कांगावा करावा तर असा.

Submitted by Rajesh Kulkarni on 24 November, 2015 - 00:54

कांगावा करावा तर असा.
.
.
सत्यमेव जयते या सुंदर कार्यक्रमात केलेले दावे हे आमिर खान या व्यक्तीचे नव्हते, तर तो कार्यक्रम चालवणा-या पात्राचे होते, हे मधूनमधून दिसू लागले आहे.

आताच्या तथाकथित असहिष्णु परिस्थितीची कोणती झळ फाइव्ह स्टार गाड्या, गाद्या किंवा खुर्च्या सदैव ढुंगणाशी असणा-या त्याच्यासारख्यांना लागलेली असते, की त्यामुळे यांना देश सोडून जावेसे वाटते किंवा तसा विचार तरी मनात येतो? शिवाय हा बाण आपल्या पत्नीच्या माध्यमातून मारलेला. याचा अर्थ काय लावायचा, तर मी किंवा शाहरूख, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून केवळ आम्हालाच देशात असहिष्णु परिस्थिती आहे असे वाटत नाही, तर माझ्या हिंदू असलेल्या बायकोलाही तसेच वाटते.

कालच एक तुलना वाचण्यात आली. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी अलीकडेच झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी म्हणते की ती तिच्या दोन्ही मुलांना आर्मीमध्ये जाण्यासाठीच प्रोत्साहन देईल आणि हा इकडे हा दिवटा त्याला प्रत्यक्ष कसलीही झळ लागलेली नसताना किंवा लागण्याची शक्यताही नसताना देश सोडण्याची भाषा करतो आहे.

बरे, याची बायको त्याला खरोखरच तसे म्हणाली असेल किंवा नसेल, पण तू तरी तिला समजावलेस का, की बये, तुला वाटते तसे काही नाही. आपण या देशात सुखरूप आहोत. काही काळजी करू नकोस. तरी चांगला संदेश गेला असता की नाही? तसे तरी काही केल्याचे हा म्हणाला का? म्हणजे या त्याच्याही भावना आहेत का? त्या आहेतच. उगाच नाव मात्र बायकोचे घेतो.

एक विचार मनात येतो, काल सय्यदभाई हे महाराष्ट्रातले सुधारणावादी नेते समान नागरी कायदा आणण्याच्या दृष्टीने व देशातील इतर महिलांचेच हक्क मुस्लिम महिलांनाही मिळावेत या दृष्टीने आपले मत मांडत होते. तथाकथित असहिष्णुतेची झळ लागलीच तर ती आमीरपेक्षा त्यांच्यासारख्या सामान्यांनाच लागत असेल. ते त्याबद्दल काही न बोलता आपले कार्य करतच आहेत. इथल्या म्हणजे ‘हिंदूंच्या’ असहिष्णुतेचे सोडा, उद्या जर इसिससारख्या संघटनेचा येथे थोडा जरी जम बसला, तर सर्वप्रथम सय्यदभाईंसारखे आवाज बंद होणार आहेत. आमीरचे तसेही कशात काही नाही, तर त्याच्यासारख्याला काय धाड भरली आहे कोणास ठाऊक!

सिनेमात दुस-याने लिहिलेले संवाद बोलावे लागतात. सर्वांसमोर माइक हातात आल्यावर अनेकदा खूप बागडायला होते. आमीरचे तसेच झाले की हे संवादही त्याला कोणीतरी लिहूनच दिले होते असे वाटायला जागा आहे.

तेथे जेटलीसाहेबांनी तुझे कांगावखोर बोलणे शांतपणे ऐकून घेतले असेलही, मी तेथे असतो, तर तुला दोन प्रश्न निश्चितपणे विचारले असते.

तिकडे शाहरूख – सलमानचे अनेक वर्षांपूर्वीचे भांडण मिटते आहे, दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत, इकडे आमीर शाहरूखच्या सुरात सूर मिळवताना दिसत आहे. एरवी शाहरूखच्या बोलण्याला काहीही किंमत देण्यासारखे नव्हते.

होय, एकेका घटनेचा अर्थ लागत आहे.

आणि हो, आमिरखानला शिव्या द्यायच्या नाहीत. एवढा समजुतदार वाटला खरा, पण असा घसरला, इतके बेजबाबदारपणे बोलला, त्याबद्दल त्याच्यावर दया करायची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमल हसन त्याच्या देश सोडून सेक्युलर देशात जाण्याच्या धमकीचा पुनरुच्चार करताना.
https://www.youtube.com/watch?v=fnPv66v__w4

पेडर रोड उड्डाणपूल प्रकरण
m.ibnlive.com/news/politics/uddhav-targets-raj-thackeray-over-flyover-issue-426213.html

Raj Kulkarni
2 hrs · Edited ·
देश सोडून जाण्याची भाषा निषेधार्हच आहे. उलट वाढलेल्या असहिष्णूतेच्या विरोधात लोकशाही मार्गाने व्यापक लढा उभा करण्यासाठी योगदान द्यायला हवे. परंतु एका गोष्टीचे आकलन होत नाहीए, संवैधानिक पदावर असलेल्या, एखाद्या जवाबदार व्यक्तीच्या "कुठल्या जन्माच्या पापाची शिक्षा म्हणून या देशात जन्म घेतला" या वक्तव्यावर टाळ्या पडणा-या देशात, एका संवैधानिक पदावर नसलेल्या व्यक्तीच्या "माझ्या बायकोच्या मनात देश सोडून जाण्याचा विचार मनात आला होता, पण मी तीला त्यापासून परावृत्त केले" या वाक्यावर एवढा वादंग का माजत असेल बरे?

