दिवाळीचा फराळ दिवाळीत नकोसा होतो. पण काही दिवसांनी काहींना त्याची आठवण येऊ लागते. मैने प्यार किया, हम आपके है कौन नंतर ऐन दिवाळीत आलेल्या हम साथ साथ है चं प्रेक्षकांना अजीर्ण झालं होतं. नंतर नवा पदार्थ बनवून पाहण्यासाठी मै प्रेम की दिवानी हूं आणि विवाह हे प्रेमपट बनवूनही तोंडाला बसलेली मिठी काही सुटेना.मग पुन्हा जुनाच आयटेम नव्या पद्धतीने पण त्याच परंपरेत बनवून पाहण्याची खेळी या वेळी बॉक्स ऑफीसवर तरी चालली आहे.
सूरज बडजात्याचा सिनेमा हा पोस्टरवरूनच ओळखता येतो. त्यासाठी श्रेयनामावालीची गरज नसते. ते सर्वांचं अरुण गोविल छाप हसू ओठात खेळवणारा सलमान त्याहूनही गोड हसू असणारा आलोकनाथ हे पाहून सूज्ञ प्रेक्षक ताबडतोब ओळखतो कि बडजात्यांचा फराळ आला.
घरांचे भाव गगनात गेल्याच्या जमान्यात आख्खी स्कीम एकाच घरात मावेल एव्हढी भव्य घरं, डोळे दिपवून टाकेल अशी श्रीमंती आणि टचकन डोळ्यांत पाणी आणणारे कौटुंबिक प्रसंग हे याही सिनेमात आहेत. फक्त यावेळी चढत्या भाजणीप्रमाणे यातलं कुटुंब चक्क राजघराणं असल्याने एक नाही दोन नाही तर पाच सहा महाल आहेत. श्रीमंती इतकी की अंगवस्त्रासाठी दिलेलं सामान्य घर हे अॅपलचं कार्पोरेट ऑफीस स्वतःच्या थोतरीत मारून घेईल !
तर अशा या सिनेमाची कथा काय वर्णावी ?
अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी दिलवाले प्रेम हा नवतरुण राजश्रीच्या ध्वनीप्रदूषणाच्या दहा डेसीबल्सच्या मर्यादेत राहून रामलीला सादर करीत असतो. याच मर्यादेत त्याचे पुटपुटते संवाद प्रेक्षकांना कळत असतात. एकीकडे रामलीला सादर करत असताना तो एका राजकुमारीच्या सोशल वर्कला हातभार देखील लावत असतो. राजकुमारीला एक डाव डोळे भरून पहावं एव्हढीच त्याची इच्छा असते. त्याला समजतं की अयोध्येपासून बसने एक दिवसाच्या अंतरावर असणा-या प्रीतमपूर गावी राजकुमारी येणार आहेत. प्रेम दिलवालेला आगापिछा नसल्याने मित्रासोबत तो गावी जायला निघतो.
आणि आपल्याला राजकुमारीचं गंतव्य ठिकाण पडद्यावर दिसू लागतं. रियासतचा फैसला होऊन संभाव्य युवराजांचा राजतिलक व्हायचा आहे. हेच युवराज आपल्या पाहुण्या राजकुमारीचे वाग्दत्त वर असून त्यांचा साखरपुडा व्हायचा आहे हे आपल्याला कळतं. हा प्रसंग ज्या घरात घडत असतो तिथे कॅमेरा अगदी उंचावर टांगूनही घर त्यात मावलेलं नसतं. ते सुरू कुठे होतं नि संपतं कुठे हे शेवटपर्यंत समजत नाही.
कॅमेरा जस जसा युवराजांच्या चेह-यावर येतो तसे आपण सावरून बसतो आणि पाहतो अरेच्चा !
नियतीचा चमत्कार !! आश्चर्य !!!!
पूर्वी कधीही न पाहीले असं अघटीत ! नवल !!
युवराजांचा चेहरा थेट, हुबेहूब प्रेम दिलवालेसारखा. आपण मनात म्हणतो कसं काय ना ? दोघांचे आवाजही सारखे, केस सारखे उंचीसारखी, रंग सारखा आणि वयदेखील सारखं. प्रेक्षक थक्क ! एकाच तिकीटात डबल मनोरंजन ? बोनस शेयर ! पिक्चर चालणार म्हणजे काय दौडणार.
