एक पार आहे. तिथे दबल्या पिचलेल्यांसाठी महालढा उभारणा-या महामानवांवरून भावना दुखावणा-यांचा कंपू आहे. चुकूनही इकडच्या दैवतावरून तिकडच्या पारावरच्यांच्या भावना दुखावत नाहीत.
दुखावल्याच तर मग अमूक द्वेष , तमूक द्वेष, बी ग्रेडी, सी ग्रेडी आणि ए ग्रेडी अशी वाटणी आहे. कुणा पोटभरू कादंबरीकाराने घातलेल्या काल्पनिक प्रसंगावरून आणि संवादावरून मग बी पारावरच्या भावना दुखावल्या जातात. बी म्हणजे बहुजन पण म्हणू शकता. इथे संख्या जास्त आहे. मग ए पारावरून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा येतो. लेखकाने शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले हे (महाराजांवर ?) उपकारच नाहीत का असा युक्तीवाद येतो. इथे ए म्हणजे अभिजन असं म्हटलं तरी चालेल. बहुजन च्या उलट अल्पजन ऐवजी अभिजन म्हणायचं. बरं वाटतं. आता काहींना अभिजन च्या विरुद्ध बहुजन म्हणजे कायसंच वाटतं. अभिजन च्या विरुद्ध जो काही शब्द असेल तो = बहुजन !
मग पिंगाचा इश्यु येतो. तेव्हां ए पारावरच्यांच्या भावना दुखावतात. मग बी पारावरच्यांना आनंद होतो. साहजिक नाही का ? तेव्हां कसे हसत होतात ? आता बोला ! आता संजय लीला भन्साळीने नाही का बाजीरावाला देशभरात घराघरात पोचवलं, मग त्याच्य़ा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं काय ?
मुद्दा अचूक आहे ना ?
पण मंडळी बाजीराव पेशवे काय किंवा शिवाजी महाराज काय यांच्याकडून आपण काय शिकलो ?
त्याने शेण खाल्ल म्हणून आपण.........
( थोडी कमी हिंस्त्र म्हण होती की.. पण )
पुरंदरेंचं लिखाण संशयास्पद होतं म्हणून. त्या वेळी तुम्ही तसं केलं म्हणून आम्ही आता असं करणार अशाने
युद्ध कधी संपायचंच नाही. कुणीतरी पुढाकार घ्यावा लागेल. आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे वागायचं. माफ करणे हा आपला स्थायीभाव गेल्या काही वर्षात संपत चालला आहे.
अतिरेकी संघटना आपल्या कुकर्माने नष्ट होणार आहेत. माफ करणे याचा अर्थ चुकीच्या गोष्टींना संसदीय मार्गाने विरोध करणे. द्वेष न बाळगता चुकीचा मार्ग सोडण्याचे आवाहन करणे. आपल्या आवाहनातला हेतू निखळ असावा.
ज्यांना आवाहन करायचं आहे ते द्वेषाच्या टोकाकडे पोह्चलेले आहेत, आमीर खानची क्लिप न पाहताच त्याला धर्मावरून शिवीगाळ चालली आहे. आमच्या जिवावर कमावलं म्हणजे नेमकं काय ? कमल हसनने सुद्धा गेल्या वर्षी म्हटलं होत ना की हा देश सोडून कुठल्यातरी सेक्युलर देशात जाईन... त्याने नाही कमावलं ?
आमीरचं वाक्य तपासून पहायला अज्जिबात वेळ नाही लागणार. उचलले बोट लावले की बोर्डला हा प्रकार शाहरूख खानबद्दल पण झालेला. त्याने जे म्हटलंच नाही त्यावरून त्याला झोडलं गेलंय. त्याची मुलाखत आहे ना उपलब्ध ? बघा की !
पेडर रोडला फ्लायओव्हर झाला तर देश सोडून जाऊ असं म्हणणा-या एक नाही दोन दोन गानकोकिळांना, दोन सरस्वतीदेवींना कुणी चीनमधे जायला नाही सांगितलं ! चीन मधे असं करून पहा मग बघा काय होतं ते असं कुणी नाही बोललं ते ?