-फेसबूक सभार

सुंदर लिहिलेत.
महाडिकांच्या पत्नीचा वर्तमानपत्रात लिहून आलेला वृत्तांत अगदी आवर्जून तिन्ही मुलांना वाचून दाखवला होता.
मुलाला आधीपासूनच सैन्यात जायचे आहे. हे वाचून तो पुढच्या वर्षीच मला सैनिकी स्कूलात घाल म्हणून मागे लागलाय.

आमिर खान स्वतःची 'पत्नी असं म्हणाली आणि मला ते भितीदायक वाटतं' असं म्हणाला. हे आता कळलं म्हणून प्रतिसाद बदलला.

अहो त्याचा नविन शिनेमा येत हाये, त्यासाठी हा पब्लिसिटी स्टंट आहे..
=+१००००००००००००००००००००००००००००

अहो त्याचा नविन शिनेमा येत हाये, त्यासाठी हा पब्लिसिटी स्टंट आहे..>>
आणि हो एव्हढं होउनही आमच्या intolerable देशातली खुळी जनता त्याची तिकिटे रांगा लाउन घेणार, स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करुन त्या सुमार सिनेमाला ३०० कोट कमवायला देणार. परत वर हे शिव्या वाहायला मोकळे की इंडोलेरन्स वाढला म्हणुन.
ए आर रेहमान ला धमकी दिली तेंव्हा कुठे गहाण होती ह्यांची बुद्धी आणि जीभ, एक चकार शब्दही काढला नाही ते..

जौद्या हो... इथे लोकांना खायला पैसे नाहीत तरी आलेला प्रत्येक चित्रपट ४०० आणि ५०० करोडचा धंदा करतोय. सलमानचा खटला चालु होता तेव्हा किती बोंबाबोंब झाली. तरी टुकार प्रेम धन.. गल्ला जमवतोयच ना....

असली मुर्खासारखी विधाने करणार्‍या "सर्व" कलाकारांना डोक्यावरून खाली उतरविण्याची वेळ आली आहे!! ते काम जनतेनेच केले पहिजे. आपल्या परीने आपण त्यांच्या करोड क्लबमध्ये आपले योगदान न देणे एवढे तरी करू शकतो.

Aamir Khan का बयान देश की छवि बिगाड़ने की कोशिश है: किरेन रिजीजू

"कुठल्या जन्माच्या पापाची शिक्षा म्हणून या देशात जन्म घेतला" हे वक्तव्य बहुतेक देशाची प्रतिष्ठा वाढवणारे होते. असो असते एकेकाची निष्ठा.

"कुठल्या जन्माच्या पापाची शिक्षा म्हणून या देशात जन्म घेतला" असे कुणीतरी म्हटले म्हणुन आमीर खान जे बोलला ते योग्य आहे हे समर्थन होउ शकत नाही.
इथे आपण तुलना का करतोय?

काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी अलीकडेच झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी म्हणते की ती तिच्या दोन्ही मुलांना आर्मीमध्ये जाण्यासाठीच प्रोत्साहन देईल >

वरील वाक्याचे पोस्टर बनवून काही सोशल मिडीयामधे फिरवत आहे त्यांना विचारायचे आहे की त्यापैकी किती जणांनी स्वतःची मुल सैन्यात पाठवली आहे अथवा तसे प्रोत्साहन देत आहे ? "कांगावा करावा तर असा" समर्पक आहे

पण अमीरच्या पहिल्या बायकोला असे का वाटले नाही?:अओ:

की ती ( रीना दत्ता- अमीरची पहिली बायको, दोन मुलान्ची आई- मुले दोन इरा आणी जुनैद ) तितकी इन्टलेक्च्युअल नाहीये? जरा अमीरने तिचे पण म्हणणे पेप्रात द्यावे. उगाच पहिलीवर अन्याव कशाला? तिला पण मते मान्डण्याचा अधिकार आहे की नाही? किरणमुळे अमीरने धोबीघाट नावाचा सिणुमा काढला होता, पण त्यालाच रवीना टन्दन, अनुपम खेर, परेश रावळ यानी धोबीपछाड घातलाय.

झालच तर पेपरवाल्यानी सलमानच्या भावी वधु ( ज्या कोण असतील नसतील त्या), शाहरुखची गौरी यान्च्या पण मुलाखती घ्याव्यात. पेपरवाले पण येडेच हायेत. येऊ द्या अजून सो कॉल्ड इन्टलेक्च्युअल मुलाखती.