तर युवराजांना एक भाऊ असतो तो दिसायला युवराजांच्या मनात कॉम्प्लेक्स निर्माण करत असतो. त्याचे नाव नील नितीन मुकेश. त्यामुळे तलवारबाजीत युवराज भावाला हरवतात. मग तो आपला देखणा चेहरा घेऊन नवतरूण नायकास अपशकुन करायला वारंवार पडद्यावर येत नाही.
युवराजांना दोन बहीणी असतात. युवराज परंपराप्रिय असल्याचे पहिल्याच सीन मधे आपल्याला कळालेले असते. तर राजकुमारीस ठेसनात रिसीव्ह करायला बहीणीने जावं हे परंपरेप्रमाणे योग्य राहील असा निर्वाळा खानदानी पडीक दिवाणजी कम मुनीमजी कम पागनीस कम पोतनीस कम वाकनीस कम फडणवीस असलेले अनुपम खेर देतात. नायकाचा डबल रोल असल्याने एव्हढी कामे अनुपम खेर यांना एकट्याने करावी लागणार असतात. त्यामुळे अजित वाच्छानी, सतीश शहा, आलोकनाथ यांना नारळ मिळालाय हे आपल्या ध्यानात येतं. गुजराती बनियाचं बजेटवर किती काटेकोर लक्ष असतं हे ही शिकायला मिळतं.
या दरम्यान गाणं बजावणं होत असतं त्यातले शब्द काही लक्षात राहणार नाहीत याची दक्षता रविंद्र जैन यांच्या जागी गुजराती म्हणून आलेल्या हिमेसभाईने घेतलेली असते. पण त्याला गाण्याची संधी न देऊन सूरज बडजात्या आपल्याला संगीताचा कान असल्याचे सुचवून जातो.
बहीणीने ठेसनात जावं ही परंपरा किती शतकं पुरानी आहे हे आपल्याला कळत नाही. अशी काही परंपरा असते हे आपण राजघराण्यात जन्माला आलेले नसल्याने आणि कपाळकरंटे असल्याने आपल्याला कसं ठावे ? या परंपरेसाठी युवराज बहीणींच्या घरी जातात मात्र दारात बग्गी थांबताच वरून एक बहीण एक वस्तू फेकून मारते. त्याला घरात घेतले जात नाही आणि राजघराण्याचा वकील तिथे दाखल होतो. जे काही बोलायचं ते माझ्याशी आधी बोला मी ते त्यांना कळवीन. तुमचा प्रस्ताव योग्य असेल तर त्या तुम्हाला भेटतील. हा अपमान रिचवून युवराज तिला भेटायला घरात घुसतात पण त्यांना धक्के मारून बाहेर काढलं जातं.
त्यानंतर दिवाणजींना तिथेच सोडून रागारागाने युवराज आपल्या घरी , माफ करा महाली निघतात. आपण पडद्यावर पाहतो तो काय बग्गीचालक मळलेली वाट सोडून भलत्याच दिशेने बग्गी हाकू लागतो. युवराजांना झोप लागलेली असते. बग्गी आता अरुंद घाटरस्त्याने धावू लागते. चालक बग्गीचे सर्व दरवाजे बंद करून टाकतो आणि स्वतः आडव्या फांदीला लटकतो. इकडे युवराजांना जाग येते तो बग्गी विनाचालकाची धावतेय. युवराज काच फोडून बाहेर येऊन जीव वाचवू पाहतात पण हाय रे देवा, बग्गी हजारो फुटांवरून खाली कोसळताना दिसते . सोबत युवराज स्काय डाईव्ह करताना दिसतात. पण खाली दरी, दगड धोंडे, एक तालाब इ. इ. असतं आणि युवराजांकडे पॅराशूट देखील नसतं.
प्रेम दिलवाले बस थांबल्यावर राजकुमारीसाठी मिठाई खरेदी करत असताना त्यांना संस्थानातली एक कार दिसते. तो सिक्युरिटी अधिकारी असतो. प्रेम दिलवालेला पाहून तो अत्यंत आश्चर्यचकीत झालेला दिसतो आणि आपल्या कारमधे येण्याची विनंती करतो. प्रेम देखील विश्वास बसत नसताना त्याच्या कारमधे बसतो आणि युवराजांच्या संस्थानात दाखल होतो...