मग दादरी प्रकरणी कुठलं मांस खाल्लं या संशयावरून विशिष्ट धर्मियाची हत्या करणे हे योग्यच असल्य़ासारखे वातावरण निर्माण झाले तर त्याविरुद्ध ब्र सुद्धा काढायचा नाही का ? तुम्ही अमूक धर्माचे आहेत म्हणून कायदा -स सुव्यवस्था तुमच्यासाठी नाही, आम्ही ठरवू काय ते हे चित्र असुरक्षितता नाही पैदा करत ?
मग कुठली उदाहरणं द्यायची ? सीरीया ?
काही माहीत आहे का त्याच्या मुळाबद्दल ? आता पुतीनने कारवाई सुरू केल्याबरोबर अमेरिका धास्तावते याचा अर्थ काय होतो ? फ्रान्समधे हल्ला होतो आणि मास्टरमाइंड कारवाईत ठार केला जातो याचा अर्थ काय होतो ? आयसिस हे इतकं साधं प्रकरण आहे की भारतातल्या मुस्लिमांना त्याबद्दल जाब द्यावा लागेल ?
आणि त्याच प्रश्नावर तर आमीर खान उत्तर देत होता ना !
आता त्याच्या सिनेम्य़ाच्या प्रमोशनचा स्टंट असेल तर मात्र त्या पब्लिसिटी कंपनीचा निषेध करायला पाहीजे. जाणूनबुजून विधान तोडून मोडून पसरवायचं आणि नंतर तो नेमकं काय म्हणाला हे हळूच दाखवायचं. हे तंत्र घातक आहे. त्याला आवर घालायल हवा.
पण या निमित्ताने माझा दुतोंडीपणा मी जगासमोर मांडला. नीट वाचा ना लेख बाप्पा !
किती ठिकाणी निसरडी कसरत झालीय माझ्याकडून.
चुकलोय तो मी हो बाप्पा !
मी दुस-याला भावना दुखावण्यावरून लेक्चर्स देतो, पण माझ्या भावना दुखावल्या की सैरभैर होतो. शिवीगाळ करतो. मला भान राहत नाही. समोर येईल त्याला कापून काढावंसं वाटतं. मग शिव्या देऊन शांत झालो की दुस-याच्या भावना दुखावल्यावर प्रवचन द्यायला मला खूप आवडतं.
मी ,
बरं का मंडळी !
मीच
तो मी नव्हेच वाला मी नव्हे
तरी पण..
कुणी स्वत:वर ओढवून घेऊन रुसून बसलं तर नाईलाज आहे.
मी माझी बदनामी करतोय. कारण मी खूप खूप दुतोंडी आहे, वाईट्ट आहे.
सहमत ना ?
त्यातले पेड आर्मीच्या
त्यातले पेड आर्मीच्या लोकांनीच मेसेज पाठवले असतील बाकी बिहार निवडणुकि मधे कळाले आहे
परंतु आमिरसारख्या संवेदनशील
परंतु आमिरसारख्या संवेदनशील कलावंताला असे का वाटले हा खरा प्रश्न आहे.
श्री.Ajay Maktedar यांच्या
श्री.Ajay Maktedar यांच्या Wall वरून साभार....
***********************************
We are not Matured...enough..
---
ठिकाण - रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळा.
(संभाषण इंग्रजीतुन)
आमीरला प्रश्न - पुरस्कारवापसी विषयी मत
आमिरचे उत्तर - कोणताही अहिंसक निषेधाचा मार्ग हा मला निषेधाचा योग्य मार्ग वाटतो.
आमिरला प्रश्न - पण तू असहिष्णुता वाढते आहे या त्यांच्या मताशी सहमत आहेस काय ?
आमिर सहमती दर्शवत म्हणाला -
“As an individual, as a citizen, certainly I have also been alarmed, I can’t deny it, by a number of incidents,” he said, “For us, as Indians, to feel a sense of security, two-three things are important. The sense of justice gives a lot of security to the common man. The second thing, that is important, are the people who are the elected representatives, at the state level or the level of the Centre… when people take law in their own hands, we look upon these representatives to take a strong stance, make strong statements and speed up the legal process to prosecute such cases. It doesn’t matter who the ruling party is.”