तसेच देशातले सन्धीसाधू साधु-साध्व्या आणी बोलबच्चन नेते याना आवर घातला तर देशातले वातावरण बर्‍यापैकी ठिकाणावर येईल. दररोज पेपरात या लोकान्ची मुक्ताफळे वाचुन वीट आलाय.

या साधु- साध्व्यान्सकट सगळ्या भ्रष्ट्राचारी, लाचखाऊ आणी पैसेखाऊ, जमिनी हडपु-पाणी हडपु नेत्याना अन्तराळात हुसकुन द्यायला पाहीजे. होऊ दे यान्चा त्रिशन्कु!

‘खान’ आडनाव असल्यामुळे आपली विमानतळावर चौकशी झाली, असा कांगावा शाहरूखने केला आणि त्याचा ‘माय नेम इज खान’ सुपरहीट झाला. नंतर सगळ्यांना कळलं की या सिनेमासाठी त्याने तो स्टंट केलेला होता. सलमानने फाशी जाणाऱ्या एका गद्दाराविषयी सहानुभूती दाखवली आणि बजरंगी भाईजानसारखा टुकार सिनेमा सहाशे कोटी कमवून गेला. आता आमीरने वर्षभर आधीच ही दंगल सुरू केलीये. त्यामुळे ‘पीके’ने सातशे कोटी कमावले असतील तर दंगलचं टार्गेट आता हजार कोटींचं असणार!

तसेच देशातले सन्धीसाधू साधु-साध्व्या आणी बोलबच्चन नेते याना आवर घातला तर देशातले वातावरण बर्‍यापैकी ठिकाणावर येईल. दररोज पेपरात या लोकान्ची मुक्ताफळे वाचुन वीट आलाय. >> +१

तसेच देशातले सन्धीसाधू साधु-साध्व्या आणी बोलबच्चन नेते याना आवर घातला तर देशातले वातावरण बर्‍यापैकी ठिकाणावर येईल. दररोज पेपरात या लोकान्ची मुक्ताफळे वाचुन वीट आलाय. >> +१

सध्याच्या सरकारविरुध्द काहीही लिहिले अथवा बोलले की त्यांच्याविरुध्द सोशल मिडीयावरील पेड आर्मीतील जनावर लचके तोडायला जे पळत येतात त्याला Tolerance म्हणतात.
ही सध्याची व्याख्या आहे. अमिर बोलल्या बरोबर भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळणे इ. प्रकार जोमात सुरु केले आहे. परंतू असे काही वर्षांपुर्वी सरकारविरुध्द बोलल्यावर होत नसे.

अमिर बोलल्या बरोबर भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळणे इ. प्रकार जोमात सुरु केले आहे. >>>>>हे चूकीचेच आहे. तो बोलला. बोलण्याचे स्वातन्त्र्य प्रत्येकाला असायलाच पाहीजे. पण आपण काय बोलत आहोत याचा तर विचार करावा. आतापर्यन्त इतके बॉम्बस्फोट झाले, तेव्हा या लोकानी पाकड्यान्विरुद्ध का नाही आवाज उठवला? वरतुन म्हणतात की पाकी कलाकार पण माणुसच आहेत, कलेला धर्म, जात नसते. हो का? मग आमच्याकडल्या स्फोटात बरेच निरपराध मारले गेले त्यान्चा धर्म कोणता होता बर? त्या वेळेस नाही या अमीर-शाहरुख ने आवाज उठवला? आताच वाटायला लागले के हे सर्व?

त्या वेळेस नाही या अमीर-शाहरुख ने आवाज उठवला? > नमोभक्तांसारखे कृपया इथे बोलू नये. त्या त्या वेळेस त्यांनी निषेध व्यक्त केला आहे आमिर खान ने ऑगस्ट महिन्यातच ११ लाख मुख्यमंत्र्यांच्या जलशिवार योजनेत दिले आहे त्याचा खुद्द फडणवीसांनीच ट्विट करून आभार मानले आहे. आधी वाचून घ्या मग प्रश्न विचारावे.
स्वतः किती मुख्यमंत्री कोषात मदत केली २६/११ च्या वेळॅस रक्तदान केले याची आठवण करून घ्यावी मग सर्वांनी इतरांविरुध्द बोलावे.

खरेतर अमिर बद्दल माझे मत चांगले आहे (होते नाही अजुनही आहे).
आत्ताच्या या प्रकाराबाबत नक्की सांगता येत नाही.
कदाचित पुढच्या चित्रपटासाठीची प्रसिद्धी असेल,
कदाचित किरणने सहज उद्गारलेल्या विधानाचा विपर्यास केला गेला असावा.

मग अपुर्‍या माहितीवरून प्रश्न विचारण्याची पात्रता येते ? Uhoh
वापरत नाही मग माहीत काय असणार आहे उगाच प्रश्न उचलायचा म्हणून उचलू नये इतकी समज असायला हवी

Pages