बाप रे बाप ! सुरुवातीलाच क्लायमॅक्स !!
सूरज बडजात्यांनी या वेळच्या फराळात देशोदेशींचे मसाले मिक्स केले आहेत. इतका दारुगोळा ठासून भरल्यानंतर सिनेमात नाती उलगडून दाखवण्यात प्रेम यशस्वी होतो का ? त्याला कुठली कामगिरी मिळते ? युवराजांचं काय होतं ? त्यांना कोण मारण्याचा प्रयत्न करतं ?
मुख्य म्हणजे डबल.रोलचं प्रयोजन काय ? सिनेमात दुसरी हिरॉइन आहे का ? मग सोनम कपूरचं काय होतं ? तिला युवराज मिळतात का की त्यांच्या जागी ड्यआयडी मिळतो या प्रश्नांची उत्तरं पडद्यावरच पहावीत.
सिनेमात आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याच अंदाज आलाच असेल बहुधा. बडजात्या पट म्हटल्यावर निरमाने दुतलेल्या स्क्रीनवर चित्रपट उलगडणार हे कळतंच. बडजात्यांच्या सिनेमातल्या नायिका स्वच्छ दिसतात पण त्या स्नान करतात की नाही हे इतर सिनेम्यांप्रमाणे आपणास कळत नाही. नायक बिना अंघोळीचा , पारोशी असला तरी चालेल पण नायिका कशी शुचिर्भूत असली पाहीजे हा सिनेसृष्टीचा दंडक आहे. त्याचा ढळढळीत पुरावा देण्याची पद्धत बडजात्यांकडे नाही. तरी देखील चित्रपटाने चाळीस कोटीचा डल्ला मारला आहे हे पाहून लिऑनपटांनी तोंडात बोटं घातली असतील.
फराळाचा अंदाज आल्यावर हा फराळ आवडत असेल तर एकदा चाखायला हरकत नाही. पण तोंडाची मिठी अद्याप सुटली नसल्यास वाकडी वाट देखील करू नये. रामायण मालिकेत ज्याप्रमाने हसले, रडले, उठले, बसले या सर्व क्रियांवर रविंद्र जैन यांच्या आवाजात एक अगम्य गाणं असायचं तशी गाणी हिमेसभाईंनी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या मर्यादा पाहता त्याने त्या उघड्या पडू नयेत म्हणून जो काही ढणढणाट केला आहे ते पाहता त्याला दिवाळी आणि दहीहंडीतला फरक ध्यानात आला नसावा असे वाटते. हॉलबाहेर आल्यावर डोकं जड का वाटतंय हे एक झोप काढून झाल्यावर ध्यानात येतं.
मायबोलीकरांनी डबल रोलचा रहस्यभेद सिनेमाहॉल मधे करू नये. सगळ्यांनाच ड्युआयडीचे फायदे तोटे माहीत असतील असे नाही. तुम्ही जर एव्हढे पथ्य पाळलेच तर येताना गुणगुणल्याशिवाय राहणार नाही कि
पायो जी मैने रामरहीम ड्युआय पायो !!
ह्या सि ने मा त , 'रा म' आ णि
ह्या सि ने मा त , 'रा म' आ णि 'र त न' ही ना वे कु णा ची अ स ता त?
>>> वेल सिनेमात "राम नाहिच्चे" आणी हे रतन (रत्न या अर्थाने) कुठुन शोधुन काढल ते सुरजलाच माहित..
(सिनेमाच नाव प्रेम रतन धन पायो आहे)
प्रभू श्रीमचंद्रासारखे रत्न
प्रभू श्रीमचंद्रासारखे रत्न व्हावे हेच धन.
भारी रिव्यु. पण आता बाजीर॑व
हा भण्साळ्या उद्या सीता आणि
हा भण्साळ्या उद्या सीता आणि द्रौपदी यांची फुगडी देखील दाखवील. प्रसंग : द्रौपदीच्या स्वपनात सीता येते आणि त्या फुगडी खेळू लागतात. लिरिक्स :
आपण दोघी मैत्रिणी टांग्यात गं टांग्यात गं ..