पुढे बोलताना तो म्हणाला (यावरुनच वातावरण गरम केले जात आहे)
“(Wife) Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers everyday. That does indicate that there is a sense of growing disquiet,”
याचा मराठीत अर्थ -
किरण आणि आम्ही सबंध आयुष्यभर भारतात राहिलो, राहत आहोत; परंतु प्रथमच किरण मला म्हणाली, आपण भारत सोडून जाऊ या का ? आणि हे खूप धक्कादायक आणि प्रचंड भयानक विधान आहे. तिला तिच्या मुलाची चिंता वाटते. तिला आजूबाजूच्या वातावरणाची भीती वाटते. दररोजचं वर्तमानपत्र उघडताना तिच्या मनात धास्ती असते. आजूबाजूला किती भीतीदायक अशांततेचं वातावरण आहे याचं हे निदर्शक आहे.
(वरील घटनेचा व्हिडिओ उपलब्ध आहे.एक्सप्रेसला जशीच्या तशी वाक्य छापुन आली आहेत)
----
डबल पोस्ट
डबल पोस्ट
>>>अमिताभ या वादात पडणारच
>>>अमिताभ या वादात पडणारच नाही हे माझे वै. मत आहे.<<<
अगदी सहमत रश्मी! उपरोधिक ताशेरा होता तो! अमिताभ एकेकाळी राजीवजींच्या सरकारमधील खासदार होता आणि बोफोर्सचे आरोप झाल्यावर त्याने खासदारकी सोडली होती. राजीवजींच्या दुर्दैवी हत्येनंतर त्याने सोनियांना सक्रीय राजकारणात येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला होता.
पण आत्ताची 'कांगावखोर' परिस्थिती अशी आहे की देवच जाणे कधी कोण कोणावर उलटेल. म्हणून म्हणालो की आता बहुधा अमिताभही म्हणेल की येथे काही खरे नाही.
आणि खरे तर आश्चर्य वाटणारही नाही जर तो तसे म्हणाला तर!
आपण आमिरला इतके प्रश्न
आपण आमिरला इतके प्रश्न विचारून आपण असहिष्णू होत चालल्याचे दाखवून देत आहोत, हे मला वाटते. निव्वळ अनुल्लेख केला असता तर चांगले झाले असते.
>>अमिरने कांगावा केला आहे असे
>>अमिरने कांगावा केला आहे असे पुर्णपणे खरे वाटत नाहीये.
आमिर हा पहिल्यापासुन चांगला असल्याचे वाटत होतेच. ते अजुनही तसेच असल्याचे पाहून आनंद वाटला.
अमिताभनेही कांगावा केला. पण
अमिताभनेही कांगावा केला. पण त्यांचे आडनाव खान नाही ना! The Indian cinema from its beginning has taught us the lessons of finding love, justice and social unity. And most importantly the banishment of communal prejudices and hatred," Bachchan said during his inaugural speech at the 21st Kolkata International Film Festival. "It is essential to recall the lessons of equality and cultural diversity taught by Rabindranath Tagore at a time when cultures are being questioned and prejudices against communities are dividing the world."
अनेकांनी पुरस्कारवापसी केलीय
अनेकांनी पुरस्कारवापसी केलीय आमिरसारखा कलावंत अशी विधाने करतोय हे नक्किच चिंताजनक आहे.कुणी काय खावे, कुठले कपडे घालावे, स्त्रियांना मंदिर प्रवेशासाठि स्कँनर लावु अशी विधाने करणे एखाद्या मुस्लिमाने काही न पटणारे विधान केले तर पाकिस्तानात जायचे सल्ले देणे ज्यांच्या पुर्वजांनी फाळणीच्या वेळी हा देश सोडला नाही आपला मानला त्यांना हा देश सोडुन जा म्हणण्याची असहिष्णुता या देशात का बळावली?
टागोरांनी लिहिलेले एक गीत
टागोरांनी लिहिलेले एक गीत कश्यासाठी आहे ह्यावर मागे एक चर्चा झालेली होती.
अमिताभ असे बोलणार ह्याचे आश्चर्य वाटणार नाही हे आधीच म्हंटलेले आहे.
तो 'खान' नसल्यामुळे अडचण झालेली असावी. पूर्वसंचित असा शब्द आहे त्यासाठी!
धाविघाभूंचे धाग्यावर हार्दिक
धाविघाभूंचे धाग्यावर हार्दिक स्वागत!
देशाचा राजकिय स्वातंत्र्यलढा
देशाचा राजकिय स्वातंत्र्यलढा हा सर्वधर्मियांनि लढला. फाळणी झाली ज्यांना जायचे ते गेले बाकीच्यांनी किती दिवस स्वताला प्रुव्ह करायचे आणि का?
>>> सचिन पगारे | 24 November,
>>> सचिन पगारे | 24 November, 2015 - 20:50 नवीन
देशाचा राजकिय स्वातंत्र्यलढा हा सर्वधर्मियांनि लढला. फाळणी झाली ज्यांना जायचे ते गेले बाकीच्यांनी किती दिवस स्वताला प्रुव्ह करायचे आणि का?
<<<
ज्यांना जायचे ते कोणत्या निकषावर गेले?
ज्यांना जायचे ते कोणत्या
ज्यांना जायचे ते कोणत्या निकषावर गेले पगारे?
आमिरखानला या प्रकरणावरून
आमिरखानला या प्रकरणावरून देशद्रोही वगैरे म्हणण्याचे अजिबात कारण नाही. भाजप-शिवसेनेने यावरून त्याची वैयक्तिक कारणांवरून मानहानी करणे चालू आहे. शिवसेनेचे कोकणातले एक मंत्री इतकी वर्षे आम्ही सापाला दूध पाजले असे विधान केले आहे ते अगदी बिनडोकपणाचे आहे. शिवसेनेच्या एक प्रवक्त्या त्याच्यावर देशद्रोहाबद्दल कारवाई करावी असे वाट्टेल ते बोलत आहेत. तेव्हा आमीरखानवर टीका करताना त्याचे आधीचे लग्न, पीकेसारखे सिनेमे व वैयक्तिक बाबी यात आणू नयेत अशी विनंती आहे.
जे गेले ते धर्माच्या आधारावर
जे गेले ते धर्माच्या आधारावर त्यांना धर्मावर आधारित देश आपलासा वाटला . पण ज्यांनि हा देश हेच सर्वस्व मानुण दुसरी भुमि देश म्हणुन स्विकारली नाही त्यांनि किति काळ संशयाच्या भोवर्यात रहायचे.ह्या देशातिल काही नागरिकांना दुसर्या नागरिकांना पाकिस्तानात जा हे सांगायचा अधिकार कोणि दिला? येथे जो कोणी आहे देशाचा नागरिक आहे कुणिही दुय्यम नागरिक नाही हे ठासुन सांगणे हे सरकारचे कर्तव्य आहे त्यात हे सरकार कमी पडतय.
काहींना गेले त्यांची पडली आहे
काहींना गेले त्यांची पडली आहे जे आहे त्यांच्याबद्दल विचार करत नाही
पिके सिनेमाचा आमिर खान एक
पिके सिनेमाचा आमिर खान एक हिस्सा होता सर्वस्व नव्हता. कथा अभिजित जोशी ह्यांची होती तर डायरेक्टर व निर्माता वेगळा होता. ह्या चित्रपटावर टिका करताना फक्त आमिर खानला लक्ष्य का केले जाते? कारण तो मुस्लिम आहे.एक अभिनेता हा लेखकाने लिहीलेले संवाद बोलतो तर दिग्दर्शकाच्या मागणिनुसार अभिनय करतो.मग त्या लेखक व दिग्दर्शकावर का जहरी टिका होत नाहि?
आणि पिके ह्या चित्रपटात काय वाइट होते आपल्याला आरसा दाखवण्यात आला त्यात आपण कुरूप दिसलो म्हणुन आरश्याला दोष देण्यासारखे झाले.
Pages