फोटु काढू वांग्यात गं वांग्यात गं ...
फू फू फू फू
काय हसले आहे वाचून.
काय हसले आहे वाचून.
व्वाह!!! मजा आली वाचतांना
व्वाह!!! मजा आली वाचतांना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरेच्च्या, पिक्चर दिवाळीत
अरेच्च्या, पिक्चर दिवाळीत आलाय हे सांगण्यासाठी पेश्शल बनवलेल्या त्या चकली चिवड्याच्या गाण्याबद्दल नाही?
राजतिलक चालु असताना वेड्यासारखे पळत जाउन डायरेक्ट नाचायला सुरु करणार्या त्या हिरविणीच्या सीनबद्दल पण काहीच नाही?
सलमानखान एवढा दरी कोसळुन पण फक्त त्याच्या पाठीला इत्तुस्सं लागतं, पाय मोडत नाही कि हात मोडत नाही कि चेहर्याला खरचटचं पण नाही. ते तो बोलिवूड हिरो असल्यामुळे बाय डिफोल्टच असावं म्हणा.
पेरू प्रेक्षकांची उत्कंठा कमी
पेरू
प्रेक्षकांची उत्कंठा कमी होऊ नये यासाठी मोह आवरला. लोकांचा बघून होऊ दे, मग काय सोडायचा का स्वस्तात ?
म्हणजे राजश्री च्या " विवाह "
म्हणजे राजश्री च्या " विवाह " पेक्शा कमी गोडच म्हणायचा .
सोनमच गोड गोड हसू पाहून कंटाळा आला ट्रेलरमध्येच.
सलमान आणि सोनमच्या एज
सलमान आणि सोनमच्या एज डिफरन्सबद्दलहि काल एफ एम वर धमाल ऐकली . आरजे मस्त खेचत होता सोनमची
पाउण्शे वयोमान असलेले कोपचे,
पाउण्शे वयोमान असलेले कोपचे, धम्माल लिहिलय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी समस्त टीनेजर भाचेकंपनीबरोबर पाहिला त्यामुळे मजा आली. टीनेजर्स खुप मजाक उडवत होते. बाकी सलमान होताच त्यामुळे सुसह्य झाला.
भारी लिहलंय असच लिहा!
भारी लिहलंय असच लिहा!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रसप, धमाल लिहिलय >>>>> सस्मित
रसप, धमाल लिहिलय >>>>> सस्मित![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रसप अगं मुली मी वयोमान अवघे
रसप![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अगं मुली मी वयोमान अवघे पाऊणशे असलेला नवयुवक आहे. सलमानपेक्षा थोडासाच मोठा.
भारी आहे परीक्षण
भारी आहे परीक्षण![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त लिहीले !
मस्त लिहीले !
लोल..
लोल..
भन्नाट लिहीलय... मजा आली
भन्नाट लिहीलय...
मजा आली वाचताना...
(No subject)
धम्माल लिहिलंय. खूप हासले
धम्माल लिहिलंय. खूप हासले
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
तसाही थेटरात जाऊन पैसे वाया नाही घालवणार. टिव्हिवर आल्यास ब्रेक ब्रेक करत पाहिन.
हसुन हसुन पुरेवाट
हसुन हसुन पुरेवाट
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आवड कळवलेल्या सर्वांचे
आवड कळवलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
<< बडजात्यांच्या सिनेमातल्या
<< बडजात्यांच्या सिनेमातल्या नायिका स्वच्छ दिसतात पण त्या स्नान करतात की नाही हे इतर सिनेम्यांप्रमाणे आपणास कळत नाही. नायक बिना अंघोळीचा , पारोशी असला तरी चालेल पण नायिका कशी शुचिर्भूत असली पाहीजे हा सिनेसृष्टीचा दंडक आहे. >>
अज्ञान! घोर अज्ञान!! बडजात्यांचे सर्व सिनेमे आपण नक्की पाहिलेत का? दुल्हन वही जो पिया मन भाये नक्की पाहावा. त्यात नायिका रामेश्वरीचे सविस्तर स्नानदृश्य दाखविले आहे. अर्थात त्यावेळी सिनीअर बडजात्या होते. ज्युनिअर बडजात्यांना आंघोळीची (म्हणजे पडद्यावर दाखवायची) अॅलर्जी असावी.
यावरुन जसपाल भट्टी यांचा फ्लॉप शो हा जुना कार्यक्रम आठवला. त्यात एका भागात भट्टी दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते असतात. ते एका अभिनेत्रीला रोल ऑफर करायला जातात असा प्रसंग दाखविला आहे. त्या प्रसंगात ती अभिनेत्री आपण स्नानदृश्य पडद्यावर साकारणार नाही असे सांगते. त्यावर भट्टी चटकन उत्तरतात - "ओह् जी! बाथ सीन्स तो बिलकूल नही होंगे आप फिक्र ना करे! हमे नहानेसे इतनी नफरत है कि हम खुदही हफ्ते हफ्ते नहाते नही है!"
चित्रपट तसाही ऑनलाईनच बघणार
चित्रपट तसाही ऑनलाईनच बघणार होते पण परि़क्षण धम्माल आहे.
अ आणि अ सिनेमा मे बहोत दिनके
अ आणि अ सिनेमा मे बहोत दिनके बाद दमदार एंट्री...
पण 'वायझेड आयलव्ह्यू' अश्या प्रकारची गंमत आहे की नाही गाण्यांमधे?
अंगवस्त्र आणि तत्संदर्भाने प्रतिक्रियांमधले विनोद...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
अशक्य लिहिलंय. दोघांचे आवाजही
दोघांचे आवाजही सारखे, केस सारखे उंचीसारखी, रंग सारखा आणि वयदेखील सारखं. प्रेक्षक थक्क ! >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खानदानी पडीक दिवाणजी कम मुनीमजी कम पागनीस कम पोतनीस कम वाकनीस कम फडणवीस असलेले अनुपम खेर >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रामायण मालिकेत ज्याप्रमाने हसले, रडले, उठले, बसले या सर्व क्रियांवर रविंद्र जैन यांच्या आवाजात एक अगम्य गाणं असायचं तशी गाणी हिमेसभाईंनी देण्याचा प्रयत्न केला आहे. >>
अगदी आठवलं.
ठेसनावर बहिणी निघाल्याबद्दल लिहिताना मध्येच युवराज बहिणींच्या घरी का गेले आणि त्यांना वरुन बहिणींनी वस्तू फेकुन मारल्याने डोक्यावर काय आणि का प्रसाद मिळाला हे जरा कळलं नाही. पण ते कळून घेण्यासाठी हा पिच्चर बघण्याचे धाडस नाही. काही काही रहस्य उलगडली नाही चालतील पण वेडं धाडस करु नये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण वेडं धाडस करु नये >> मो
पण वेडं धाडस करु नये >> मो![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रेम रतन धन पायो बहुत सारा
प्रेम रतन धन पायो
बहुत सारा धन पायो
हद से ज्यादा धन पायो
पर आप इतना धन नही पायो
इस लिये देखने मत जायो
सलमान खान डबल रोल मे आयो
सोनम कपूर को राजकुमारी के रूप मे दिखायो
राज घराने मे iPhone/iPad चलायो
खूब सारी लग्जरी कारे दिखायो
फालतू की सजावट करवायो
हर किसी से इंग्लिश बुलवायो
देश के सारे कल्चर एक ही महल मे घुसायो
अनुपम खेर एक्टिंग की माँ-बहन करवायो
फालतू डायलॉग्स बुलवायो
हम तो गलती से देख आयो
कह रहे हैं मत जायो
कह रहे हैं मत जायो ।।
कह रहे हैं मत जायो कह रहे हैं
कह रहे हैं मत जायो![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कह रहे हैं मत जायो ।।>>
एव्हढे लोक्सांनी नावं ठेउन देखिल आणि जाउ नका हे सांगून देखिल, कोट्यावधी कमावले ह्या शिनेमाने.. कस्काय ते कळतच नाय ब्वॉ!! तेच तेच बिनडोक शिनेमे आणि तेच तेच म्हातारे हिरो त्यांच्या मुला-मुलींच्या (ह्यांच लग्न टायमावर झालं असत तर) वयाच्या पोरींबरुबर नाचताना पाहण्यात काय मजा हे कळत न्हाइ.
Pages